Monday, September 14, 2026
Homeसाताराराज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढीच्या मार्गावर; साताऱ्यात ६ संशयित रुग्णांची नोंद

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढीच्या मार्गावर; साताऱ्यात ६ संशयित रुग्णांची नोंद

सातारा: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome – GBS) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून आतापर्यंत एकूण 168 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, या आजारातून अनेक रुग्ण बरे होत असल्याने दिलासादायक चित्र आहे. सातारा जिल्ह्यात सध्या ६ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी १ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्या माहितीनुसार, साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात २, खाजगी रुग्णालयात १, तर कराडच्या कृष्णा रुग्णालयात २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पाचही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर या रुग्णांना GBS असल्याचे स्पष्ट होणार आहे.


GBS म्हणजे काय?

गुलेन बॅरी सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या नर्व्ह सिस्टमवर हल्ला करते. त्यामुळे हात-पाय बधीर होणे, स्नायूंची कमजोरी, चालताना त्रास होतो. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, जीवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होतो, अशी शक्यता आहे.


राज्यातील GBS चा आढावा (ता. 3 पर्यंतचे आकडे)

  • एकूण रुग्णसंख्या: 168
  • नवीन रुग्णांची नोंद (काल): 10
  • वाटप:
    • 86 रुग्ण ग्रामीण भागातील
    • 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीत
    • 18 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील
    • 19 रुग्ण ग्रामीण पुणे हद्दीत
    • 8 रुग्ण इतर जिल्ह्यातील (पुण्यात उपचार सुरू)
  • डिस्चार्ज मिळालेले रुग्ण: 47
  • आयसीयूमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण: 47
  • व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण: 21

लक्षणे ओळखा:

  • अचानक हातापायात कमकुवतपणा
  • चालण्यात किंवा उभे राहण्यात त्रास
  • अतिसाराचा इतिहास
  • गिळण्यास किंवा श्वास घेण्यास अडचण

काळजी कशी घ्यावी?

  • शुद्ध व उकळलेले पाणी प्या
  • अन्न ताजे आणि स्वच्छ ठेवा
  • वैयक्तिक स्वच्छता राखा
  • अर्धवट शिजलेले अन्न (मांसाहारी) टाळा
  • अशक्तपणा जाणवल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments