Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 502

GK : भारतातील एकमेव राज्य जिथे इंग्रजी ही अधिकृत भाषा! 90% लोकांना माहिती नाही उत्तर

0
GK : भारतातील एकमेव राज्य जिथे इंग्रजी ही अधिकृत भाषा! 90% लोकांना माहिती नाही उत्तर


भारत हा विविधतेने नटलेला देश असून इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने राहतात. प्रत्येक राज्यात आपली स्थानिक भाषा, आपली परंपरा आणि प्रथा घेऊन आजही ते राहतात. भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी असली तरी भारत हा एक एकमेव देश आहे जिथे अनेक भाषा बोलल्या जातात. हिंदीशिवाय इंग्रजी, उडिया, आसामी, तेलुगू, कन्नड, भोजपुरी, मैथिली आणि बंगालीसह इतर अनेक भाषा बोलल्या जातात. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल याच भारतात एकमेव राज्य असं आहे ज्याची अधिकृत भाषा ही हिंदी आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगात 7000 हून अधिक भाषा बोलल्या जातात. education.gov.in च्या अहवालानुसार भारतात एकूण 1652 भाषा बोलल्या जातात. इथे प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे. काही ठिकाणी खारी हिंदी बोलली जाते, काही ठिकाणी बंगाली, तर काही ठिकाणी सोपी भाषा देखील वापरली जाते. स्थानिक भाषेसोबतच येथील राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. (Nagaland only state in India where English is the official language General Knowledge in marathi)

भारतातील ते एकमेव राज्य कोणतं?

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा राज्याबद्दल सांगणार आहोत जिथे इंग्रजी भाषा बोलली जाते आणि हे भारतातील एकमेव राज्य आहे. साधारणपणे तुम्ही सर्व राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. तर, ज्यांना स्थानिक भाषा येते. ते बाहेरून येणाऱ्या लोकांशी हिंदीत संवाद साधतात, जेणेकरून दोघेही एकमेकांना समजू शकतील. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या राज्यात इंग्रजी भाषा बोलली जाते. सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. या राज्याचे नाव नागालँड आहे, जिथे अधिकृत भाषा इंग्रजी आहे. हे भारताचे ईशान्येकडील राज्य आहे. येथील विधानसभेत इंग्रजी भाषेला अधिकृत भाषा घोषित करण्यात आली होती.

जर तुम्ही इथे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य तुम्हाला प्रेमात पडेल. त्याच्या सीमा आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरला लागलेल्या असून त्याची राजधानी कोहिमा आहे. डोंगररांगा आणि घनदाट जंगलांमुळे ते पर्यटकांना आकर्षित करतात. येथे वर्षभर हिरवळ पाहिला मिळते. 





Source link

महिला दिनानिमित्त  सातारा येथे तनिष्का बौद्ध वधू वर परिचय मेळावा संपन्न*

0
महिला दिनानिमित्त  सातारा येथे तनिष्का बौद्ध वधू वर परिचय मेळावा संपन्न*


सातारा :- सातारा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या व रिपाईच्या जावली तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी महिला दिनानिमित्त मोफत बौद्ध वधू वर मेळावा भरवून सामाजिक बांधिलकी जपत शेकडो मुला मुलींच्या विवाह जुळवण्यासाठी तनिष्का वधू वर संस्था जावली यांच्या वतीने परिचय मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केले.
बौद्ध वधू वर मेळाव्याचे उदघाटन आदरणीय हेमलता अशोकराव गायकवाड आईसाहेब यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पँथर रिपाईचे सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय अशोकराव गायकवाड, प्रोपेसर अरुणजी गाडे साहेब, रिपाईचे जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे साहेब,संगीताताई परिहार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील अनेक विवाह इच्छुक बौद्ध मुला मुलींनी, घटस्फोटीतांनी व पालकांनी उत्सपूर्त प्रतिसाद देत सातारा येथे मेळावा संपन्न केला.
तनिष्का वधू वर चे दशरथ कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात (फौजी ),बौद्धाचार्य दत्तात्रय जाधव गुरुजी,बौद्धाचार्य कुमार सुर्वे, बौद्धाचार्य अनिल शिंदे यांनी मेळाव्याचे अतिशय नियोजनबद्ध संयोजन केले.
प्रमोद मोतलिंग,विकास तोडकर,करण कांबळे, शर्मिला कांबळे, तनिष्का कांबळे, इत्यादीनीं मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
याप्रसंगी रिपाईचे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांनी सांगितले की वधू वर मेळाव्याच्या माध्यमातून लग्न जुळवणे ही खुप मोठी सामाजिक चळवळ निर्माण झाली असून विवाहइच्छुक मुलांनी व मुलींनी योग्यवयातत लग्न केली पाहिजेत नोकरींचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुला-मुलींनीही शासकीय नोकरी,डॉक्टर, इंजिनियरच पाहिजे अशी अट न धरता निर्व्यसनी व चांगला कमवणारा किंवा व्यवसायिक,शेतकरी मुलगा असेल तर तडजोड केली पाहिजे. तसेच मेळाव्याच्या माध्यमातून दोन कुटुंबाला एकत्र आणण्याचा खूप चांगला उपक्रम रिपाई जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महासचिव दशरथ कांबळे व जावली तालुक्याचे सर्व पदाधिकारी करीत असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
तनिष्का वधू वर संस्थेचे मार्गदर्शक एकनाथ रोकडे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील हा सातवा बौद्ध वधू वर परिचय मेळावा आमच्या सर्व टीमने यशस्वी केला असून इतरही जिल्ह्यातील डॉक्टर, शासकीय कर्मचारी, इंजिनियर, तलाठी, आयटी क्षेत्रातील मुला मुलींनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला बौद्ध वधुवर मेळाव्यामुळे अनेक मुलामुलींचे, घटस्फोटीतांचे संसार नव्याने उभे राहायला मदत मिळेल त्यामुळे इथून पुढे आमची सर्व टीम सामाजिक बांधिलकी जपत आजून जोमाने काम करनार आहे.
दशरथ कांबळे यांनी सांगितले की तनिष्का वधू वर मेळाव्याच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त लग्न जुळवले असून ह्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या संस्थेला मिळालेला आहे लवकरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बौद्ध वधू वर महामेळाव्याची तयारी आमची टीम करणार आहे.
भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात यांनी सर्वांचे आभार मानले व बौद्धाचार्य कुमार सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

फलटणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; समता घरेलू महिला कामगारांना अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्कार प्रदान

0
फलटणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; समता घरेलू महिला कामगारांना अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्कार प्रदान

फलटण, 12 मार्च – साथी फलटण शाखा आणि समविचारी समता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समता घरेलू महिला कामगार आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) फलटण शाखेतर्फे अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी अॅड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात, कल्पनाताई मोहिते, नकुसा फरतडे आणि साजिया यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कल्पना मोहिते यांनी केले, तर अंनिस फलटण शाखेचे कार्यकर्ते वसिम शेख, अयाज आतार, आरती काकडे आणि मोहिनी भोंगळे यांनी संपूर्ण जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आनंद देशमुख होते. प्रमुख उपस्थिती दादासाहेब चोरमले, सुपर्णाताई अहिवळे आणि मंदाकिनी गायकवाड यांची होती. यावेळी महिलांच्या अंधश्रद्धांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात गिरीश बनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांनी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा वाटून क्रांतीज्योतीचा संदेश दिला.

यावेळी अॅड. कांचनकन्होजाताई यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाने जागतिक महिला दिनाला खऱ्या अर्थाने सामाजिक भान प्राप्त करून दिले.

विधानसभेनंतर आता थोरातांचा कारखाना निवडणुकीत लागणार कस, खताळ यांचे आव्हान कसं पेलणार?

0
विधानसभेनंतर आता थोरातांचा कारखाना निवडणुकीत लागणार कस,  खताळ यांचे आव्हान कसं पेलणार?


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणानंतर थोरात यांना यंदाची कारखान्याची निवडणूक जड जडाण्याचे संकेत दिसत आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचीत आमदार अमोल खताळ यांना विखे गटाची साथ मिळत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ या संस्थेने सह्याद्री कारखाना क्षेत्रात ग्राउंडवर जाऊन आढावा घेतला आहे.



Source link

मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं

0


Udayanraje Bhosale on Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सैन्यात कोणीच मुस्लीम नव्हते, असा दावा भाजप नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू-मुस्लीम भेदभाव केला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर मल्हार सर्टिफिकेटवरही उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. 

उदयनराजे भोसले म्हणाले की, मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही, असे त्यांनी म्हटले. तर नितेश राणेंना असं म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा. मी तर किती वेळा तरी सांगितलं आहे की, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो, हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.  

मी नॉनव्हेज खात नाही, ज्यांना खायचंय त्यांनी…

मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certificate) देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. याबाबत उदयनराजे भोसले म्हणाले की, मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंची उडी 

दरम्यान, कराड सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. मी या कारखान्याचा सभासद नसलो तरी या कारखान्यात सत्तेचं केंद्रीकरण झालं असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता खा. उदयनराजे यांनी केलं आहे. कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती मात्र ती मिळाली नाही. कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं खासदार उदयनराजे यांनी सांगितला आहे. 

आणखी वाचा 

मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या

अधिक पाहा..



Source link

शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रवेश

0
शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रवेश


‘शिक्षक महासंघा’चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री, आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भोयर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भोयर यांनी २०२० साली अमरावती विभाग शिक्षक मतदार संघची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ८ हजार मते मिळाली होती. भोयर यांनी शिक्षण क्षेत्र तसेच शिक्षकांसाठी भरपूर काम केले असून त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पक्षाचे संघटन वाढणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 



Source link

वाघळवाडीत टोळक्याचा दहशतवाद! कोयता, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला

0
वाघळवाडीत टोळक्याचा दहशतवाद! कोयता, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला

बारामती | “आम्ही कोण आहोत, तुम्हाला माहीत आहे का?” असे म्हणत सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयता, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वाघळवाडी (कन्नडवस्ती), ता. बारामती येथे घडली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

संकेत राजेंद्र शेवाळे (वय 27, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी ऋतीक उर्फ काल्या रावळकर, प्रमोद जगताप, सोनू नवले, भावेश रावळकर, पंकज सुहास पाटील, रणजीत रावळकर (सर्व रा. वाघळवाडी कन्नडवस्ती, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

घटनाक्रम:

दि. 8 मार्च रोजी रात्री 10 वाजता, फिर्यादी व त्यांचे मित्र सोमेश्वर करंजेपुल येथील ‘जय भवानी हॉटेल’ येथे जेवण करून साखरवाडीला परतत होते. यावेळी आरोपी क्रमांक 1 आणि 4 यांनी त्यांचा पाठलाग करून कॅनॉलजवळ अडवले. “आम्ही गुन्हेगार आहोत, तुम्ही कुणाच्या नादाला लागत आहात” असे धमकी देत आरोपी क्रमांक 1 ने मोबाईलवरून अन्य साथीदारांना “सर्वजण मटेरीअल घेऊन कॅनॉल पुलावर या” असा संदेश दिला.

थोड्याच वेळात आरोपी क्रमांक 2 कोयता घेऊन, तर आरोपी क्रमांक 3 आणि 5 लोखंडी पाईप घेऊन घटनास्थळी आले. आरोपी क्रमांक 6 लाकडी दांडका घेऊन धावत आला. सर्वांनी हवेत शस्त्रे नाचवून परिसरात दहशत माजवली आणि शिवीगाळ करत हल्ला केला.

हल्ल्यातील जखमी:

  • आरोपी क्रमांक 2 ने फिर्यादीच्या मित्र योगेशच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र योगेशने वेळेत डोके मागे घेतल्याने त्याच्या हनुवटीवर गंभीर जखम झाली.
  • आरोपी क्रमांक 6 ने लाकडी दांडक्याने शुभमच्या पाठीवर मारले.
  • आरोपी क्रमांक 4 ने योगेशच्या मांडीवर व पाठीवर लोखंडी पाईपने वार केले.
  • आरोपी क्रमांक 3 ने लोखंडी पाईपने शुभमच्या मांडीवर आणि डाव्या हातावर मारहाण केली, त्यामुळे त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला.
  • आरोपी क्रमांक 1 आणि 4 यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील तपास सपोनि राहुल साबळे करत आहेत.

‘महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही’

0


Ajit Pawar : सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सहन होणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य फक्त एकाच बाजूने नव्हे, तर दोन्हीकडून होत आहेत आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराडमध्ये प्रीती संगमावरून राज्यातील वाचाळांना कानपिचक्या दिल्या. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असा टोला सुद्धा अजित पवार यांनी लगावला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी प्रीतीसंगमावर जाऊन समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राजकीय वाचाळवीरांना फटकारले.

यशवंतरावांच्या विचारधारनेचं भलं होणार 

अजित पवार म्हणाले की यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलं त्यांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती जातीमध्ये समाजामध्ये भेदभाव केला नव्हता. या सगळ्या बाबी विचारात घेऊनच आम्ही अर्थसंकल्प मांडल्याचे अजित पवार म्हणाले. जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय विचार सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण यांच्या विचारधारेनेच महाराष्ट्राचे भलं होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मंत्री कोणाला करणार? अजित पवारांनी बोलणं टाळलं

देशासह महाराष्ट्रावर प्रेम करणारा मोठ्या संख्येने मुस्लिम समाज देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील मुस्लिम मावळे होते. त्यामुळे नितेश व्यक्त नितेश राणे यांचे वक्तव्य काय होतं, त्या मागचा हेतू काय होत आहे मला माहित नसल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या जागी मग कोणाला मंत्री आहात काय केलं जाणार याबाबतीत मात्र अजित पवार यांनी बोलणं टाळलं. 

हेदेखील वाचा

अधिक पाहा..





Source link

याला म्हणतात नशीब! घरात साफसफाई करताना सापडली 36 वर्षांपूर्वीच्या Reliance शेअरची कागदपत्रं, आजची किंमत थक्क करणारी

0
याला म्हणतात नशीब! घरात साफसफाई करताना सापडली 36 वर्षांपूर्वीच्या Reliance शेअरची कागदपत्रं, आजची किंमत थक्क करणारी


RIL Reliance Shares : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक जोखमीची असून नियम व अटी लक्षपूर्वक वाचून घ्या… अशा स्पष्ट सूचना इथं गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकालाच दिल्या जातात. त्यातच मागील काही वर्षांमधील शेअर बाजाराचा आलेख पाहायचा झाल्यास सातत्यानं होणारी घसरण पाहता नफा नेमका कुठून आणि कमवायचा याचसाठी कुशल मंडळीसुद्धा डोकं लावताना दिसत आहेत. अनेकांनी तर, शेअर बाजाराती पडझड पाहता या क्षेत्राकडे पाठच फिरवली आहे. पण, एक व्यक्ती अशीही आहे, ज्यांना नशीबच या शेअर बाजाराकडे घेऊन आलं आहे. इतकंच नाही, तर साक्षात धनलक्ष्मीचा लाभही या व्यक्तीला झाला आहे. 

सध्या शेअर बाजार, एसआयपी, म्युच्युअल फंड यांमधील गुंतवणुकीविषी जितकी समज सामान्यांनाही आली आहे, तितकी समज साधारण दोन दशकांपूर्वी नव्हती आणि ज्यांना थोडीथोडकी समज होती अशा मंडळींनी तेव्हाच्या काळात आपली आवक पाहून त्यानुसार काही शेअर खरेदीसुद्धा केले होते. अशाच एका शेअरधारकाला जवळपास 36 वर्षांनंतर लॉटरी लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. 

नशीबच पालटलं… 

चंदीगढमधील एका कुटुंबावर लक्ष्मी प्रसन्न झाली हे सध्या प्रत्येकजण म्हणताना दिसत आहे. कारण, घराच्या साफसफाईदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे शेअर आणि त्याची काही कागदपत्र रतन ढिल्लों यांना सापडली आणि आजच्या घडीला त्या शेअरची किंमत पाहून त्यांचेही डोळे चमकतील. 

कारची आवड असणाऱ्या रतन ढिल्लों जेव्हा घरता साफसफाई करत होते, तेव्हा त्यांना काही कागदपत्र मिळाली. ज्याणध्ये 1988 मध्ये 10 रुपये प्रति शेअर या दरानं त्यांनी खरेदी केलल्या 30 इक्विटी शेअरची बाब त्यांच्या लर्षात आली. या शेअरची खरेदी ज्या व्यक्तीनं केली ती व्यक्ती आज हयात नाही. शेअर मार्केटसंदर्भातील फारशी माहिती नसल्यानं यानंतर ढिल्लों यांनी शेअरची कागदपत्र X वर शेअर करत याचं पुढे काय करावं असा प्रश्न करत सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांकडून मार्गदर्शन मागितलं. 

ढिल्लों यांची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली आणि या क्षेत्राची माहिती असणाऱ्या अनेकांनीच ही माहिती पडताळली. काही नेटकऱ्यांनी सध्याची शेअर बाजारातील स्थिती पाहता तीन स्टॉक स्प्लीट आणि दोन बोनसनंतर शेअरची किंमत वाढून 960 रुपयांवर पोहोचल्याचं सांगितलं. ज्यामुळं हे 30 शेअर ढिल्लों यांना साधारण 11 ते 12 लाख रुपये कमवून देतील ही बाब समोर आली. 

काही नेटकऱ्यांनी ढिल्लों यांना हे शेअर डिमॅट खात्यात ट्रान्सफर करून घेण्याची मागणी केली. तर, काहींनी या कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचा सल्ला देत त्यानंतर शेअर ऑनलाईन ट्रान्सफर करता येतील असंही सांगितलं. अतिशय अनपेक्षितरित्या ढिल्लों यांना मिळालेली कागदपत्र आणि या शेअरची संख्या पाहता आता त्यांना यातून नेमका कसा लाभ होतो हेच जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 





Source link

शिवाजी महाराजांनी जातीधर्मात कधीच भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते: अजित पवा

0


सातारा: गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे मंत्री नितेश राणे हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमकपणे बोलत आहेत. त्यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात जातीय सलोखा ठेवण्याची गरज व्यक्त केली. अलीकडे दोन्ही बाजूची लोकं काहीतरी बोलत असतात. ही वक्तव्यं अनेकदा महाराष्ट्राला सहन होणार नसतात. त्यामुळे अशी वक्तव्यं करणाऱ्यांना भान ठेवले पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी बुधवारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Birth Anniversary) यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त प्रीतिसंगम या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी आपण राजकारणात असेपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची कास सोडणार नसल्याचे सांगितले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापन करताना कधीच जातींमध्ये किंवा समाजात भेद केला नाही. त्यांनी महाराष्ट्रात राहणारा जो मराठा माणूस आहे, त्या सगळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापन केली आहे. अलीकडच्या काळात ‘छावा’ चित्रपट आला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास नव्या पिढीसमोर आणला आहे.

मी विधिमंडळातील दोन्ही बाजूच्या सन्मानयीय सदस्यांना सांगेन की, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, असा मुस्लीम समाज मोठ्याप्रमाणावर भारतात आहे. आपण जो इतिहास वाचला आहे, तो संशोधन करुन आणि माहिती गोळा करुन मांडण्यात आला आहे. त्यामध्ये लिहण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मुस्लीम लोक होते. शिवाजी महाराजांचा दारुगोळा कोण सांभाळत होतं? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे अजित पवार यांनी म्हटले.

अर्थसंकल्पातील निधीवाटपावर कोणीही नाराजी नाही: अजित पवार

राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात प्रत्येक खात्याच्या वाट्याला आलेल्या निधीवरुन महायुतीत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. याबद्दल अजित पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. बजेट हा कॅबिनेटची मंजुरी घेऊनच मांडला जातो. अर्थसंकल्प सादर करताना मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सगळ्या बाबी विचारात घेतल्या होत्या. त्यामुळे निधीवाटपावरुन कोणीही नाराजी नाही. समतोल विकास आणि गरीब समाजाला कशाप्रकारे न्याय मिळेल, हे बघून बजेट ठरवले जाते, असे अजित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण

अधिक पाहा..



Source link