Thursday, July 30, 2026
Home Blog Page 525

भारतातील सर्वात खतरनाक एअरपोर्ट! उड्डाण करताना पायलटचे हात पाय थरथरतात; असं आहे तरी काय इथं?

0
भारतातील सर्वात खतरनाक एअरपोर्ट! उड्डाण करताना पायलटचे हात पाय थरथरतात; असं आहे तरी काय इथं?


Which Is The Most Dangerous Airport In India: विमान हे प्रवासाचे सर्वात जलद माध्यम आहे. भारतामध्ये विविध राज्यात मिळून एकूण 137 विमानतळं आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ, 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 संरक्षण हवाई क्षेत्रे विमानतळांचा समावेश आहे. यातील काही  एअरपोर्ट खूपच थरारक आहेत. कारण, इथं ही विमनतळं जिथे आहेत. तेथील भौगिलीक रचना अत्यंत धोकादायक आहे. यामुळे  इथं टेकऑफ आणि लँडिंग करताना पायलटचे हात पाय थरथरतात. जाणून घेऊया.

लेंगपुई विमानतळ

मिझोरममध्ये असलेले लेंगपुई विमानतळ भारतातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळाच्या धावपट्टीखाली सतत पाण्याचे प्रवाह वाहत असतात, ज्यामुळे पावसाळ्यात परिस्थिती आणखी धोकादायक बनते. अशा वातावरणात येथे विमानांचे  टेकऑफ आणि लँडिंग करणे वैमानिकांसाठी एखाद्या कठीण परीक्षेपेक्षा कमी नसते. 

लेह रिम्पोची विमानतळ

जम्मू – काश्मीरमधील लेह येथे असलेल्या रिम्पोची विमानतळ हे देशातील सर्वात उंच विमानतळ आहे. 3259 मीटर उंचीवर हे विमानतळ आहे. येथे टेकऑफ आणि लँडिंग करणे हा पायलटसाठी अत्यंत धोकादायक अनुभव असतो. जास्त उंची आणि क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण यामुळे येथे विमान नियंत्रित करणे खूप कठीण असते. 

कांगडा विमानतळ

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे असलेले कांगडा विमानतळ अर्थात गग्गल विमानतळ 2492 फूट उंचीवर आहे. यामुळे याची धावपट्टी खूपच  धोकादायक आहे.   बदलते हवामान आणि उंचीमुळे वैमानिकांना येथे खूपच सतर्क रहावे लागते. 

मंगलोर विमानतळ

मंगलोर विमानतळ हे टेबलटॉप विमानतळ म्हणून ओळखले जाते. 2010 मध्ये येथे एक भीषण विमान अपघात झाला होता. यावरुनच हा विमानतळाचे धोकादायक स्वरूप अधोरेखित झाले. एअर इंडियाचे एक विमान धावपट्टीवरून घसरले आणि टेकडीवरून पडल्यानंतर आग लागली. या धावपट्टीच्या आकारामुळे आणि आजूबाजूच्या भूप्रदेशामुळे, टेकऑफ आणि लँडिंग करणे अत्यंत धोकादायक आहे.

भारतातील या धोकादायक विमानतळांवर फक्त अनुभवी वैमानिकांनाच उड्डाण करण्याची परवानगी दिली जाते. याकारीता वैमानिकांना विविध चाचण्या पार कराव्या लागतात. प्रशिक्षणार्थी वैमानिकांना येथे चुकुनही पाठवले जात नाही. 





Source link

‘मी आई आणि प्रेयसीसह 6 लोकांना ठार केलं आहे,’ विष पिऊन तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं, अधिकारी हादरले

0
‘मी आई आणि प्रेयसीसह 6 लोकांना ठार केलं आहे,’ विष पिऊन तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं, अधिकारी हादरले



Crime News: 23 वर्षीय तरुणाने सहा जणांची हत्या केल्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्याने आपल्या आईसह, प्रेयसीचीही हत्या केली. गुन्हा केल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. 
 



Source link

कितीही गर्दी असो, ‘ही’ एक ट्रीक वापरून रेल्वेत मिळवा 10 मिनिटात कन्फर्म तिकीट

0
कितीही गर्दी असो, ‘ही’ एक ट्रीक वापरून रेल्वेत मिळवा 10 मिनिटात कन्फर्म तिकीट



Indian Railway : ट्रेन सुरु होण्याआधी तुमच्या हाती असेल कन्फर्म तिकीट; रेल्वेतून सराईताप्रमाणं प्रवास करणाऱ्यांनाही नाही ठाऊक ही पद्धत… 
 



Source link

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा! RBI ने अखेर दिली परवानगी, म्हणाले…

0
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा! RBI ने अखेर दिली परवानगी, म्हणाले…


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर स्थगिती आणल्याने बँकेच्या खातेदारांवर संकट कोसळलं होतं. आरबीआयच्या आदेशानुसार, बँक ना कर्ज देऊ शकतं, ना डिपॉझिट घेऊ शकतं. इतकंच नाही तर खातेधारक आपल्या खात्यातील पैसेही काढू शकत नाहीत. यानंतर खातेदारांनी बँकेच्या बाहेर रांगा लावल्या होत्या आणि याप्रकरणी संताप व्यक्त केला होता. दरम्यान आता आरबीआयने खातेदारांना मोठा दिलासा दिला असून खात्यातून 25 हजारांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर बंदी घातल्यानंतर बँकेचे खातेदार चिंताग्रस्त होते. आरबीआयने ठेवीदारांचे पैसे काढण्यावरही बंदी घातली होती, जी आता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हटवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने एक्सवर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासक आणि सल्लागारांची समिती नियुक्त केली होती. त्यांच्यासोबत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक खातेधारकाला 25 हजारांपर्यंत पैसे काढता येतील.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या सवलतीनंतर बँकेच्या एकूण खातेधारकांपैकी सुमारे 50 टक्के म्हणजेच निम्मे खातेदार त्यांचे संपूर्ण शिल्लक पैसे काढू शकतील. उर्वरित अर्धे खातेधारक त्यांच्या खात्यातून 25 हजारांपर्यंत पैसे काढू शकतील. हे पैसे काढण्यासाठी, खातेदार बँकेच्या शाखेत जाऊ शकतात किंवा बँकेच्या एटीएम चॅनेलचा वापर देखील करू शकतात. तथापि, काढता येणारी एकूण रक्कम 25 हाजर किंवा त्यांच्या खात्यातील एकूण शिल्लक, यापैकी जी कमी असेल ती आहे.

90 टक्क्यांहून अधिक ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत

आरबीआयने काही काळापूर्वी असंही सांगितलं होते की 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध असेल. बँकेच्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. DICGC च्या नियम 18 अ नुसार ग्राहकांना पेमेंट केले जाईल. खातेधारकांनी त्यांचे सर्व दाव्याशी संबंधित कागदपत्रे 45 दिवसांच्या आत (30 मार्च 2025 पर्यंत) सादर करावीत. सर्व बँक खात्याशी संबंधित प्रमाणपत्रे, पर्यायी बँक खाते क्रमांक आणि तपशील द्या. यामुळे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.





Source link

कर्ज काढून जगले लक्झरी आयुष्य त्यानंतर पत्नींची केली हत्या, कोलकात्यातील तिहेरी मर्डर मिस्ट्रीचा धक्कादायक खुलासा

0
कर्ज काढून जगले लक्झरी आयुष्य त्यानंतर पत्नींची केली हत्या, कोलकात्यातील तिहेरी मर्डर मिस्ट्रीचा धक्कादायक खुलासा


कोलकात्यात तीन महिलांच्या संशयास्पद हत्येबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, हे कुटुंब बऱ्याच काळापासून कर्जात बुडाले होते. त्यानंतरही कुटुंबाने आपल्या खर्चात कपात केली नाही आणि लक्झरी जीवन जगत राहिले. शेवटी कर्ज इतकं वाढलं की कुटुंबातील तीन महिलांची दोन भावांनी हत्या केली. पत्नींचा हत्या केल्यानंतर दोघे जण आत्महत्या करण्याच्या तयारीत होते, पण वाटेतच त्याच्या गाडीला अपघात झाला. पोलीस आल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 



Source link

फलटण रेवेन्यू क्लबसाठी ९.९५ कोटींचा निधी मंजूर

0
फलटण रेवेन्यू क्लबसाठी ९.९५ कोटींचा निधी मंजूर

जुन्या इमारतीच्या जागी होणार नवी भव्य इमारत

फलटण | महाराष्ट्र शासनाने फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेवेन्यू क्लबसाठी ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच क्लबच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

रेवेन्यू क्लबची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असून, एकेकाळी वैभवशाली असलेली ही इमारत आता पूर्णतः मोडकळीस आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी क्लबची पाहणी करून सदर इमारतीची दुरवस्था पाहता ती धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर तातडीने प्रस्ताव सादर करून नवीन इमारतीसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला.

रेव्हेन्यू सबोर्डिनेट वेलफेअर फंड कमिटी, फलटणचे अध्यक्ष आणि निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी महसूल परिवाराच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, “महसूल परिवाराच्या सुविधा व कल्याणासाठी ही नवीन इमारत अत्यंत महत्त्वाची असून, यासाठी रणजितदादा आणि आमदार पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच आम्हाला मंजुरी मिळाली आहे.”

फलटण आठवडा बाजार वाद: रविवार पेठेतच बाजार भरवण्याची मागणी

0
फलटण आठवडा बाजार वाद: रविवार पेठेतच बाजार भरवण्याची मागणी

फलटण : शहरातील आठवडा बाजार रविवार पेठेत भरवावा, या मागणीसाठी श्रीमंत मालोजीराजे भाजी विक्रेता सामाजिक संघाच्या वतीने फलटण नगरपालिका, प्रांत कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. सध्या आठवडा बाजार रविवार पेठ व माळजाई मंदिर परिसरात भरवला जात असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

पालिकेने काही दिवसांपूर्वी आठवडा बाजार रविवार पेठेत भरवण्यास सुरुवात केली होती. मात्र, तालुक्याच्या बाहेरील भाजी विक्रेत्यांच्या विरोधामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हा बाजार माळजाई मंदिर परिसरात भरवला जात आहे. या निर्णयामुळे रविवार पेठेतील व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजार पूर्वीप्रमाणे रविवार पेठेतच भरवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पर्यटक आणि स्थानिकांना त्रास
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माळजाई मंदिर हे फलटण शहरातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. तिथे बाजार भरवल्यास पर्यटक तसेच शहरातील वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास होतो. याशिवाय, शेजारील तालुक्यांतील विक्रेते येथे विक्रीसाठी येत असल्याने स्थानिक भाजी विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आठवडा बाजाराच्या व्यवस्थापनात प्रशासनाने योग्य तोडगा काढावा आणि बाजाराचे विभाजन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार अहिवळे, उपाध्यक्ष कादरभाई बागवान, उपाध्यक्ष अरुण अहिवळे, सचिव नितिन घोडके, सदस्य बापूराव भोसले यांच्यासह तब्बल 192 भाजी विक्रेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याने दिल्लीत वादंग, आता कुणाचा लावला फोटो?

0
डॉ. आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याने दिल्लीत वादंग, आता कुणाचा लावला फोटो?


दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. आमदारांच्या शपथविधीनंतर विजेंदर गुप्ता यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी मार्लेना यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवण्यात आल्याचा आरोप करत आतिशी यांनी गदारोळ घातला. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी त्यांना फटकारले आणि नंतर गदारोळ थांबला नाही तेव्हा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.



Source link

अदानींने 2024 मध्ये भरलेल्या टॅक्सचा आकडा पाहून ‘हा आकडा वाचायचा कसा?’ असा प्रश्न पडेल

0
अदानींने 2024 मध्ये भरलेल्या टॅक्सचा आकडा पाहून ‘हा आकडा वाचायचा कसा?’ असा प्रश्न पडेल


Adani Group Toatal Tax Payment: अदानी समुहाने आर्थिक वर्षात नेमका किती कर भरला यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत अदानी समुहाने भरलेल्या कराच्या रक्कमेमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भातील आकडेवारी अदानी समुहानेच जारी केली असून देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या या अदानींच्या कंपन्यांनी भरलेल्या कराचा आकडा नेमका वाचावा कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

नेमका किती कर भरलाय अदानी समुहाने?

अदानी समुहाने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडे आर्थिक वर्ष 2024 मध्ये जमा केलेल्या कराची एकूण रक्कम 581040000000 रुपये इतकी आहे. वेगवेगळ्या माध्यमातून भरलेल्या एकूण कराची अगदी अचूक रक्कम 58 हजार 104.4 कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष 2023-24 च्या कालावधीत सरकारकडे जमा करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच रक्कम 46,610.2 कोटी रुपये इतकी होती. या रक्कमेमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 25 टक्के वाढ झाल्याचं दिसत आहे, असं अदानी समुहाने म्हटलंय.

कोणकोणत्या कंपन्या आहेत अदानी समुहामध्ये?

अदानी समुहाअंतर्गत येणाऱ्या प्रमुख सात कंपन्यांच्या माध्यमातून हा कर जमा करण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेड अशा सात कंपन्यांचा यात समावेश आहे. अदानी समुहाअंतर्गत येणाऱ्या एनडीटीव्ही लिमिटेड, एसीसी लिमिटेड आणि संघी इंड्स्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांनी भरलेला कराच्या रकमेचा यामध्ये समावेश आहे.

…म्हणून जाहीर केली आकडेवारी

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यासंदर्भात म्हणाले की, “पारदर्शकता हा विश्वासाचा पाया असून शाश्वत वाढीसाठी विश्वास आवश्यक आहे. आम्ही आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत असलेला प्रत्येक रुपया पारदर्शकता आणि सुशासनासाठी असून आमची वचनबद्धता यामधून दिसते. स्वेच्छेने हे अहवाल लोकांसमोर सादर करून, आम्ही अधिकाधिक भागधारकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आकडेवारी उघड करण्याच्या माध्यमातून आम्ही एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी म्हणून नवीन बेंचमार्क सेट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आहोत.”

आपल्या कंपन्यांच्या व्यवहारांबद्दल पारदर्शकता असल्याचं अधोरेखित करण्याबरोबरच स्टेकहोल्डरचा विश्वास वाढवणे आणि अधिक जबाबदार कर प्रणालीमध्ये योगदान देण्याचा अदानी समुहाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं आहे.





Source link

सोन्याच्या वाढत्या किमतीमागचं कारण काय? जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

0
सोन्याच्या वाढत्या किमतीमागचं कारण काय? जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर


Gold Price Today: देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग आठव्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. एमसीएक्सवर सोनं 86,000 रुपयांच्या वर व्यवहार करत आहेत. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर $2,950 प्रति औंसच्या वर पोहोचली आहे. सोन्याचे हे दर डोनाल्ड ट्रंपचे टॅरिफ वॉर आणि सेंट्रल बँके सातत्याने खरेदी होत असल्याने वाढल्याचे पाहायला मिळतंय. तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि चीनमधील व्यापारातील वाढते तणाव आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या दरांबाबत अनिश्चितता असताना गुंतवणुक म्हणून सोन्याचा पर्यायाचा विचार करत आहेत. याच कारणामुळं सोनं सातत्याने मजबूत होताना दिसत आहे. 

चांदीच्या दरात मात्र किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. एमसीएक्सवर चांदी 96,000 च्या जवळपास व्यवहार करताना दिसत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात $33 प्रति औंसवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. मात्र घरगुती बाजारात चांदीचे दर घसरले आहेत. 

सोन्याच्या दरात आत्तापर्यंत 11 टक्क्यांची अधिक तेजी आली आहे. मौल्यवान धातुचा विचार गुंतवणुक म्हणून अधिक करण्यात येत आहे. सोन्याच्या दरात आज 100 रुपयांची वाढ झाली असून 22 कॅरेट सोन्याचे दर  80,550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांवर पोहोचले असून 87,870 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याचे दर 90 रुपयांनी वाढले असून 65,910 रुपयांवर प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,550 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,870 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,910 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,055 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,787 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,591 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,440 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   70,296 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    65,910 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,550 रुपये
24 कॅरेट- 87,870 रुपये
18 कॅरेट- 65,910 रुपये





Source link