Thursday, July 30, 2026
Home Blog Page 527

‘४ दिवस सोबत राहिली, तरुणीला माहिती होते की, ती काय करत आहे’, बलात्कार प्रकरणातील आरोपीला कार्टाकडून जामीन

0
‘४ दिवस सोबत राहिली, तरुणीला माहिती होते की, ती काय करत आहे’, बलात्कार प्रकरणातील आरोपीला कार्टाकडून जामीन


पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या बलात्काराच्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षांच्या मुलीला तिच्या कृत्याची पूर्ण माहिती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. ती स्वत:च्या मर्जीने ४ दिवस आरोपींसोबत राहिली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, ‘पॉक्सो कायद्याच्या कक्षेत फिर्यादी अल्पवयीन आहे, यात शंका नाही. मात्र, त्याला आपल्या कृत्याची पूर्ण माहिती व क्षमता होती, असे या प्रकरणातील वस्तुस्थितीवरून दिसून येते. त्यानंतरच ती स्वेच्छेने चार दिवस आरोपीसोबत राहिली. 



Source link

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला; दोन्ही राज्यांदरम्यान बस सेवा स्थगित, प्रवाशांचे हाल, काय आहे प्रकरण

0
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला; दोन्ही राज्यांदरम्यान बस सेवा स्थगित, प्रवाशांचे हाल, काय आहे प्रकरण


कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात मराठीत न बोलल्यामुळे केएसआरटीसी बस कंडक्टरवर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तनावाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही राज्या दरम्यानची बस सेवा स्थगित करण्यात आली आहे.



Source link

‘प्रधानमंत्री सूर्य घर योजनेला’ही बिलाचा शॉक, रात्री वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी बिल?

0
‘प्रधानमंत्री सूर्य घर योजनेला’ही बिलाचा शॉक, रात्री वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी बिल?


प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतील ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण सायंकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वीज वापरल्यास या योजनेतील ग्राहकांना वीज बिल भरावे लागणार आहे.  असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिलाय. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर

केंद्र सरकराने 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचं वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत देशातील अनेक घरांवर सौरयंत्रणा बसवण्यात आली. सोलरमुळे आपलं वीजबिल शून्यावर येईल या आनंदात असणाऱ्या ग्राहकांना आता मोठा झटका बसलाय. कारण ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 यावेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारले जाणार आहे. असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिलाय.

‘पंतप्रधान सूर्यघरला’ही बिलाचा शॉक

संध्याकाळी  6 ते सकाळी 9 यावेळेत वीज वापरल्यास विजेवर बिल आकारण्याचा प्रस्ताव. राज्यातील 1 लाखांवर वीजग्राहकांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसविण्यात आले आहेत. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य. तर अतिरिक्त वीज महावितरणला पाठवून उत्पन्नही मिळतं. पॅनल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात आलं होतं. 

महावितरणने वीज नियामक आयोगाला विजबिलाचा प्रस्ताव दिलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्ज काढून घरावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसविलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीजबिल, असा दुहेरी झटका ग्राहकांना बसणार आहे.

छतावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसविण्यात आलेले कुठे किती ग्राहक? 

नागपूर – 16, 949 ग्राहक

पुणे-  7, 931

जळगाव-  7, 514

छ. संभाजीनगर- 7, 008

नाशिक- 6, 626

अमरावती- 5, 795

कोल्हापूर- 5, 024 

आपल्याला शून्य रुपये विजबिल येणार म्हणून आनंदीत असणाऱ्या ग्राहकांच्या आनंदावर या प्रस्तावामुळे विरझण पडणार आहे. त्यामुळे आता महावितरणच्या या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातोय. हे लवकरच स्पष्ट होईल. 





Source link

मी थकलो नाही, डोकं चालतंय तोपर्यत खुर्चीत बसून संपवेन; रामराजेंचा इशारा कुणाला? 

0


सातारा : मी थकलो नाही, डोकं अजूनही चालतंय. जोपर्यंत डोकं चालतंय तोपर्यंत काळजी करू नका, खुर्चीत बसवून संपवेन असा इशारा रामराजे निंबाळकर यांनी दिला. रामराजेंनी हा इशारा नेमका कुणाला दिला यावर चर्चेला उधाण आलं आहे. रामराजे हे फलटणमधील एका कार्यक्रमाल बोलत होते. 

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील कार्यक्रमात त्यांच्या राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी 1991 साली फलटणमध्ये केलं होतं. तेव्हापासूनच आम्हाला हे चुकीचं राजकारण पटत नव्हतं. त्याकाळी विकास आणि सामान्य माणूस नव्हे तर सत्ताच केंद्रबिंदू होती. या चुकीच्या बाबी थांबवण्यासाठी आम्ही राजकारणात पडलो. आम्ही राजकारणात आल्यावर विकास केला, फलटणसाठी पाणी आणलं. 

खुर्चीत बसून संपवेन, रामराजेंचा इशारा

रामराजे पुढे म्हणाले की, मी थकलो नाही. मात्र क्रिकेट‌ खेळताना तरुणपणात पायाला लागलेलं होतं. त्यावेळचं पायाचं दुखणं आता आहे. माझं वय 77 आहे. त्यामुळं ते दुखणं त्रास देणारच. पण माझं डोकं चालतंय त्याला काय करायचं? डोकं चालतंय तो पर्यंत तुम्ही काळजी करु नका. खुर्चीत बसून संपवेन.

तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे. हा विश्वास घालवू नका एवढंच मी सांगतो असं सुद्धा रामराजे  निंबाळकरांनी म्हटलं.

भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे हे रामराजे निंबाळकरांचे कट्टर राजकीय वैरी समजले जातात. रामराजे हे अजित पवार गटाचे असले तरी लोकसभेच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे रणजित निंबाळकरांचा पराभव झाला.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

‘या’ दाम्पत्याच्या नावावर आहे जगातील सर्वाधिक वैवाहिक जीवनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १०० हून अधिक नातवंडे

0
‘या’ दाम्पत्याच्या नावावर आहे जगातील सर्वाधिक वैवाहिक जीवनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १०० हून अधिक नातवंडे


ब्राझीलच्या एका जोडप्याने जगातील सर्वात यशस्वी लग्नाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ब्राझिलियन मॅनोएल अँजेलिम डिनो (१०५) आणि मारिया डो सूसा डिनो (१०१) यांच्या लग्नाला ८४ वर्षे झाली आहेत. १९४० मध्ये या दोघांचे लग्न पार पडले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लॉन्गीक्वेस्टने त्यांच्या लग्नाची पडताळणी केली आहे. या वेबसाईटवर १०० वर्षांहून अधिक काळ जगलेल्या लोकांची माहिती आहे. या दोघांच्या लग्नाला ८४ वर्ष ७८ दिवस झाले आहेत.



Source link

धक्कादायक! महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्रातील दोघांना अटक

0
धक्कादायक! महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्रातील दोघांना अटक



कुंभमेळयातील आणि हॉस्पिटलमधील महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 



Source link

येत आहे यंत्रांचे युग! हुबेहुब मानवासारख्या दिसणाऱ्या रोबोटचा Video पाहून भरेल उरात धडकी

0
येत आहे यंत्रांचे युग! हुबेहुब मानवासारख्या दिसणाऱ्या रोबोटचा Video पाहून भरेल उरात धडकी


पोलंड आणि अमेरिकेतील क्लोन रोबोटिक्स या स्टार्टअप कंपनीने आपल्या ताज्या शोधाने सर्वांना चकीत केले आहे. कंपनीने एक असा रोबोट तयार केला आहे जो माणसांप्रमाणे अगदी नैसर्गिकरित्या चालू शकतो. या रोबोटचे नाव प्रोटोक्लोन असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मानवासारखे बनावट स्नायू, हाडे आणि जोड्या आहेत, जे त्याच्या पारदर्शक त्वचेत स्पष्टपणे प्रतिबिंबित होतात.



Source link

दिल्लीला मिळाल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; आपच्या बैठकीतील आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

0
दिल्लीला मिळाल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; आपच्या बैठकीतील आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब


कालकाजीच्या आमदार आतिशी यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आम आदमी पक्षाने निवड केली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे २२ आमदार आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते, त्यात सर्वांनी आतिशी यांच्या नावाला संमती दिली. दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधारी भाजप सरकारने मागील ‘आप’ सरकारच्या कामगिरीविरोधात प्रलंबित असलेला कॅगचा अहवाल सभागृहात मांडला जाईल, असे सांगितले आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’चे अनेक बडे नेतेही निवडणुकीत पराभूत झाले आहेत.



Source link

Maharashtra Election News LIVE February 23, 2025: Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

0
Maharashtra Election News LIVE February 23, 2025: Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ


Maharashtra Election 2024 News LIVE: Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Maharashtra Election 2024 News LIVE: Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 23 Feb 202508:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

  • Pollution in Mumbai: मुंबईतील देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या परिसरात अनधिकृत आरएमसी प्लांट (Ready Mix Concrete Plant) मुळे प्रदूषणाची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे प्लांट बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. 


Read the full story here





Source link

Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

0
Maharashtra Election News LIVE February 23, 2025: Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ


मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. प्रदूषणाच्या समस्येवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. मुंबईतील देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या परिसरात प्रदूषणाची समस्या फार मोठी आहे. शहरात देवनारमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली असून शुष्क वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागात असलेले डम्पिंग तसेच अनधिकृत चालणारे आरएमसी प्लांट (Ready Mix Concrete Plant) याला जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत ईशान्य मुंबईचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना नुकतेच पत्र पाठवून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक या अनधिकृत आरएमसी प्लांटवर कार्यवाही करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



Source link