Thursday, July 30, 2026
Home Blog Page 528

कव्हर स्टोरी: ‘शक्तिपीठ’चं काय होणार?

0
कव्हर स्टोरी:  ‘शक्तिपीठ’चं काय होणार?


रसिक डेस्क1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

नागपूर ते गोवा… महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांसह अनेक तीर्थस्थळांना जोडणाऱ्या, ८०२ किलोमीटर लांबीच्या सहापदरी द्रुतगती महामार्गासाठी राज्य सरकारने पुन्हा कंबर कसली आहे. तर, केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांसाठी सरकार हा प्रकल्प लादत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आपला विरोध आणखी तीव्र केला आहे. वाढत्या उन्हासोबत तापू लागलेल्या या विषयाचा वेध…

नागपूर ते ग‌ोवा ‘शक्तिपीठ महामार्गा’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची घोषणा केली. या नव्या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती येईल, असा दावा सरकारने केला होता. २८ फेब्रुवारी २०२४ ला शासनाने एका राजपत्राद्वारे या ‘पवनार ते पत्रादेवी द्रुतगती महामार्गा’ला राज्य महामार्ग क्र. १० म्हणून मान्यता दिली.

त्यानंतर काही दिवसांतच या प्रकल्पाला शेतकऱ्यांमधून विरोध होऊ लागला. विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत प. महाराष्ट्रात विरोधाची ही धार खूप तीव्र होती. या प्रकल्पाच्या आडून केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आपल्या सुपीक जमिनींचा घास दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. विशेषत: प. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाल्या.

शेतकऱ्यांचा विरोध पाहता, लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकल्प रद्द करावा लागला. परंतु, निवडणुकीनंतर पुन्हा महायुती सरकार सत्तारुढ झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्ग सुरू करण्याची घोषणा केली आणि हा मुद्दा नव्याने तापू लागला. मधल्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांचा विरोध काहीसा कमी झाला. मात्र, नांदेडसह मराठवाड्याच्या काही भागातील तसेच प. महाराष्ट्रातील, विशेषत: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध अजूनही कायम आहे. तिथे पुन्हा आंदोलन उभे राहिले आहे.

या भागातील मंत्री आणि सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा दावा करत आहेत. पण, शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते मात्र विरोधाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सर्व बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची बैठक नुकतीच २० फेब्रुवारीला कोल्हापुरात झाली. १२ मार्चला विधानभवनावर ‘गळफास मोर्चा’ काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते, त्यावरच या प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आणि तीन प्रदेशांतून जाणाऱ्या या महामार्गासमोरचे अडथळे दूर होऊन तो राज्यासाठी शक्तिदायी ठरतो की उभा राहण्याआधीच शक्तिहीन होतो, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्प…

– लांबी : ८०२ किमी.

– रुंदी : १०० मीटर (सहा पदरी)

– अंदाजित खर्च : ८६ हजार कोटी रु.

– भूसंपादन : २७ हजार हेक्टर

– पूर्णत्वाचा कालावधी : ५ वर्षे (२०३० पर्यंत)

नागपूर टू गोवा…

१२ : जिल्ह्यांतून जाणार महामार्ग.

१८ : तास सध्या लागतात या प्रवासाला.

०८ : तास लागतील महामार्ग पूर्ण झाल्यावर.

या तीर्थस्थळांना जोडणार…

रेणुकामाता (माहूर), तुळजाभवानी (तुळजापूर), महालक्ष्मी (कोल्हापूर) ही शक्तिपीठे; औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे तसेच पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, औदुंबर, नरसोबाच्या वाडीसह १९ तीर्थस्थळे या महामार्गाने जोडली जाणार आहेत.

विरोधाची धार कमी करण्याचे प्रयत्न

या ‘महा’प्रकल्पाचा ‘मार्ग’ मोकळा करण्यासाठी कोल्हापुरात अलीकडेच ‘क्रेडाई’ने एक चर्चासत्र घेतले. प्रकल्पाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी त्यातून पुढे आली. यावेळी करण्यात आलेल्या काही सूचना अशा :

– प्रकल्पबाधितांना योग्य दराने आर्थिक मोबदला मिळावा, त्यांचे प्राधान्याने पुनर्वसन व्हावे.

– महामार्गालगत व्यवसाय उभारणीत प्रकल्पबाधित आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

– प्रकल्पाच्या कामात प्राधान्याने स्थानिक मनुष्यबळाचा वापर करावा.

– दळणवळण गतिमान होण्यासाठी या महामार्गाशी सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जोडण्यात यावा.

– महामार्गात नद्यांचे संगम क्षेत्र येत असल्याने पुरामुळे शेतीची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

– कोल्हापूर ते शिर्डी आणि कोल्हापूर ते गुजरात सीमेचा भाग जोडण्याचाही प्रयत्न व्हावा.

उद्योग – पर्यटनवाढीमुळे नवा महामार्ग ठरेल वरदान

कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात उद्योग – व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत, पण ते दळणवळणासाठी मुंबईवर अवलंबून आहेत. चांगल्या वाहतूक सुविधेअभावी कोल्हापुरातील फाउंड्री उद्योगाची वाढही खुंटली आहे. नव्या महामार्गामुळे मुंबईऐवजी रत्नागिरी पोर्टचा वापर करून वेळ वाचवता येईल. कोल्हापुरातील विमानतळावर आता नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नवे उद्योग उभे राहून स्थानिक पातळीवर हजारो रोजगार निर्माण होतील. त्याचवेळी, कोल्हापूर – सांगलीसह प. महाराष्ट्रातील धार्मिक, ऐतिहासिक तसेच वन पर्यटनालाही चालना मिळेल. त्यामुळे हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल. या महामार्गावर उभे राहणारे पूल हे पेन्सिल ब्रिज असल्याने त्यातून पाणी पुढे जाऊ शकेल. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीतील पुराची समस्याही नियंत्रित होईल. या प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ दोन टक्के शेतजमिनी लागणार आहेत. बाकी सर्व जमीन वन विभागाची आहे. त्यामुळे केवळ दोन टक्के नुकसानीकडे बोट दाखवत प्रकल्पाच्या ९८ टक्के लाभाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

– सचिन ओसवाल, उपाध्यक्ष, क्रेडाई, कोल्हापूर

कंत्राटदार, भांडवलदारांसाठी प्रकल्प थोपवला जातोय

सरकार जनतेने मागणी न केलेले आणि केवळ कंत्राटदार, भांडवलदारांच्या हिताचे प्रकल्प घेऊन येत आहे. शक्तिपीठ महामार्ग त्यापैकी एक आहे. रत्नागिरी – नागपूर हा सहापदरी महामार्ग वाहनांअभावी रिकामा असतो. अनेक समांतर रस्तेही या दिशेने जात आहेत. त्यांचे रुंदीकरण करण्याऐवजी सरकार हा नवा महामार्ग जनतेवर, शेतकऱ्यांवर थोपवत आहे. सह्याद्रीतील किंवा मराठवाड्यातील खनिज संपत्तीवर भांडवलदारांचा डोळा आहे. ती वाहून नेण्यासाठी हा महामार्ग बनवला जात आहे. विदर्भातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे, मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी तहानली आहे. या स्थितीत बारा जिल्ह्यांतील जमिनी या प्रकल्पासाठी घेतल्या गेल्या तर शेतकरी भूमिहीन होतील. हजारो झाडे तोडली जाणार आहेत; शिवाय खोदकामामुळे भूजल पातळीवरही परिणाम होईल. मुळात सांगली – कोल्हापूरमध्ये पुरामुळे हानी होते. हा रस्ता झाल्याने पुन्हा महापूर येऊन गावेच्या गावे बुडतील. निवडणुकीपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची किंवा तो न लादण्याची भाषा करणारे नेते आता निवडणूक जिंकल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या पाठीत सुरा खूपसून तो पुढे रेटत आहेत.

– गिरीश फोंडे, समन्वयक, महामार्गविरोधी संघर्ष समिती

वाहत्या प्रवाहांचा गळा न आवळता प्रकल्प व्हावा

नवीन रस्ते तयार करताना लहानमोठ्या नदी – नाल्यांवर आणि प्रसंगी मोठ्या नद्यांवर पूल बांधावे लागतात. अशी कामे करताना महत्त्व दिले जाते, ते रस्त्याच्या प्लॅनिंग आणि डिझाइनला. मात्र, पुलाखालून वाहणाऱ्या नदी / नाल्यांच्या प्रवाहाला अशा नवीन पुलामुळे अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जातेच, असे नाही. साहजिकच अशा पुलांखाली नद्या – नाल्यांच्या प्रवाहाचा गळा आवळला जातो. त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. बऱ्याचदा पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे भराव असलेले पोहोच रस्ते (Approach Road) असतात. त्या भरावात पुरेशा संख्येने आणि मोठ्या आकाराच्या मोऱ्या ठेवल्या जात नाहीत. परिणामी भरावांचे रूपांतर छोट्या धरणात होते आणि त्यामध्ये पाणी साठून राहते. त्यामुळे पुराचा धोका असलेल्या सांगली – कोल्हापूरसारख्या भागात नवा महामार्ग तयार करताना नद्यांवरील रस्ता आणि पुलांचा काटेकोर आढावा घेऊन नद्यांचा प्रवाह खुंटणार नाही, याला प्राधान्य दिले पाहिजे. पुलांच्या पोहोच – भरावाऐवजी आरसीसी बॉक्स कल्व्हर्ट्सचा वापर केला तर पाण्याच्या प्रवाहाला कोठेही अडथळा येणार नाही. – प्रदीप पुरंदरे, जलनियोजन विषयाचे अभ्यासक



Source link

वेब वॉच: ‘मिसेस’ हे ‘ती’च्या विदारक मनोवस्थेचे चकाचक रूप

0
वेब वॉच:  ‘मिसेस’ हे ‘ती’च्या विदारक मनोवस्थेचे चकाचक रूप


सुहास किर्लोस्कर3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ज्यो बेबी लिखित-दिग्दर्शित ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला ‘मिसेस’ अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. २०२१ मध्ये मूळ मल्याळी सिनेमा ‘प्राइम’वर आला होता, तर त्याचा रिमेक ‘झी फाइव्ह’वर प्रदर्शित झाला आहे. अर्थात, या दोन्हींचा विषय सारखाच असला, तरी त्यांच्या कथानकात आणि त्याच्या सादरीकरणात कमालीचे अंतर आहे. त्यामुळे ‘द ग्रेट इंडियन किचन’प्रमाणे ‘मिसेस’च्या नायिकेची मनोवस्था प्रेक्षकांना भिडत नाही.

मूळ मल्याळी सिनेमातून स्वयंपाकघरात तासनतास राबणाऱ्या स्त्रियांची कुचंबणा दाखवली होती. त्या कथेच्या केंद्रस्थानी कुटुंबातील नवविवाहिता होती. व्हरांड्यात आरामखुर्चीवर वृत्तपत्र वाचत बसलेल्या सासऱ्याला टूथब्रश हातात आणून द्यावा लागणे, डायनिंग टेबलवर ताट मांडल्यावर पानात वाढल्याशिवाय न खाणारा सासरा आणि नवरा बघितल्यावर तिला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येते.

मल्याळी सिनेमात संवाद खूप मोजके आहेत. इतके की आपल्याला नायिकेचे नावही समजत नाही. तिच्या रोजच्या कामातून कथानक उलगडत जाते आणि एका नृत्यकुशल, हुशार स्त्रीची स्वयंपाकघर आणि रोजच्या कामात कशी कुचंबणा होत आहे, हे लक्षात येते. कथानक पुढे सरकताना, सबरीमला आंदोलन, अय्यप्पा मंदिर आणि त्या अनुषंगिक परंपरा यांचा उल्लेख येत राहतो; पण ठोस विधाने, चटपटीत संवाद नसतानाही आपल्याला तिथल्या वास्तवाचे गांभीर्य समजते.

निमिषा सजयन आणि सूरज वेंजरामोड्डू यांच्या नैसर्गिक अभिनयाने रोजचे प्रसंग जिवंत होतात. निमिषाच्या मनातले द्वंद्व, होणारी फरपट तिच्या कृतीतून आणि चेहऱ्यावरून जाणवत राहते. हिंदीमध्ये ‘मिसेस’ नावाने या सिनेमाचा रिमेक तयार करताना लेखक हरमन बावेजा आणि अनुसिंग चौधरी यांनी नवरा व सासरा या दोघांना डॉक्टर बनवले आहे.

मूळ सिनेमात सासरा कर्मठ होता. हिंदीमध्ये त्याला डॉक्टर दाखवून लेखकाने नेमके काय साध्य केले आहे, कळत नाही. नववधूला मासिक पाळीच्या दिवसांत ‘बाहेर बसण्याची’ प्रथा या डॉक्टरांच्या घरातही पाळावी लागते, हे जरा विचित्र वाटते. मल्याळीमध्ये नायिकेला सतत स्वयंपाकघरात बघून प्रेक्षकांना काहीसा उबग येतो.

पण हिंदीमध्ये मात्र, डिझायनर ड्रेस घालणारी सुंदर नायिका सासूकडून अनेक उत्तमोत्तम पदार्थ शिकून घेताना अशाप्रकारे दाखवली आहे की, नायिका आणि प्रेक्षकही स्वयंपाक बनवण्याची प्रक्रिया बघण्याचाच आनंद घेतात. स्वयंपाकघरात रोज दिवसभर काम करणाऱ्या नायिकेला उत्तमोत्तम ड्रेस परिधान करुन इतके सजवले आहे की, अशा उत्तम दृश्यांमुळे तिला होणारा मनःस्ताप प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही.

‘मिसेस’मधील नायिका नृत्याचा रियाज करण्याऐवजी नृत्य करताना दिसते. ती भरतनाट्यम किंवा कथक न शिकता बॉलिवूड डान्स करते. मल्याळी सिनेमाच्या सुरूवातीला नायिका नृत्याचा रियाज करताना दिसते. त्यातून तिचा नृत्याचा ध्यास जाणवतो. पण, हिंदीत सिनेमाची सुरूवातच नायिकेच्या बॉलीवूडछाप नृत्याने होते.

मूळ सिनेमा एकूणच केरळची संस्कृती, तिथले निसर्गसौंदर्य, स्थानिक लोकांची मानसिकता निर्भीडपणे दाखवतो. ‘मिसेस’मध्ये तो आणि ती नेमके कोणत्या राज्याचे आहेत, हे कळत नाही. सासरच्या लोकांची जुनाट मते दाखवताना कोणत्याही संस्कृतीवर भाष्य वा टीका करणे हेतुपूर्वक टाळले आहे. त्यामुळे हिंदी सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक इतके कडेकडेने का पोहतात, हा प्रश्न पडतो.

मूळ सिनेमात सलू थॉमस कॅमेरा यांचा बोलतो. नायिका सर्वांच्या पानातले खरकटे काढत असल्याचे बघताना आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, तर आपल्या घरातल्या स्त्रिया रोज हेच काम कसे करत असतील, असा विचार प्रेक्षकांच्या मनात येतो. बेडरूममध्येही स्त्रीला स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, नकाराधिकार वापरता येत नाही, हे दृश्य मूळ मल्याळी सिनेमामध्ये जितके प्रभावी झाले आहे, तितके हिंदी रिमेकमध्ये ते मनाला भिडत नाही.

‘मिसेस’च्या शेवटी नायिका नवऱ्याच्या कारची किल्ली घेऊन घर सोडते, तेव्हा आतमध्ये सासऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते. ती कार स्वत: चालवत माहेरी जाते आणि लगेच बॉलीवूडछाप नृत्य करते. ते नृत्य होताच तिला उदंड प्रतिसाद मिळतो. मूळ मल्याळी सिनेमाच्या शेवटी नायिकेच्या घरात पुरुषप्रधान कर्मकांड सुरू असते. ती घर सोडून रस्त्याने तडफेने चालू लागते, त्यावेळी पार्श्वभूमीवर घरातल्या बायका रोजची कामे करताना दिसतात. मुली घरकाम करताना आणि मुलं खेळताना दिसतात. काही स्त्रिया मंदिरात प्रवेश न मिळणे आणि रीतीरिवाज पाळण्याविरुद्ध निषेध करताना दिसतात. कालांतराने ती नृत्यामध्ये करिअर करताना जे नृत्य-नाट्य सादर होते, तेसुद्धा अर्थपूर्ण आहे.

एकूणच, मूळ मल्याळी सिनेमा आणि त्याच्या हिंदी रिमेकमधील फरक जाणवण्यासारखा आहे. ‘मिसेस’ची नायिका सान्या मल्होत्राचा अभिनय उत्तम आहे. पण, दिग्दर्शकाने तिची व्यक्तिरेखा उजळवून दाखवण्याचा अनावश्यक प्रयत्न केल्याने सिनेमा अपेक्षित परिणाम साधत नाही. प्रतीक उत्पल यांचे कलादिग्दर्शन सिनेमा सुंदर आणि प्रेक्षणीय करण्यावर भर देते, जे या विषयाला अजिबात अनुरूप नाही. हिंदीवाले सिनेमा चकाचक करण्यावर भर देतात. त्या उलट मल्याळी दिग्दर्शक कथेचा विषय प्रभावीपणे पोहोचवण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे मल्याळी सिनेमे आशयघन ठरतात आणि त्यांचे हिंदी रिमेक केवळ प्रेक्षणीय होतात.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link

रसिक स्पेशल: सोशल मीडियावरचा वाह्यातपणा आणि आपण

0
रसिक स्पेशल:  सोशल मीडियावरचा वाह्यातपणा आणि आपण


अतुल कहाते14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अलाहाबादियाच्या प्रकरणात पूर्ण दोष त्याचा, त्या ‘शो’च्या संयोजकांचा आणि तो सादर करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आहेच. पण, आपणही कधी अंतर्मुख होणार की नाही? की वाह्यातपणा करणाऱ्यांनी करत राहावा, न्यायालयाने कान उपटावे, सरकारने कायदे करावे अन् आपण मात्र अशा गढूळ पाण्यात डुंबत राहावं?

अलीकडं ‘सोशल मीडिया’ म्हणजेच समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेला लिखित किंवा दृकश्राव्य प्रकारचा आशय आणि त्यासंबंधीच्या निकषांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आहे. त्याच जोडीला, डिजिटल विश्वातील ‘इन्फ्ल्युएन्सर’ नावाची नवी जमात प्रचंड प्रभावी ठरत असल्याचंही ठळकपणे समोर येत आहे.

या दोन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून एका शोमध्ये रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या अश्लाघ्य संभाषणामुळे देशभर संतापाची लाट उसळली. ‌अगदी सर्वोच्च न्यायालयालानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यावर खरमरीत टिप्पणी केली. त्यामुळं सोशल मीडियाचं आणि त्यावर होत असलेल्या गैरप्रकारांचं काय करायचं, हा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.

पहिला मुद्दा सोशल मीडियाचा. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही यांसारख्या मुख्य माध्यमांच्या तुलनेत अलीकडे सोशल मीडिया विलक्षण लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे. प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाइल, स्वस्तातील इंटरनेट आणि नोबेल पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञांच्या मुलाखतींपासून ते अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदूंच्या कारनाम्यांपर्यंतचे सगळे प्रकार इथे उपलब्ध असतात. खरी करमणूक आणि ज्याला करमणूक का म्हणावं, असा प्रश्न पडावा अशा प्रकारच्या पाचकळपणात तर अख्खा देश बुडून गेला असल्याचं विदारक चित्र सतत डोळ्यासमोर येतं.

साहजिकच या सोशल मीडियावर आपला जम बसवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी असंख्य लोकांची धडपड सुरू असते. त्यातूनच जन्मलेले ‘इन्फ्ल्युएन्सर’ आपल्या प्रेक्षकांनी चुकूनही दुसरीकडं जावू नये, यासाठी सतत निरनिराळ्या क्लुप्त्या करण्याच्या धडपडीत व्यग्र असतात. सध्या गाजत असलेला अलाहाबादियाचा प्रकार यातूनच घडला आहे. विशेष म्हणजे, संबंधित शोमध्ये करण्यात आलेली विधानं मूळची या इन्फ्ल्युएन्सरची नव्हती, तर ती त्याने एका विदेशी कार्यक्रमात ऐकून त्यांचा वापर आपल्याही कार्यक्रमातही करायचं ठरवलं होतं, याचे काही पुरावे समोर आले आहेत. म्हणजेच, ‘टीआरपी’सदृश लोकप्रियता मिळवत राहण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कुठलीही पातळी गाठली जाते, हे या निमित्तानं दिसून आलं.

या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा. अशी घटना घडल्यावर अनेक जण सोयिस्कररीत्या याचं खापर सरसकटपणे सोशल मीडियावर फोडून मोकळे होतात. खरं म्हणजे, यात सोशल मीडियाची चूक काय आणि किती आहे? हा एक खुला मंच आहे. तिथं कोण काय करेल, यावर या माध्यमाचं नियंत्रण नाही. एखादी घटना घडली किंवा तक्रार आली आणि त्यात तथ्य असूनही त्यासंबंधी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी काही केलं नाही, तर त्यांच्यावर ठपका ठेवणं बरोबर आहे.

मुळात सोशल मीडिया हा वर्तमानपत्रासारखा नाही. उदाहरणार्थ, संबंधित कार्यक्रमात केलेली विधानं त्या माणसानं वर्तमानपत्रातल्या आपल्या एखाद्या लेखात लिहिली असती, तर त्या वर्तमानपत्राने ती छापली असती का? अजिबातच नाही. म्हणजेच वर्तमानपत्रे, ‘लाइव्ह’ नसलेले रेडिओ आणि टीव्हीचे कार्यक्रम याठिकाणी एक संपादकीय फळी असते. लोकांपर्यंत काय पोहोचवायचं आणि नाही, हे ठरवण्याचं तारतम्य त्यांच्याकडं असतं. याउलट एखादा आपल्या इन्स्टा अकाउंटवर किंवा यूट्यूब चॅनलवर काय करेल, यावर सोशल मीडिया नियंत्रण कसं ठेवणार?

म्हणूनच आता आपण दुसरा मुद्दा विचारात घेतला, तर सोशल मीडिया कसा वापरायचा, याचं तारतम्य लोकांकडेच असलं पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये लहान मुलांवर सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतातही पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मीडिया अकाउंट वापरता येणार नाही, असा नियम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सगळं स्तुत्य आहेच; पण म्हणून आत्ता घडला तसा प्रकार पुन्हा घडणार नाही किंवा एकूणच सोशल मीडियावर एकदम जबाबदारीनं वागणारे लोक येतील, अशी आशा बाळगणं अक्षरश: दुधखुळेपणाचं ठरेल.

उदाहरणार्थ, यूट्यूब आणि व्हॉट्स ॲ‍प यांवर मिळत असलेल्या ‘टिप्स’च्या आधारे शेअर बाजारात ‘गुंतवणूक’ करून हात पोळून घेणारे लोक आणि सतत नशा चढल्यासारखे सोशल मीडियाला चिकटलेले लोक यांना कोण शहाणं करणार? आणि कसं?

म्हणजेच यामधला खरा मुद्दा तुमच्या-आमच्यासारख्या लोकांपर्यंतच येऊन ठेपतो. कुणी आजूबाजूला कचरा केला म्हणून त्याच्याशी काही संबंध नसताना आपण त्या माणसाच्या घरात जाऊन नंतर त्याविषयी तक्रार करण्यासारखा हा प्रकार आहे. त्या कचऱ्याकडं दुर्लक्ष करणं, हा त्यावरचा वैयक्तिक पातळीवरचा पहिला उपाय असतो.

सोशल मीडियावरच्या अफाट कचऱ्याच्या बाबतीत आपण हेच म्हणू शकतो. अपवाद वगळता बहुतांश प्रमाणात आपल्यालाच या सगळ्याची चटक लागली आहे. आपल्याला सतत काहीतरी नवं, अचकट विचकट, ‘हटके’ हवं असतं. त्यातूनच आपण अशा नवनव्या ‘इन्फ्ल्युएन्सर’ना जन्माला घालतो आणि आहेत त्यांना फुगवत राहतो.

त्यामुळं आपला ‘अटेन्शन स्पॅन’ अत्यंत कमी झाला आहे आणि तो आता १० ते ३० सेकंदांच्या रील्सपलीकडे जाऊ शकत नाही. एवढ्या अल्पकाळात जो आपल्याला हसवेल, आपली कसली का होईना; करमणूक करेल किंवा आपल्याला ‘व्हॉट्स ॲ‍प युनिव्हर्सिटी’चं बौद्धिक पाजेल, त्याचे आपण ‘फॉलोअर’ झालेलो असतो.

अलाहाबादियाच्या प्रकरणातील दोष पूर्णपणे त्याचा, संबंधित शोच्या संयोजकांचा आणि तो सादर करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आहेच. पण, वेळोवळी घडणाऱ्या अशा प्रकारांचा सगळा दोष संबंधित ‘इन्फ्ल्युएन्सर’ आणि सोशल मीडियावर ढकलून मोकळं होताना आपणही जरा अंतर्मुख होणार की नाही? की वाह्यातपणा करणाऱ्यांनी तो करत राहावा, पोलिसांनी कारवाई करावी, न्यायालयाने कान उपटावे, सरकारने कायदे करावे आणि आपण मात्र अशा गढूळ पाण्यात डुंबत राहावं, असं आपल्याला वाटतंय?

(संपर्कः akahate@gmail.com)



Source link

350 राण्यांपैकी कोणासोबत तो शयनगृहात जाणार ते असं ठरायचं; लैंगिक उत्तेजन वाढविण्यासाठी करायचा खास उपाय, तर विवस्त्र असेल तरच महालात…

0
350 राण्यांपैकी कोणासोबत तो शयनगृहात जाणार ते असं ठरायचं; लैंगिक उत्तेजन वाढविण्यासाठी करायचा खास उपाय, तर विवस्त्र असेल तरच महालात…


Maharaja Bhupinder Singh :   भारतातील इतिहास जेवढा वाचला तेवढा कमी आहे. भारतात मुघल सम्राटसोबत अनेक राजे, महाराजे होऊन गेले आहेत. प्रत्येक राजे, महाराजांची आपली अशी खासियत आणि इतिहास आहे. मुघल सम्राट हे अय्याशासाठी ओळखले जायचे. भारतात एक असाही हिंदू राजा होत्या ज्याचा तब्बल 365 राण्या आणि 83 मुलं होती. या हिंदू राजाबद्दल अनेक गोष्टी आजही जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दिवाण जरमनी दास यांच्या ‘महाराजा’ या पुस्तकात या राजाबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. 

आम्ही ज्या राजाबद्दल बोलत आहोत, त्याच नाव भूपिंदर सिंग असून तो भारतातील सर्वात अय्याश राजा म्हणून ओळखला जायचा. भूपिंदर सिंग हे 1900 ते 1938 पर्यंत ब्रिटीश भारतातील पटियाला संस्थानाचे राज्य करणारे महाराजा होते. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी तो राजा झाला. 18 वर्षांचा झाल्यानंतर त्यांनी राज्याच पदभार स्विकारला आणि त्याने 38 वर्षे पटियालावर राज्य केलंय. या राजाची उंची 6 फूट 4 इंच तर वजन 178 किलो होते.  भूपिंदर सिंग यांच्या 365 राण्यांपैकी 10 प्रमुख राण्या होत्या. या राण्यांपासून महाराजांना 83 मुलं झाली आणि त्यापैकी फक्त 53 मुलं जिवंत राहिली. भूपिंदर सिंग यांचे त्यांच्या राण्यांवर खूप प्रेम होते. 

दिवाण जरमनी दास यांनी त्यांच्या ‘महाराजा’ या पुस्तकात महाराजा भूपिंदर सिंग यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. या पुस्तकानुसार या राजाने लीला भवन किंवा उत्सव करणाऱ्यांसाठी महाल बांधलं होतं. या महालात एक नियम होता त्यानुसार विवस्त्र लोकांना महालात प्रवेश मिळायचा. पटियाला शहरातील भूपेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहरदरी बागेजवळ हा महाल बांधला आहे.   

या महालात एक अशी खोलील आहे जिला प्रेम मंदिर असं म्हटलं जातं. ही खोली महाराजांसाठी खास असून तिथे दुसऱ्या लोकांनाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती. या खोलीत राजाच्या सुखसोयींची पूर्ण व्यवस्था असायची. त्याच्या वाड्याच्या एक स्विमिंग पूल होता ज्यामध्ये एकाच वेळी सुमारे 150 जण आंघोळ करु शकायचे. याठिकाणी राजा अनेक पार्ट्या करायाचे. असं म्हणतात जेव्हा राजा या स्विमिंग पूलला आंघोळीला जायचा तेव्हा हरमच्या मुलींना विवस्त्र उभं केलं जात होतं. 

महाराजांच्या महालात दररोज 365 कंदील पेटवले जात होते. या कंदिलाच वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर 365 राण्यांचं नाव लिहिलं होतं. असं म्हणतात या 365 कंदीलपैकी जी कंदिल पहिले विझलेल त्यावर ज्या राणीचं नाव असेल ती राणी राजाच्या शयनगृहात रात्री जायची. 

भूपेंद्र सिंह यांनी महालातील महिलांचे कपडे, मेकअप, दागिने इत्यादींसाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक केली होती. हरममधील महिलांना सतत आकर्षक ठेवण्यासाठी ते कपडे आणि दागिने डिझाइन करायचे. महाराजांना आवडेल असा मेकअपवर भर दिला जायचा. एवढंच नाही तर महिलांच्या शरीरात त्यांच्या इच्छेनुसार बदल करण्यासाठी फ्रेंच, इंग्लिश आणि भारतीय प्लास्टिक सर्जनचीही नेमणूक करण्यात आली होती. यासाठी एक प्रयोगशाळाही उघडण्यात आली होती. 

महाराजांच्या खोलीत कामुक कलाकृती बनवल्या होत्या. या कलाकृती प्राचीन मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. त्या कलाकृतींमध्ये चित्रित केलेल्या प्रेम आणि लैंगिक जीवनासाठी महाराजांना प्रेरणा मिळायची असं या पुस्तकात सांगण्यात आलंय. विविध आसनांचा सराव करण्यासाठी त्याने आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यात रेशमी तारांनी बनवलेला झुलाही टांगला होता असं म्हणतात. 

शारिरीकदृष्ट्या मजबूत असूनही महाराज सर भूपेंद्र सिंह विविध प्रकारची कामोत्तेजक औषधे घ्यायचे असं या पुस्कात उल्लेख करण्यात आलाय.  भारतीय डॉक्टर मोती, सोने, चांदी आणि लोखंड, विविध प्रकारची औषधे तयार करायचे. एकदा तर खास बारीक चिरलेलं गाजर आणि चिमणीचा मेंदू पासून त्यांच्यासाठी औषध तयार करण्यात आलं होतं. 

त्याच्या आहाराचा आणि थाटाचा उल्लेख डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुस्तकातही करण्यात आला आहे. महाराजा एका दिवसात सुमारे 10 किलो अन्न खायचा असं म्हणतात. चहा पिताना दोन कोंबड्या खाणे हे त्यांचा नाश्ता असायचा. खाजगी जेट खरेदी करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते. 

महाराजा भूपिंदर सिंग यांनाही मद्यपानाची आवड होती. कदाचित तुम्हाला माहित नसेल सध्या लोकप्रिय असलेल्या पटियाला पेगचा शोध त्यांनीच लावला होता. तर त्याच्याकडे 44 रोल्स रॉयस कार होत्या, त्यापैकी 20 कारचा ताफा दैनंदिन कामांसाठी वापरला जायचा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महाराजा भूपिंदर सिंग हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांच्याकडे स्वतःचे विमान होतं. जे त्यांनी 1910 मध्ये ब्रिटनकडून खरेदी केलं होतं. 

 





Source link

‘त्या’ हरममधील दासीचं सौंदर्य पाहून औरंगजेब बेशुद्ध पडला; मुघल सम्राट आणि हीराबाईची प्रेमकहाणी अतिशय रंजक

0
‘त्या’ हरममधील दासीचं सौंदर्य पाहून औरंगजेब बेशुद्ध पडला; मुघल सम्राट आणि हीराबाईची प्रेमकहाणी अतिशय रंजक


Aurangzeb and Hirabai Zainabadi Love Story : भारताच्या इतिहासात जेव्हा आपण झाकून पाहतो, तेव्हा सर्वात क्रूर मुघल सम्राट कोण होता, असं विचारल्यास औरंगजेब हे उत्तर मिळतं. औरंगजेबाने 49 वर्ष भारतावर राज्य केलं. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी यांच्यासोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. हा असा क्रूर मुघल सम्राट कोणाच्या प्रेमात पडेल असं तुम्हाला वाटतं का? औरंगजेबाच्या हरममध्ये हजारो महिला होत्या. हरम हे मुघल सम्राट यांच्या अय्याशीचा अंडा मानला जात होता. यात हरममध्ये हिराबाई नावाची एक दासी होती. हिराबाईचं सौंदर्य पाहून औरंगजेबसारखा क्रूर सम्राट बेशुद्ध पडला होता. चला पाहूयात त्यांची प्रेमकहाणी. 

मुघल सम्राट आणि हीराबाईची प्रेमकहाणी 

अब्दुल हयी खान यांच्या ‘मसर-अल-उमारा’ या पुस्तकाचा हीराबाई आणि मुघल सम्राटचा प्रेमकाहणीचा उल्लेख आहे. ही कथा त्या काळाची आहे जेव्हा भारताचा सम्राट शाहजहान हयात होते. शाहजहाने त्याचा 35 वर्षांचा मुलगा औरंगजेब याला दख्खनचा राज्यपाल म्हणून पाठवलं होतं. दख्खनच्या राज्यपाल म्हणून औरंगजेबाचा हा दुसरा कार्यकाळ होता. तो आपले पद स्वीकारण्यासाठी औरंगाबादला जात होता. वाटेत मध्य प्रदेशात ताप्ती नदीच्या काठावर बुरहानपूर येते. औरंगजेबाची मावशी सुहेला बानो तिथे राहत होती. औरंगाबादला जात असताना, औरंगजेब त्याच्या मावशीला भेटण्यासाठी बुरहानपूर येथे थांबला. त्यांचे मामा मीर खलील खान-ए-जमान होते.

या पुस्तकात असं सांगितलं आहे की, औरंगजेब बुरहानपूरच्या जैनाबाद इथे बाग आहू खाना येथे फिरत होती, तेव्हा त्याची मावशीही तिच्या दासींसह फिरायला आली. जेव्हा औरंगजेबाने त्याच्या मावशीसोबत आलेल्या एका दासीला पाहिले तेव्हा तो तिच्याकडे पाहत राहिला.

हमीदुद्दीन खान यांनी औरंगजेबाचे चरित्रात असं लिहिलंय की, मावशीच्या घरात, औरंगजेबाच्या नजरेपासून हरममधील महिलांना दूर ठेवण्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. पण एके दिवशी तो न कळवता घरात शिरला. त्यावेळी, चालताना भेटलेली तीच दासी झाडाची फांदी धरून हळूवारपणे गात होती. त्या दासीचे नाव हिराबाई होते पण सर्वजण तिला झैनाबादी म्हणत.

झैनाबादीला पाहताच औरंगजेब बेशुद्ध होऊ खाली पडला. असं म्हटलं जातं की ही माहिती मिळताच औरंगजेबाची मावशी अनवाणी त्याच्याकडे धावली आणि त्याला मिठी मारून रडू लागली. मात्र, काही क्षणातच औरंगजेब शुद्धीवर आला.

नंतर जेव्हा औरंगजेबाने आपल्या मावशीला संपूर्ण गोष्ट सांगितली तेव्हा तिने सांगितले की काका मीर खलील खान-ए-जमान खूप क्रूर आहेत. हे कळल्यानंतर ते मला मारतील. तो हीराबाईलाही मारेल. यावर औरंगजेब म्हणाला की तो त्याच्या काकांशी दुसऱ्या मार्गाने बोलेल आणि मुर्शीद कुली खान मार्फत खान-ए-जमानला त्याचा संदेश पोहोचवला.

बीबीसीच्या वृत्तानुसार, खान-ए-जमानने त्याला औरंगजेबाच्या हरममधून हिराबाईच्या बदल्यात चित्राबाई त्याच्या स्वाधीन करण्यास सांगितलं. काही इतिहासकार या व्यवहाराशी सहमत नाहीत. मात्र औरंगजेब पहिल्याच नजरेत प्रेमात पडला यावर सर्वांचे एकमत आहे. त्याने आपल्या मावशीकडे विनवणी करून हिराबाईलाही मिळवले होते. त्याच वेळी, काही जण म्हणतात की त्याने चित्राबाईच्या बदल्यात हिराबाई मिळवली होती. 

हिराबाईंचे खरं नाव बदलण्यामागे एक कथा आहे. इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या मते, अकबराच्या काळात एक नियम बनवण्यात आला होता. यानुसार, हरममधील महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारली जात नव्हती. त्यांची नावं त्यांच्या शहराच्या किंवा जन्मस्थळाच्या नावावरून ठेवण्यात आली. म्हणूनच जेव्हा हिराबाई औरंगजेबाच्या हरममध्ये पोहोचल्या, तेव्हा त्या झैनाबादच्या असल्याने त्याचे नाव झैनाबादी महाल पडले.

औरंगजेबाच्या या प्रेमाची बातमी शाहजहानपर्यंतही पोहोचत होती. इतिहासकार रामानंद चॅटर्जी यांनी लिहिलंय की औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह याने त्याचे वडील शाहजहान यांना या घटनेबद्दल सांगितले होते. असं म्हटलं जातं की दारा शिकोहने औपचारिक तक्रार केली होती, की औरंगजेब त्याच्या मावशीच्या घरातील एका दासीमुळे उद्ध्वस्त होत आहे. असं म्हटलं जातं की नोव्हेंबर 1653 मध्ये हिराबाई देखील औरंगजेबासोबत दौलताबादला गेल्या होत्या. मात्र त्यांचं निधन 1654 मध्ये झाले.





Source link

Maharashtra Election News LIVE February 22, 2025: Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार

0
Maharashtra Election News LIVE February 22, 2025: Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार


Maharashtra Election 2024 News LIVE: Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार

Maharashtra Election 2024 News LIVE: Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 22 Feb 202501:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार

  • Bbiwandi Crime News: भिवंडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Read the full story here





Source link

Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार

0
Maharashtra Election News LIVE February 22, 2025: Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार


Bbiwandi Crime News: भिवंडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात देखील महिला असुरक्षित असल्याचं यामुळे निष्पन्न झालं आहे. एका नवविवाहितेवर सासरे आणि त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला असून विवाहितेने तक्रार दिल्यावर नारपोली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन सासरे व त्याच्या मित्राने विवाहितेवर बलात्कार केला. तब्बल १५ दिवस हा प्रकार सुरू होता. आरोपी व त्याचा मित्र घरात झोपले असल्याची संधी साधून घरातून पळून जाऊन विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठत. या प्रकरणी तक्रार दिली.



Source link

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना किती पगार मिळणार? घरासह या सुविधा देखील मिळणार, वाचा

0
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना किती पगार मिळणार? घरासह या सुविधा देखील मिळणार, वाचा


 Delhi Chief Minister Rekha Gupta salary: रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आता त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी ठरवून दिलेल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. पगार, बंगला, वाहन, सुरक्षा, मोफत उपचार, मोफत वीज आदी सुविधा त्यांना मिळणार आहेत.



Source link

Mughal Harem Stories : ‘या’ माध्यमातून अकबराने हरममध्ये ठेवल्या होत्या हजारो महिला; त्यांना आकर्षित करण्यासाठी…

0
Mughal Harem Stories : ‘या’ माध्यमातून अकबराने हरममध्ये ठेवल्या होत्या हजारो महिला; त्यांना आकर्षित करण्यासाठी…


Mughal Harem Stories : मुघल काळात नवाब त्यांच्या विलासी जीवनासाठी प्रसिद्ध होते. सम्राट अकबरला त्याच्या वडिलांकडून आणि आजोबांकडून अनेक गोष्टी वारशात मिळाल्या होत्या. अकबर चरित्र यात त्यांच्याबद्दल अनेक किस्से लिहिले आहेत. अकबर त्याच्या आईचा आणि पालक आईला खूप मानायचा. त्यासोबत तो त्याच्या राणींवरही खूप प्रेम करायचा आणि त्यांचा आदर करायचा. मुघल काळात महिलांसाठी मोठे मोठे हरम बांधण्यात आले होते. इतिहासकार सांगतात की, बाबर आणि हुमायूनच्या हरममध्ये दोनपेक्षा जास्त महिला नव्हत्या. मात्र अकबराच्या हरममध्ये ही संख्या हजारोंच्या घरात होती. बाबर आणि हुमायून यांनी स्वतःला चार बायका करण्यापुरते मर्यादित होते. पण  अकबराच्या हरममधील महिलांच्या संख्येमुळे एक वादाला तोंड फुटलं होतं.  

अकबरच्या हरममध्ये इतक्या महिला कश्या?

इतिहासकार किशोरी शरण लाल यांनी त्यांच्या ‘द मुघल हरेम’ या पुस्तकात लिहिलंय की, उलेमांचा असा विश्वास आहे की मुस्लिम पुरुष चार लग्न करू शकतो. यामागील तर्क असा होता की लग्नानंतर तीन महिन्यांनी पत्नी गर्भवती होते. म्हणून, राजा चार वेळा लग्न करू शकत होता जेणेकरून त्याच्या आनंदात कोणताही अडथळा येऊ नये. जरी त्याला पाचव्यांदा लग्न करायचे असेल तरी त्याला एका पत्नीला घटस्फोट द्यावा लागेल. अकबराच्या हरममध्ये अनेक महिला असल्याने, इबादत खानामध्ये यावर चर्चा झाली आणि तेथे असे ठरवण्यात आले की मुताह निकाहद्वारे एक मुस्लिम पुरुष कितीही महिलांसोबत राहू शकतो. राजा स्वतः कायदा असल्याने, मुताहचा हुकूम हा त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय होता. अकबराच्या हरममध्ये अनेक प्रकारच्या महिला होत्या. त्या केवळ देखाव्यासाठी एकमेकांसोबत प्रेमाने राहत होत्या पण राजावर स्थान आणि प्रभाव मिळविण्यासाठी त्यांनी एकमेकांविरुद्ध कट रचला. जरी तिने ते उघड केले नाही.

मुताह निकाह म्हणजे काय?

इस्लाममध्ये, मुताह निकाह हा एक तात्पुरता विवाह आहे ज्यामध्ये विवाह पूर्व-निर्धारित कालावधीसाठी करारानुसार केला जातो. निकाहचा कालावधी काही तासांपासून ते ९९ वर्षांपर्यंत असू शकतो. मुताह निकाहची परंपरा इस्लामपूर्वीची अरबी परंपरा मानली जाते, जी शिया मुस्लिमांमध्ये अधिक प्रचलित होती. सुन्नी लोकांचा असा विश्वास आहे की पैगंबर मुहम्मद यांनी यावर बंदी घातली होती. या निकाहमध्ये लेखी किंवा तोंडी करार असतात आणि त्याची पद्धत निकाहपेक्षा वेगळी असते. मुताह निकाहमध्ये साक्षीदार असणे आवश्यक नाही.

मुघल हरममध्ये सम्राटाची आई सर्वोच्च होती, जरी याला अनेक अपवाद होते. बाबर आणि हुमायूनच्या हरममध्ये, त्यांच्या माता हरमच्या सर्वोच्च अधिकारी होत्या आणि सर्व काम त्यांच्या आदेशानुसार केले जात असे. ती राजाच्या मुख्य पत्नीपेक्षा जास्त प्रभावशाली होती. पण अकबराच्या काळात परिस्थिती बदलली, अकबराची आई त्याच्या बालपणात त्याच्यासोबत राहिली नाही आणि अकबराला त्याच्या दहा पालक मातांसोबत राहावे लागले, ज्यांच्या प्रमुख महम अंगा होत्या. अकबराच्या हरममध्ये महम अंगाचा मोठा प्रभाव होता. त्याने येथे आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी अनेक कट रचले. त्यांच्याशिवाय, अकबराची आई मरियम माकानी, सलीमा बेगम आणि अकबराच्या इतर बेगमांनाही त्यांच्या प्रतिष्ठेनुसार स्थान होते. अकबराच्या हरममध्ये त्याची पत्नी, उपपत्नी, उपपत्नी, दासी, नर्तकी इत्यादी होत्या. हरममध्ये बहिणींनाही खूप विशेष स्थान होते. जहांगीरने त्याच्या आत्मचरित्रात त्याची बहीण उन्निसा बेगमचाही उल्लेख केला आहे, तो तिच्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम करत असे. अकबरने नौरोजच्या निमित्ताने हरममधील महिलांसाठी एक खास मेळा आयोजित करण्यास सुरुवात केली होती. अकबराने त्याचे हरम बाबर आणि हुमायूनच्या हरमपेक्षा वेगळे बांधले होते, कारण हरमच्या आकाराचा राजाच्या प्रभावावर परिणाम होत होता, म्हणून त्याने ते मोठे बांधले. येथे षंढ हे संरक्षक होते आणि महिलांच्या संख्येवर कोणतेही बंधन नव्हते.





Source link

Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!

0
Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!


पुढील
बातमी

Indian Railway नं प्रवास करताना ट्रेनमध्ये दिलेलं चादर, टॉवेल घरी नेल्यास काय शिक्षा होते?





Source link