Sunday, June 28, 2026
Home Blog Page 43

सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची लगबग; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी २० मार्चपूर्वी पहिली सभा बंधनकारक

0
सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची लगबग; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी २० मार्चपूर्वी पहिली सभा बंधनकारक


फलटण प्रतिनिधी  : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडताच सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र शासनच्या ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, सातारा जिल्हा परिषद तसेच अंतर्गत पंचायत समित्यांची पहिली सभा २० मार्च २०२६ पूर्वी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या पहिल्या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार असून, संबंधित पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदांसाठीही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून विविध पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १३५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा अधिकृत कार्यकाळ हा पहिल्या सभेपासून सुरू होणार असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठका आयोजित करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी नेमके कोणत्या पक्षाकडे स्पष्ट संख्याबळ आहे, यावर राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. काही ठिकाणी अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आघाड्या, बैठका आणि अंतर्गत चर्चांना वेग आला आहे.
दरम्यान, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्या असून, लवकरच जिल्हा परिषद सभेची तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांतच सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेचा सारीपाट स्पष्ट होणार आहे.

फलटण नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांनाच उपोषणाचा इशारा; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

0
फलटण नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांनाच उपोषणाचा इशारा; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह


फलटण प्रतिनिधी .: फलटण येथील नगरपरिषदेमधील कारभार सध्या तीव्र चर्चेचा विषय ठरत आहे. सत्ताधारी गटातील माजी नगरसेवक तथा विद्यमान नगरसेवकाच्या वडिलांनीच नगरपरिषदेच्या कामकाजाविरोधात उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अनुप शहा यांनी आज फलटण नगरपरिषद येथे उपोषणाचे पत्र सादर करत नगरपरिषदेच्या ढिसाळ, बेजबाबदार आणि मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी गटाशी संबंधित व्यक्तीलाच असा इशारा द्यावा लागत असल्याने, नगरपरिषदेतील अंतर्गत विसंवाद आणि प्रशासकीय अकार्यक्षमता उघड झाली आहे.
स्थानिक पातळीवर चर्चा अशी की, ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचीच कामे प्रलंबित राहतात, तेथे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि फाईलींचे काय होत असेल? विकासाच्या घोषणा आणि स्मार्ट शहराच्या दाव्यांमध्ये व वास्तवातील कामकाजात मोठी तफावत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
ही घटना केवळ वैयक्तिक नाराजीपुरती मर्यादित नसून, नगरपरिषदेतील गटबाजी, सत्तासंघर्ष आणि प्रशासनातील शिथिलतेचे द्योतक मानली जात आहे. उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
सध्या उपोषणाचा इशारा देण्यात आला असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

फलटणमध्ये बुलेटच्या कर्कश आवाजावर पोलिसांचा ‘ऍक्शन मोड’; बिना नंबर प्लेट वाहनांवर कडक कारवाई

0
फलटणमध्ये बुलेटच्या कर्कश आवाजावर पोलिसांचा ‘ऍक्शन मोड’; बिना नंबर प्लेट वाहनांवर कडक कारवाई


फलटण (जि. सातारा) – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बुलेट मोटारसायकलींच्या कर्कश ‘फट-फट’ आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः सायंकाळी व रात्रीच्या वेळी जोरदार सायलेन्सर बदलून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याशिवाय काही दुचाकी वाहने बिना नंबर प्लेट फिरत असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर फलटण पोलिसांनी अखेर ऍक्शन मोड स्वीकारत अशा वाहनांवर थेट जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
 आरटीओ तपासणी व जप्तीची मागणी
पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, नियमबाह्य सायलेन्सर, ध्वनीप्रदूषण आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत, “शहरातील शांतता राखण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबवावी,” अशी मागणी केली आहे.
 ‘दबाव टाकण्याचा’ प्रयत्न?
दरम्यान, एका स्थानिक नगरसेवकाने पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून “बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडून द्या” असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. संबंधित व्यक्ती स्वतःला मोठा नेता असल्याचा आव आणत असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता नियमबाह्य वाहनांवर कारवाई सुरूच राहील.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर कारवाई थांबविण्यासाठी कोणताही राजकीय दबाव आणला गेला, तर संबंधिताचे नाव व त्यांचे उद्योग पत्रकारांमार्फत उघड केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.
नागरिकांना दिलासा
पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, “बिना नंबर प्लेट आणि कर्कश आवाजाच्या बुलेटला आता निश्चितच चाप बसणार,” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फलटणमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई सातत्याने ठेवावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

साताऱ्यात ‘कोयता गॅंग’चा थरार! करंजे पेठेत तरुणावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

0


Satara Crime News : साताऱ्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. शहरातल्या गजबजलेल्या करंजे पेठ नाका परिसरात ‘कोयता गॅंग’ने भरदिवसा धुमाकूळ घातला आहे. एका गॅरेज मधील तरुणावर अज्ञात हल्ले खोराने धारदार  कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. अक्षय रामदास गाडे हा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

हल्लेखोराला जखमी अक्षय गाडे याने दुकानातच डांबून ठेवलं डांबून

यातील एका हल्लेखोराला जखमी अक्षय गाडे याने दुकानातच डांबून ठेवल्यामुळे त्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन ताब्यात घेतले. मात्र त्याचा दुसरा साथीदार या घटनेनंतर फरार झाला आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहे. जखमी अक्षय गाडेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बोरीवलीत सराफ व्यापाऱ्याला मागितली 30 लाखांची खंडणी, चार आरोपी जेरबंद

बोरीवली परिसरातील एका सराफ व्यापाऱ्याला स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असल्याचे सांगत व्हॉट्सअ‍ॅप कॉल-मेसेजद्वारे 30 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रार मिळताच बोरीवली पोलिसांनी सापळा रचत माहिम येथे सोने घेण्यासाठी आलेल्या रियाजुद्दीन बशीर याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईत बांद्रा व जोगेश्वरी येथे छापे टाकून आणखी तीन साथीदारांना अटक करण्यात आली. आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून धमकी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा तपास बोरीवली पोलीस करीत आहेत.

सराफा व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप कॉल व संदेशांद्वारे खंडणीची मागणी 

दिनांक 18 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान बोरीवली परिसरातील एका सराफा व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप कॉल व संदेशांद्वारे खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी आरोपींशी संवाद साधत खंडणीची रक्कम सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात देण्याचा बनाव केला. त्यानुसार सोने स्वीकारण्यासाठी आलेल्या रियाजुद्दीन मोहम्मद बशीर (वय 29) याला माहिम पश्चिम येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात बांद्रा व जोगेश्वरी पश्चिम येथून आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी मूळचे वासेपुर, जिल्हा धनबाद (झारखंड) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

आणखी वाचा



Source link

यशवंत बँक घोटाळा प्रकरण! फरार असणारा मुख्य आरोपी शेखर चरेगावकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात

0


Satara :  सातारा जिल्ह्यातील कराडमधील गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी शेखर चरेगावकरला अखेर मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेखर चरेगावकर सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आहे. दीर्घ काळापासून फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता नव्हता. मात्र, मध्यरात्री आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विंग या गावातून चरेगावकरला ताब्यात घेतले आहे. चरेगावकर यांना दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीच त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक  झाली होती. 

यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप 

यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबर 2025 मध्ये सुमारे 50 जणांविरोधात कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप, 50 जणांविरोधात गुन्हा दाखल

साताऱ्यातील गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आले असून मुख्य आरोपी शेखर चरेगावकर याला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.  सहकार परिषदेचा माजी अध्यक्ष तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांच्या जवळचा शेखर चरेगावकर आहे. गेल्या अनेक दिवसापासून  फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता नव्हता, आर्थिक  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कराड तालुक्यातील विंग गावातून ताब्यात घेतले असून कराड कोर्टाने दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप असून सुमारे 50 जणांविरोधात कराड पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसापुर्वी इडीची चरेगावकरांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून तपासणी केली होती. या कारवाईमुळे राज्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसापूर्वी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवला होता

या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसापूर्वी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवला होता. या बँकेच्या गैरव्यवहारावरून भाजपमधील पुण्यातील काही नेत्यांच्यात धुसफूस पाहायला मिळाली होती. यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या जवळचे आहेत.

रिझर्व्ह बँकेने (RBI) यशवंत सहकारी बँक लिमिटेड, फलटण (जिल्हा सातारा) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35 अ सह वाचले जाणारे कलम 56 अंतर्गत लादलेल्या निर्देशांचा कालावधी वाढवला आहे. या निर्देशांनुसार, बँकेचे ठेवीदार पैसे काढण्याच्या मर्यादांमुळे (जसे की 10000  किंवा बँक-विशिष्ट मर्यादा) त्यांच्या संपूर्ण ठेवी काढू शकत नाहीत. बँकेने तिच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे हे पाऊल उचलले आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 35 अ अंतर्गत, यशवंत सहकारी बँक लिमिटेड, फलटण यांना 28 मे 2025 रोजीच्या निर्देशांक क्रमांक CO.DOS.SED.No.S1580/12-22-321/2025-26 द्वारे 29 नोव्हेंबर 2025 रोजी व्यवसाय बंद होईपर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देश जारी केले, जे 24 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निर्देशांक DOR.MON.D-41/12.28.017/2025-26 द्वारे 28 फेब्रुवारी 2026 रोजी व्यवसाय बंद होईपर्यंत वाढवण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेला खात्री आहे की सार्वजनिक हितासाठी, 28 फेब्रुवारी 2026 रोजी व्यवसाय बंद होण्याच्या पलीकडे निर्देशांकाच्या कार्यकाळात आणखी वाढ करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 35अ च्या उप-कलम (1) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, भारत, याद्वारे 28 फेब्रुवारी 2026 रोजीच्या व्यवसायाच्या समाप्तीपासून 28 मे 2026 रोजीच्या व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत निर्देशकाचा कालावधी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवत आहे, जो पुनरावलोकनाच्या अधीन आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने उपरोक्त मुदतवाढ आणि/किंवा सुधारणांचा अर्थ असा लावता कामा नये की भारतीय रिझर्व्ह बँक बँकेच्या आर्थिक स्थितीवर समाधानी आहे.

 

 

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये वाढत्या गुन्हेगारीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गारकायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची ठाम मागणी; मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यावर धडक

0
फलटणमध्ये वाढत्या गुन्हेगारीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गारकायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची ठाम मागणी; मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यावर धडक


फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहर व परिसरात वाढत्या चोरी, जबरी गुन्हे, मारहाण तसेच रोडरोमिओंच्या वाढत्या प्रकारांविरोधात फलटण व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने फलटण शहर पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून निषेध नोंदवला. संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला सविस्तर निवेदन देत तात्काळ व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
सलग घटनांनी व्यापारी वर्ग संतप्त
रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शंकर मार्केट परिसरात हीरणवाळे बंधूंवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवार पेठ येथील हिंदुस्तान हार्डवेअरचे व्यापारी श्री. पटेल बंधूंना दहशत निर्माण करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
या सलग प्रकारांमुळे शहरातील व्यापारी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
निवेदनातील प्रमुख मागण्या
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात पुढील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे :
शहर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ
जबरी गुन्हे व मारहाणीचे वाढते प्रकार
महिला व नागरिकांना रोडरोमिओंकडून होणारा त्रास
गस्त पथक प्रभावीपणे कार्यरत नसल्याची तक्रार
व्यापारी व नागरिकांमध्ये वाढलेली असुरक्षिततेची भावना
शहरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, व्यापारी वर्ग प्रामाणिकपणे व्यवसाय करून शासनाला कररूपाने मोठे योगदान देतो. अशा परिस्थितीत सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे.
वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा
या निवेदनाची प्रत राज्यातील वरिष्ठ मान्यवर व अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे. या प्रकरणाची उच्च पातळीवर दखल घेऊन ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
शांततापूर्ण पण ठाम भूमिका
पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. सर्वांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनांचा गांभीर्याने तपास सुरू असून शहरात गस्त वाढविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समजते.
थोडक्यात
फलटण शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. व्यापारी संघटनेच्या एकजुटीमुळे हा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, चोरी, मारहाण व रोडरोमिओंच्या प्रकारांवर तात्काळ अंकुश न लावल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

फलटणमध्येअनधिकृतबांधकामाचा प्रश्न गंभीर फलटण

0
फलटणमध्येअनधिकृतबांधकामाचा प्रश्न गंभीर फलटण

फलटण प्रतिनिधी :-  फलटण तालुक्यातील आळंदी–पंढरपूर मार्गावर वडजल गावाजवळ, फरांदवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या व्यावसायिक प्रकल्पाचे बांधकाम सुरू असल्याची चर्चा आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आवश्यक प्रशासकीय व ग्रामपंचायतीच्या परवानग्या न घेता हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे “हम करेसो कायदा” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.  #शासकीयरस्त्याचेनुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये ये-जा करण्यासाठी आमदार निधीतून तयार करण्यात आलेला रस्ता आहे. संबंधित बांधकाम करताना या रस्त्याला अडथळा निर्माण करून त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा रस्ता शासनाच्या निधीतून उभारण्यात आल्याने त्याचे नुकसान म्हणजे थेट सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होय.  परवानगीनसतानाहीकामसुरू?
स्थानिक पातळीवरील परवानग्या, बांधकाम परवाना, ग्रामपंचायत मंजुरी, तसेच इतर आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता काम सुरू केल्याचा आरोप होत आहे. याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतरही काम सुरूच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित विभागांकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
प्रशासनमूकदर्शकका?
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊनही प्रशासनाकडून कारवाई का होत नाही?
नुकसान भरपाईची जबाबदारी निश्चित का केली जात नाही?
परवानगी प्रक्रियेचे पालन न करता उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर नियंत्रण कोण ठेवणार?
हे प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केले जात आहेत.
जनतेचीमागणी संबंधित बांधकामाची सर्व कागदपत्रे आणि परवानग्या सार्वजनिक कराव्यात. शासकीय रस्त्याच्या नुकसानीची पंचनामा करून भरपाई वसूल करावी. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी. ग्रामपंचायत व प्रशासनाने पारदर्शक भूमिका जाहीर करावी. कायद्याचेभानसर्वांसाठीसमान
कायद्यापुढे सर्व समान आहेत. मग तो सामान्य नागरिक असो वा मोठा उद्योगसमूह. सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे आणि नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रशासनाने वेळेत आणि पारदर्शकपणे भूमिका स्पष्ट केली तरच जनतेचा विश्वास टिकून राहील.

फलटणमध्ये व्यापाऱ्यांवर सलग मारहाणीच्या घटना; निषेधार्थ २५ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यावर निवेदन

0
फलटणमध्ये व्यापाऱ्यांवर सलग मारहाणीच्या घटना; निषेधार्थ २५ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यावर निवेदन

फलटण | प्रतिनिधी :-  फलटण शहरात अलीकडील काळात घडलेल्या दोन मारहाणीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर फलटण व्यापारी संघटना यांच्या वतीने बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता फलटण शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शंकर मार्केट परिसरात हीरणवाळे बंधूंवर मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर व्यापारी वर्गात अस्वस्थता पसरली असतानाच मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवार पेठ येथील हिंदुस्तान हार्डवेअरचे व्यापारी श्री. पटेल बंधूंना विनाकारण दहशत निर्माण करून मारहाण करण्यात आल्याची दुसरी घटना घडली. सलग दोन दिवसांत घडलेल्या या प्रकारांमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनांचा निषेध नोंदवून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, संबंधितांवर कडक कारवाई व्हावी आणि शहरात सुरक्षित व निर्भय व्यावसायिक वातावरण निर्माण व्हावे, या मागण्यांसाठी व्यापारी संघटनेने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
सर्व व्यापारी बांधवांनी बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता फलटण शहर पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवावी व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करावे, अशी नम्र विनंती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

फलटणमध्ये समज दिल्याचा राग; दोन भावांवर जीवघेणा हल्ला, दोन आरोपींना पोलीस कोठडी

0
फलटणमध्ये समज दिल्याचा राग; दोन भावांवर जीवघेणा हल्ला, दोन आरोपींना पोलीस कोठडी


फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरातील गजबजलेल्या शंकर मार्केट परिसरात वेगात गाडी चालवू नका, अशी समज दिल्याच्या किरकोळ कारणावरून दोन भावांवर सत्तूर व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
थरारक घटना कशी घडली?
दि. 22 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास अनिल विठ्ठल हिरणवाळे हे आपले गॅरेज बंद करून बाहेर उभे होते. त्यावेळी गोसावी वस्तीतून आलेल्या 7 ते 8 तरुणांनी त्यांच्या गॅरेजसमोरून मोठ्या आवाजात आणि वेगात दुचाकी चालवल्या.
कोणाला अपघात होऊ नये या उद्देशाने अनिल यांनी संबंधित तरुणांना, “गाडी इतक्या वेगात व आवाजात का चालवता? कोणाला धडक लागली तर मोठा अपघात होईल,” अशी समज दिली.
या समजुतीचा राग मनात धरून काही वेळाने तेच टोळके पुन्हा तेथे आले. त्यांनी अनिल हिरणवाळे आणि त्यांचे भाऊ संतोष हिरणवाळे (रा. ब्राम्हण गल्ली, फलटण) यांच्यावर लाकडी दांडके, हाताने मारहाण करत लोखंडी सत्तूरने सपासप वार केले. या हल्ल्यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्लेखोर त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.
शहरात संतापाची लाट
घटनेनंतर संपूर्ण फलटण शहरात संताप व्यक्त करण्यात आला. सर्वपक्षीय नेते व विविध सामाजिक मंडळांनी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची भेट घेऊन गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
दोन आरोपींना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. त्यात खालील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे –
संदीप विठ्ठल जाधव (वय 20, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, मलठण, ता. फलटण)
सुनिल ऊर्फ सतिश राजू मोरे (वय 20, रा. कुंभारभट्टी, मलठण, ता. फलटण)
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना दि. 24 फेब्रुवारी रोजी फलटण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी (PC) मंजूर केली आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणातील इतर काही संशयित आरोपी अद्याप फरार असून फलटण शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.

बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

0
बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर


सातारा, दि.२४ : १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मक्रांती झाली. दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. तदनंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देत, “यापुढे उर्वरित आयुष्य धम्म परिवर्तनासाठी समर्पित करणार आहे,” असा दाखला त्यांनी दिला.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दल प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नगरपंचायत मैदान, पाटण येथे पाटण तालुका महिला व पुरुष कार्यकारिणीच्यावतीने भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आनंदा गुजर होते.
डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेली धम्मक्रांती देशात उत्साहवर्धक अनुयायी पुढे घेऊन चालले आहेत. अनेक लोक धम्मात येत आहेत. वारंवार शिबिरे झाली पाहिजेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच धम्म चळवळ वाढणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७५ जिल्ह्यांत चार राज्य निर्माण झाल्याने धम्मचळवळ गतिमान होत आहे. सत्ताधारी आंबेडकरवाद्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जगविख्यात महाविहार लढ्यासाठी एक वर्ष झाले तरी यश मिळाले नाही. विविध मोर्चे, आंदोलने झाली. देश संविधानावर विज्ञानवादी आहे. स्वातंत्र्यामध्ये भाग न घेणारे आरएसएस शंभरावा उत्सव प्रयागराजमध्ये करतात. मात्र, त्यांनी भेदाभेद केलेला आढळतो. तिथेही योगी सरकार विरोधात धम्माचे काम सुरू आहे. इप्सित साध्य करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल. सन २००० पासून देशात क्रांती सुरू झाली आहे. शिक्षण महत्त्वपूर्ण काम करते. पिढ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी संघटित राहून वाटचाल करावी लागेल. भारतीय बौद्ध महासभेची ताकद वाढत आहे. धम्माची पताका सर्वत्र फडकत आहे. धम्मच राजकीय चित्र बदलू शकतो. शस्त्राने भूभाग जिंकणारा महान राजा सम्राट अशोक शेवटी बुद्धांच्या चरणी लीन झाला. त्यांचीही प्रतिमा महापुरुषांबरोबर कार्यक्रमात असली पाहिजे.”
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु. जी. बोराडे, ट्रस्टी अरुण पोळ व तालुकाध्यक्ष आनंदा गुजर यांनी मनोगत व्यक्त केले.
वंदना, सूत्रपठण व ध्वजारोहण माजी जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब भोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. धम्म रॅली बोधिसत्व बुद्ध विहारपासून निघाली होती. तिचा मार्ग बाळासाहेब देसाई कॉलेज मैदान – पाटणकर लायब्ररी चौक – मेन रोड – झेंडा चौक – नगरपंचायत असा होता. तालुकाध्यक्षा कमलताई मिलिंद-बापू कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मुंबई कमिटीचे अध्यक्ष भगवान भोळे यांनी स्वागत केले. सचिव घनश्याम कांबळे व सुरेखाताई गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कोषाध्यक्ष ॲड. राहुल भोळे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमास मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर, जिल्हाध्यक्षा संगीताताई मंगेश डावरे, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष सुनील सपकाळ, राज्य उपाध्यक्ष उत्तम मगरे, मुंबई प्रदेश पर्यटन सचिव शहाजी मगरे, जिल्हा सरचिटणीस नेहाताई विजयकुमार गायकवाड, कराड तालुकाध्यक्ष यशवंत (आप्पा) अडसुळे, माजी केंद्रीय महासचिव नाथा ममता आगाणे (काका), जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, कोषाध्यक्षा प्रतीक्षा कांबळे, संघटक राजाराम पडवळ, महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही. आर. थोरवडे, संस्कार सचिव मिलिंद कांबळे, कराड तालुका कोषाध्यक्ष नंदकुमार भोळे, जिल्हा कोषाध्यक्ष रुपेश सावंत, जिल्हा सरचिटणीस यशपाल बनसोडे, संघटक चंद्रकांत कांबळे, माजी सरचिटणीस उदय भंडारे, मुंबई कमिटीचे माजी अध्यक्ष एन. बी. गायकवाड, जिल्हा संघटक उत्तम पवार, माजी पर्यटन सचिव रामचंद्र कांबळे (मामा), जावली तालुका सचिव बाळकृष्ण उर्फ तात्या गाडे, जिल्हा उपाध्यक्षा अनिता कांबळे, दगडू तांदळे, राजाराम पाटणकर, श्रीधर सवाखंडे, मंगेश डावरे, वर्षा सवाखंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.