केरळमधील एका कॅथलिक शाळेच्या हलगर्जीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड जिल्ह्यातील शाळा प्रशासनाने तेथे काम करणाऱ्या एका शिक्षिकेला तब्बल सहा वर्षांपासून पगार दिला नाही. ज्यानंतर या महिलेने कंटाळून आत्महत्या केली. एलिना बेनी (२९) असे पीडित शिक्षिकेचे नाव असून ती कोझिकोड जिल्ह्यातील कोडेन्चेरी येथील सेंट जोसेफ लोअर प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती. बुधवारी दुपारी ती घरात मृतावस्थेत आढळली, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.
औरंगाबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील चैत्यगृह, म्हणजेच लेणी क्रमांक १० मध्ये दरवर्षी १० व ११ मार्च रोजी घडणाऱ्या अद्वितीय किरणोत्सवाला यंदा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ११ मार्च २०२५ मंगळवारी वेरूळ लेणीची साप्ताहिक सुट्टी असल्याने, या दिवशी पर्यटक व बुद्ध अनुयायांना हा विलक्षण खगोलीय सोहळा अनुभवता येणार नाही.
वेरूळ लेणी क्रमांक १० हे अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा संगम असलेले चैत्यगृह आहे. येथे समोरच्या चैत्यगवाक्षातून येणारे सूर्यकिरण भगवान गौतम बुद्धांच्या शिल्पावर पडतात, ही अत्यंत दुर्मीळ आणि भव्य दृश्य असते. देश-विदेशातील पर्यटक तसेच बुद्ध अनुयायी याचा साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने दरवर्षी वेरूळ लेणीला भेट देतात.
मात्र, यंदा ११ मार्चला वेरूळ लेणी बंद राहील, यामुळे या दिवशी होणाऱ्या किरणोत्सवाला उपस्थित राहण्यास अडथळा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) औरंगाबाद सर्कलचे अधीक्षक शिवकुमार भगत यांना निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, ११ मार्चची साप्ताहिक सुट्टी मागे किंवा पुढे ढकलण्यात यावी, अथवा विशेष बाब म्हणून लेणी पर्यटक व अनुयायांसाठी खुली ठेवण्यात यावी.
या निर्णयावर हजारो पर्यटक व बौद्ध अनुयायांचे लक्ष लागले असून, ASI यावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.
सासकल येथील दारू विक्री न करण्याबाबतचे लेखी पत्र देताना शैला भोसले व गोरख बाबा मुळीक….
फलटण : मौजे सासकल ता. फलटण जि.सातारा येथील अवैधरित्या दारू विक्री अनेक वर्ष सुरू होती या विरुद्ध सासकल जन आंदोलन समितीने अनेकदा आंदोलने करून पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आली होती. तरीही राहून राहून दारू विक्रेते अवैधरित्या दारू व्यवसाय करतच होते. परंतु सासकल गावामध्ये नव्याने स्थापन झालेल्या श्री.भैरवनाथ फाउंडेशन च्या वतीने कायमस्वरूपी गावातील अवयव दारू व्यवसाय बंद करावेत यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यादृष्टीने ज्ञानेश्वर हरिबा मुळीक यांच्या वस्तीवर रात्री भैरवनाथ फाउंडेशनचे पदाधिकारी, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना बोलावून त्यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्याकडून दारू बंद करत असल्याबाबतचे लेखी पत्र देण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार गावातील दोन्हीही दारू विक्रेत्यांनी आज ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येऊन दोघांनीही लेखी पत्र देऊन पुन्हा व्यवसाय सुरू केला तर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी संमती दिली. गावच्या विधायक विकासासाठी व गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या भैरवनाथ फाउंडेशनच्या मार्फत येत्या काळात जलसंधारण व मृदा संधारण याही क्षेत्रात भरीव काम करण्याचा मनोदय भैरवनाथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दारूबंदीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे भैरवनाथ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले असून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी विक्रेत्यांच्या या कृतीचे स्वागत केले असून भैरवनाथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.गावाचे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी दारू विक्रेत्यांनी लेखी पत्र भैरवनाथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सुपूर्त केले. यावेळी दारू विक्रेते गोरख बाबा मुळीक व शैला विनोद भोसले यांनी “आम्ही यापुढे गावामध्ये कोणत्याही प्रकारची अवैध दारू विक्री करणार नाही असे आम्ही लिहून देत आहोत. यापुढे आम्ही जर गावांमध्ये अवैध दारू विक्री केली तर भारतीय दंड संहिता अधिनियम अंतर्गत सदर गुन्ह्यासाठी असणारी शिक्षा व कारवाई आमच्यावर करण्यात यावी असे आम्ही लेखी देत आहोत.” यावेळी माजी सरपंच हणमंत गंगाराम मुळीक, माजी उपसरपंच सत्ता ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घोरपडे, ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मदने,दीपक घोरपडे,देविदास विनोद भोसले, कमलाकर आडके, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक मदने, अजित मुळीक, संदीप फडतरे, अनिल मुळीक,विनोद भोसले, शैला विनोद भोसले, किसन पवार उपस्थित होते.
Neet UG : परदेशातून एमबीबीएस करण्यासाठी नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा हा नियम सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. केंद्र सरकारने २०१८ मध्ये लागू केलेल्या या नियमामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक मानकांची पूर्तता करता येईल. हे नियम निष्पक्ष, पारदर्शक असून कोणत्याही वैधानिक तरतुदी किंवा राज्यघटनेच्या विरोधात नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा नियम इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ मधील कोणत्याही तरतुदीच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही प्रकारे मनमानी किंवा अवाजवी नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पडद्याआड अथवा पडद्यासमोरील नाट्यकलाकार, रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांच्या हक्काचे ठिकाण असणाऱ्या मध्य मुंबईतील (mumbai) प्रभादेवी (prabhadevi) येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या राहिलेल्या या वास्तूचे शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) व अजित पवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे.
पु .ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र (maharashtra) कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमींच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.
तसेच उपजत कला गुण असलेल्या कलाकारांसाठीही विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन दशकांपूर्वी बांधलेली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाची वास्तू ऑक्टोबर 2023 मध्ये नूतनीकरणासाठी बंद करण्यात आली. मात्र लांबलेला पाऊस आणि कामातील छोट्या – मोठ्या बारकाव्यांमुळे नाट्यगृह सुरू करण्याचे काम लांबणीवर गेले.
अखेर आता या संकुलाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यामुळे कलाकार तसेच रसिकप्रेक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी आता रविंद्र नाट्य मंदीर (ravindra natya mandir) ही महत्त्वाची वास्तू ठरणार आहे.
चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाची तगडी स्टारकास्ट लक्षवेधी ठरेल. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या नव्याकोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रंजक ट्विस्टमधून उलगडणार ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची आकर्षक कहाणी! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
04:52 AM ISTFeb 20, 2025 10:22 AM
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 20 Feb 202504:52 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: रंजक ट्विस्टमधून उलगडणार ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची आकर्षक कहाणी! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण अनेकांच्या पसंतीस पडेल यांत शंका नाही.
मनोरंजन बातम्या News in Marathi: नेटफ्लिक्सने ‘डाकू महाराज’मधील उर्वशी रौतेलाचे सर्व सीन्स डिलीट केले? ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट
Daaku Maharaj: नेटफ्लिक्सने ‘डाकू महाराज’ या चित्रपटाचे पुन्हा संपादन केल्याचे बोलले जात आहे. त्याने उर्वशी रौतेलाचे सर्व सीन्स चित्रपटातून डिलीट केले आहेत. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
नंदमुरी बालकृष्ण यांचा तेलुगू अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘डाकू महाराज’ २१ फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. नंदमुरी बालकृष्ण, उर्वशी रौतेला, बॉबी देओल, प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ, ऋषी, चांदिनी चौधरी, प्रदीप रावत, सचिन खेडेकर, शाइन टॉम चाको, विश्ववंत दुदुम्पुडी, अदुकलाम नरेन आणि रवी किशन हे कलाकारही या चित्रपटात आहेत.
Pune GBS Death update: पुण्यासह राज्यभरात ‘जीबीएस’ चा कहर सुरूच आहे. पुण्यात रुग्णसंख्या कमी झाली असली तरी बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये दौंड येथील ३७ वर्षीय तरुण व सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीच ‘जीबीएस’ चे उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळेआतापर्यंत एकूण मृतांची संख्या 11 झाली आहे. आतापर्यंत पुण्यात ‘जीबीएस’ च्या रुग्णांची संख्या २११ वर पोहोचली आहे.
फलटण : फलटण तालुक्यातील निंबळक गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीच्या किरकोळ धडकेवरून वाद वाढत गेला आणि त्यातून धक्कादायक घटना घडली. सोमवारी (दि. १७) माजी सैनिकाने थेट पिस्टल बाहेर काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि चारचाकी असे ११ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.
घटनेचा तपशील: माजी सैनिक दत्तात्रय बाबू महारनूर (वय ४९, रा. ऋषिकेशवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) हे आपल्या चारचाकी (क्रमांक MH 12 US 9535) मधून पंढरपूर ते पुणे असा प्रवास करत होते. निंबळक गावच्या हद्दीत त्यांच्या गाडीला दुचाकीचा सौम्य धक्का बसल्याने दुचाकीस्वार विक्रम आडके यांच्यासोबत वाद सुरू झाला. हा वाद चिघळत गेला आणि संतापाच्या भरात महारनूर यांनी आपली पिस्टल बाहेर काढली.
स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. फलटण ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होताच प्रसंगावधान राखून कोणतीही जीवितहानी होऊ न देता माजी सैनिकाला ताब्यात घेतले.
पोलिसांची तत्परता: या प्रकरणी पोलिसांनी पिस्टल, जिवंत काडतूस आणि चारचाकी असा एकूण ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणातील कायदेशीर बाबींची पडताळणी केली जात आहे.