Thursday, July 30, 2026
Home Blog Page 523

Chhaava tax-free: छत्तीसगडमध्ये ‘छावा’ सिनेमा करमुक्त जाहीर

0
Chhaava tax-free: छत्तीसगडमध्ये ‘छावा’ सिनेमा करमुक्त जाहीर


छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट छत्तीसगडमध्ये करमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी घेतला आहे. ‘छावा’ हा केवळ चित्रपट नसून आपल्या ऐतिहासिक परंपरा, धाडस आणि स्वाभिमानाला आदरांजली असल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा समजून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हा सिनेमा पाहावा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी

0
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी


Pune Swargate bus depot crime: पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेतील आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे असे आरोपीचे नाव असून या घटनेला ४८ तास उलटून देखील आरोपी गाडे याने पोलिसांना गुंगारा दिला आहे.



Source link

“आरडी”तून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम, चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च!

0
“आरडी”तून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम, चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च!


एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी “आरडी” या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे.



Source link

विकी कौशलच्या ‘छावा’ने कमावले 500 कोटींपेक्षा जास्त, महाशिवरात्रीला किती झाली कमाई?

0
विकी कौशलच्या ‘छावा’ने कमावले 500 कोटींपेक्षा जास्त, महाशिवरात्रीला किती झाली कमाई?



विकी कौशलच्या ‘छावा’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही जबरदस्त सुरू आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विकी कौशलच्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.



Source link

Po*n व्हिडीओ पाहून 13 वर्षीय मुलाकडून 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; ती बिथरताच…

0
Po*n व्हिडीओ पाहून 13 वर्षीय मुलाकडून 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; ती बिथरताच…


Crime News : पुण्यातील स्वारगेट इथं झालेल्या बलात्कार प्रकरणानं महाराष्ट्र हादरला असतानाच आता संपूर्ण देशालासुद्धा हादरा देणारी एक खळबळजनक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ही घटना छत्तीसगढमधील असून, इथं बिलासपूर जिल्ह्यात पाच वर्षीय चिमुकलीवर 13 वर्षीय मुलानं बलात्कार केल्याची घटना घडली आणि साऱ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिलासपूर जिल्ह्यातील सरकंडा पोलीस ठाणे क्षेत्रात एका निर्माणाधीन गृहसंकुलामध्ये या लहान मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची हादरवणारी घटना घडली. सजर प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

बिलासपूर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक (एसपी) रजनेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम पोलिसांना सरकंडा क्षेत्रातील एका निर्माणाधीन गृहसंकुलामध्ये सोमवारी एक लहान मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या मुलीचा मृतदेह या निर्माणाधीन प्रकल्पातील एका घरात आढळला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आणि तिथं हा मृतदेह आढळताच पोलिसांनाही हादरा बसला. मृतदेहावर डोक्यासह इतर अवयवांवर गंभीर दुखापत झाल्याचं पाहताक्षणी लक्षात आलं. 

 

घटना घडलेल्या या भागामध्ये अनेक घरं निर्माणाधीन असून, तिथं मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष मजूर त्यांच्या मुलांसह वास्तव्यास असल्याचं सांगितलं जातं. हत्या झालेल्या चिमुकलीचे आईवडिलही मजूर असून, तिथंच मजुरांसाठीच्या घरांमध्ये ते वास्तव्यास होते. 

अश्लील व्हिडीओ पाहून…. 

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपीसुद्धा याच भागात राहणारा असून, CCTV व्हिडीओतून समोर आलेल्या दृश्यांनुसार तो या लहान मुलीला आपल्यासोबत नेताना दिसला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन आरोपीनं गुन्हा कबुल केला असून, आपण अश्लील व्हिडीओ पाहत असल्याची माहितीसुद्धा त्यानंच दिली. सायंकाळी जेव्हा मुलगी एकटीच खेळत असल्याचं त्यानं पाहिलं तेव्हा तो तिला एका बांधकामाधीन घरामध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले. जेव्हा मुलीनं याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या मुलानं तिला लाकडानं मारून तिथंच संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सदर घटनेनंतर या भागात एकच खळबळ माजली असून, पोलिसांच्या ताब्यातील आरोपी अल्पवयीन असल्या कारणानं त्याच्यावर बाल कल्याण कायद्यांतर्गत कारवाई केली जात असून, पुढे त्याला किशोर न्याय बोर्डासमोर हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 





Source link

Entertainment News in Marathi Live: Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’

0
Entertainment News in Marathi Live: Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’


Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’

Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Thu, 27 Feb 202502:10 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Chal Halla Bol movie: नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात, ‘चल हल्ला बोल…’

  • Chal Halla Bol movie – ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांची ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो…’ ही कवितेवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. 


Read the full story here

Thu, 27 Feb 202508:09 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: छत्तीसगडमध्ये ‘छावा’ सिनेमा करमुक्त; गोवा मध्य

  • Chhaava movie –  छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे विलक्षण धाडस, त्याग आणि सामरिक प्रतिभा दर्शवणारा ‘छावा’ चित्रपट छत्तीसगड राज्यात करमुक्त जाहीर करण्यात आला आहे.


Read the full story here

Thu, 27 Feb 202505:16 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: “आरडी”तून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम, चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च!

  • एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी “आरडी” या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे.


Read the full story here

Thu, 27 Feb 202505:11 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: विकी कौशलच्या ‘छावा’ने कमावले 500 कोटींपेक्षा जास्त, महाशिवरात्रीला किती झाली कमाई?

  • विकी कौशलच्या ‘छावा’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही जबरदस्त सुरू आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विकी कौशलच्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.


Read the full story here

Thu, 27 Feb 202504:40 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: हास्यजत्रा फेम निखील बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकरचं “पोर बदनाम” गाणं व्हायरल!

  • मैत्रीचं धम्माल गाणं “पोर बदनाम” नुकतचं प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे या गाण्याने प्रदर्शित होताच अवघ्या ८ तासात १ मिलीयनचा टप्पा पार केला आहे.


Read the full story here





Source link

स्वारगेट बसस्थानकातील अमानुष घटना: तरुणीवरील बलात्कार प्रकरणात राज्यभर संताप, अजित पवार यांची कठोर प्रतिक्रिया

0
स्वारगेट बसस्थानकातील अमानुष घटना: तरुणीवरील बलात्कार प्रकरणात राज्यभर संताप, अजित पवार यांची कठोर प्रतिक्रिया

पुणे: स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप उसळला आहे. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध घेण्यासाठी आठ पोलिस पथके रवाना झाली असून, यापैकी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध शिरूर तालुक्यात आणि त्याच्या गावात सुरू आहे.

अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया:

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“या घटनेने मला अतिशय मनस्ताप झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे असह्य आहे. आरोपी कोणत्याही परिस्थितीत सापडला पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा हीच योग्य न्याय असू शकतो.”

तपास जलदगतीने करण्याचे आदेश

पुण्यासारख्या मोठ्या शहरात आणि वर्दळीच्या ठिकाणी असे प्रकार घडणे अत्यंत गंभीर असल्याचे सांगत अजित पवार यांनी सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“स्वारगेट आणि शिवाजीनगर डेपो हे वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करणं गरजेचं आहे. पोलिसांना तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले जात असून, आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.”

लवकरात लवकर न्याय देण्याचे आश्वासन

अजित पवार यांनी पुढे सांगितले की,
“पीडित तरुणीला सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. हा खटला जलदगतीने चालवला जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.”

महिला सुरक्षेवरून प्रशासनावर टीका

या घटनेनंतर पुण्यात नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आता या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर अटक होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


स्वारगेट बस स्थानकातील अमानुष घटना: सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
स्वारगेट बस स्थानकातील अमानुष घटना: सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

बसस्थानकात भीषण अत्याचाराची घटना, आरोपी फरार

पुणे :- स्वारगेट एसटी बस स्थानकात एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात नवी माहिती उघड झाली असून, आरोपी दत्तात्रय गाडे याने स्वतःला एसटी बसचा वाहक असल्याचे खोटे सांगून पीडित तरुणीची फसवणूक केली. विशेष म्हणजे, ही बस स्वारगेट ते सोलापूर मार्गावर विनावाहक धावत होती, त्यामुळे आरोपीने संधी साधत अमानुष कृत्य केले.

ही घटना मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपीने फलटणला जाणाऱ्या तरुणीला गोड बोलून फसवले. ‘आपण त्या बसचा वाहक असून, गेल्या वर्षभरापासून ड्रायव्हर म्हणून काम करतो,’ असे सांगून तो तिला बसमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.


सुरक्षेतील गंभीर त्रुटी; २३ सुरक्षारक्षक निलंबित

या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बस स्थानकातील २३ सुरक्षारक्षकांना निलंबित केले आहे. तसेच नवीन सुरक्षारक्षकांची नियुक्ती गुरुवारपासून (29 फेब्रुवारी) करण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय, डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चौकशीचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर पुढील कारवाई ठरवली जाणार आहे.


शिवसेनेच्या आंदोलनाने सुरक्षा व्यवस्थेचा भोंगळपणा उघड

या घटनेनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. गर्दीच्या स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार होतो, यावरून सुरक्षेची दयनीय अवस्था स्पष्ट झाली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे नेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट बस स्थानकात जोरदार आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर आक्रमक भूमिका घेत, सुरक्षारक्षकांच्या केबिनच्या काचा फोडल्या.


स्वारगेट स्थानकातील बंद बसमध्ये आक्षेपार्ह वस्तू आढळल्या

या प्रकरणानंतर बस स्थानकाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानकातील काही बंद बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम, जुने कपडे, साड्या आणि शर्ट सापडल्याने येथे अन्य प्रकारच्या गुन्हेगारी घटनाही घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एसटी प्रशासनाने तातडीने उपाय न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


➡️ पुढील पावले:

  • पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.
  • स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचे पुनरावलोकन.
  • नवीन सुरक्षारक्षकांची तातडीने नियुक्ती.
  • डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकांवर कठोर कारवाईची शक्यता.
  • महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्यावर भर.

ही घटना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेच्या मोठ्या त्रुटी दाखवून देते. आता प्रशासन आणि पोलीस वेळीच कठोर कारवाई करतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दोषी राजकीय नेत्यांवर आयुष्यभराची बंदी नको, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात विनंती, म्हणाले ‘इतकं निष्ठूर…’

0
दोषी राजकीय नेत्यांवर आयुष्यभराची बंदी नको, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात विनंती, म्हणाले ‘इतकं निष्ठूर…’


गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या राजकीय नेत्यांवर आयुष्यभरासाठी बंदी घालणं कठोर ठरेल. सध्या अपात्रतेचा असणारा सहा वर्षांचा कालावधी आहे प्रतिबंधक म्हणून पुरेसा आहे, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या राजकीय नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची आणि खासदार आणि आमदारांवरील गुन्हेगारी खटले जलद निकाली काढण्याची मागणी करणाऱ्या अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने हे म्हटलं आहे. तसंच अपात्रतेचा कालावधी निश्चित करणं केवळ संसदेच्या अधिकारक्षेत्रात आहे असंही केंद्र सरकारने सांगितलं आहे.

“आयुष्यभरासाठी बंदी घालणं असेल की नाही हा प्रश्न केवळ संसदेच्या अधिकारक्षेत्रात येतो,” असं केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तसंच अपात्रतेचा कालावधी सभागृह प्रमाणता आणि तर्कशुद्धतेच्या तत्त्वांचा विचार करून ठरवते असंही सांगितलं.

शिक्षेची मर्यादा योग्य कालावधीपर्यंत मर्यादित करत, प्रतिबंध केला जाईल याची खात्री करण्यात आली असून, अनावश्यक कठोरता टाळली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे. उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेत लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 8 आणि 9 ला आव्हान दिलं आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 8 (1) अंतर्गत, अपात्रतेचा कालावधी दोषी ठरवल्याच्या तारखेपासून सहा वर्षं किंवा तुरुंगवासाच्या बाबतीत, सुटकेच्या तारखेपासून सहा वर्षे होता, असं सरकारने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.

कलम 9 अंतर्गत, भ्रष्टाचार किंवा राज्याशी बेईमानी करण्याबद्दल बडतर्फ करण्यात आलेले सरकारी कर्मचारी अशा बडतर्फीच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरतात. उपाध्याय यांनी दोन्ही प्रकरणांमध्ये अपात्रता आयुष्यभरासाठी असावी अशी मागणी केली.

प्रतिज्ञापत्रात, केंद्राने मर्यादित शिक्षा करण्यात काहीही असंवैधानिक नसून,  असं करणं कायद्याचे एक निश्चित तत्व आहे असं सांगितलं. “याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे व्यापक परिणाम आहेत आणि ते स्पष्टपणे संसदेच्या कायदेविषयक धोरणात येतात आणि अशा संदर्भात न्यायालयीन पुनरावलोकनाच्या रूपरेषांमध्ये योग्य बदल केले जातील,” असं त्यात म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालय केवळ कायदे असंवैधानिक म्हणून रद्द करू शकते, परंतु याचिकाकर्त्याने मागितलेल्या आजीवन बंदीची सवलत देऊ शकत नाही असा युक्तिवाद केंद्राने केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल 2013 मध्ये किमान दोन वर्षांच्या शिक्षेसह दोषी ठरलेल्या खासदारांना ताबडतोब सभागृहातून अपात्र ठरवलं जावं, त्यांना अपील करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला जाऊ नये असा निर्णय दिला होता. केंद्रातील यूपीए सरकारने याविरोधात अध्यादेश काढला होता, ज्याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार विरोध केला होता. राहुल गांधी यांनी हा अध्यादेश फाडून टाकत मूर्खपणा असल्याचं म्हटलं होतं. 





Source link

स्व. भगवानराव गोरे (दादा) अनंतात विलीन; राजकीय-सामाजिक क्षेत्रात शोककळा

0
स्व. भगवानराव गोरे (दादा) अनंतात विलीन; राजकीय-सामाजिक क्षेत्रात शोककळा

दहिवडी  :  महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.श्री. जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे ( दादा ) यांचे मंगळवारी पहाटे दिर्घ आजाराने दुख:द निधन झाले.
पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माण, खटाव तालुक्यांसह जिल्ह्यावर शोककळा पसरली. बोराटवाडी ( ता. माण ) येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्व.भगवानराव गोरे दादा यांना राजकीय, सामाजिक,सहकार, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच शोकसंदेशाद्वारे श्रद्धांजली वाहिली.

स्व.भगवानराव गोरे दादा यांच्यावर गेल्या चार महिन्यांपासून पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भवानराव गोरे दादा १९९० ते ९५ बोराटवाडीचे सरपंच होते. २०२० पासून त्यांनी येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमनपद भूषविले. सातारा जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे मार्गदर्शक आणि माण तालुका संघटनेचे ते अध्यक्ष होते.
समता शिक्षण मंडळातही ते संचालक पदावर कार्यरत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंदेश पाठवून ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री मा.श्री.जयकुमार गोरे आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. या दु:खातून सावरण्याची शक्ती गोरे कुटुंबियांना मिळो अशी त्यांनी प्रार्थना केली.
स्व.भगवानराव गोरे (दादा) यांना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराज, मा. खा. रणजितसिंह नाईक _निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आ. राहुल कुल, आ. सचिन पाटील, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, मा.आ. डॉ. दिलीपराव येळगावकर, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, मा. आ.दिनकर आबा पाटील, मा.आ.मदन भोसले, मा.आ.राम सातपुते, आ.राजू खरे, आ. सचिन कल्याणशेट्टी,आ. देवेंद्र कोठे, मा.आ. दिपक आबा साळुंखे,आ. हेमंत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, प्रभाकर देशमुख, सेवागिरी महाराज ट्रस्ट पुसेगाव चे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, सरचिटणीस विकल्प शेठ शहा, मुकुंद आफळे, ह. भ.प.सागर महाराज बोराटे, प्रधान सचिव एकनाथ डवले, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे,सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, जीवन गलांडे, मनोहर गव्हाड, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, एसपी समीर शेख, सोलापूरचे जिल्हाधिकारी , सीईओ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रांत उज्वला गाडेकर, डिवाय एसपी अश्विनी शेंडगे, पंढरपूरचे पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके, सर्व राजकीय पक्षांचे आजी, माजी पदाधिकारी यांनी श्रध्दांजली अर्पण करुन मंत्री जयकुमार गोरे, उद्योजक अंकुश गोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक शेखर गोरे, नगरसेविका सौ. सुरेखा पखाले यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.
मंत्री गिरीश महाजन, मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री आदिती तटकरे, खा. सुप्रिया सुळे,आ. मनोज घोरपडे, आ. राणाजगजीतसिंह पाटील,आ. योगेश टिळेकर, आ. चित्राताई वाघ,आ. सुभाष देशमुख,आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. अमोल महाडिक,आ. सुरेश धस,आ. गिरिष चौधरी,आ. सुधीर मुनगंटीवार रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. अतुल भोसले, आ. राजेंद्र पवार,यांनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली अर्पण केली.