Sunday, June 28, 2026
Home Blog Page 42

प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् निर्जनस्थळी बोलावून त्याला संपवलं; मृतदेह नीरा नदीत फेकला अन्…, ए

0


फलटण:  कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फलटण तालुक्यातील गोखळी येथील नीरा नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांना (Phaltan Crime News) अटक केली आहे.अंकुश नरबट राहणार माण असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयितांनी महिलेच्या नावाने बनावट सोशल मीडियावरून संपर्क साधत १५ फेब्रुवारी रोजी त्याला फलटण येथे बोलावले. तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केल्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नीरा नदीत फेकण्यात आला.सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत अविष्कार भगत, श्रद्धा भगत, ज्ञानेश्वर भगत आणि अर्चना भगत यांना अटक केली आहे.(Phaltan Crime News)

अंकुश बापू नरबट (वय २२, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा), असे खून झालेल्या तरुणाचे तर आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत (चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अंकुश नरबटच्या डोक्यावरील जखमांमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.(Phaltan Crime News)

 तपासात निष्पन्न झाले की, कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खून करण्यात आला. बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांनी खुनाचा कट रचला. महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व त्याला फलटण येथे बोलावण्यात आले. १५ फेब्रुवारी रोजी अंकुश फलटण येथे आल्यानंतर संबंधित महिलेने त्याला एकांतात वेळ घालवण्याच्या बहाण्याने तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. त्याठिकाणी कटानुसार इतर चार आरोपी वेगवेगळ्या वाहनांतून आले. त्यांनी अंकुशला मारहाण करून वाहनात टाकले व पिंप्रद येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याचा खून करून मृतदेह गोखळी हद्दीतील नीरा नदीत फेकून दिला.

पुरावे तपासल्यानंतर गुन्हा उघडकीस आला, हा खून अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबद्ध पद्धतीने केल्यामुळे सुरुवातीला पोलिसांकडे कोणतेही ठोस धागेदोरे नव्हते. मात्र, पोलिसांनी फलटण ते दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दूध डेअरी व पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी व मृतक यांच्या मोबाइल 3 क्रमांकांची तांत्रिक माहिती मिळवून त्याआधारे पुराव्यांची साखळी जोडत गुन्हा उघडकीस आणला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 

आणखी वाचा



Source link

एकाच महिन्यात तीन गंभीर गुन्ह्यांचा छडा – पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांची कौशल्यपूर्ण कामगिरी

0
एकाच महिन्यात तीन गंभीर गुन्ह्यांचा छडा – पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांची कौशल्यपूर्ण कामगिरी

एकाच महिन्यात तीन गंभीर गुन्ह्यांचा छडा – पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांची कौशल्यपूर्ण कामगिरी


फलटण : फलटण तालुक्यातील निरा नदीच्या पात्रात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या तपासातून खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार यांनी अत्यंत कौशल्य आणि चिकाटी दाखवत अवघ्या एका महिन्यात तीन गंभीर गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.
मृतदेहाची ओळख आणि संशयास्पद बाबी
दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता गोखळी, ता. फलटण, जि. सातारा येथील निरा नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली; मात्र तपासादरम्यान मृताची ओळख अंकुश बापू नरबट (वय 22 वर्षे, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) अशी पटली.
मृत व्यक्ती माण तालुक्यातील असताना त्याचा मृतदेह फलटण तालुक्यात कसा आढळला? तसेच डोक्यावर आढळलेल्या जखमा संशयास्पद असल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
बनावट इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे आखलेला कट
गोपनीय माहिती व तांत्रिक तपासातून धक्कादायक बाब समोर आली. मृत अंकुश नरबट याने आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीबाबत गैरप्रकार केल्याची माहिती मिळाली होती. तथापि, प्रतिष्ठेच्या कारणास्तव आरोपींनी तक्रार न करता बदला घेण्याचा कट रचला.
आरोपींनी स्त्रीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून मृतास प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि फलटण येथे भेटण्यासाठी बोलावले.
दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी मृत अंकुश नरबट फलटण येथे आल्यानंतर आरोपींपैकी एका महिलेनं त्याला तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या इतर आरोपींनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चारचाकी वाहनातून पिंप्रद हद्दीत नेऊन त्याचा खून करण्यात आला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निरा नदीत टाकण्यात आला.
गुन्हा नोंद व आरोपींना अटक
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र. नं. 119/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 140(1), 238, 61, 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी
आविष्कार ज्ञानेश्वर भगत
श्रद्धा आविष्कार भगत
ज्ञानेश्वर भरतराव भगत
अर्चना ज्ञानेश्वर भगत
(सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा)
यांना अटक करण्यात आली आहे.
तांत्रिक तपासातून उलगडा
सुरुवातीला कोणतेही ठोस धागेदोरे नसताना पोलिसांनी फलटण ते दहिवडी रोडवरील हॉटेल्स, दूध डेअरी व पेट्रोलपंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी व मृताचे मोबाईल क्रमांकांची तांत्रिक माहिती विश्लेषित करून मिळालेल्या तुटपुंज्या पुराव्यांच्या आधारे घटनाक्रमाची साखळी जोडण्यात आली आणि गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार तसेच पोलीस अमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी व हणमंत दडस यांनी या तपासात मोलाची भूमिका बजावली.

फलटण : निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा; चार आरोपी जेरबंद

0
फलटण : निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा; चार आरोपी जेरबंद

फलटण : निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा; चार आरोपी जेरबंद
फलटण तालुक्यातील गोखळी गावाच्या हद्दीत निरा नदीच्या पात्रात आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाचा उलगडा करण्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांना यश आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गोखळी परिसरात नदीपात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान मृत तरुणाची ओळख सातारा जिल्ह्यातील रहिवासी म्हणून पटली. मात्र तो दुसऱ्या तालुक्यातील असताना त्याचा मृतदेह फलटण तालुक्यातील नदीपात्रात कसा आला, तसेच डोक्यावर झालेल्या जखमा पाहता हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. चौकशीत संबंधित तरुणाला ओळखीच्या व्यक्तींनी भेटीच्या बहाण्याने बोलावून नेल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यावर मारहाण करून खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात फेकण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण तांत्रिक तपास व पुराव्यांची साखळी जोडत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पुढील तपास फलटण ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

फलटण नगरपरिषदेत मुश्ताक महात यांनी आई-वडिलांच्या उपस्थितीत स्वीकारला सेवानिवृत्तीचा सत्कार; प्रशासनातील प्रदीर्घ सेवेला सलाम

0
फलटण नगरपरिषदेत मुश्ताक महात यांनी आई-वडिलांच्या उपस्थितीत स्वीकारला सेवानिवृत्तीचा सत्कार; प्रशासनातील प्रदीर्घ सेवेला सलाम


फलटण (प्रतिनिधी): फलटण येथील नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी म्हणून दीर्घकाळ कार्यभार सांभाळणारे मुश्ताक अहमद अब्दुललतिफ महात (महात साहेब) काल शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त नगरपरिषदेत भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभात मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी महात साहेबांना स्वतःच्या खुर्चीवर बसवून विशेष सन्मान केला. लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही त्यांचा गौरव करत नगरपालिकेतील अनेक जुने प्रसंग व त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.
महात साहेबांच्या सेवाजिवनातील एक अत्यंत हृदयस्पर्शी क्षण यावेळी अनुभवायला मिळाला. ज्या आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांनी शासकीय सेवेत पहिले पाऊल ठेवले होते, त्याच आई-वडिलांच्या साक्षीने त्यांनी निवृत्तीचा सत्कार स्वीकारला. या प्रसंगी महात साहेब आणि त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कार्यक्रमाला त्यांच्या नातवंडांचीही उपस्थिती लाभल्याने वातावरण अधिकच भावनिक झाले.
नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांचा विशेष सत्कार करत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येकाने त्यांच्या संयमी, कर्तव्यदक्ष आणि सर्वसमावेशक कार्यशैलीचे कौतुक केले. अनेक वर्षे प्रशासनाचा कारभार सुरळीत आणि प्रभावीपणे सांभाळताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, प्रामाणिकपणा आणि समन्वयक वृत्ती यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
महात साहेबांच्या निवृत्तीमुळे नगरपरिषदेतील एक अनुभवी आणि समर्पित अधिकारी कार्यमुक्त झाला असला, तरी त्यांच्या कार्याचा ठसा आणि प्रशासनातील योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शंकर मार्केट येथील दवाखान्याची वीज तोडली; तातडीने बिल भरून सेवा सुरू करा – माजी नगरसेवक अनुप शहा यांची मागणी

0
शंकर मार्केट येथील दवाखान्याची वीज तोडली; तातडीने बिल भरून सेवा सुरू करा – माजी नगरसेवक अनुप शहा यांची मागणी


फलटण – शहरातील फलटण नगर परिषद यांच्या अखत्यारीतील शंकर मार्केट येथील दवाखान्याची वीज थकीत बिलामुळे तोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद असून तात्काळ वीज बिल भरून दवाखाना पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर मार्केट परिसरातील नगरपालिकेचा दवाखाना याचे वीज बिल थकले असल्याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या वतीने वीज जोडणी खंडित करण्यात आली. परिणामी, दवाखान्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना आरोग्य सेवेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की वीज बिल भरण्यासाठी लागणाऱ्या रकमेवर एका ज्येष्ठ नगरसेवकाने ‘किती मलिदा मिळू शकतो?’ अशी विचारणा केली होती. संबंधित रकमेवर टक्केवारी देण्याची अपेक्षा व्यक्त झाल्यानेच बिल भरण्यास विलंब झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चेबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “वीज बिलावरही टक्केवारीची अपेक्षा केली जात असेल, तर नगरपालिकेचा कारभार नेमका कोणाच्या हातात आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरपालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन वीज बिल अदा करावे आणि दवाखाना त्वरित सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सेवा कोणत्याही कारणास्तव बंद पडणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने पारदर्शकता ठेवून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मराठी भाषा गौरव दिन विशेष: तरुण गुप्तहेराने दिली बनावट नोटांची बातमी…., ‘ग्राफिक्स’आडच्या बनावट नाेटांचा काळा धंदा मालेगाव ते संभाजीनगर

0
मराठी भाषा गौरव दिन विशेष:  तरुण गुप्तहेराने दिली बनावट नोटांची बातमी…., ‘ग्राफिक्स’आडच्या बनावट नाेटांचा काळा धंदा मालेगाव ते संभाजीनगर




मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्या बातम्यांचे रिपोर्टिंग कसे केले असते, अशी मांडणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिव्य मराठीच्या या प्रयोगात केली आहे. साहसी, धाडसी फास्टर फेणे म्हणजे भा. रा. भागवतांनी किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेली अफलातून व्यक्तिरेखा. तर हा फास्टर फेणे सांगतोय बनावट नोटांच्या टोळीबद्दल. “बाप रे! काय सॉलिड केस होती ही! बन्याबापू कान देऊन ऐका. सायकल काढली आणि थेट गेलो मालेगावच्या सटाणा रोडवर. तिथल्या एचडीएफसी बँकेत फायनान्स एजंट बिचारा गणेश खरे, हा 23 जानेवारीला 78 हजार भरण्यास गेला अन‌् पाचशेच्या 100 नोटा ‘बोगस’ निघाल्या. टिंग टिंग टिंगाक! पोलिसांनी नोटा जप्त केल्या आणि खरेला ताब्यात घेतलं. भयंकरच सगळं. धागेदोरे थेट संभाजीनगरच्या जयभवानीनगरमध्ये. येथील ‘विनायक ग्राफिक्स’ मध्ये हा पठ्ठ्या 500 च्या नोटा छापायचा. आधीच तार प्रिंट केलेला खास 85 जीएसएमचा पेपर तो ऑनलाइन मागवायचा. पोलिसांनी छापा टाकताच मुख्य सूत्रधार संतोष केळसकरला 200 बनावट नोटांसह पकडला. डेंजर एकदम… खरेकडून अजय राठोड, रायबान मोरेंची नावे पुढे आली. त्यांनी करण राठोडचं नाव, त्याने बन्सीलाल यादव, त्याने कन्नडच्या रेहान खान, समीर शेखची नावे घेतली. त्यांनीही गोल्डन कुरेशी, अजिंक्य जाधव अन‌् शुभम खैरनारकडे बोट दाखवले. शुभमने केळसकरचे नाव घेतले अन‌् रॅकेटचा पर्दाफाश झाला.



Source link

शंकर मार्केटमध्ये भ्याड हल्ला; जखमी हिरणवाळे बंधूंना अनिकेतराजे नाईक निंबाळकरांची रुग्णालयात भेट

0
शंकर मार्केटमध्ये भ्याड हल्ला; जखमी हिरणवाळे बंधूंना अनिकेतराजे नाईक निंबाळकरांची रुग्णालयात भेट


फलटण (प्रतिनिधी) – फलटण शहरातील शंकर मार्केट परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या अनिल हिरणवाळे व संतोष हिरणवाळे या बंधूंना आज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमींच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
याप्रसंगी बोलताना अनिकेतराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटणचे राजघराणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांनी हिरणवाळे बंधूंना मानसिक आधार दिला तसेच कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाकडे ठोस मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारांना कडक शासन व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी तसेच कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शंकर मार्केट परिसरात वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

फलटण नगरपरिषदेत समिती सभापती निवड बिनविरोध; सत्ताधारी गटात नाराजीचे पडसाद

0
फलटण नगरपरिषदेत समिती सभापती निवड बिनविरोध; सत्ताधारी गटात नाराजीचे पडसाद


फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगर परिषद येथील विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका आज बिनविरोध पार पडल्या. मात्र या निवडीदरम्यान सत्ताधारी गटामध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले या समिती सभापती निवडीच्या बैठकीस गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. त्यांना शिक्षण व क्रीडा समितीचे सभापतीपद देण्यात आले असले, तरी ही समिती दुय्यम दर्जाची समजली जाते व कामकाज मर्यादित असल्याची चर्चा नगरवर्तुळात आहे. त्यामुळेच नाराजीपोटी त्यांनी निवडीवेळी अनुपस्थित राहिल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनुप शहा यांच्या कन्या कुमारी सिद्धाली शहा यांनाही समिती सभापतीपदाची अपेक्षा होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र त्यांची केवळ समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा दिल्याचेही वृत्त आहे.
सभापती निवडी प्रक्रिया बिनविरोध झाली असली तरी अंतर्गत नाराजीमुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. पुढील काळात या घडामोडींमुळे राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची शिफारस; कार्यकर्त्यांत उत्साह

0
राज्यसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची शिफारस; कार्यकर्त्यांत उत्साह

फलटण : – राज्यसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची शिफारस; कार्यकर्त्यांत उत्साह
भारतीय जनता पक्षच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा पार पडली. या बैठकीत राज्यसभेच्या चार जागांसाठी तब्बल २५ जणांच्या नावांची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात आली आहे.
या शिफारशीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक बळावली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी माढा लोकसभा मतदारसंघ येथून निवडणूक लढवून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी खचून न जाता संघटनबांधणीवर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेसाठी आमदार सचिन पाटील यांना विजयी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच, फलटण नगर परिषद येथे तब्बल ३३ वर्षांनंतर सत्तांतर घडवून भाजपची सत्ता स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. फलटण पंचायत समितीमध्येही प्रथमच आठ सदस्य निवडून आणण्यात यश आले असून सभापतीपदाची निवडणूक अद्याप बाकी आहे.
पक्षाने सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीचे त्यांनी यशस्वीपणे पालन केले असल्याने राज्यसभा निवडणूक जाहीर होताच त्यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली होती. आता कोअर कमिटीने अधिकृत शिफारस केल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची लगबग; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी २० मार्चपूर्वी पहिली सभा बंधनकारक

0
सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेची लगबग; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी २० मार्चपूर्वी पहिली सभा बंधनकारक


फलटण प्रतिनिधी  : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडताच सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र शासनच्या ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, सातारा जिल्हा परिषद तसेच अंतर्गत पंचायत समित्यांची पहिली सभा २० मार्च २०२६ पूर्वी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या पहिल्या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार असून, संबंधित पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदांसाठीही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून विविध पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १३५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा अधिकृत कार्यकाळ हा पहिल्या सभेपासून सुरू होणार असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठका आयोजित करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी नेमके कोणत्या पक्षाकडे स्पष्ट संख्याबळ आहे, यावर राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. काही ठिकाणी अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आघाड्या, बैठका आणि अंतर्गत चर्चांना वेग आला आहे.
दरम्यान, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्या असून, लवकरच जिल्हा परिषद सभेची तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांतच सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेचा सारीपाट स्पष्ट होणार आहे.