Thursday, July 30, 2026
Home Blog Page 526

महाबळेश्वर येथे जैन सोशल ग्रुपच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

0
महाबळेश्वर येथे जैन सोशल ग्रुपच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

फलटणच्या जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम आणि युवा फोरमचा भव्य सन्मान

फलटण :- महाबळेश्वर  येथे नुकताच जैन सोशल ग्रुप व महाराष्ट्र रिझनचा कॉन्फरन्स आणि भव्य अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्रभरातून विविध प्रतिनिधी व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात जैन सोशल ग्रुप फलटण, संगिनी फोरम, फलटण आणि युवा फोरम, फलटण या तीनही गटांचा गौरव करण्यात आला. जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी यांना “बेस्ट प्रेसिडेंट”, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांना “बेस्ट प्रेसिडेंट”, तर युवा फोरमचे सचिव श्री. पुनीत दोशी यांना “बेस्ट सचिव” या सन्मानाने गौरविण्यात आले.

सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याचा सन्मान

सन 2023 ते 2025 या कार्यकाळात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझनतर्फे या गटांना विशेष सन्मान मिळाला.

या गौरव सोहळ्यात जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे निर्वाचित अध्यक्ष मा. श्री. बिरेनभाई शहा, महाराष्ट्र रिजन अध्यक्ष मा. श्री. उन्मेशभाई करनावट, अवॉर्ड कमिटी कन्व्हेनर मा. सौ. प्रीतीभाभी करनावट, इंटरनॅशनल डायरेक्टर मा. श्री. प्रीतेश तातेड, मा. श्री. महावीरजी पारेख, सोलापूर झोन कोऑर्डिनेटर मा. श्री. सुनिल लोढा आणि कोल्हापूर झोन कोऑर्डिनेटर मा. सौ. रज्जूबेन कटारिया यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याच वेळी, शरदभाई शहा स्मृति अभियान अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जैन सोशल ग्रुप, फलटण यांना “रत्न स्तंभ पुरस्कार”, तर संगिनी फोरम, फलटण यांना “सुवर्ण स्तंभ पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.

व्यापारी महासंघाचे विशेष अभिनंदन

या तिन्ही गटांच्या यशाबद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. मंगेश दोशी, श्रीराम बझारचे संचालक मा. श्री. तुषार गांधी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष मा. श्री. श्रीपाल जैन, सचिव मा. श्री. प्रीतम शहा, खजिनदार मा. श्री. समीर शहा, माजी अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र कोठारी, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षा मा. सौ. स्मिता शहा, माजी अध्यक्षा मा. सौ. नीना कोठारी, संगिनी फोरम सचिव मा. सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार मा. सौ. मनीषा घडिया, युवा फोरम अध्यक्ष मा. श्री. तेजस शहा, खजिनदार मा. श्री. मिहीर गांधी आणि तिन्ही गटांचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन केले.

पुरस्कार विजेत्यांनी हा सन्मान मिळवण्यासाठी जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि संपूर्ण टीमच्या सहकार्याचे विशेष योगदान असल्याचे नमूद केले.

फलटण आठवडी बाजाराचा प्रश्न गंभीर; नगरपरिषदेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

0
फलटण आठवडी बाजाराचा प्रश्न गंभीर; नगरपरिषदेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

फलटण :-  शहरात गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजाराच्या ठिकाणाबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पूर्वी हा बाजार उमाजी नाईक चौक येथे भरत होता, मात्र कोरोना महामारीनंतर तो माळजाई मंदिरासमोर स्थलांतरित झाला. परंतु, काही आठवड्यांपूर्वी नगरपरिषदेच्या आदेशानुसार बाजार पुन्हा उमाजी नाईक चौकात हलवण्यात आला.

या वारंवार होणाऱ्या बदलामुळे शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून विक्रेते आणि शेतकरी माळजाई मंदिरासमोरच बसू लागले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल (रविवार) देखील आठवडी बाजार माळजाई मंदिरासमोर तसेच महावीर स्तंभ ते गजानन चौक या परिसरात भरवण्यात आला.

दरम्यान, फलटण नगरपरिषदेने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी हा मुद्दा पोलीस प्रशासनाकडे सोपवला असला तरी अद्याप कोणताही आदेश पारित करण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक होणार असून अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

या गोंधळामुळे वाहतूक कोंडी आणि गर्दीचा प्रश्न निर्माण झाला असून, शहरातील अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने शेतकरी व भाजी विक्रेत्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

उदयनराजेंच्या बर्थडेचा थाट पाहून येडे व्हाल! आठ फुटांचा केक, चांदीचं सिंहासन अन् लाखो रुपयांचे फटाके

0



Udayanraje Bhosale birthday: आठ फुटांचा केक, चांदीचं सिंहासन अन् लाखोंच्या फटाक्यांची आतषबाजी; साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलीब्रेशन



Source link

‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका

0
‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका


Mahabharat Kissa : पौराणिक कथांवर बनलेल्या टीव्ही मालिकांबद्दल बोलायचे झाले तर, बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारता’चा उल्लेख नक्कीच येतो. बीआर चोप्रा यांची महाभारत ही टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक मानली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन बीआर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. आता रवी चोप्राची पत्नी रेणू चोप्राने मालिकेच्या निर्मितीशी संबंधित माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा महाभारत निर्मितीच्या टप्प्यात होते, तेव्हा निर्मात्यांना दर आठवड्याला कोट्यवधींचे नुकसान होत असे.



Source link

साताऱ्यात राजकीय तापमान वाढले! “खुर्चीत बसून संपवेन” – रामराजे निंबाळकरांचा इशारा

0
साताऱ्यात राजकीय तापमान वाढले! “खुर्चीत बसून संपवेन” – रामराजे निंबाळकरांचा इशारा

सातारा – “मी थकलो नाही, डोकं अजूनही चालतंय. जोपर्यंत डोकं चालतंय तोपर्यंत काळजी करू नका, खुर्चीत बसवून संपवेन,” असा थेट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

फलटणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना रामराजे निंबाळकर यांनी राजकीय विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “१९९१ साली मी पहिल्यांदा फलटणमध्ये भाषण केलं होतं. तेव्हापासून आम्हाला चुकीचं राजकारण मान्य नव्हतं. त्याकाळी सत्ताच केंद्रबिंदू होती, विकास नव्हता. त्यामुळे आम्ही राजकारणात आलो आणि फलटणसाठी विकासाच्या वाटा उघडल्या, पाणी आणलं.

“डोकं चालतंय, काळजी करू नका!”

रामराजे म्हणाले, “माझं वय ७७ आहे. तरुणपणी क्रिकेट खेळताना झालेली पायाची दुखापत अजून त्रास देते. पण माझं डोकं अजूनही शाबूत आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. खुर्चीत बसून संपवेन!” त्यांनी आपल्या समर्थकांना आवाहन करताना सांगितले की, “तुमच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे, हा विश्वास गमावू नका.

नेमका इशारा कोणाला? राजकीय चर्चांना उधाण!

रामराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे हे त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. रामराजे अजित पवार गटाचे असल्याचे जरी मानले जात असले तरी, लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच रणजित निंबाळकरांचा पराभव झाला, असे मानले जाते.

रामराजेंच्या “खुर्चीत बसून संपवेन” या वक्तव्याचा रोख नेमका कोणावर आहे, यावरून आता राजकीय चर्चांना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा भाजपच्या विरोधकांसाठी आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामराजेंचा सडेतोड इशारा: “गुडघे काम करत नसले तरी डोकं तल्लख, खुर्चीत बसून संपवीन!”

0
रामराजेंचा सडेतोड इशारा: “गुडघे काम करत नसले तरी डोकं तल्लख, खुर्चीत बसून संपवीन!”

फलटण: विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कंबर कसली असून कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा धडाका सुरू केला आहे. फलटण शहरासह तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत, गटबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना इशारा देताना ते म्हणाले, “माझे गुडघे जरी काम करत नसले तरी माझं डोकं चांगलं काम करतंय; त्यांना खुर्चीत बसून संपविन!”

रामराजेंच्या या दमदार वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे.

“आयकर धाड टाकली असती तर स्टेटस वाढलं असतं!”

आंदरुड येथे शंभूराज विनायकराव पाटील यांनी आयोजित हुरडा पार्टीत बोलताना रामराजेंनी मिश्कील शैलीत आयकर विभागाच्या कारवाईबाबत भाष्य केले. “आयकर विभागाने माझ्यावर धाड टाकायला हवी होती; धाड टाकली की स्टेटस वाढते!” असा टोला त्यांनी हाणला. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर धाड पडली होती, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, असे संजीवराजेंनी स्पष्ट केले होते.

स्थानिक निवडणुकीत “राजे गट” पूर्ण ताकदीने उतरणार!

तरडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात रामराजेंनी स्पष्ट केले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुका राजे गटाच्या माध्यमातून संपूर्ण ताकदीने लढवल्या जातील. “कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे,” असे निर्देशही त्यांनी दिले.

रामराजेंचा ‘ऍक्टिव्ह मोड’ सुरू!

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फारसे सक्रिय न राहिलेले रामराजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतः प्रचारात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या अॅक्टिव्ह होण्याने फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकारणात या विधानांचा परिणाम काय होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!

Entertainment News in Marathi Live: ‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका

0
‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका


‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका

‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 24 Feb 202504:37 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: ‘महाभारत’चा एक भाग बनवण्यासाठी लागायचे ‘इतके’ लाख! नुकसान सहन करून निर्मात्यांनी बनवली मालिका

  • Mahabharat Kissa : बीआर चोप्रा यांची ‘महाभारत’ ही टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की जेव्हा ही मालिका प्रॉडक्शन स्टेजवर होती, तेव्हा निर्मात्यांना दर आठवड्याला कोट्यवधींचा तोटा होत होता.


Read the full story here

Mon, 24 Feb 202503:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: ‘बिग बॉस १८’मध्ये जिंकलेले पैसे अद्याप मिळाले नाहीत! करणवीर मेहराने केली पोलखोल

  • टीव्ही शो ‘बिग बॉस १८’चा विजेता करणवीर मेहरा जेव्हा भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये पोहोचला, तेव्हा कॉमेडी क्वीनने त्याला अनेक प्रश्न विचारले. बिग बॉसच्या घरातील त्याचा हा विजय स्क्रिप्टेड आहे का, असा सवालही भारतीने केला.


Read the full story here





Source link

‘बिग बॉस १८’मध्ये जिंकलेले पैसे अद्याप मिळाले नाहीत! करणवीर मेहराने केली पोलखोल

0
‘बिग बॉस १८’मध्ये जिंकलेले पैसे अद्याप मिळाले नाहीत! करणवीर मेहराने केली पोलखोल


सलमान खान होस्ट केलेल्या रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस 18 चा विजेता अभिनेता करणवीर मेहराला अद्याप बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही. करणवीर मेहराने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, एकीकडे रोहित शेट्टी होस्ट केलेल्या शो ‘खतरों के खिलाडी’ची बक्षीस रक्कम आणि कार त्याच्यापर्यंत पोहोचली आहे, तर दुसरीकडे कलर्स टीव्हीच्या शो ‘बिग बॉस 18’ मध्ये जिंकलेले पैसे अद्याप त्याच्या खात्यात आलेले नाहीत. करणवीर मेहराने कलर्स टीव्हीवरील आपले प्रेम व्यक्त केले असून तो आता चॅनेल सोडत नसल्याचे म्हटले आहे. करण म्हणाला की, केकेके 14 हा कलर्स टीव्हीसोबतचा त्याचा पहिला शो होता आणि या चॅनेलने त्याला खूप पैसे आणि प्रसिद्धी दिली आहे.



Source link

‘मोदींना कसले भय वाटले? गोडसे प्रवृत्तीचे की…’, ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, ‘भटकती आत्मा…’

0
‘मोदींना कसले भय वाटले? गोडसे प्रवृत्तीचे की…’, ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, ‘भटकती आत्मा…’


Modi Speech Marathi Sahitya Sammelan: “दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनपर भाषण केले. ते जोरकस होते. साहित्य संमेलनाचा मुख्य सोहळा तालकटोरा मैदानात होता, पण पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान भवनाच्या सभागृहात साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. मोदींच्या सुरक्षेच्या वगैरे कारणांसाठी उद्घाटनाचा हा वेगळा घाट घातला. याची खरेच गरज होती काय?” असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे. “तालकटोरावर भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी याच तालकटोरा स्टेडियमला मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम केला व त्यास चांगली गर्दी जमवली होती. मग तालकटोरावरील मराठी सारस्वतांच्या मेळ्यात जाण्याचे पंतप्रधानांनी का टाळावे? त्यांना कोणाचे भय वाटले?” असा सवाल ‘सामना’मधून उपस्थित करण्यात आला आहे.

मोदींचे मराठी प्रेम खरे मानावे का?

“दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राचे भय वाटले व साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात मोदी गेले नाहीत असे समजावे काय? पुन्हा हा मंडप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारला व सजवला गेला होता. विज्ञान भवनात मोदींचे भाषण टिपणारे पत्रकार, भाजपचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, खासदार, अधिकारी जास्त होते. साहित्यिक, प्रकाशक, रसिक श्रोते हे तालकटोरावरच ताटकळत राहिले. त्यामुळे विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या उपस्थितीत जणू एक समांतर संमेलन भरवून उद्घाटन केले गेले,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय. “दिल्लीत 1954 साली साहित्य संमेलन झाले व त्याचे उद्घाटन लेखक-साहित्यिक पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केले. नेहरू प्रत्यक्ष संमेलनात सहभागी झाले व आपल्या भाषणात त्यांनी राजकीय प्रचार केला नाही. विज्ञान भवनात मोदी यांनी जे भाषण केले ते अनमोल मोतीच आहेत. मोदी यांच्या भाषणात त्यांच्या मराठी प्रेमाचे प्रतिबिंब नक्कीच पडले, पण हे बिंब-प्रतिबिंब खरे मानावे काय?” असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.

आयोजकांचे चेहरे पडलेले दिसले

“मोदी यांनी त्यांच्या भाषणात मराठी भाषेच्या वैभवाची, गौरवाची महती गायली. संत रामदासांच्या महाराष्ट्र धर्म वाढविण्याच्या मंत्राचा उच्चार केला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून संत ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव, संत तुकडोजी, गाडगेबाबांचा उल्लेख केला व या सगळ्यांमुळे मराठी भाषा कशी संपन्न आणि अभिजात झाली ते कथन केले, पण मोदी यांना मराठी भाषेची गोडी लागली याचे कारण त्यांनी विज्ञान भवनातील सारस्वतांना मार्गदर्शन करताना सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीयांना देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली.’’ मोदी यांनी पुढे अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ माहिती दिली ती अशी की, “महाराष्ट्राच्या भूमीवर 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली व ती करणारे मराठी होते. त्यामुळे माझा मराठी भाषेकडे ओढा आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या 100 वर्षांपासून करत आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी संमेलनाच्या मंचावरून सांगितले. मोदी हे बोलत होते तेव्हा पुरोगामी विचारांचे शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून मंचकावर उपस्थित होते. मोदी यांनी संघाची भलामण करायला हरकत नाही, पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ त्यासाठी वापरून घेणे बरे नाही. त्यामुळे आयोजकांचे चेहरे पडलेले दिसले,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘भटकती आत्मा’ म्हणत जाहीर सभांमधून पवारांचा अपमान

“मोदी हे कोणत्या व्यासपीठावरून काय बोलतील किंवा त्यांच्याकडून वदवून घेतले जाईल याचा नेम नाही. मराठी साहित्य संमेलनातले पंतप्रधानांचे भाषण ज्यांनी तयार केले त्यांना दंडवतच घालायला हवा. राजकारण आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी मराठी साहित्य संमेलनही सोडले नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या भाषणातील अनेक साहित्यविषयक मुद्दे मागेच पडले. मराठी भाषा ही अमृताहुनी गोड आहे, असे मोदी यांनी सांगितले. मग त्या अमृत भाषेचा सोहळा जो तालकटोराला झाला तेथे मोदी का गेले नाहीत?” असं ठाकरेंच्या पक्षाने विचारलं आहे. “पंतप्रधान मोदी यांनी काही साहित्यबाह्य कृती विज्ञान भवनातील मंचावर केल्या. त्यामुळे चर्चेला पेव फुटले. शरद पवार हे भाषण करून आले तेव्हा मोदी यांनी उठून पवार यांना खुर्चीत विराजमान होण्यास मदत केली. खरे तर याची गरज नव्हती, पण मोदी यांना लक्ष वेधून घ्यायचे होते. पवार खुर्चीत विराजमान झाल्यावर मोदी यांनी पवारांच्या ग्लासात पाणी ओतले, पण पवार ते पाणी प्यायले नाहीत. त्यामुळे मोदी-पवार संबंधांवरच वृत्तवाहिन्यांवर चर्चा सुरू झाल्या. साहित्य संमेलन राहिले बाजूला. प्रश्न असा आहे की, मोदी यांना पवारांच्या प्रती आदर वगैरे असता तर शरद पवार म्हणजे ‘भटकती आत्मा’ असल्याची विशेषणे लावून जाहीर सभांतून पवारांचा अवमान करण्याचा उद्योग पंतप्रधान मोदींनी केला नसता व परम आदरणीय पवारांचा पक्ष फोडून तो अजित पवारांच्या खिशात घातला नसता. त्या भटकत्या आत्म्यास अमित शहांनी काय शब्द वापरले? ‘‘पवारांचे कृषी-सहकार क्षेत्रात योगदान काय? पवारांनी महाराष्ट्राची लूट केली’’ वगैरे मुक्ताफळे अमित शहा उधळतात, हे काही आदर असल्याचे लक्षण नाही,” असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

मोदींना कसले भय वाटले?

“काका-पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला, असे मोदी म्हणाले तो पुतण्या आज मोदींच्याच पक्षात आहे व काका साहित्य संमेलनाच्या मंचावर मोदींसोबत बसले. काकांसाठी स्वतः मोदींनी खुर्ची सरकवली हे चित्र गमतीचे आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या मंचावर भरकटलेले किती आत्मे भटकत होते ते पाहायला हवे. पंतप्रधान हे साहित्यविषयक कार्यक्रमात हजेरी लावतात तेव्हा त्यांनी व्यासपीठ आणि विषयाचे भान राखायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक कामांचे कौतुक करायला काहीच हरकत नाही. मात्र त्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरणे योग्य नाही. राष्ट्रभक्तीची प्रेरणा व मराठी प्रेम आपल्याला संघामुळे समजले हे मोदींचे विचार, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होण्याच्या अनेक शतके आधी भारतवर्षात राष्ट्रभक्तीची व लढण्याची प्रेरणा होतीच. देव, देश व धर्मासाठी लढणारे महान लोक अनेक शतकांपूर्वी याच मातीत जन्मास आले. शिवरायांची भाषा मराठीच होती. स्वातंत्र्याच्या कोणत्याच लढ्यात ‘भाजप’ किंवा ‘संघ’ नव्हता. ते फक्त स्वातंत्र्याचा फुकट उपभोग घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रभक्तीची ही उधार प्रेरणा त्यांना मिळते कोठून? याचा खुलासा कधीच झाला नाही. पंतप्रधान मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी भान ठेवले असते तर बरे झाले असते. मोदीजी तालकटोरावर आले नाहीत. का? त्यांना कसले भय वाटले? महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानी बाण्याचे की वाढत चाललेल्या गोडसे प्रवृत्तीचे?” असा सवाल लेखाच्या शेवटी विचारला आहे.





Source link

GK : 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक, भारतातील ‘या’ राज्यात आहेत 23 विमानतळं; राज्याचे नाव ऐकून शॉक व्हाल

0
GK : 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक, भारतातील ‘या’ राज्यात आहेत 23 विमानतळं; राज्याचे नाव ऐकून शॉक व्हाल


Airport In Uttar Pradesh : भारतातील एक राज्यात तब्बल 23 विमानतळं आहेत. यापैकी  5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट आहेत. भारतामध्ये एकूण 137 विमानतळ आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ, 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 संरक्षण हवाई क्षेत्रे विमानतळांचा समावेश आहे. पण, सर्वाधिक विमानतळं असलेले हे राज्य कोणते? जाणून घेऊया .

उत्तर प्रदेश हे 23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये  5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट आहेत.   चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनौ, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या,  लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसी, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा आणि नोएडा आंतरराष्ट्रीय जेवार विमानतळ, नोएडा अशी उत्तर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांची नावे आहेत. 

आझमगड विमानतळ, बरेली विमानतळ, चित्रकूट विमानतळ, गाझियाबाद, हिंडन विमानतळ , गोरखपूर विमानतळ, झाशी विमानतळ, कानपूर विमानतळ, ललितपूर विमानतळ, मेरठ विमानतळ, मुरादाबाद विमानतळ आणि पालिया विमानतळ अशी डोमॅस्टिक विमानतळांची नावे आहेत. 

भारतातील विविध राज्यांमध्ये मिळून 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई, तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद, गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमृतसर, लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ ( सिव्हिल एन्क्लेव्ह), श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, श्रीनगर (सिव्हिल एन्क्लेव्ह), जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड विमानतळ, कालिकत, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (सिव्हिल एन्क्लेव्ह), पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटे (यूटी), इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई, जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद, बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, बेंगळुरू, कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट, कोची, भारतरत्न बाबासाहेब डॉ.बी.आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (महाराष्ट्र) हे महत्त्वाची विमानतळं आहेत.





Source link