India Pakistan Flag Meeting: LoC सारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात झाली उच्चस्तरीय बैठक. दोन्ही देशांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आंतरराष्ट्रीय विश्वात एकच चर्चा…
Source link

PF Withdrawal Through UPI: ईपीएफ ग्राहकांचे दावे निकाली काढण्यास मदत करणारी प्रणाली तयार करण्यावर केंद्र सरकारकडून वेगाने काम सुरु आहे.
Source link

सातारा : सातारा पोलिसांनी दरोडाच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला आहे. मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे याच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुस्क्या सातारा पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणात या टोळीतील इचलकरंजी आणि साताऱ्यातील 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी टोळीकडून 2 पिस्टल, कोयता, जिवंत काडतुसे असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यामधील सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा आहे. निलेशनेच या टोळीला धीरज ढाणेला मारण्यासाठी 20 लाखांची सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शाहूनगर परिसरामध्ये काही युवक संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक पोहोचताच पाचजण सापडले. यामुळे अधिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते. पोलिसांनी आणखी दोन युवकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुसे, 4 रिकाम्या पुंगळ्या, 2 दुचाकी असा मुद्देमाल मिळाला. प्राथमिक चौकशीत त्यांनी एका सराफ पेढीवर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला.
धीरज ढाणेला जीवे मारण्याची सुपारी मिळाली
सातार्यातील धीरज ढाणेला जीवे मारण्याची सुपारी मिळाली असून ती सुपारी वाजवायला आलो असल्याचे इचलकरंजीमधून आलेल्या गुंडांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करुन सुपारी देणार्याचे नाव विचारले असता त्यांनी निलेश लेवे असे सांगितले. त्याने 20 लाख रुपयांची सुपारी दिली असून त्यापैकी 2 लाख रुपये अॅडव्हान्स दिल्याचेही सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मारहाण झाल्याचा राग
विधानसभा निवडणुकीत मतदानादिवशी अनंत न्यू इंग्लिश स्कूल परिसरात नीलेश लेवे व पप्पू लेवे यांचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी वसंत लेवे यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते. या मारहाणीचा राग निलेश याच्या डोक्यात होता. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक खून होता होता वाचला आहे. पोलिसांनी अटक केलेली जर्मनी टोळी कोल्हापुरात सुद्धा कुख्यात असून अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. इचलकरंजी पोलिसांनी काल (20 फेब्रुवारी) याच टोळीतील गुंडाची धिंड काढत अद्दल घडवली होती. वाढदिवसाच्या नावाखाली त्यांचा धिंगाणा सुरु होता.

Gold Rate Today in Maharashtra: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर लवकरच सोनं 90 हजारांचा पल्ला गाठेल यात काही शंका नाही. मात्र आज शुक्रवारी वायदे बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याची नोंद आहे. MCX वर सोनं आणि चांदीच्या फ्युचर्समध्ये घट झाल्यानंतर ट्रेडिंग होत आहे. मात्र सराफा बाजारात सोन्याची घोडदौड सुरूच आहे.
MCXवर सोनं 224 रुपयांची घट होऊन 85,500 रुपयांवर ट्रेड करत आहे. या दरम्यान चांदी 415 रुपयांची घट होऊन 96,698 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. काल ट्रेडिंग सेशनमध्येही 97,113 रुपयांवर चांदी स्थिरावली होती. सराफा बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं इतक्या दिवसांपासून चिंतेच्या गर्तेत अडकलेल्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 290 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण झाली असून 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दलच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले असल्याने गुरुवारी सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 80,250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 87,750 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 65,660 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,025 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,775 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,566 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 64,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 70,200 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 52,528 रुपये
22 कॅरेट- 80,250 रुपये
24 कॅरेट- 87,750 रुपये
18 कॅरेट- 65,660 रुपये

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर लवकरच सोनं 90 हजारांचा पल्ला गाठेल यात काही शंका नाही. मात्र आज शुक्रवारी वायदे बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याची नोंद आहे. MCX वर सोनं आणि चांदीच्या फ्युचर्समध्ये घट झाल्यानंतर ट्रेडिंग होत आहे. मात्र सराफा बाजारात सोन्याची घोडदौड सुरूच आहे.
MCXवर सोनं 224 रुपयांची घट होऊन 85,500 रुपयांवर ट्रेड करत आहे. या दरम्यान चांदी 415 रुपयांची घट होऊन 96,698 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. काल ट्रेडिंग सेशनमध्येही 97,113 रुपयांवर चांदी स्थिरावली होती. सराफा बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं इतक्या दिवसांपासून चिंतेच्या गर्तेत अडकलेल्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 290 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण झाली असून 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दलच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले असल्याने गुरुवारी सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 80,250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 87,750 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 65,660 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,025 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,775 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,566 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 64,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 70,200 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 52,528 रुपये
22 कॅरेट- 80,250 रुपये
24 कॅरेट- 87,750 रुपये
18 कॅरेट- 65,660 रुपये

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Inauguration: 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार आहे. दुपारी 3.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनात साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असतील. त्यामुळे राजकारणातील सर्व दिग्गज अ. भा. साहित्य संमेलनाच्या मंचावर एकत्र दिसणार आहे. 21,22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ.तारा भवाळकर या भूषवणार आहेत. देशाच्या राजधानीत (Delhi News) तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. तालकटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल.
संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत दुसरे उद्घाटन सत्र होणार आहे. सुशीलकुमार शिंदे, उदय सामंत, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हे सत्र पार पडेल. संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत निमंत्रितांचे कविसंमेलन असेल.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, 22 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत होईल. याशिवाय, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि ‘मधुरव’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच यशवंतराव चव्हाण सभामंडपात ‘बहुभाषिक कवी संमेलन’ आणि ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे याशिवाय माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत, आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे असे अनेक मोठे नेते महाराष्ट्रातून संमेलनात उपस्थिती दाखवणार आहेत.
Satara News : सातारा पोलिसांनी दरोडाच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला आहे. मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे याच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुस्क्या सातारा पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणात या टोळीतील इचलकरंजी आणि साताऱ्यातील 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी टोळीकडून 2 पिस्टल, कोयता, जिवंत काडतुसे असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यामधील सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा आहे. निलेशनेच या टोळीला धीरज ढाणेला मारण्यासाठी 20 लाखांची सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शाहूनगर परिसरामध्ये काही युवक संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक पोहोचताच पाचजण सापडले. यामुळे अधिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते. पोलिसांनी आणखी दोन युवकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुसे, 4 रिकाम्या पुंगळ्या, 2 दुचाकी असा मुद्देमाल मिळाला. प्राथमिक चौकशीत त्यांनी एका सराफ पेढीवर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला.
सातार्यातील धीरज ढाणेला जीवे मारण्याची सुपारी मिळाली असून ती सुपारी वाजवायला आलो असल्याचे इचलकरंजीमधून आलेल्या गुंडांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करुन सुपारी देणार्याचे नाव विचारले असता त्यांनी निलेश लेवे असे सांगितले. त्याने 20 लाख रुपयांची सुपारी दिली असून त्यापैकी 2 लाख रुपये अॅडव्हान्स दिल्याचेही सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मतदानादिवशी अनंत न्यू इंग्लिश स्कूल परिसरात नीलेश लेवे व पप्पू लेवे यांचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी वसंत लेवे यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते. या मारहाणीचा राग निलेश याच्या डोक्यात होता. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक खून होता होता वाचला आहे. पोलिसांनी अटक केलेली जर्मनी टोळी कोल्हापुरात सुद्धा कुख्यात असून अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. इचलकरंजी पोलिसांनी काल (20 फेब्रुवारी) याच टोळीतील गुंडाची धिंड काढत अद्दल घडवली होती. वाढदिवसाच्या नावाखाली त्यांचा धिंगाणा सुरु होता.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Satara News : साताऱ्यामध्ये माजी नगराध्यक्षांच्या मुलाने खुनाच्या सुपारीचा पर्दाफाश झाला असून सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे खूनाची घटना टळली आहे. पाच जणांच्या सशस्त्र टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व सातारा शहरच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केल्यानंतर माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच खुनाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्यांदा उडवाउडवी केल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच टोळीने सुपारी घेतल्याची कबूली दिली. संशयितांकडे देशी बनावटीची दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, चार रिकाम्या पुंगळ्या, दोन लोखंडी सुरे व महागडे मोबाइल, दोन दुचाकी सापडल्या.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांचे पती वसंत लेवे यांना मारहाण झाली होती. हा राग मनात धरून धीरज ढाणे (वय 45, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा काटा काढण्यासाठी वसंत लेवे यांचा मुलगा नीलेश लेवेनं संशयितांना 20 लाखांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या घटनेमुळे साताऱ्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. लेवे यांच्या मुलाने धीरज ढाणेला मारण्यासाठी अनुज पाटील याला 20 लाखांची खुनाची सुपारी दिली. त्यातील दोन लाख रुपये अॅडव्हान्स दिले होते.
पोलिसांनी अनुज चिंतामणी पाटील ( वय 21, रा. गुरुवार पेठ), दीप भास्कर मालुसरे (वय 19, रा. गुरुवार पेठ, शिर्केशाळेजवळ, सातारा), आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय 25, रा. हनुमाननगर, इचलकरंजी, कोल्हापूर), अक्षय अशोक कुंडूगळे (वय 25, रा. जवाहरनगर इचलकरंजी, कोल्हापूर), क्षितिज विजय खंडाईत (रा. गुरुवार पेठ) या पाचजणांना अटक केली. सुरुवातीला संशयित आरोपींनी सराफ पेढीवर दरोडा टाकणार होतो, अशी खोटी माहिती पोलिसांना दिली. परंतु पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच धक्कादायक माहिती समोर आली.
विधानसभा निवडणुकीत मतदानादिवशी अनंत न्यू इंग्लिश स्कूल परिसरात नीलेश लेवे व पप्पू लेवे यांचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी वसंत लेवे यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते. या मारहाणीचा राग निलेश याच्या डोक्यात होता.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..

Supreme Court on Bank Fraud Transaction : सतत होणारे सायबर हल्ले आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं स्कॅमर्सना आर्थिक फसवणुकीसाठी उपलब्ध होणारे पर्याय पाहता सध्या ई व्यवहार अधिक सुरक्षित करण्याची गरज आणखी वाढल्याचं स्पष्ट होत आहे. याचदरम्यान एकिकडे सामान्यांना आपल्या पैशांची चिंता वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल देत बँक खात्यांच्या बाबतीत खातेदारक, बँक ग्राहकांना मोठा दिलासा देऊ केला आहे.
बँकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानं बँकेच्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय सुनावला. बँकेतील खात्यातून फसवणुकीनं पैसे काढल्यास त्याला संबंधित बँक जबाबदार राहणार असल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. तसेच बँकेनं ग्राहकांची नुकसानभरपाई द्यावं असंही सर्वोच्च न्यालयानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध पल्ल्व भौमिक या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं ग्राहकाच्या बाजूनं निर्णय देत ग्राहकांच्या पैशांचं संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची असल्याची बाब अधोरेखित केली.
देशात न्यू इंडिया बँकेचं प्रकरण चर्चेचा विषय ठरत असतानाच सर्वोच्च न्यायालायानं हा महत्त्वाचा निर्णय दिल्यानं बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या न्यू इंडिया बँकेला ‘ए’ ग्रेड देणाऱ्या सीएचीही चौकशी सुरू असून बँकेला दोन आर्थिक वर्षांत ऑडिटसाठी ‘ए’ ग्रेड देणारे CA अभिजित देशमुख गुरुवारी चौकशीसाठी हजर झाले. त्यांनी बँकेला ‘ए’ ग्रेड ऑडिट रिपोर्ट कोणत्या आधारावर दिला याची चौकशी यावेळी करण्यात आली.
‘संजय राणे अँड असोसिएटस’चे देशमुख यांनीच न्यू इंडिया बँकेचे 2019 ते 2021 या दोन आर्थिक वर्षांचे ऑडिट करत ही श्रेणी दिली होती. 2019 पासून बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताने गैरव्यवहार सुरू केला होता. त्यामुळे संशयाच्या घेण्यात अडकलेल्या देशमुख यांचीही चौकशी करत त्यांचा नोंदवण्यात आला. शिवाय सदर प्रकरणी इतर ऑडिटरनाही समन्स बजावण्यात येणार असून बँकेनं सादर केलेल्या कागदपत्रांचा पुढील तपासही सध्या सुरू आहे. तेव्हा आता या तपासातून कोणती नवी माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.