
45 वर्षीय जगदीप याचा हत्येच्या तीन महिन्यानंतर मृतदेह सापडला आहे. जगदीप हा बाबा मस्तनाथ युनिव्हर्सिटीत काम करत होता.
Source link

45 वर्षीय जगदीप याचा हत्येच्या तीन महिन्यानंतर मृतदेह सापडला आहे. जगदीप हा बाबा मस्तनाथ युनिव्हर्सिटीत काम करत होता.
Source link

Wed, 26 Mar 202501:23 PM IST
याचिकाकर्ते ठाकरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकांकडे न्यायाधीशांविरोधात तक्रार दाखल केली. पुढे त्यांनी न्यायाधिकाऱ्यांना नोटीस बजावली.

श्रीकृष्ण बी. ठाकरे या शिक्षकाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अवमान कारवाई सुरू केली आहे. त्यांनी न्यायाधीशांवर लाच घेतल्याचा आरोप केला. दिवाणी न्यायाधीश असलेल्या शालेय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांनी पदोन्नतीसंदर्भातील एका प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप केला होता, असे ठाकरे म्हणाले. अवमान कारवाईसाठी येत्या काही दिवसांत ठाकरे यांनी न्यायालयात हजर राहावे, असे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या महिलेवर मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघेही प्रेमात पडले. प्रेमाच्या या त्रिकोणात शिक्षक रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वर स्थान येथे जानेवारी महिन्यात ही हत्या झाली होती. घटनेच्या ५५ दिवसांनंतर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी मुख्याध्यापकांसह सात जणांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून त्यात तीन हल्लेखोरांचा समावेश आहे.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 19 हजारांनी वाढेल असं Goldman Sachs ने सांगितलं आहे. वेतन आयोगात सुधारणा केल्यानंतर 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीधारकांना याचा फायदा मिळणार आहे.
वेतन आयोग ही सरकार-नियुक्त संस्था आहे जी भारतातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन, पेन्शन आणि लाभ सुधारणांचा आढावा घेते आणि शिफारस करते. आर्थिक परिस्थिती, महागाई आणि राहणीमानाच्या खर्चावर आधारित वेतनश्रेणी सुधारण्यासाठी ते वेळोवेळी (सहसा दर 10 वर्षांनी) गठीत केली जाते.
सध्या, एका मध्यम दर्जाच्या सरकारी कर्मचाऱ्याचे सरासरी मासिक उत्पन्न 1 लाख रुपये (करपूर्व) असते. पगारवाढीसाठी जे बजेट देण्यात आलं असेल, त्यानुसार प्रत्येक पातळीवर पगारवाढ होईल.
– 1.75 लाख कोटी रुपयांच्या वाटपासह – पगार दरमहा 1,14,600 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
– 2 लाख कोटी रुपयांच्या वाटपासह – पगार दरमहा 1,16,700 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
– 2.25 लाख कोटी रुपयांच्या वाटपासह – पगार दरमहा 1,18,800 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, तज्ज्ञांच्या मतानुसार सरकार एप्रिल 2025 मध्ये पॅनेलची स्थापना करू शकतं आणि त्याच्या शिफारशी 2026 किंवा 2027 पर्यंत लागू होतील.
2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. ज्यामुळे सरकारला 1.02 लाख कोटी रुपये खर्च आला. जुलै 2016 पासून वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आल्या, परंतु जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
फिटमेंट फॅक्टर (पगारवाढ मोजण्यासाठी वापरला जाणारा) 2.57 पट वाढवण्यात आला, ज्यामुळे किमान मूळ वेतन 7 हजार रुपयांवरून 18 हजारांवर गेले.
त्याचप्रमाणे, जर आठव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 3 किंवा त्याहून अधिक वाढवला, तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पगारवाढीची अपेक्षा असू शकते.
एकदा स्थापन झाल्यानंतर, आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर आणि पगार सुधारणांचा निर्णय घेण्यासाठी कर्मचारी संघटना आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करेल. संघटना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणेच 2.57 किंवा त्याहून अधिक फिटमेंट फॅक्टरची मागणी करतील अशी अपेक्षा आहे.
माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी फिटमेंट फॅक्टर 1.92 च्या जवळ असेल असा अंदाज वर्तवला होता.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने बुधवारी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो एका गाण्याच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांना ‘निर्मला ताई’ म्हणत आहे आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद चिघळला असतानाच कामराचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

No match is being played.
Mar 26, 2025 | 5th T20
Pakistan in New Zealand, 5 T20I Series, 2025
NZ (20 ov) 128/9 | VS | PAK 131/2(10 ov) |
| New Zealand beat Pakistan by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
Mar 26, 2025 | 5th T20
Pakistan in New Zealand, 5 T20I Series, 2025
PAK (20 ov) 128/9 | VS | NZ 131/2(10 ov) |
| New Zealand beat Pakistan by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
Mar 25, 2025 | Match 5
Indian Premier League, 2025
PBKS (20 ov) 243/5 | VS | GT 232/5(20 ov) |
| Punjab Kings beat Gujarat Titans by 11 runs | ||
| Full Scorecard → | ||

बलात्कार प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुलीचे स्तन पकडणे, पायजाम्याची नाडी तोडणे तिच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यासाठी पुरेसे नाही, असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आदेश लिहिणाऱ्या न्यायाधीशांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

EPFO UPI Facility Latest Update: भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ… नोकरदार वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी नोकरी करणाऱ्यांसाठीसुद्धा EPFO च्या नावे कापली जाणारी रक्कम एक मोठा आर्थिक आधार असते. अशा या EPFO खात्यातील रकमेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्या निर्णयांचा अनेकांनाच फायदा होणार आहे.
कर्मचारी भविष्य निधि मंडळ (EPFO) कडून आता युपीआय (UPI)च्या माध्यामातून पीएफच्या रकमेवर दावा सांगता येणार आहे. श्रम- रोजगार सचिव सुमिता डावरा यांनी नुकतीच यासंदर्भातील माहिती देत EPFO प्रणालीमध्ये UPI इंटीग्रेट केलं जाणार असल्याचं सांगितलं. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून 7.5 कोची सक्रिय ईपीएफओ सदस्यांना फायदा होणार असून, त्यांच्या पीएफ खात्यात लगेचच अपेक्षित रक्कम जमा केली जाणार आहे.
1 लाख रुपयांपर्यंतचे पीएफ क्लेम पूर्णपणे ऑटोमेटेड असून, आता UPI च्या माध्यमातून ही प्रक्रिया आणखी वेगानं पार पडणार आहे. याशिवाय खातेधारकांना त्यांचे युपीाय अॅप (PhonePe, Google Pay, Paytm) EPFO खात्यासह सहजपणे लिंक करता येणार आहेत. इथं ऑटोक्लेम ही सुविधा मिळणार आहे.
म्हणजेच जर एखादी व्यक्ती पात्र सदस्य आहे तर त्यांची रक्कम लगेचच जमा केली जाणार आहे. आताच्या घडीला पीएफ खात्यातील रक्कम जमा होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो मात्र युपीआयच्या वापरानं ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण होणार आहे.
EPFO नं या योजनेसाठी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया ( NPCI) सोबत सल्लामसलत करत एक प्रस्ताव तयार केला आहे. ज्या धर्तीवर मे महिन्याच्या अखेरीस UPI फ्रंटएंड टेस्टिंगनंतर ही सुविधा लाँच करण्यात येणार आहे.
ईपीएफओनं पहिल्यांदाच सेंट्रलाइज्ड डेटाबेस तयार करण्यात आला असून, तो पूर्णपणे लागू होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. देशातील 78 लाख पेन्शनधारकाना यापूर्वी काही निवडक बँकांमधूनच पैसे काढण्याची मुभा होती. मात्र आता कोणत्याही बँकेडून पीएफची रक्कम काढता येणार आहे. आरबीआयच्या सांगण्यावरून ही सेंट्रलाइज्ड पेंशन सिस्टीम लागू करण्यात आली आहे.
सातारा: राज्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे. सातारा जिल्ह्य टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक किलो टोमॅटोला दोन रुपयांचा दर मिळत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम पिकांवर झाला आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे.
सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे, पारा 36 अंश सेल्सीअस पर्यंत पोहचला आहे. याचा मोठा फटका आणि झळ टोमॅटो पिकाला बसत असून, झाडावरच टोमॅटो पिकून गळू लागले आहेत, त्यामुळे टोमॅटोचे दर घसरले असून, यातून उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याचे खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सातारा बाजार समिती मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढली आहे. सातारा बाजार समितीत आज टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उन्हामुळे टोमॅटो पीक लवकर खराब होत असल्याने, टोमॅटो दर कमी करून विकण्याची वेळ आली असल्याचे, बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याने सांगितले आहे.
एका शेतकऱ्याने यावेळी शेतकऱ्याला टोमॅटो रस्त्यावर फेकलं. फुकट झालं. भांडवलं सुध्दा त्यातून निघेना. टोमॅटो रस्त्यावर फेकायची वेळ आली. फुकट, फुकट टोमॅटो फुकट असं देखील तो बाजारात टोमॅटो विकणारा शेतकरी म्हणत आहे. सातारा बाजार समितीत आज टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उन्हामुळे टोमॅटो पीक लवकर खराब होत असल्याने, टोमॅटो दर कमी करून विकण्याची वेळ आली असल्याचे, बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याने सांगितले आहे.
राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. उन्हाळा आला असताना विविध भाज्यांचे दर दोन रूपयांपर्यंत घसरले आहेत. बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील खत, बियाणे, मजुरी याचा प्रचंड खर्च असूनही बाजारात भाजीपाला अवघ्या 3 ते 12 रुपये किलो दरानं शेतकऱ्याला विकावा लागत आहे. दर घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे. त्यांना स्वस्तात भाजीपाला खरेदी करता येत आहे.
अधिक पाहा..