Thursday, July 30, 2026
Home Blog Page 530

Google Pay युझर्सना मोठा दणका! आता फ्री काहीच नाही; पाहा बदललेले नियम

0
Google Pay युझर्सना मोठा दणका! आता फ्री काहीच नाही; पाहा बदललेले नियम


GPay Processing Fees: भारतातील कोट्यवधी लोक मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसारख्या सेवांसाठी गुगल पे वापरतात. आतापर्यंत गुगल पे त्यांच्या सेवा मोफत देत होते, परंतु आता कंपनीने काही व्यवहारांवर युझर्सकडून प्रक्रिया शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

‘या’ पेमेंटसाठी प्रक्रिया शुल्क

मीडिया रिपोर्ट्सनुसार, “गूगल पे ने गॅस आणि वीज बिलांसारख्या पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणाऱ्या युझर्सकडून ‘प्रक्रिया शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे. फोनपे आणि पेटीएम देखील बिल पेमेंट, रिचार्ज आणि इतर सेवांसाठी समान शुल्क आकारतात. हे शुल्क व्यवहार रकमेच्या 0.5% ते 1% पर्यंत असू शकते. या प्रोसेसिंग शुल्कावर उत्पादन शुल्क आणि सेवा कर (जीएसटी) देखील आकारला जात आहे.

जेव्हा Google Pay युझर्स क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे बिल पेमेंट करतो तेव्हा हे शुल्क एकूण बिल रकमेत जोडले जाते. UPI द्वारे बिल भरण्यासाठी कोणताही प्रक्रिया शुल्क आकारला जात नाही.

प्रोसेस फी कशी मोजली जाते?

प्रक्रिया शुल्क, म्हणजेच सुविधा शुल्क हे बिलाच्या रकमेसह अनेक निकषांवर अवलंबून असते. गुगल पेनुसार, बिल भरण्यापूर्वी, तुम्ही बिलाच्या रकमेसह स्वतंत्रपणे आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क पाहू शकता.

गुगल पे वर प्रक्रिया शुल्क कसे तपासाल?

जर प्रक्रिया शुल्क लागू असेल, तर पेमेंट करताना तुम्हाला ते कोणत्याही बिलाच्या रकमेसह दिसेल. तुम्ही Google Pay अ‍ॅपच्या जुन्या व्यवहारात (History) प्रक्रिया शुल्क देखील पाहू शकता. त्यामध्ये बिलाच्या रकमेसह आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क सूचीबद्ध आहे.

पेमेंट न झाल्यास पैसे परत येतील का?

जर तुमचे बिल भरणे अयशस्वी झाले, तर प्रक्रिया शुल्कासह संपूर्ण बिल रक्कम तुमच्या खात्यात निर्धारित वेळेत परत केली जाईल.

गुगल पेला नागरिकांच्या व्यवहारात खूप महत्त्व मिळाले आहे. ते सुमारे 37% UPI व्यवहार हाताळते, जे वॉलमार्ट-समर्थित फोनपे नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारीपर्यंत, प्लॅटफॉर्मने 8.26 लाख कोटी रुपयांच्या UPI व्यवहारांवर प्रक्रिया केली.





Source link

नारळ पाणी, कफ सिरप पिण्यावर बंदी; लोको पायलटसाठी Indian Railway चं नवं फर्मान

0
नारळ पाणी, कफ सिरप पिण्यावर बंदी; लोको पायलटसाठी Indian Railway चं नवं फर्मान


Indian Railway Latest News : भारतीय रेल्वेच्या वतीनं ज्याप्रमाणे प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वे प्रवासाशी संबंधित काही निर्णय घेतले जातात अगदी त्याचप्रमाणे रेल्वे विभागानं आता कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानंही काही निर्णय घेतले आहेत. त्यातीलच एका निर्णयाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. हा निर्णय लागू केल्यानंतर त्यासंदर्भातील बहुविध चर्चांना वाव मिळाल्याचं पाहायला मिळालं.

भारतीय रेल्वेच्याच अख्तयारित येणाऱ्या दक्षिण रेल्वेच्य तिरुवअनंतपूरम मंडळानं रेल्वेतील लोको पायलट आणि इतर रेल्वे संचालन कर्मचाऱ्यांसाठी एक नवं फर्मान जारी केलं आहे. ज्यानुसार ड्युटीआधी अर्थात काम सुरु करण्यापूर्वी किंवा कामाचे तास सुरु असताना रेल्वे कर्मचारी आणि विशेष म्हणजे लोको पायलटना विशिष्ट गोष्टींच्या सेवनास बंदी घालण्यात आली आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार होमिओपॅथिक औषधं, शीत पेय, नारळ पाणी, कफ सिरप, माऊथवॉशच्या सेवनामुळं श्वसनाच्या चाचणीरम्यान अल्कोहोलचं प्रमाण अधिक असल्याचं निदर्शनास आलं आहे. ज्यामुळं कर्मचाऱ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन रेल्वे संचलनावर याचे थेट परिणाम होत आहेत.

वरील परिस्थितीचा आधार घेत रेल्वेनं एक परिपत्रक जारी केलं असून, त्यात नमूद माहितीनुसार रेल्वेच्या लोको पायलटच्या रक्तांचे नमुने सरकारी लॅबमध्ये आणण्यात आले. यावेळी या नमुन्यांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण शून्य आढळलं. अर्थात शरीरात नशेचा कोणताही स्तर आढळून आला नाही. पण, ब्रीथ एनालाइजर टेस्टमध्ये मात्र अल्कोहोल आढळलं. रेल्वेच्या माहितीनुसार काही विशिष्ट पदार्थांच्या सेवनामुळं हे निष्कर्ष आढळले असून, त्याचा परिणाम रेल्वे संचलनावर होताना दिसत आहे.

दरम्यान, रेल्वेच्या परिपत्रकानुसार कोणाही रेल्वे कर्मचाऱ्यांनी वरील प्रतिबंधित वस्तूंचं सेवन केलं तर त्यांनी याची पूर्वसूचना ड्यूटीवर असणाऱ्या क्रू कंट्रोलर (CRC) ला लिखीत स्वरुपात देणं बंधनकारक असेल. यानंतर सीआरसीनं ही माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत CCRC (लोको पायलट) आणि सहायक मंडल अभियंता (ADEE/OP) यांना द्यावी. एखाद्या व्यक्तीला वैद्यकिय कारणांमुळं अल्कोहोलयुक्त औषध घेणं गरजेचं असेल तर यासाठी रेल्वेतील वैद्यकिय अधिकाऱ्यांची परवानगी इथं आवश्यक ठरणार आहे.

परिपत्रकानुसार जर एखादा कर्मचारी कोणत्याही वैध कारणाशिवाय ब्रीथ एनालाइजर टेस्टमध्ये अल्कोहोल असल्यासंदर्भातील निष्कर्षात सापडतो तर, अशा प्रकरणात कर्मचाऱ्यानं जाणीवपूर्वक बेजबाबदार वर्तणूक केल्याचं इथं ग्राह्य धरलं जाईल. सदर कर्मचाऱ्यांविरोधात अनुशासनात्मक कारवाई (DAR) करण्यात येणार असून, ही एक गंभीर चूक समजली जाईल असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं.





Source link

…तर कितीही जीवतोड काम करुनही ग्रॅच्युइटी मिळणार नाही; SC च्या निर्णयानं नोकरदारांना धक्का

0
…तर कितीही जीवतोड काम करुनही ग्रॅच्युइटी मिळणार नाही; SC च्या निर्णयानं नोकरदारांना धक्का


Supreme Court on Gratuity : कोणत्याही संस्थेमध्ये ज्यावेळी एखादी व्यक्ती नोकरीस सुरुवात करते, त्यावेळी संस्थेतील कर्मचारी म्हणून कंपनीच्या वतीनं कर्मचाऱ्यांना काही सुविधा लागू होतात. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या या सुविधांमध्ये पगाराव्यतिरिक्तही काही इतर महत्त्वाचे निकष असतात जे कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम करतात. यामध्ये सुट्ट्या, प्रॉव्हिडंट फंड (PF), मेडिकल इन्शुरन्स (Medical Insurance), ग्रॅच्युइटी (Gratuity) यांचाही समावेश असतो.

वरील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी हे घटक एका स्वरुपातील आधाराचच काम करतात. यापैकी ग्रॅच्युइटीसंदर्भात नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निर्णय सुनावला असून त्यामुळं नोकरदार वर्गाला धक्का बसू शकतो.

ग्रॅच्युइटी  म्हणजे एक असा निधी किंवा रक्कम जी कंपनीकडून कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी लागू होते. ठराविक वर्षे किंवा कैक वर्षे कंपनीत केलेलं काम आणि दिलेल्या योगदानाबद्दल कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाणारी आर्थिक स्वरुपातील भेट म्हणजे ग्रॅच्युइटी (Gratuity). सोप्या शब्दांत सांगावं तर अनेक नोकरदारांसाठी ग्रॅच्युइटी म्हणजे निवृत्तीनंतरचा आधार. अर्थात काळानुरुप निवृत्तीची संकल्पनाही बदलत असली तरीही ग्रॅच्युइटीचं महत्त्वं मात्र कमी झालेलं नाही.

काम करणारी प्रत्येक व्यक्ती या निधीसाठी पात्र असते असाच अनेकांचा समज. पण, इथून पुढे मात्र हे गणित बदलू शकतं. कारण, ठरेल ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. इथून पुढं काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी जप्त केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या धर्तीवर कर्मचारी आणि मालकांमधील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

सर्वोच्च न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी कायदा 1972 अंतर्गत, कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी जप्त करण्यासाठी गुन्हेगारी शिक्षा यापुढे आवश्यक नाही. थोडक्यात एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीच्या ठिकाणावरून नैतिक भ्रष्टाचाराच्या (Moral Turpitude) अर्थात कोणतंही अनैतिक, चुकीचं किंवा फसवं काम यांसारख्या किंवा यापैकी एखाद्या कारणामुळं बाहेरचा रस्ता दाखवला, तर त्याची ग्रॅच्युइटी रोखण्याचा अधिकार कंपनीला असून त्यासाठी न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.

न्यायालयाच्या या निर्णयामुळं सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी 2018 मधील निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं निर्णयात ग्रॅच्युइटी थांबवण्यासाठी, न्यायालयात गुन्हा सिद्ध करणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. पण, आता नव्यानं देण्यात आलेल्या निर्णयानंतर 2018 ता निर्णय लागू नसेल. परिणामी एखाद्य व्यक्तीनं कंपनीत कितीही वर्षे काम केलं असलं आणि कर्मचारारा नैतिक भ्रष्टाचाराच्या कोणत्याही कारणास्वत नोकरीवरून काढण्यात आलं तर त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम रोखण्याचा अधिकार कंपनीकडे असेल.





Source link

साखळी बॉम्बस्फोटांनी इस्रायल हादरला! दहशतवादी हल्ला असल्याचा संशय, यंत्रणा अलर्ट

0
साखळी बॉम्बस्फोटांनी इस्रायल हादरला! दहशतवादी हल्ला असल्याचा संशय, यंत्रणा अलर्ट


Israel serial bomb blasts : इस्रायल साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला आहे. मध्यवर्ती भागात एकापाठोपाठ एक अनेक बसस्फोट ांच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी हा संभाव्य दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अन्य दोन बसमध्ये अतिरिक्त स्फोटके सापडली आहेत. प्रशासनाने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Success Story: आई शिकताना लोकांनी मारले टोमणे, लेकाने JEE Mains मध्ये 99.44 टक्के मिळवून गावाला दाखवला आरसा!

0
Success Story: आई शिकताना लोकांनी मारले टोमणे, लेकाने JEE Mains मध्ये 99.44 टक्के मिळवून गावाला दाखवला आरसा!


Success Story: राजस्थानच्या गौरव सिंह शेखावतने मागच्या आठवड्यात लागलेल्या जेईई मेन्समध्ये 99.44 टक्के मिळवून संपूर्ण गावाचे नाव रोशन केले. कोटामध्ये स्पर्धा परीक्षार्थींची गर्दी पाहता त्याच्या आईवडिलांनी तिथे न पाठवण्यातच समजदारी मानली. यानंतर गौरवने झुंझुन येथूनच आपल्या जेईईची तयारी केली. मुलाला साथ देण्यासाठी वडील स्वत:त्याच्या सोबत येऊन राहिले. गौरवच्या परिवाराकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. 

माझ्या शिक्षणादरम्यान वडिलांनी वारंवार मला प्रोत्साहन दिले.  स्वत:ला त्रास देऊन काही होणार नाही. मेहनत कर तरच यश मिळेल असे माझे वडील मला वारंवार सांगायचे. मलाच नव्हे तर माझी बहीण वर्षालादेखील वडिलांनी तिच्या NEET परीक्षेसाठी खूप सहकार्य दिले. यामुळेच आज त्यांची दोन्ही मुले डॉक्टर आणि इंजिनीअर बनण्याच्या काही पावले दूर आहेत, असे गौरव आपल्या वडिलांबद्दल सांगतो. 

गौरवचे वडील विजय सिंह शेखावत सांगतात की, ‘सुरुवातीला मी माझ्या पत्नीला शिकवायचो. तेव्हा समाज मला टोमणे मारायचा. पण कोणाचेच ऐकले नाही. मग मुलीकडून नीट परीक्षेची तयारी करुन घेतली आणि त्यात ती यशस्वी झाली. यानंतर मुलाकडून जेईईची तयारी करुन घेतली. ज्यात त्याने खूप चांगला निकाल दिला.’

मी जेव्हा पहिल्यांदा नांगर हाती पकडला तेव्हा तो योग्य पद्धतीने चालवू शकत नव्हतो.  तेव्हा ते उदास झाले. नांगर नीट पकडत नाही, हा आयुष्यात काय करेल?  आपल्या परिवाराचे पोट कसे भरणार?’ असे ते माझ्या आईला विचारत होते. पण आज विजयसिंह शेखावत संपूर्ण गाव आणि समाजासाठी एक प्रेरणा बनले आहेत. 

विजयसिंह शेखावत सांगतात, ‘माझ्या आई-वडिलांना शिक्षणाचे महत्व माहिती नव्हते. मी घरी बसून शांतपणे अभ्यास करायचो. माझे आई-वडील दोघेही अशिक्षित होते.  शिक्षण घेऊन आयुष्य बदलेल हे त्यांना माहिती नव्हते. शिकून छोटी मोठी नोकरी केली तर शेती कोण करणार? असे त्यांना वाटायचे’.

12 वीनंतर मुलाला कोटाऐवजी झुंझुनमध्ये शिकायला पाठवलं. मी मुलासोबत राहायचो. एकटे राहिल्याने मुलं तणावात येतात. त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही, असे मी मुलांना सांगत असायचो. खासकरुन मी मुलीला शिकवलं की शिकून स्वत:च्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे. मुलीने 2024 मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण केली. मी आयुष्यातील मोठी लढाई जिंकल्याचा आनंद मला त्यादिवशी झाल्याचे विजयसिंह सांगतात. आज गावात माझी एकमेव मुलगी आहे जी डॉक्टर होणार आहे. कोणतीच महिला नोकरी करत नव्हती तेव्हा माझी बायको कामाला जाऊ लागली होती. समाजाप्रती आपली मोठी जबाबदारी असल्याचे, विजयसिंह आपल्या मुलांना सांगतात.





Source link

बारामती वकील संघटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विशेष धन्यवाद!

0
बारामती वकील संघटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विशेष धन्यवाद!

बारामती :-   बारामती वकील संघटनेच्या न्यायालय नवीन इमारतीच्या मागणीला अवघ्या पाच आठवड्यात मान्यता मिळाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तत्परतेमुळे तब्बल ७२ कोटी रुपयांच्या नऊ मजली न्यायालय इमारतीला मंजुरी मिळाली आहे.

११ जानेवारी २०२५ रोजी, Imperial Lawns येथे उद्घाटनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रभाकर बर्डे यांनी न्यायालय नवीन इमारतीच्या मंजुरीसाठी निवेदन दिले होते. बारामतीमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय स्थलांतरित होत असल्याने, लेबर कोर्ट, सहकार न्यायालय व इतर न्यायाधिकरणांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले होते.

या मागणीला अजितदादांनी तत्काळ प्रतिसाद देत, केवळ चार दिवसांत प्रपोजल मंत्रालयात पोहोचवले आणि १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ७२ कोटींच्या नवीन इमारतीला मंजुरी मिळवून दिली.

बारामती वकील संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार!

Indian Army मध्ये अधिकारी बनण्याची संधी, 2 लाखांहून जास्त पगार;लेखी परीक्षेची गरज नाही!

0
Indian Army मध्ये अधिकारी बनण्याची संधी, 2 लाखांहून जास्त पगार;लेखी परीक्षेची गरज नाही!


Indian Army Recruitment: भारतीय सैन्यात काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. देशसेवा करण्यासोबत एक सन्मानाची चांगल्या पगाराची नोकरी याद्वारे मिळते. तुम्हीदेखील भारतीय सैन्यातील नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारतीय सैन्यात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

रिक्त पदांचा तपशील 

भारतीय लष्कराकडून अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी एनसीसी स्पेशल स्कीम अंतर्गत भरती सुरु आहे. इंडियन आर्मीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (नॉन-टेक्निकल) साठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. भारतीय सैन्याच्या या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 70 रिक्त पदे भरली जाणार आहेत. जर तुमच्याकडे या पदांशी संबंधित पात्रता असेल तर खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचून अर्ज करा. भारतीय सैन्यात पुढील पदांवर पुनर्नियुक्ती केली जाणार आहे. याअंतर्गत एनसीसी पुरुष (सामान्य) ची 63 पदे, एनसीसी पुरुषची 7 पदे,एनसीसी महिला (सर्वसाधारण) ची 5 पदे, एनसीसी महिलांचे 1 पद भरले जाणार आहे. 

पात्रता

या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 19 वर्षे तर कमाल वय 25 वर्षे इतके असावे. उमेदवारांच्या वयाची गणना 1 जुलै 2025 पर्यंत केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 
भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. असे असले तरी मागील वर्षांमध्ये त्या उमेदवाराने एकूण 50% गुण मिळवले असणे आवश्यक आहे.

पगार

भारतीय सैन्यात निवड झाल्यावर उमेदवारांना त्यांच्या पद आणि लेव्हलनुसार 56 हजार 100 ते 2 लाख 50 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

कशी होईल निवड? 

सर्वप्रथम उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. भारतीय सैन्य एकूण गुणांच्या आधारे उच्च कट-ऑफ सेट करू शकते. यानंतर एसएसबी मुलाखत होईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना प्रयागराज, भोपाळ, बेंगळुरू आणि जालंधर येथील निवड केंद्रांवर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एसएसबीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल. सर्वात शेवटी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.एसएसबीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.

अर्जाची शेवटची तारीख

जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकता. 15 मार्च ही अर्जाची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.





Source link

‘मला सासूला ठार मारायचं आहे, औषधं सांगता का’, महिलेचा मध्यरात्री 2.10 ला डॉक्टरला मेसेज, पुढच्याच क्षणी…

0
‘मला सासूला ठार मारायचं आहे, औषधं सांगता का’, महिलेचा मध्यरात्री 2.10 ला डॉक्टरला मेसेज, पुढच्याच क्षणी…


बंगळुरुमध्ये एक 40 वर्षीय महिला सासूला ठार करण्यासाठी औषधं सुचवा अशी विनंती घेऊन थेट डॉक्टरकडे पोहोचली होती. यानंतर तिला थेट पोलिसांनीच समन्स पाठवलं. यावेळी तिने पलटी मारत आपण तर आत्महत्या करण्यासाठी सल्ला मागत होतो असा दावा केला. आठवड्याच्या सुरुवातीला ही घटना घडली आहे. महिलेने बंगळुरुमधील संजय नगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या डॉक्टर सुनील कुमार यांना मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी मेसेज केला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने डॉक्टरला आपल्या 70 वर्षीय सासूची हत्या करण्यासाठी धीम्या पद्धतीने विष कसं देता येईल याबाबत विचारलं होतं. डॉक्टरने नकार दिल्यानंतर महिलेने सर्व मेसेज डिलीट करुन टाकले होते. पण तोपर्यंत डॉक्टर कुमार यांनी मेसेजचे स्क्रीनशॉट काढले होते आणि पोलिसांना कळवलं होतं. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर कुमार यांनी आपल्यासाठी हा फार धक्कादायक अनुभव होता असं सांगितलं. तसंच लोक आपल्याकडे अशा प्रकारची विनंती करतात हे पाहून फार वेदना झाल्याचंही सांगितलं. “मी तिला सांगितलं की, डॉक्टरांचं काम लोकांचा जीव वाचवणं आहे, घेणं नाही”. डॉक्टर  कुमार यांनी कळवल्यानंतर पोलिसांनी महिलेला शोधून काढत समन्स पाठवलं. 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “महिला आपल्या पतीसह आली होती. आपल्याला ऑनलाइन डॉक्टरांचा नंबर मिळाला. आपल्याला सासूला मारायचं नव्हतं, तर आत्महत्या करायची होती असा तिचा दावा आहे. आपण सासूच्या नावे विचारलं जेणेकरुन आपल्याला माहिती मिळू शकेल असं तिचं म्हणणं आहे”.

महिलेचा पती चालक असून, त्यांना एक मुलगी आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असून, महिलेकडून लिखित स्टेटमेंट घेतलं आहे. 





Source link

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गड किल्ले स्वच्छता मोहीम ,डॉ. बी आर आंबेडकर आय. आय.टी  विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळी वेगळी शिवजयंती.

0
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गड किल्ले स्वच्छता मोहीम ,डॉ. बी आर आंबेडकर आय. आय.टी  विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळी वेगळी शिवजयंती.

फलटण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी फलटण  येथील विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी शिवजयंती साजरी करत संतोषगडावर स्वच्छता मोहीम राबवली. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांच्या मान्यता प्राप्त केंद्रात सारथी महामंडळाच्या योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरदार हिरोजी इंदलकर सारथी गडकिल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत या मोहिमेत सहभाग घेतला.

संतोषगड, जो समुद्रसपाटीपासून 2900 फूट उंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1630 मध्ये बांधला. किल्ल्याला मुख्य तीन दरवाजे असून तो गोमुक स्थापत्यशैलीत बांधलेला आहे.  तसेच गडाच्या आत एक गुप्त दरवाजा आहे आणि गडावर आजही विहिरीमध्ये पाणी उपलब्ध आहे.

गड संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी गडाच्या स्वच्छतेबरोबरच, येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या छोट्या शिळा एकत्र करून बाजूला ठेवल्या आणि काही ठिकाणी पायऱ्या तयार करण्याचा प्रयत्न केला. मोहिमेच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर आय आय टी पासून सुरुवात करून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून  संतोषगडाकडे प्रस्थान केले.

ग्रामस्थांचे स्वागत आणि मार्गदर्शन
ताथवडा गावात पोहोचल्यानंतर ग्रामसेवक, सरपंच आणि गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत कचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

संस्कृतीचा जागर – पोवाडे, भारुड आणि बाळ शिवबाचा पाळणा
गडावर पोहोचल्यानंतर दोन तासांत विद्यार्थ्यांनी संपूर्ण गड परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत पोवाडे, भारुड आणि मनोगते सादर करण्यात आली. विशेषतः महिला स्टाफने मिळून ‘बाळ शिवबाचा पाळणा’ गात या ऐतिहासिक क्षणाला एक वेगळेच रंगत दिली.

या आगळ्या-वेगळ्या शिवजयंती उत्सवामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची नव्याने ओळख झाली तसेच गडसंवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले.

बापरे.. १२ तासांत १०५७ पुरुषांसोबत सेक्स; विश्वविक्रम केलेली पॉर्न स्टार आता बनणार आई, बाळाचा वडील कोण?

0
बापरे.. १२ तासांत १०५७ पुरुषांसोबत सेक्स; विश्वविक्रम केलेली पॉर्न स्टार आता बनणार आई, बाळाचा वडील कोण?


ब्रिटनची दोन प्रसिद्ध ओनलीफॅन्स मॉडेल्स बोनी ब्लू आणि लिली फिलिप्स आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आहेत. दोन्ही प्रौढ कंटेंट क्रिएटर्सनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शेकडो पुरुषांसोबत झोपण्याच्या वादग्रस्त विश्वविक्रमामुळे या दोघी नुकत्याच चर्चेत आल्या होत्या.



Source link