Thursday, July 30, 2026
Home Blog Page 524

नवऱ्यामुलाने दारुच्या नशेत नवरीमुलीऐवजी तिच्या जिवलग मैत्रिणीच्या गळ्यात घातला हार; पुढे काय झालं पाहा

0
नवऱ्यामुलाने दारुच्या नशेत नवरीमुलीऐवजी तिच्या जिवलग मैत्रिणीच्या गळ्यात घातला हार; पुढे काय झालं पाहा


लग्न म्हटलं की आयुष्याचा नव्याने सुरु होणारा प्रवास असतो. या प्रवासात जर आपला जोडीदार योग्य असला तर तो सुखाने होते. पण जर ही निवड चुकली, तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय नसतो. सुदैवाने काही जणांना लग्नाच्या आधीच जोडीदाराबद्दल ही कल्पना येते किंवा माहिती मिळते. तर काहींना दुर्दैवाने लग्नानंतरच हे गुपित कळतं. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. प्रकरण इथपर्यंत पोहोचलं होतं की, नवरीमुलीने नवऱ्याच्या कानाखाली लगावत लग्न मोडलं. लग्नमंडपात नेमकं काय झालं हे जाणून घ्या. 

उत्तर प्रदेशातील बरेली येथे लग्नमंडपात नवरामुलगा दारुच्या नशेत पोहोचला होता. यावेळी त्याने दारुच्या नशेत नवरीमुलीच्या मैत्रिणीच्या गळ्यात हार घातला. यानंतर संतापलेल्या 21 वर्षीय नवरीमुलगी राधा देवीने मुलाच्या कानाखाली लगावली आणि लग्न मोडून मंडपातून निघून गेली. पण लग्नमंडपात फक्त एवढंच झालं नाही. 

26 वर्षीय नवरामुलगा रवींद्र कुमार वरात घेऊन लग्नमंडपात उशिरा पोहोचला आणि तिथून सगळं काही सुरु झालं.  नवरीमुलीच्या कुटुंबाने एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्यामुलाच्या कुटुंबाने अतिरिक्त हुंड्याची मागणी केली होती. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आपण लग्नाआधीच्या विधींदरम्यान 2.5 लाख रुपये दिले होते. यानंतर लग्नाच्या सकाळी 2 लाख दिले. पण नवऱ्यामुलाच्या कुटुंबाचं यावरही पोट भरत नव्हतं. 

दुसऱ्या एका दाव्यानुसार, रवींद्र कुमारला आपल्या मर्जीतील मुलीशी लग्न करायचं होतं. तो आपल्या लग्नात दारुच्या नशेत पोहोचला आणि मुलीचं कुटुंब, नातेवाईकांशी गैरवर्तन करु लागला. वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हा तो आपल्या मित्रांसह मद्यपान करत होता असं एफआयआरमध्ये सांगण्यात आलं आहे. 

लग्न लागताना रवींद्र कुमारने चुकून नवरीमुलीच्या शेजारी उभ्या तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात हार घातला. यामुळे नवरीमुलगी इतकी संतापली की तिने त्याच्या कानाखाली लावली आणि लग्न मोडून निघून गेली. 

प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. यानंतर नवरामुलगा आणि नवरीमुलीच्या कुटुंबीयांमध्ये हाणामारी सुरु झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. नवरामुलगा आणि वरातीला पुन्हा माघारी पाठवण्यात आलं. 

पोलिसांनी नवरामुलगा आणि त्याच्या मित्रांविरोधात नवरीमुलीच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल आणि शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हुंडा मागितल्याप्रकरणी नवऱ्यामुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांनीच नवऱ्यामुलाला दारु पाजली असं सांगितलं जात आहे. दारु विक्री प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. 





Source link

बारामती आणि परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये; मंत्रिमंडळाने दिली मान्यता

0
बारामती आणि परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये; मंत्रिमंडळाने दिली मान्यता

अजित पवार यांच्या वेगवान निर्णयक्षमतेचा प्रत्यय

पुणे : महाराष्ट्रातील कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे-बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने या दोन्ही जिल्ह्यांत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

बारामती येथे जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ‘कृषिक-२०२५’ प्रदर्शनात शेतकरी आणि पशुपालकांनी बारामतीत पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यास तातडीने प्रतिसाद देत अजित पवार यांनी बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे दोन नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली होती. मागील महिनाभरातच सर्व प्रक्रिया पूर्ण करून मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.

राज्यातील पशुधन विकासाला गती

महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असल्याने कृषी क्षेत्रासोबतच पशुपालन आणि दुग्ध व्यवसायालाही मोठे महत्त्व आहे. राज्यातील पशुवैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढवण्यासाठी ही महाविद्यालये महत्त्वाची ठरणार आहेत. या नव्या प्रकल्पामुळे राज्यातील पशुधनाच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेता येणार असून, आधुनिक पशुवैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होतील.

बारामती आणि परळी येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे ८२ एकर, तर परळी तालुक्यातील लोणी येथे ७५ एकर जागेवर ही दोन नवीन महाविद्यालये उभारली जाणार आहेत.

११२९ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

या महाविद्यालयांसाठी राज्य सरकारने ११२९.१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, प्रत्येकी ५६४.५८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रगत संशोधन केंद्रे आणि शिक्षणासाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.

२३४ नियमित आणि ४२ मानधनावरील पदे मंजूर

या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठी मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती करण्यात आली आहे.

  • शिक्षकवर्ग: ९६ पदे
  • शिक्षकेत्तर कर्मचारी: १३८ पदे
  • मानधन तत्त्वावर भरती: ४२ पदे

पशुपालक आणि कृषी क्षेत्रातील आनंद

राज्यातील पशुपालकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आणि तांत्रिक मदत मिळणार असल्याने हा निर्णय स्वागतार्ह ठरत आहे. यामुळे कृषिपूरक व्यवसायांना चालना मिळेल आणि पशुधन संगोपनासाठी संशोधन व नव्या तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा होईल.

अजित पवार यांच्या वेगवान निर्णयक्षमतेचा प्रत्यय

अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलर वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून शेती आणि पशुपालनास चालना देण्यासाठी या दोन महाविद्यालयांना मंजुरी मिळवण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी एका महिन्यात घेतला.

राज्यातील पशुधनासाठी ऐतिहासिक पाऊल

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय क्षेत्रात मोठी सुधारणा होणार असून, प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढणार आहे. विशेषतः, बारामती आणि परळी परिसरातील पशुपालकांसाठी हा निर्णय एक मोठी संधी ठरणार आहे. राज्यातील कृषी व पशुपालन क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही नवी महाविद्यालये महत्त्वाची भूमिका बजावतील.

स्वारगेट बसस्थानकात धक्कादायक प्रकार – शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

0
स्वारगेट बसस्थानकात धक्कादायक प्रकार – शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुणे – पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर पहाटेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

घटनाक्रम कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे ५.३० वाजता स्वारगेट बसस्थानकात पोहोचली. यावेळी ती एका ठिकाणी उभ्या असलेल्या शिवशाही बसजवळ गेली. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी बस दुसरीकडे उभी असल्याची बतावणी केली. पीडितेने त्यास नकार दिला, मात्र आरोपीने तिची दिशाभूल करत टॉर्च लावून बसमध्ये जाण्यास सांगितले.

पीडित बसमध्ये प्रवेश करताच नराधमही तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेनंतर पीडित तरुणीने काही अंतर गेल्यानंतर हिंमत एकवटत स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्वरित कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली.

आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, राहणार शिक्रापूर) असे असून त्याच्या विरोधात जबरी चोरीचे दोन गुन्हे आधीच दाखल आहेत.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणी पुणे पोलिसांनी तत्काळ ८ विशेष पथके स्थापन केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वारगेटसारख्या प्रमुख बसस्थानकावर पहाटेच्या वेळीही अशा घटना घडत असल्याने सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी महिलांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


,

‘काँग्रेसला लाज वाटली पाहिजे ते…’, प्रिती झिंटा भडकली; ‘न्यू इंडिया’ बँक अन् 18 कोटींचं कनेक्शन

0
‘काँग्रेसला लाज वाटली पाहिजे ते…’, प्रिती झिंटा भडकली; ‘न्यू इंडिया’ बँक अन् 18 कोटींचं कनेक्शन


Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps

Crowe-Thorpe Trophy, 2024

Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps

Sri Lanka in South Africa, 2 Test Series, 2024

No match is being played.

Nov 22, 2024 | 1st Test

Bangladesh in West Indies, 2 Test Series, 2024

WI

(144.1 ov) 450/9 dec

(46.1 ov) 152

VS

BAN

269/9 dec (98.0 ov)

132 (38.0 ov)

West Indies beat Bangladesh by 201 runs
Full Scorecard →

Nov 26, 2024 | 2nd ODI

Pakistan in Zimbabwe, 3 ODI Series, 2024

ZIM

(32.3 ov) 145

VS

PAK

148/0 (18.2 ov)

Pakistan beat Zimbabwe by 10 wickets
Full Scorecard →





Source link

लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी मंत्र्यांच्या दारात वणवण

0


सातारा : सरकारी अधिकारी किंवा मंत्री, मंत्र्‍यांचे नातलग यांच्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा जोरदारपणे कामाला लागते. मात्र, सर्वसामान्य लोकांसाठी, नागरिकांसाठी यंत्रणेपुढे सातत्याने चपला झिजवाव्या लागतात हेही तितकेच खरंय. कारण, काही दिवसापूर्वी राज्यातील एका माजी मंत्र्याच्या मुलाला थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करुन चक्क हवेतूनच विमान वळविण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र, मरणाच्या दारात असलेल्या मुलीला वाचविण्यासाठी, तिच्या भेटीसाठी अमेरिकत जाऊ इच्छिणाऱ्या तिच्या बापाला मेडिकल इमर्जन्सी व्हिसा (Visa) मिळत नाही. भारतातून परदेशात केवळ मौजमौज्जा करण्यासाठी मंत्र्याच्या मुलाला विमान मिळते, मिळालेले विमान हवेतून परतही फिरते. मात्र, अमेरिकेतील (America) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या लेकीला पाहण्यासाठी बापाला मंत्र्‍यांच्या बंगल्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. 
 
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील  उंब्रज गावातील नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या 11 दिवसापूर्वी अपघात झाला असून तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळेना गेल्याने वडिलांनी नाराशा व्यक्त केली आहे. प्रशासना व शासनाकडे आर्जव करुन हतबल झालेल्या, दमलेल्या या बापाची कहाणी कोणी ऐकेल का, या बापाला लेकीच्या भेटीसाठी कुणी व्हिसा देईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे वडिल तानाजी शिंदे यांनी यासाठी अनेक मंत्र्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या आहेत. 

अमेरिकेत शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या नीलम हीचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी व्यायामासाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झालाय. या अपघातासाठी दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र, रक्तातील नातेवाईक आल्याशिवाय याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकेतील पोलिस सांगत आहेत. या अपघातात नीलमच्या दोन्ही हाता, पायांना आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने ती कोमातील स्थिती असल्याचे डाक्टर सांगत आहेत. तिची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना याबाबत माहिती मिळत आहे. मात्र, वडिल तानाजी यांना मुलीच्या भेटीसाठी हवा असलेला इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीय. 

अमेरिकेतील हॉस्पिलटलने दिलंय पत्र

तानाजी शिंदे यांनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क केला. तर, मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा आँफिसलाही पालकांनी भेट दिलीय पम, व्हिसासाठी त्यांना दाद मिळत नसल्याचं त्यांची म्हणणं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील हॉस्पिटलने अपघातानंतर नीमच्या पालकांना पत्र देखील दिलं आहे, ज्या आधारे ते व्हिसासाठी मागणी करत आहेत. मात्र, व्हिसा मिळत नसल्याने वडिलांच्या हतबलतेकडे आता सरकार देईल का, हाच खरा प्रश्न आहे. 

हेही वाचा

 

अधिक पाहा..



Source link

जगातलं सर्वात छोटं अन् थेट Resignation Letter! 6 शब्दांत राजीनामा; म्हणाला, ‘डिअर सर, मज्जा…’

0
जगातलं सर्वात छोटं अन् थेट Resignation Letter! 6 शब्दांत राजीनामा; म्हणाला, ‘डिअर सर, मज्जा…’



कामावर राजीनामा देणं ही गोष्ट प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी मोठी गोष्ट असते. पण एका कर्मचाऱ्याच अवघ्या 6 शब्दातील राजीनामा सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. 



Source link

Pune Swarget Crime : पुणे हादरले! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

0
Pune Swarget Crime : पुणे हादरले! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार


Pune Swarget Bus stand Rape Crime: पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास फलटण येथे जाण्यास निघालेल्या एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून  पुण्यात खरचं महिला सुरक्षित आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आले आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.



Source link

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर आज कोसळले; वाचा 24 कॅरेटचे दर

0
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर आज कोसळले; वाचा 24 कॅरेटचे दर


Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने विक्रमी दर गाठला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सोनं 90 हजारांवर पोहोचू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं आज 80,500 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उलाढाली आणि घटनांमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मार्चपासून लग्नसराईंना मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे. त्यामुळं सोनं खरेदीसाठी झुंबड उडते. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 87,820 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोनं 200 रुपयांनी स्वस्त झाले असून प्रतितोळा 65,870 रुपयांवर पोहोचले आहे. आज सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,820 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,870 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,050 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,782 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,587 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,400 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   70,256 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    65,870 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-80,500 रुपये
24 कॅरेट- 87,820 रुपये
18 कॅरेट- 65,870 रुपये





Source link

‘उदयनमहाराज, बाबाराजे तुम्हाला शिवराय, मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं मान्य आहेत का?’

0


Kiran Mane on Udayanraje Bhosale and Shivendrasinh Bhosale : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून अनेकांनी या धमकीचा निषेध केला आहे. आहे. एका व्यक्तीने कॉल करून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे. हा व्यक्ती नागपूर येथील प्रशांत कोरटकर असल्याचेही त्यांनी सांगितले. रेकॉर्डिंग सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यात धमकी देणारा व्यक्ती अर्वाच्य शिवीगाळ करत असल्याचे दिसून येते. माझे नाव गुगलवर शोध. ब्राह्मणांना हलक्यात घेऊन नको. ब्राह्मणांची ओकात दाखवून देऊ. जिथे बोलवशील तिथे येऊ, तुझ्या घरात येऊन मारेन, असे धमकी देणारी व्यक्ती म्हणत आहे. यानंतर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी कोल्हापूर पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. 

आईबापांचे वाभाडे निघूनही आम्ही लाचारच राहू?  

दरम्यान, इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आल्यानंतर एक सातारकर म्हणत अभिनेते किरण माने यांनी खासदार उदनयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना थेट सवाल केला आहे. त्यांनी सोशल मीडियातून सवाल करत म्हटले आहे की, छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे… एक सातारकर तुम्हाला हक्कानं विचारतो आहे. इंद्रजीत सावंतांना आलेल्या धमकीच्या फोनमध्ये छ. शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का? की आपल्या आईबापांचे वाभाडे निघूनही आम्ही लाचारच राहू? तुम्ही म्हणाल तसं!

धमक्यांना मी भीक घालत नाही

दरम्यान, मला प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिली असली तरी अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा व्यक्तीवर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत, असा संदेश द्यावा, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. सावंत यांनी सांगितले की, सोमवारी मध्यरात्री 12 वाजता मला कोरटकर नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ती व्यक्ती शिव्या देत जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्याने केला असून हा महाराष्ट्र पेशव्यांचा आहे का, असा सवाल त्यांनी केला. संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू. इतिहासाचे दाखले ब्रिटिश काळापासून आहेत. खोटा व घाणेरडा इतिहास सांगावा, अशी त्यांची इच्छा आहे. पण, खोटा इतिहास आम्ही का सांगू, असेही सावंत म्हणाले. 

अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी 

दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या कुविचारी कोरटकर वर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी, असे म्हटले आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. देशाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकर वर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा राज्यभर एल्गार; विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलन

0
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा राज्यभर एल्गार; विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलन


भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली, परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची कामे ठप्प पडली आहेत, त्याविरोधात ४ मार्चला महापालिका क्षेत्रात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.



Source link