Thursday, July 30, 2026
Home Blog Page 532

GBS Death: पुण्यात जीबीएसचा कहर सुरूच! आणखी दोघा रुग्णांचा मृत्य, मृतांची. संख्या ११ वर

0
GBS Death: पुण्यात जीबीएसचा कहर सुरूच! आणखी दोघा रुग्णांचा मृत्य, मृतांची. संख्या ११ वर


Pune GBS Death update: पुण्यासह राज्यभरात ‘जीबीएस’ चा कहर सुरूच आहे. पुण्यात रुग्‍णसंख्‍या कमी झाली असली तरी बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही वाढतच आहे. गेल्‍या दोन दिवसांमध्ये दौंड येथील ३७ वर्षीय तरुण व सिंहगड रस्‍त्‍यावरील नांदेड सिटी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीच ‘जीबीएस’ चे उपचार घेत असताना मृत्‍यू झाला. त्यामुळेआतापर्यंत एकूण मृतांची संख्‍या 11 झाली आहे. आतापर्यंत पुण्‍यात ‘जीबीएस’ च्‍या रुग्‍णांची संख्‍या २११ वर पोहोचली आहे.



Source link

फलटण : किरकोळ वादातून माजी सैनिकाची पिस्टलदाखवून दहशत! पोलिसांनी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

0
फलटण : किरकोळ वादातून माजी सैनिकाची पिस्टलदाखवून दहशत! पोलिसांनी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

फलटण : फलटण तालुक्यातील निंबळक गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीच्या किरकोळ धडकेवरून वाद वाढत गेला आणि त्यातून धक्कादायक घटना घडली. सोमवारी (दि. १७) माजी सैनिकाने थेट पिस्टल बाहेर काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि चारचाकी असे ११ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.

घटनेचा तपशील:
माजी सैनिक दत्तात्रय बाबू महारनूर (वय ४९, रा. ऋषिकेशवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) हे आपल्या चारचाकी (क्रमांक MH 12 US 9535) मधून पंढरपूर ते पुणे असा प्रवास करत होते. निंबळक गावच्या हद्दीत त्यांच्या गाडीला दुचाकीचा सौम्य धक्का बसल्याने दुचाकीस्वार विक्रम आडके यांच्यासोबत वाद सुरू झाला. हा वाद चिघळत गेला आणि संतापाच्या भरात महारनूर यांनी आपली पिस्टल बाहेर काढली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. फलटण ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होताच प्रसंगावधान राखून कोणतीही जीवितहानी होऊ न देता माजी सैनिकाला ताब्यात घेतले.

पोलिसांची तत्परता:
या प्रकरणी पोलिसांनी पिस्टल, जिवंत काडतूस आणि चारचाकी असा एकूण ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणातील कायदेशीर बाबींची पडताळणी केली जात आहे.

साहस Times

270 किलोंचा रॉड अंगावर पडून मान मोडली; गोल्ड मेडलिस्ट महिला पॉवरलिफ्टरचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO

0
270 किलोंचा रॉड अंगावर पडून मान मोडली; गोल्ड मेडलिस्ट महिला पॉवरलिफ्टरचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO


Viral Video: राजस्थानच्या बिकानेरमधील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. पॉवरलिफ्टिंगचा सराव करताना राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यष्टिकाने आपल्या खांद्यावर 270 किलोंचं वजन उचललं होतं. यावेळी अचानक तिचा हात सुटला आणि तोल गेला. तोल गेल्याने खांद्यावरील वजन तिच्या मानेवर पडलं. इतकं वजन मानेवर पडल्याने ती तुटली. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांना मृत घोषित केलं. 

नेमकं काय झालं?

राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर यष्टिका आचार्य (17) ही राजस्थानमधील बिकानेर येथील नथुसर गेट येथील बडा गणेश मंदिराजवळील पॉवर हेक्टर जिममध्ये सराव करत होती. तिने आपल्या खांद्यावर 270 किलोच्या रॉडवर वजन उचललं होतं. यावेळी यष्टिकाचा मानेवर रॉ़ड पडल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत जिममध्ये सराव करणाऱ्या इतर खेळाडूंनी सांगितलं की, यष्टिका नेहमीप्रमाणे प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत होती.

सरावाच्या वेळी हात घसरल्याने अचानक तिचा तोल गेला आणि 270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडला. यादरम्यान जोरदार धक्का बसला. तिच्या डोक्याचा फटका बसल्याने यष्टिकाच्या मागे उभा असलेला प्रशिक्षकही मागे पडला. यानंतर यष्टिका बेशुद्ध पडली. तिला जीममध्येच प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर तिथे उपस्थित खेळाडूंनी उपचारासाठी तिला रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

तिथे उपस्थित खेळाडूंनी सांगितलं की, ट्रेनर यष्टिकाकडून वेट लिफ्ट करुन घेत होता. त्याने एक, दोन, तीन म्हटल्यानंतर तिने वजन उचललं होतं. पण तिचा हात सुटू लागला आणि तोल गेला. सगळं वजन तिच्या मानेवर आलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

नॅशनल चॅम्पिअनशीपमध्ये जिंकलं होतं गोल्ड मेडल

यष्टिकाने गोव्यात झालेल्या 33 व्या राष्ट्रीय बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये इक्विप्ड गटात सुवर्णपदक आणि क्लासिक प्रकारात रौप्यपदक जिंकलं होतं. यष्टिकाचे वडील ऐश्वर्या आचार्य (50) हे कंत्राटदार आहेत. यष्टिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. दरम्यान कोणीही तक्रार केली नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. 





Source link

Aashram Season 3 : ‘आश्रम ३ – पार्ट २’ चा ट्रेलर रिलीज, जाणून घ्या OTT वर कधी येणार बॉबी देओलची ही वेबसीरीज

0
Aashram Season 3 : ‘आश्रम ३ – पार्ट २’ चा ट्रेलर रिलीज,  जाणून घ्या OTT वर कधी येणार बॉबी देओलची ही वेबसीरीज


Aashram Season 3 : बॉबी देओलच्या क्राइम ड्रामा वेब सीरिज ‘आश्रम 3 – पार्ट 2’चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यासोबतच अॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पम्मी बाबा निराला आणि भोपा यांच्यात अंतर निर्माण करेल हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. ती सूडाच्या आगीत जळून जाईल आणि ही आग बाबा निरालाची कथा कायमची संपुष्टात आणेल.



Source link

‘बाबाने आईला असं मारलं,’ मुलीने चित्र काढून दाखवलं; आजी-आजोबांसह पोलीसही हादरले; एका क्षणात बापाचं बिंग फुटलं

0
‘बाबाने आईला असं मारलं,’ मुलीने चित्र काढून दाखवलं; आजी-आजोबांसह पोलीसही हादरले; एका क्षणात बापाचं बिंग फुटलं


पती जेव्हा पत्नीची हत्या करत होता तेव्हा त्यांची चार वर्षांची मुलगी आपल्या डोळ्यांसमोर हे सर्व घडताना पाहत होती. घाबरलेली मुलगी हे सर्व शांतपणे पाहत होती. वडिलांनी आईला ठार केल्यानंतर तिच्या गळ्यात दोरी टाकून नंतर छताला लटकवल्याचंही तिने पाहिलं. मुलीचा बाप पोलिसांनी पत्नीने आत्महत्या केल्याची खोटी माहिती देतो. पण नंतर ती चार वर्षांची चिमुरडी एक चित्र काढते आणि त्यानंतर या हत्याकांडाचं सगळं सत्य समोर येतं. 

मुलीने चित्र काढताना त्यामध्ये आईचे दोन हात काढले होते. यावेळी एक हात आईच्या गळ्याजवळ येताना दाखवलं होतं. हा तिसरा हात तिने आपल्या वडिलांचा काढला होता. तिच्या वडिलांनी आईचा गळा दाबून हत्या केल्याचं दाखवण्याचा प्रयत्न ती करत होती. हे सर्व तिने आपल्या डोळ्यादेखत पाहिलं होतं. मुलीने काढलेल्या चित्रामुळे बापाचं बिंग फुटलं आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या हत्येला आत्महत्येचं रुप देण्याचा त्याचा प्रयत्नही फसला. 

वडिलांना अटक झाल्याने मुलीलाच आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. हे पाहिल्यानंतर तिथे उपस्थित सर्वजण हळहळले होते. आरोपी पित्याचं नाव संदीप बुधौलिया असून तो झाशीचा रहिवाशी आहे. तो एका औषधांच्या कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतो.

27 फेब्रुवारी 2019 ला सोनाली आणि संदीपचं लग्न झालं होतं. सोनाली मध्य प्रदेशच्या टीकमगढ जिल्ह्याची रहिवासी होती. लग्नाच्या वेळी सोनालीच्या वडिलांनी हुंड्यात 20 लाख रुपये दिले होते. पण संदीपला गाडीदेखील हवी होती. यामुळे लग्नानंतर सासरच्यांनी सोनालीचा छळ करण्यास सुरुवात केली. तीन वर्षं कसेबसे सरल्यानंतर अखेर सोनालीने एका मुलीला जन्म दिला, जी आज चार वर्षाची आहे. 

14 फेब्रुवारीला सोनालीच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. सोनाली आपल्या मुलीसह 12 फेब्रुवारीला लग्नात गेली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीला संदीपने सोनालीला फोन करुन तात्काळ घरी ये, अन्यथा कधीच येऊ नको असं सांगितलं. पतीने धमकावल्याने सोनाली 16 फेब्रुवारीलाच घरी पोहोचली. 17 फेब्रुवारीला सकाळी संदीपने सासरी फोन करुन सोनालीने आत्महत्या केल्याचं सांगितलं. 

सोनालीचे आई-वडील आले असता संदीपने त्यांनाही सोनालीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं. तसंच पोलिसांनाही हीच कहाणी सांगितली. दरम्यान आपल्या आजी-आजोबांच्या घरी येताच मुलीने त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला. हे सांगताना तिने पेपर आणि पेन्सिल उचलून चित्र काढलं. हे चित्र पाहिल्यानंतर सगळं सत्य उघड झालं. यानंतर मुलीच्या आजी-आजोबा आणि नातेवाईकांनी पोलिसांना फोन करुन सर्व सांगितलं. 

शवविच्छेदन अहवालातही गळफासाआधी तिच्या शरिरावर जखमा असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी पुन्हा मुलीकडे चौकशी केली. तिने ते चित्र दाखवत जे पाहिलं होतं ते सर्व सांगितलं. यानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली. त्याच्यासह कुटुंबीयांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

प्राथमिक तपासानुसार, 16 फेब्रुवारीच्या रात्री संदीपने सोनालीला बेदम मारहाण केली होती. यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्येला आत्महत्येचा रंग देण्यासाठी त्याने मृतदेह पंख्याला लटकवला. त्यावेळी संदीपला वाटले की आपली चार वर्षांची मुलगी झोपली आहे, पण ही निरागस घाबरलेली मुलगी सर्व काही आपल्या डोळ्यांनी पाहत होती. आणि तिने जे काही दिसले ते या कागदावर उतरवलं. 





Source link

‘कुठे आहेस गुलशन, प्लिज कॉल कर’, आर्केस्ट्रा गर्लला सिंदूर लावणारा तरुण गायब, Viral Video मागची गोष्ट समोर

0
‘कुठे आहेस गुलशन, प्लिज कॉल कर’, आर्केस्ट्रा गर्लला सिंदूर लावणारा तरुण गायब, Viral Video मागची गोष्ट समोर



Bihar Viral Video : घटनेनंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबाबत तरुणीने दिलेल्या काही मुलाखती समोर येत आहेत. व्हिडिओनंतर तरुणाला आणि त्याचे कुटुंब सर्व त्या तरुणीपासून अंतर राखत आहेत. 



Source link

पतीने पत्नीवर सामूहिक बलात्कार होताना पाहिलं, आरोपींनी अंगावर डिझेल ओतून…; धक्कादायक घटनेने गाव हादरलं

0
पतीने पत्नीवर सामूहिक बलात्कार होताना पाहिलं, आरोपींनी अंगावर डिझेल ओतून…; धक्कादायक घटनेने गाव हादरलं



उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे पत्नीचं अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव साक्षीदार असणाऱ्या पतीला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपड्यांच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली आहे. 
 



Source link

काय आहे LIC चा ‘स्मार्ट’ पेन्शन प्‍लान’? पात्रता काय? पाहा A to Z माहिती

0
काय आहे LIC चा ‘स्मार्ट’ पेन्शन प्‍लान’? पात्रता काय? पाहा A to Z माहिती


Smart Pension Plan: शासनाच्या अख्तयारित राहून काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील इंश्‍योरेंस कंपनी भारतीय जीवन विमा निगम (LIC) वर असणारी विश्वासार्हता अद्यापही कायम असून, आता आणखी एक नवी योजना एलायसीनं लाँच केली आहे. स्मार्ट पेन्शन प्लान (Smart Pension Plan) असं या योजनेचं नाव. विविध आर्थिक स्तरांच्या अनुषंगानं ही योजना आखण्यात आली असून, या माध्यमातून निवृत्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांसाठी परताव्याची हमी देते. 

एलआयसीचा हा स्मार्ट पेन्शन प्लान नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड, पर्सनल / ग्रुप, सेव‍िंग आणि इमीडिएट एन्युटी प्लान असून, निवृत्तीच्या वेगवेगळ्या गरजांच्या अनुषंगानं या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेतून परताव्याची हमी ठेवीदारांना दिली जाते. ही योजना एक नॉन-पार्टिसिपेटिंग प्रोडक्‍ट असून, याअंतर्गत हयातीत देय लाभावर निश्चित परतावा मिळतो. 

ठेवीदार लाँग टर्म आर्थिक नियोजनाच्या धर्तीवर सर्वात उपयुक्त पर्याय निवडू शकतात. एलआयसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या योजनेतून अंशिक किंवा पूर्ण स्वरुपात बाहेर पडण्यासाठीसुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. राहिला मुद्दा या योजनेत सहभागी होण्यासाठीच्या वयोमर्यादेचा, तर या योजनेत 18 वर्षांवरील कोणीही व्यक्ती नाव नोंदवू शकते. ज्यामुळं युवांना कमी वयातच गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होते. योजनेतील नावनोंदणीची अंतिम वयोमर्यादा आगे 65 ते 100 वर्षे. योजनेअंतर्गत अॅन्युटी पर्याय निवडणं अतिशय सोपी बाब असून, सिंगल लाईफ अॅन्युटीमध्ये पॉलिसीहोल्‍डरला आयुष्यभर अॅन्युटी पेमेंट करण्याचा पर्याय असतो. 

इंसेंटीव्हची सुविधा 

सध्याच्या घजडीला पॉलिसीहोल्‍डरसाठी योजनेअंतर्गत इंसेंटीव्हची सुविधा देण्यात आली आहे. या योजनेतून आंशिक किंवा पूर्ण पैसे काढण्याचा पर्याय मिळतो, ज्यामुळं ठेवीदारांना आर्थिक आधार मिळतो. फ्लेक्सिबल अॅन्युटी पेमेंट मोडअंतर्गत पॉलिसीहोल्डर पॉलिसीहोल्डरना आपल्या आवडीचा पेमेंट पर्याय निवडण्याची मुभा असते. 

 

योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला, तीन महिन्यांच्या अंतरानं, सहा महिन्यांनी किंवा एका वर्षभरानंतर पेमेंट करू शकता. नॅशनल पेंशन स्कीम (NPS) मधील सदस्यसुद्धा हा पर्याय निवडू शकतात. दिव्यांगजन आणि आश्रितांसाठी या योजनेमध्ये  फाइनेंश‍ियल बेन‍िफि‍ट सुरक्षित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

सदर योजनेअंतर्गत जर, एखाद्या पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाला तर, नॉमिनी व्यक्तीला रक्कम निवडलेल्या पर्यायाच्या आधारे प्रदान करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. 





Source link

अवघ्या वर्षभराच्या चिमुकल्या जैशवीचा जगण्यासाठी संघर्ष! १४ कोटींच्या इंजेक्शनची होती गरज पण…

0
अवघ्या वर्षभराच्या चिमुकल्या जैशवीचा जगण्यासाठी संघर्ष! १४ कोटींच्या इंजेक्शनची होती गरज पण…


Rare Diseases : दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या १३ महिन्यांच्या जैशवीला आता नवं आयुष्य मिळणार आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) बालरोग न्यूरोलॉजीच्या प्रमुख प्रा.(डॉ.) शेफाली गुलाटी यांनी सोमवारी जैशवीला ९ कोटी रुपयांचे इंजेक्शन दिले. अमेरिकेतील या इंजेक्शनची किंमत १४ कोटी रुपये असली तरी क्राऊड फंडिंगशी संबंधित प्रकरणामुळे कंपनीने ५ कोटी रुपयांची सवलत दिली.



Source link

Entertainment News in Marathi Live: Aashram Season 3 : ‘आश्रम ३ – पार्ट २’ चा ट्रेलर रिलीज, जाणून घ्या OTT वर कधी येणार बॉबी देओलची ही वेबसीरीज

0
Aashram Season 3 : ‘आश्रम ३ – पार्ट २’ चा ट्रेलर रिलीज,  जाणून घ्या OTT वर कधी येणार बॉबी देओलची ही वेबसीरीज


Aashram Season 3 : ‘आश्रम ३ - पार्ट २’ चा ट्रेलर रिलीज,  जाणून घ्या OTT वर कधी येणार बॉबी देओलची ही वेबसीरीज

Aashram Season 3 : ‘आश्रम ३ – पार्ट २’ चा ट्रेलर रिलीज, जाणून घ्या OTT वर कधी येणार बॉबी देओलची ही वेबसीरीज

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 19 Feb 202502:10 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Aashram Season 3 : ‘आश्रम ३ – पार्ट २’ चा ट्रेलर रिलीज, जाणून घ्या OTT वर कधी येणार बॉबी देओलची ही वेबसीरीज

  • बॉबी देओलची मोस्ट अवेटेड वेब सीरिज ‘आश्रम ३ – पार्ट २’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यासोबतच मालिकेच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.


Read the full story here

Wed, 19 Feb 202505:27 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Upcoming Film : बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकणारी तीन मित्रांची रंजक कथा सांगणार ‘फॉलोअर’!

  • Upcoming Film : अनेक दशकांपासून प्रादेशिक आणि भाषिक तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकतो.


Read the full story here

Wed, 19 Feb 202504:18 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : कॉन्सर्ट सुरू असतानाच अरिजित सिंगने उचलला वडिलांचा फोन! व्हिडिओने जिंकलं साऱ्यांचं मन

  • Arijit Singh Viral Video : अरिजीत सिंगने त्याच्या चंदीगड लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान असे काही केले की, त्याचे चाहते खूप खूश झाले आहेत.


Read the full story here





Source link