Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशPrivate Job करणाऱ्यांना दिलासा; ATM विसरा आता UPI च्या मदतीनं काही मिनिटांत...

Private Job करणाऱ्यांना दिलासा; ATM विसरा आता UPI च्या मदतीनं काही मिनिटांत मिळणार PF ची संपूर्ण रक्कम

Private Job करणाऱ्यांना दिलासा; ATM विसरा आता UPI च्या मदतीनं काही मिनिटांत मिळणार PF ची संपूर्ण रक्कम

[ad_1]

EPFO ​​UPI Facility Latest Update: भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ… नोकरदार वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी नोकरी करणाऱ्यांसाठीसुद्धा EPFO च्या नावे कापली जाणारी रक्कम एक मोठा आर्थिक आधार असते. अशा या EPFO खात्यातील रकमेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्या निर्णयांचा अनेकांनाच फायदा होणार आहे. 

कर्मचारी भविष्य निधि मंडळ (EPFO) कडून आता युपीआय (UPI)च्या माध्यामातून पीएफच्या रकमेवर दावा सांगता येणार आहे. श्रम- रोजगार सचिव सुमिता डावरा यांनी नुकतीच यासंदर्भातील माहिती देत EPFO प्रणालीमध्ये UPI इंटीग्रेट केलं जाणार असल्याचं सांगितलं. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून 7.5 कोची सक्रिय ईपीएफओ सदस्यांना फायदा होणार असून, त्यांच्या पीएफ खात्यात लगेचच अपेक्षित रक्कम जमा केली जाणार आहे. 

कसं काम करणार ही नवी प्रणाली? 

1 लाख रुपयांपर्यंतचे पीएफ क्लेम पूर्णपणे ऑटोमेटेड असून, आता UPI च्या माध्यमातून ही प्रक्रिया आणखी वेगानं पार पडणार आहे. याशिवाय खातेधारकांना त्यांचे युपीाय अॅप (PhonePe, Google Pay, Paytm) EPFO खात्यासह सहजपणे लिंक करता येणार आहेत. इथं ऑटोक्लेम ही सुविधा मिळणार आहे. 

म्हणजेच जर एखादी व्यक्ती पात्र सदस्य आहे तर त्यांची रक्कम लगेचच जमा केली जाणार आहे. आताच्या घडीला पीएफ खात्यातील रक्कम जमा होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो मात्र युपीआयच्या वापरानं ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण होणार आहे. 

EPFO नं या योजनेसाठी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया ( NPCI) सोबत सल्लामसलत करत एक प्रस्ताव तयार केला आहे. ज्या धर्तीवर मे महिन्याच्या अखेरीस UPI फ्रंटएंड टेस्टिंगनंतर ही सुविधा लाँच करण्यात येणार आहे. 

 

सर्व बँकांमधून मिळणार रक्कम… 

ईपीएफओनं पहिल्यांदाच सेंट्रलाइज्ड डेटाबेस तयार करण्यात आला असून, तो पूर्णपणे लागू होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. देशातील 78 लाख पेन्शनधारकाना यापूर्वी काही निवडक बँकांमधूनच पैसे काढण्याची मुभा होती. मात्र आता कोणत्याही बँकेडून पीएफची रक्कम काढता येणार आहे. आरबीआयच्या सांगण्यावरून ही सेंट्रलाइज्ड पेंशन सिस्टीम लागू करण्यात आली आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments