Sunday, June 28, 2026
Home Blog Page 41

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध; सातही उमेदवारांची निवड निश्चित

0
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध; सातही उमेदवारांची निवड निश्चित


मुंबई – महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. या सात जागांसाठी केवळ सात उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे मतदानाची गरज पडणार नसून सर्व उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे.
भाजपकडून विनोद तावडे, माया इवनाते आणि राम वाडकुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) कडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली असून शिवसेना (शिंदे गट) कडून जोती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने राज्यात कोणतीही निवडणूक लढत होणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडीमुळे महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच आरपीआय यांचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व वाढणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राज्यसभेतील पुनरागमनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
#राज्यसभा #महाराष्ट्रराजकारण #SharadPawar #ParthPawar #VinodTawde #RamdasAthawale #MaharashtraPolitics

म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून ग

0


सातारा :  साताऱ्यातील म्हसवड धिंड प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अल्पवयीन मुलांची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी समाजकार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “अल्पवयीन मुलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका मांडली. कारवाई न झाल्यास उद्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल उद्यापर्यंत मागवून घेतो, असं आश्वासन दिलं आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे पोलिसांच्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर इंस्टाग्रामवर हत्यारासह फोटो पोस्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून त्याची भर बाजारातून त्याची धिंड काढण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे..नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून.

म्हसवड येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये पोलिसांनी सहा मुलांना ताब्यात घेत “गरुडा गँग” उघड केल्याचा दावा केला होता. मात्र तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या मुलांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसून त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. ताब्यात घेतलेल्या मुलांपैकी एक मुलगा अल्पवयीन असून त्याच्यावर दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियावर कोयत्यासोबत फोटो ठेवला होता, या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर या मुलांना म्हसवड बाजारातून फिरवत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा आणि त्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे

मुलगा अल्पवयीन असतानाही त्याची धिंड काढली, त्याचे नावही जाहीर केले. आमच्या मुलाचे करिअर खराब झाले. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी अल्पवयीन मुलाच्या आईवडीलांनी केली आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास म्हसवडमध्ये आंदोलन करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे. म्हसवडमधील या प्रकरणामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी अहवालानंतर पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमच्या मुलाचं नाव सगळीकडे दिलं, त्याची बदनामी केली, त्याचं नाव घालवलं, त्याने कोणाचा खून केला होता का? त्याच्या आयुष्याची बदनामी केली आहे, आय़ुष्यभरासाठी त्याचं नाव खराब केलं आहे. खेळात त्याची २ वेळा जिल्हा पातळीवर निवड झालेली, तालुका पातळीवर निवड झालेली, केवळ त्याने दिड वर्षांपूर्वी स्टेटस ठेवला म्हणून पोलिसांनी त्याला अडकवलं आहे. कोयत्या गँग आणि कोणती गँग आयुष्यात त्याचा कधी संबंध आला नाही, अशा लोकांशी संबंध जोडून त्याची धिंड काढली आहे, अशी माहिती अल्पवयीन मुलाच्या आईने वडिलांनी माहिती दिली आहे.

 

आणखी वाचा



Source link

माझा मुलगा राज्यस्तरीय खेळाडू, धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, नातेवाईकांची मागणी

0


Satara :  साताऱ्यातील म्हसवड धिंड प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अल्पवयीन मुलांची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी समाजकार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, अल्पवयीन मुलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. 

दीड वर्षापूर्वी केवळ स्टेटअस ठेवला म्हणून त्याला या गुन्ह्यात पोलीसांनी अडकवला

माझा मुलगा अल्पवयीन असून त्याची धिंड काढली आहे. तो खेळाडू आहे. दोन वेळा राज्य पातळीवर निवड झाली आहे. 13 वेळी जिल्हा पातळीवर नंबर आला आहे. असं असताना दीड वर्षापूर्वी केवळ स्टेटअस ठेवला म्हणून त्याला या गुन्ह्यात पोलीसांनी अडकवला असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. आमच्या मुलाची धिंड काढली गेली. आमचं नाव घालवलं गेलं. समाजात आमची बदनामी झाली. माझ्या मुलाने कुणाचा मुडदा पाडला होता का असा प्रश्न मुलाच्या आईने उपस्थित केला आहे. आता आयुष्यभर ही बदनामी सहन करावी लागणार आहे. त्याची काही चुक नव्हती. त्याच्या विरोधात कधी कोणताही गुन्हा नव्हता असं ही त्याच्या आईने सांगितलं

दरम्यान, या प्रकरणी कारवाई न झाल्यास उद्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल उद्यापर्यंत मागवून घेतो, असं आश्वासन दिलं आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

 पोलीस अधिक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून घेण्याचे आश्वासन दिले

म्हसवड येथे काही दिवसापूर्वी पोलीसांनी अल्पवयीन मुलाची धिंड काढली होती. या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी  तक्रारदार आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज साताऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी पोलीस अधिक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या आश्वासनाने कुटुंबीयांचे समाधान झालेले नाही. त्यांनी पोलीसांवर गंभीर आरोप केले आहे. शिवाय पुढच्या काळात आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे. आमच्या मुलाला या प्रकरणात गुंतवल्याचा आरोप ही केला आहे. 

 

आणखी वाचा



Source link

फुलं वाहिली; नमस्कार केला; काही क्षण निःशब्द उभे राहिले, पाठमोरं होऊन डोळे पुसले, वडिलांच्या स्मृतींना नमन करताना उदयनराजेंना अश्रू अनावर

0



Udayanraje Bhosale Emotional : फुलं वाहिली; नमस्कार केला; काही क्षण निःशब्द उभे राहिले, पाठमोरं होऊन डोळे पुसले, वडिलांच्या स्मृतींना नमन करताना उदयनराजेंना अश्रू अनावर



Source link

धम्ममित्र बालसंस्कार वर्गात काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सतिश कांबळे यांचे मार्गदर्शन

0
धम्ममित्र बालसंस्कार वर्गात काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सतिश कांबळे यांचे मार्गदर्शन

धम्ममित्र बालसंस्कार वर्गात काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सतिश कांबळे यांचे मार्गदर्शन


फलटण : सोमवार पेठ, फलटण येथे धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या वतीने २ मार्च ‘काळाराम मंदिर सत्याग्रह’ दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
२ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर सत्याग्रह उभारण्यात आला होता. सामाजिक समता, मानवी हक्क आणि स्वाभिमानासाठी झालेल्या या ऐतिहासिक लढ्याची माहिती सतीश कांबळे सरांनी मुलांना सोप्या भाषेत समजावून सांगितली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य आणि शिक्षणाच्या बळावर परिवर्तन घडवण्याची प्रेरणा त्यांनी बालमित्रांना दिली.
“मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार आणि आचरणही तितकेच महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन करत त्यांनी चांगल्या सवयी, शिस्त, नम्रता आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व स्पष्ट केले. लहान वयातच योग्य विचारांची पेरणी झाली तरच समाजात सुसंस्कारित पिढी घडू शकते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सूत्र पठण व त्याचा मराठी अनुवाद याचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले. सूत्रांचे अर्थ समजून घेतल्याने केवळ पाठांतर न होता विचारांची जाण निर्माण होते, यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमास चंद्रकांत मोहिते सर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत बालसंस्कार वर्गाच्या उपक्रमांची प्रशंसा केली. विशेष म्हणजे, एका पालकांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलामध्ये बालशिबिरामुळे झालेला सकारात्मक बदल पाहून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझ्या मुलामध्ये झालेला बदल पाहून मन भरून आले,” असे त्यांनी सांगितले. या प्रतिक्रियेमुळे वर्गाच्या कार्याची परिणामकारकता अधोरेखित झाली.
धम्ममित्र बालसंस्कार वर्ग, सोमवार पेठ, फलटण येथे अशा प्रकारचे उपक्रम नियमित राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी धम्ममित्र बालसंस्कार वर्गातील सर्व बालक, तरुण कार्यकर्ते, उपासक उपासिका उपस्थित होत्या.

ग्रहण खगोलशास्त्रीय घटना; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी

0


सातारा : भारतात आज होळी-धुळवड सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे, पण या होळीच्या सणावर ग्रहणाचे (Eclipse) सावटही आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी काही गोष्टी आणि रुढी पंरपरा पाळल्या जात आहेत. ग्रहणात काय करावे आणि काय करु नये, हे पूर्वजांनी, वयोवृद्धांनी किंवा जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे प्रथा पाळल्या जातनाचे दिसून येते. अनेक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर, काही महत्त्वाच्या आणि शुभ कामांनाही मनाई केली जाते. मात्र, अंधश्रद्धा (Superstition) निर्मूलन समितीने ग्रहणाती या प्रथा म्हणजे अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं आहे. तसेच, अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. 

चंद्रग्रहणासंबधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. आज बुधवार 3 मार्च रोजी या वर्षातले पहिले चंद्रग्रहण होत आहे. मात्र, ग्रहण ही एक खगोल शास्त्रीय घटना असून त्याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी म्हटलं आहे. सोशल मिडियातून ग्रहणाविषयी अनेक अतिरंजित दावे केले जात आहेत. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रहणविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. हमीद दाभोळकर यांनी केली आहे. 

चंद्रग्रहणानिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद

ग्रहण लागल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद करण्यात आलय. साडे सहाच्या सुमारास ग्रहण संपल्यानंतर विधिपत पूजा करून दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. आज दुपारी 3 वाजून 20 मिनिटे ते संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण असल्याने मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

टीम इंडियाने सराव टाळला

टीम इंडिया पुढील सामन्यासाठी मुंबईत दाखल होताच आजच्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाला मिळाली. त्यानंतर टीम इंडियाच्या सरावाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्यक्षात भारतीय संघ आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सराव करताना दिसेल. तर, इंग्लंड संघाचा सराव पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुपारी सुरू झाला आहे. मात्र, खग्रास ग्रहणामुळे टीम इंडियाने आपला दुपारचा सराव टाळल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच

आणखी वाचा



Source link

बारामतीत प्रेमी युगुलावर कोयत्याने हल्ला; ३.२४ लाखांचा मुद्देमाल लुटला, तिघे जेरबंद

0
बारामतीत प्रेमी युगुलावर कोयत्याने हल्ला; ३.२४ लाखांचा मुद्देमाल लुटला, तिघे जेरबंद

बारामती  : तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात प्रेमी युगुलावर कोयत्याने हल्ला करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी Baramati Taluka Police Station यांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून लुटलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत संतोष रायनवार (बदलेले नाव, वय २६, मूळ रा. नागपूर, सध्या बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते.
त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्याजवळ येत लोखंडी सत्तूर आणि कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून जखमी केले.
जबरदस्तीने दागिने व रोख रक्कम लंपास
आरोपींनी फिर्यादीकडून खालील मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला:
सुमारे २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत अंदाजे ३ लाख रुपये)
चांदीची अंगठी (५ हजार रुपये)
चांदीची चैन (१५ हजार रुपये)
आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये)
२ हजार रुपये रोख
एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपींनी “परत इकडे यायचं नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांची जलद कारवाई
या प्रकरणी बी.एन.एस. कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत खालील आरोपींना २८ फेब्रुवारी रोजी अटक केली:
प्रसाद गणपत भोसले (वय २४)
धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९)
कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता. बारामती)
न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून कोठडीदरम्यान त्यांच्याकडून संपूर्ण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

वाचन वेड’उपक्रमांतर्गत माण व फलटण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयाचे पुस्तकांचे वितरण

0
वाचन वेड’उपक्रमांतर्गत माण व फलटण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयाचे पुस्तकांचे वितरण

वाचन वेड’उपक्रमांतर्गत माण व फलटण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयाचे पुस्तकांचे वितरण


फलटण : पुणे येथील किरीटी मोरे व गोविंद शेठ या दोन पुस्तक मित्रांनी सुरू केलेल्या वाचन वेड उपक्रमांतर्गत फलटण व माण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचनीय अशा ग्रंथालय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल, पाटणेवाडी, हराटीमळा, पिंप्रद व माण तालुक्यातील माणगंगानगर, श्रीपालवण, कळसकरवाडी, मलवडी या शाळांमध्ये किरीटी मोरे व गोविंद शेठ यांनी ग्रंथालय पुस्तकाचे वितरण केले आहे. किरिटी मोरे व गोविंद शेठ या दोघांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आतापर्यंत साडेसहाशे च्या वर जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयाची पुस्तके दिली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी. त्यांची भाषिक कौशल्य विकसित व्हावी त्यासोबतच विचार करण्याची प्रक्रिया त्यांच्यामध्ये सुरू व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू केल्याची भावना किती मोरे व गोविंद शेठ यांनी व्यक्त केले. आपण ज्या समाजातून येतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून या दोघांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. त्यांच्यामार्फत मिळालेल्या पुस्तकांचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना होत असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागत आहे. त्यांनी दिलेल्या या पुस्तक भेटीसाठी मुख्याध्यापक विद्यार्थ्यांनी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले आहेत. ही पुस्तके प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांच्या संपर्कातून या शाळांपर्यंत पोहोचत आहेत.

अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठी दुर्घटना! दगड फोडणारा कामगार 200 फूट खोल दरीत कोसळला, जागीच मृत्यू

0


Satara : सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरुन 200 फूट दरीत पाय घसरून पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने कामगाराचा मृतदेह बाहेर काढला आहे. सातारा शहरा लगत असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर दगड फोडण्याचे काम सुरु होते. यावेळी काम करणाऱ्या मजुराचा 200 फूट खोल दरीत पाय घसरुन पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

पोलिसांनी छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने दोनशे फूट खोल दरीतून मजुराचा मृतदेह बाहेर काढला

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने दोनशे फूट खोल दरीतून मजुराचा मृतदेह बाहेर काढला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

किल्ल्यावर दगड फोडण्याचे काम सुरु असताना कामागाराचा तोल गेला अन्…

मिळालेल्या माहितीनुसार अजिंक्यतारा किल्ल्यावर दगड फोडण्याचे काम सुरु होते. यावेळी कामागाराचा तोल गेला आणि थेट 200 फूट दरीत कोसळला. मोठ्या उंचीवरुन कामगार दरीत  कोसळल्याने मोठी गंभीर दुखापत झाली होती. त्यातच कामागाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तसेच पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले. यानंतर शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या टीमच्या मदतीने कामागाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 

नेमका कामगार दरीत कसा कोसळला? पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नेमका कामगार दरीत कसा कोसळला? तो किल्ल्यावर कोणत्या कामासाठी आला होता? या सर्व बाबी पोलिसांकडून तपासल्या जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 

बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात, एक जण जागीच ठार

 

धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना बीड शिरूर दरम्यान रायमोह गावाजवळ घडली आहे. कृष्णा मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून कृष्णा आपल्या मित्रांसोबत धुलीवंदनाचा सण साजरा करायला वॉटर पार्कला निघाला होता.. त्यांची गाडी बीड शिरूर मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलट्या खात थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही. परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे जागीच ठार झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण यामध्ये जखमी आहे. या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक गाडी होती त्या गाडीतील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 

आणखी वाचा



Source link

प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् निर्जनस्थळी बोलावून त्याला संपवलं; मृतदेह नीरा नदीत फेकला अन्…, ए

0


फलटण:  कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फलटण तालुक्यातील गोखळी येथील नीरा नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांना (Phaltan Crime News) अटक केली आहे.अंकुश नरबट राहणार माण असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयितांनी महिलेच्या नावाने बनावट सोशल मीडियावरून संपर्क साधत १५ फेब्रुवारी रोजी त्याला फलटण येथे बोलावले. तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केल्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नीरा नदीत फेकण्यात आला.सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत अविष्कार भगत, श्रद्धा भगत, ज्ञानेश्वर भगत आणि अर्चना भगत यांना अटक केली आहे.(Phaltan Crime News)

अंकुश बापू नरबट (वय २२, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा), असे खून झालेल्या तरुणाचे तर आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत (चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अंकुश नरबटच्या डोक्यावरील जखमांमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.(Phaltan Crime News)

 तपासात निष्पन्न झाले की, कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खून करण्यात आला. बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांनी खुनाचा कट रचला. महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व त्याला फलटण येथे बोलावण्यात आले. १५ फेब्रुवारी रोजी अंकुश फलटण येथे आल्यानंतर संबंधित महिलेने त्याला एकांतात वेळ घालवण्याच्या बहाण्याने तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. त्याठिकाणी कटानुसार इतर चार आरोपी वेगवेगळ्या वाहनांतून आले. त्यांनी अंकुशला मारहाण करून वाहनात टाकले व पिंप्रद येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याचा खून करून मृतदेह गोखळी हद्दीतील नीरा नदीत फेकून दिला.

पुरावे तपासल्यानंतर गुन्हा उघडकीस आला, हा खून अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबद्ध पद्धतीने केल्यामुळे सुरुवातीला पोलिसांकडे कोणतेही ठोस धागेदोरे नव्हते. मात्र, पोलिसांनी फलटण ते दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दूध डेअरी व पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी व मृतक यांच्या मोबाइल 3 क्रमांकांची तांत्रिक माहिती मिळवून त्याआधारे पुराव्यांची साखळी जोडत गुन्हा उघडकीस आणला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 

आणखी वाचा



Source link