Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रजलसंधारणासाठी महत्त्वाचे पाऊल! महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे 3 सामंजस्य करार

जलसंधारणासाठी महत्त्वाचे पाऊल! महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे 3 सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेसह महत्त्वाचे करार

मुंबई | साहस Times  :- महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या क्षेत्रात मोठे पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मृद व जलसंधारण विभागाने तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) केले. हे करार नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स, आणि भारतीय जैन संघटना यांच्यासह करण्यात आले असून, राज्यातील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, टाटा मोटर्सचे अधिकारी आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सामंजस्य करारांचे तपशील:

1️⃣ टाटा मोटर्स-नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग:

  • राज्यातील 23 जिल्ह्यांतील किमान 1000 जलाशय, चेक डॅम, तलाव, नद्यांमधील गाळ काढून जलसाठवण क्षमता वाढविणे.
  • भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.
  • नाम फाऊंडेशन अंमलबजावणी संस्था तर टाटा मोटर्स प्रकल्प व्यवस्थापक.
  • प्रत्येक जिल्ह्यात वॉटर फेलोची नियुक्ती.

2️⃣ भारतीय जैन संघटना आणि मृद व जलसंधारण विभाग:

  • ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत मागणी संकलन, प्रचार-प्रसार, व जनजागृती.
  • राज्य व जिल्हा स्तरावर समन्वयकांची नियुक्ती.

3️⃣ महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर:

  • राज्यातील जलसंधारण संरचनांचे सॅटेलाईट डेटावर आधारित मॅपिंग व पडताळणी.
  • वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे डेटा नोंदणी.
  • पाच वर्षांच्या कालावधीसाठी करार, भविष्यातील देखभाल-दुरुस्तीचा समावेश.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले:

“नाम फाऊंडेशन ग्रामीण भागात जलसंधारणाबाबत जनजागृती करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनाही जलसंधारणाच्या कार्यात मोठे योगदान देत आहेत. हे करार महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments