Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशन्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा! RBI ने अखेर...

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा! RBI ने अखेर दिली परवानगी, म्हणाले…

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा! RBI ने अखेर दिली परवानगी, म्हणाले…

[ad_1]

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर स्थगिती आणल्याने बँकेच्या खातेदारांवर संकट कोसळलं होतं. आरबीआयच्या आदेशानुसार, बँक ना कर्ज देऊ शकतं, ना डिपॉझिट घेऊ शकतं. इतकंच नाही तर खातेधारक आपल्या खात्यातील पैसेही काढू शकत नाहीत. यानंतर खातेदारांनी बँकेच्या बाहेर रांगा लावल्या होत्या आणि याप्रकरणी संताप व्यक्त केला होता. दरम्यान आता आरबीआयने खातेदारांना मोठा दिलासा दिला असून खात्यातून 25 हजारांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर बंदी घातल्यानंतर बँकेचे खातेदार चिंताग्रस्त होते. आरबीआयने ठेवीदारांचे पैसे काढण्यावरही बंदी घातली होती, जी आता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हटवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने एक्सवर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासक आणि सल्लागारांची समिती नियुक्त केली होती. त्यांच्यासोबत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक खातेधारकाला 25 हजारांपर्यंत पैसे काढता येतील.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या सवलतीनंतर बँकेच्या एकूण खातेधारकांपैकी सुमारे 50 टक्के म्हणजेच निम्मे खातेदार त्यांचे संपूर्ण शिल्लक पैसे काढू शकतील. उर्वरित अर्धे खातेधारक त्यांच्या खात्यातून 25 हजारांपर्यंत पैसे काढू शकतील. हे पैसे काढण्यासाठी, खातेदार बँकेच्या शाखेत जाऊ शकतात किंवा बँकेच्या एटीएम चॅनेलचा वापर देखील करू शकतात. तथापि, काढता येणारी एकूण रक्कम 25 हाजर किंवा त्यांच्या खात्यातील एकूण शिल्लक, यापैकी जी कमी असेल ती आहे.

90 टक्क्यांहून अधिक ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत

आरबीआयने काही काळापूर्वी असंही सांगितलं होते की 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध असेल. बँकेच्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. DICGC च्या नियम 18 अ नुसार ग्राहकांना पेमेंट केले जाईल. खातेधारकांनी त्यांचे सर्व दाव्याशी संबंधित कागदपत्रे 45 दिवसांच्या आत (30 मार्च 2025 पर्यंत) सादर करावीत. सर्व बँक खात्याशी संबंधित प्रमाणपत्रे, पर्यायी बँक खाते क्रमांक आणि तपशील द्या. यामुळे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments