Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रवेरूळ लेणीतील किरणोत्सव: ११ मार्चच्या साप्ताहिक सुट्टीमुळे पर्यटकांना मुकावे लागण्याची शक्यता!

वेरूळ लेणीतील किरणोत्सव: ११ मार्चच्या साप्ताहिक सुट्टीमुळे पर्यटकांना मुकावे लागण्याची शक्यता!

औरंगाबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील चैत्यगृह, म्हणजेच लेणी क्रमांक १० मध्ये दरवर्षी १० व ११ मार्च रोजी घडणाऱ्या अद्वितीय किरणोत्सवाला यंदा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ११ मार्च २०२५ मंगळवारी वेरूळ लेणीची साप्ताहिक सुट्टी असल्याने, या दिवशी पर्यटक व बुद्ध अनुयायांना हा विलक्षण खगोलीय सोहळा अनुभवता येणार नाही.

वेरूळ लेणी क्रमांक १० हे अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा संगम असलेले चैत्यगृह आहे. येथे समोरच्या चैत्यगवाक्षातून येणारे सूर्यकिरण भगवान गौतम बुद्धांच्या शिल्पावर पडतात, ही अत्यंत दुर्मीळ आणि भव्य दृश्य असते. देश-विदेशातील पर्यटक तसेच बुद्ध अनुयायी याचा साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने दरवर्षी वेरूळ लेणीला भेट देतात.

मात्र, यंदा ११ मार्चला वेरूळ लेणी बंद राहील, यामुळे या दिवशी होणाऱ्या किरणोत्सवाला उपस्थित राहण्यास अडथळा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) औरंगाबाद सर्कलचे अधीक्षक शिवकुमार भगत यांना निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, ११ मार्चची साप्ताहिक सुट्टी मागे किंवा पुढे ढकलण्यात यावी, अथवा विशेष बाब म्हणून लेणी पर्यटक व अनुयायांसाठी खुली ठेवण्यात यावी.

या निर्णयावर हजारो पर्यटक व बौद्ध अनुयायांचे लक्ष लागले असून, ASI यावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments