Thursday, July 30, 2026
Home Blog Page 540

संभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून उचलून नेलं!

0
संभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून उचलून नेलं!


Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी घटना घडली आहे. येथील एका मोठ्या व प्रतिष्ठित बिल्डरच्या मुलाचे रात्री खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. संबंधित बिल्डर हा रात्री जेवण झाल्यावर मुलासह फिरत होता. त्याचा मुलगा का सायकलवर मागून येत असतांना एका काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या आरोपींनी त्याला उचलून नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. ही घटना ९ च्या सुमारास सिडको एन-४ मार्गावर घडली.



Source link

निःशुल्क “महाराजा महाविहार (कान्हेरी लेणी)” एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन

0
निःशुल्क “महाराजा महाविहार (कान्हेरी लेणी)” एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन

मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी एक सुवर्णसंधी!
साम्यक सांस्कृतिक संघटनेच्या वतीने निःशुल्क “महाराजा महाविहार अर्थातच कान्हेरी लेणी” या एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याचा उद्देश प्राचीन बौद्ध वास्तुकला, शिल्पकला, तसेच महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारशाचा सखोल अभ्यास करणे आहे.

या अभ्यास दौऱ्यात सूरज रतन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी सदस्यांना कान्हेरी लेणीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी:
जे सदस्य अभ्यास दौऱ्यावर सहभागी होऊ इच्छित आहेत, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिक माहितीसाठी समूहात सहभागी व्हावे.

समूहाची लिंक: https://chat.whatsapp.com/Bbl8yWBBA9r6TKosflfGWR

तपशील:

  • अभ्यास दौरा: महाराजा महाविहार (कान्हेरी लेणी)
  • लेणी अभ्यासक : सूरज रतन जगताप
  • आयोजक: साम्यक सांस्कृतिक संघटना
  • प्रवेश: निःशुल्क

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर महत्त्वाचे निर्णय

0
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर महत्त्वाचे निर्णय


Cabinet Meeting Decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.



Source link

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढीच्या मार्गावर; साताऱ्यात ६ संशयित रुग्णांची नोंद

0
राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढीच्या मार्गावर; साताऱ्यात ६ संशयित रुग्णांची नोंद

सातारा: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome – GBS) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून आतापर्यंत एकूण 168 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, या आजारातून अनेक रुग्ण बरे होत असल्याने दिलासादायक चित्र आहे. सातारा जिल्ह्यात सध्या ६ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी १ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्या माहितीनुसार, साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात २, खाजगी रुग्णालयात १, तर कराडच्या कृष्णा रुग्णालयात २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पाचही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर या रुग्णांना GBS असल्याचे स्पष्ट होणार आहे.


GBS म्हणजे काय?

गुलेन बॅरी सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या नर्व्ह सिस्टमवर हल्ला करते. त्यामुळे हात-पाय बधीर होणे, स्नायूंची कमजोरी, चालताना त्रास होतो. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, जीवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होतो, अशी शक्यता आहे.


राज्यातील GBS चा आढावा (ता. 3 पर्यंतचे आकडे)

  • एकूण रुग्णसंख्या: 168
  • नवीन रुग्णांची नोंद (काल): 10
  • वाटप:
    • 86 रुग्ण ग्रामीण भागातील
    • 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीत
    • 18 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील
    • 19 रुग्ण ग्रामीण पुणे हद्दीत
    • 8 रुग्ण इतर जिल्ह्यातील (पुण्यात उपचार सुरू)
  • डिस्चार्ज मिळालेले रुग्ण: 47
  • आयसीयूमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण: 47
  • व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण: 21

लक्षणे ओळखा:

  • अचानक हातापायात कमकुवतपणा
  • चालण्यात किंवा उभे राहण्यात त्रास
  • अतिसाराचा इतिहास
  • गिळण्यास किंवा श्वास घेण्यास अडचण

काळजी कशी घ्यावी?

  • शुद्ध व उकळलेले पाणी प्या
  • अन्न ताजे आणि स्वच्छ ठेवा
  • वैयक्तिक स्वच्छता राखा
  • अर्धवट शिजलेले अन्न (मांसाहारी) टाळा
  • अशक्तपणा जाणवल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 76 लाख मतदान वाढीवर हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला नोटीस

0
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 76 लाख मतदान वाढीवर हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात 76 लाख नव्या मतदानाच्या नोंदणीवरून निर्माण झालेल्या वादावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सायंकाळी 6 नंतर इतके मतदान कसे वाढले?
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाकडे सायंकाळी 6 वाजेनंतरच्या मतदानाची माहिती आणि व्हिडिओ फुटेज मागितले. न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दोन आठवड्यांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


अॅड. आंबेडकर म्हणाले की, “सायंकाळी सहानंतर किती लोकांनी मतदान केले याची नोंद निवडणूक आयोगाकडे आहे का? आयोगाने शूटिंग केले असल्यास त्याचे व्हिडिओ उपलब्ध करावेत.” आरटीआयच्या माध्यमातूनही ही माहिती मागवण्यात आली होती, परंतु निवडणूक आयोगाने ती नाकारली.

7.6 दशलक्ष मतदानाचा हिशेब नाही?
“सायंकाळी 5 ते 6 या वेळेत झालेल्या 76 लाख मतदानाचा कोणताही अधिकृत डेटा निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही,” असे अॅड. आंबेडकर यांनी न्यायालयात सांगितले. रांगेतील मतदारांना टोकन देण्याच्या प्रक्रियेबाबतही शंका उपस्थित करत आंबेडकर यांनी विचारले की, “मतदान संपण्याच्या आधी शेवटच्या मतदाराला टोकन देण्याची प्रक्रिया झाली का?”

राहुल गांधींचा संसदेत सरकारवर हल्ला
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात अचानक 70 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे, जी हिमाचलच्या लोकसंख्येइतकी आहे. एका इमारतीत 7,000 नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे.”

राहुल गांधी यांनी भाजपवर अप्रत्यक्ष आरोप करत म्हटले की, “ज्या ठिकाणी नव्या मतदारांची नोंदणी झाली, त्या ठिकाणी भाजप जिंकला आहे.” त्यांनी निवडणूक आयोगाकडे लोकसभा आणि विधानसभा मतदार यादी देण्याची मागणी केली आहे.

‘मेक इन इंडिया’वरही टीका
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “2014 मध्ये उत्पादन क्षेत्राचा जीडीपीमध्ये वाटा 15.3% होता, जो आता 12.6% वर घसरला आहे. हे गेल्या 60 वर्षांतील सर्वात कमी आहे.”

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले की, “राहुल गांधी अमेरिकेतील माझ्या दौऱ्याविषयी खोटे बोलत आहेत. मी पंतप्रधानांच्या निमंत्रणासाठी गेलेलो नाही.” यावर राहुल गांधी यांनी उपरोधिक ‘सॉरी’ म्हणत उत्तर दिले.

जलसंधारणासाठी महत्त्वाचे पाऊल! महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे 3 सामंजस्य करार

0
जलसंधारणासाठी महत्त्वाचे पाऊल! महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे 3 सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेसह महत्त्वाचे करार

मुंबई | साहस Times  :- महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या क्षेत्रात मोठे पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मृद व जलसंधारण विभागाने तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) केले. हे करार नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स, आणि भारतीय जैन संघटना यांच्यासह करण्यात आले असून, राज्यातील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, टाटा मोटर्सचे अधिकारी आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सामंजस्य करारांचे तपशील:

1️⃣ टाटा मोटर्स-नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग:

  • राज्यातील 23 जिल्ह्यांतील किमान 1000 जलाशय, चेक डॅम, तलाव, नद्यांमधील गाळ काढून जलसाठवण क्षमता वाढविणे.
  • भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.
  • नाम फाऊंडेशन अंमलबजावणी संस्था तर टाटा मोटर्स प्रकल्प व्यवस्थापक.
  • प्रत्येक जिल्ह्यात वॉटर फेलोची नियुक्ती.

2️⃣ भारतीय जैन संघटना आणि मृद व जलसंधारण विभाग:

  • ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत मागणी संकलन, प्रचार-प्रसार, व जनजागृती.
  • राज्य व जिल्हा स्तरावर समन्वयकांची नियुक्ती.

3️⃣ महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर:

  • राज्यातील जलसंधारण संरचनांचे सॅटेलाईट डेटावर आधारित मॅपिंग व पडताळणी.
  • वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे डेटा नोंदणी.
  • पाच वर्षांच्या कालावधीसाठी करार, भविष्यातील देखभाल-दुरुस्तीचा समावेश.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले:

“नाम फाऊंडेशन ग्रामीण भागात जलसंधारणाबाबत जनजागृती करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनाही जलसंधारणाच्या कार्यात मोठे योगदान देत आहेत. हे करार महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.”

जीबीएसचे राज्यात 168 रूग्णसंख्या; सातारा जिल्ह्यात 6 संशयित रुग्ण, काय आहेत लक्षणे? कशी घ्याल क

0


सातारा: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) ची रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेक रूग्ण या आजारातून बरे होत असल्याची देखील दिलासादायक बातमी आहे. तर सातारा जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)चे  6 संशयित रुग्ण, 1 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात 2, खाजगी रुग्णालयात 1, कराडच्या कृष्णा रुग्णालयात 2 अशा एकूण 5 जणांवर उपचार सुरू आहेत. पाचही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रयोग शाळेतील वैद्यकीय तपासणी नंतर गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) चे निदान स्पष्ट होणार असल्याची माहिती देखील जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी दिली आहे.

काय आहेत लक्षणे

अचानक हाता-पायात येणारा कमकुवतपणा
अचानक चालायला, उभे राहायला त्रास होणे
आधी जास्त दिवसांचा अतिसार झालेला असणे
खाण्यास, गिळण्यास त्रास होणे

काय काळजी घ्याल?

पिण्याचे पाणी दूषित नाही याची खात्री करा
अन्न स्वच्छ व ताजे असावे
वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या
शिळे किंवा अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खाऊ नये
ताप, उलट्या, जुलाब असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

जीबीएस रोग म्हणजे काय?

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.

जीबीएसचे राज्यात 168 रूग्ण

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काल( सोमवारी ता -3) 10 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आत्तापर्यंतची रुग्णसंख्या 168 इतकी झाली आहे. यातील 86 समाविष्ट गावांतील, 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, 18 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील, तर 8 इतर जिल्ह्यांतील आहेत, जे पुण्यात उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 47 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, 47 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. एकूण रुग्णांपैकी 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..



Source link

गॅरेज कामगाराची मारहाणीमुळे मृत्यू; चार जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

0
गॅरेज कामगाराची मारहाणीमुळे मृत्यू; चार जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

पुणे – एका विवाह प्रस्तावावरून झालेल्या वादात गॅरेजमध्ये काम करणाऱ्या दिलीप यल्लप्पा अलकुंटे (वय ४५) या कामगाराची मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रामजी निलू राठोड, अनुसया रामजी राठोड, करण रामजी राठोड आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:
दिलीप अलकुंटे यांच्या पत्नीचे काही काळपूर्वी निधन झाले होते. गॅरेजवर काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिलीप यांनी रामजी राठोड या बिगारी कामगाराकडे त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची विचारणा केली होती. यावरून वाद निर्माण झाला आणि “तुझे वय काय आणि आमच्या मुलीचे वय काय?” असा सवाल करत रामजी राठोड व त्याच्या कुटुंबीयांनी दिलीप यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी सळ्याने बेदम मारहाण केली.

ही घटना शनिवारी रात्री गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे मैदान परिसरात घडली. गंभीर जखमी अवस्थेत दिलीप यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान दिलीप यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात खूनाचा कलम वाढवले आहे.

पोलिस तपास:
या प्रकरणी दिलीप यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिसांनी रामजी राठोड व अनुसया राठोड यांना अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Nagpur Crime : टी शर्ट बनला मृत्यूचं कारण; नागपुरात ३०० रुपयांसाठी दोन भावांनी तरुणाचा गळा चिरला

0
Nagpur Crime : टी शर्ट बनला मृत्यूचं कारण;  नागपुरात ३००  रुपयांसाठी दोन भावांनी तरुणाचा गळा चिरला


नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या मित्राचा टीशर्ट चे ३०० रुपये दिले नाहीत म्हणून खून केला. ३०० रुपयावरून दोन मित्रात वाद झाला त्यानंतर एकाने आपल्या भावाच्या मदतीने दुसऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे.



Source link

हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला झटका..! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाचा करावा लागणार खुलासा

0
हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला झटका..! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाचा करावा लागणार खुलासा


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांनाच अनपेक्षित असे लागले आहेत. निकालानंतर राज्यात मोठ्या मताधिक्याने महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. पण या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केली आहे. विरोधकांनी ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या पार्श्वभूमीवर वंजितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात ईव्हीएम विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली असून मतदानाच्य़ा दिवशी शेवटच्या काही तासात वाढलेल्या मतांच्या टक्क्याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.



Source link