Sunday, June 28, 2026
Home Blog Page 40

महिला दिनी ‘विशेष भेट’! ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेत निवड; आंबेडकरी चळवळीतील प्रभावी आवाज संसदेत

0
महिला दिनी ‘विशेष भेट’! ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेत निवड; आंबेडकरी चळवळीतील प्रभावी आवाज संसदेत

महिला दिनी ‘विशेष भेट’! ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेत निवड; आंबेडकरी चळवळीतील प्रभावी आवाज संसदेत

सोलापूर – आंबेडकरी चळवळीत आक्रमक भूमिका, प्रभावी वक्तृत्व आणि शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम पार्श्वभूमी यामुळे ओळख असलेल्या ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेसाठी निवड झाल्याने राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला राज्यसभेवर पाठविले, ही “महिला दिनाची विशेष भेट” असल्याची भावना ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केली.
ज्योतीताई वाघमारे यांचा जन्म सोलापूर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबावर सामाजिक चळवळींचा ठसा असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव पडला. त्यांच्या वडिलांनी दलित पँथर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले होते. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरणातच ज्योतीताईंचे बालपण घडले.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्रजी विषयात पीएचडी पूर्ण केली असून मराठी भाषेवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी काही काळ वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले असून त्यांच्या स्पष्ट आणि प्रभावी मांडणीमुळे त्या व्यापक स्तरावर परिचित झाल्या.
राजकीय क्षेत्रातही ज्योतीताईंनी सक्रिय भूमिका बजावली आहे. २०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या आक्रमक, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद वक्तृत्वामुळे त्या राज्यभर ओळखल्या जाऊ लागल्या. सामाजिक न्याय, महिलांचे प्रश्न आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.
आंबेडकरी विचारांची पार्श्वभूमी, सामाजिक प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेतील निवड महत्त्वाची मानली जात आहे. आता त्या राष्ट्रीय पातळीवरही आंबेडकरी विचार, सामाजिक न्याय आणि महिलांच्या प्रश्नांवर आपली ठाम भूमिका मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजु

0


Satara News :   सातारा जिल्ह्यातील कराड ( Satara Karad) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेतात पाईपलाईनचे काम करताना दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून या दोघांचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे.  

दक्षिण मांड नदीच्या शेजारी संगम शिवारात शेतातील पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना दुर्घटना

कराड तालुक्यातील उंडाळे मनव मार्गांवर दक्षिण मांड नदीच्या शेजारी संगम शिवारात शेतातील पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करण बाजीराव चव्हाण व अमर रंगराव वडार असे मृत्यू झालेल्या मजुरांचे नाव आहे. दोघेही मनव गावचे रहिवासी असून श्रीरंग पाटील यांच्या शेतात पाईपलाईन टाकण्याचे काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही मुजरांचे मृतदेह उंडाळे ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत.

अहिल्यानगरमध्ये चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

अहिल्यानगरच्या कर्जत-श्रीगोंदा महामार्गावरील कोंभळी फाटा येथे चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  जळगाव येथील श्रावण सुखदेव पठारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान कोंभळी फाटा चौक हा मृत्यूचा सापळा बनला असून येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे येथील रहिवाशी देखील भीतीच्या छायेत असून आता ग्रामस्थांकडून तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू तर, दोघे गंभीर जखमी

लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे.भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिली. या घटनेत कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी

आणखी वाचा



Source link

जिल्हा परिषद शाळा परतवडी येथे विद्यार्थ्यांची रंगपंचमी उत्साहात साजरी

0
जिल्हा परिषद शाळा परतवडी येथे विद्यार्थ्यांची रंगपंचमी उत्साहात साजरी

परतवडी जि.प. शाळेत विद्यार्थ्यांची रंगपंचमी उत्साहात साजरी 


परतवडी (ता माण ) :- परतवडी येथील जिल्हा परिषद शाळेत होळी निमित्त रंगपंचमीचा सण विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. डोंगराच्या पायथ्याशी व निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त केला. संपूर्ण शाळा परिसर रंगांच्या उधळणीने आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी हास्याने उजळून निघाला होता.
रंगपंचमीच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सणाच्या माध्यमातून मैत्री, एकोपा आणि आनंदाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद संपूर्ण परिसरात सणाचे वातावरण निर्माण करत होता.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती साळवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रुपाली पवार मॅडम व विषय शिक्षक सुर्यकांत सुस्तरफोड सर त्यांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांनी सुरक्षित व आनंदी वातावरणात रंगपंचमी साजरी केली.
अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सणांचे महत्त्व, सहकार्याची भावना तसेच आनंद वाटण्याची सवय विकसित होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार : गोरे

0


Jayakumar Gore :  जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. यानंतर आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपला मिळावं , यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं आहे. 

सातारा जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष, त्यामुळं अध्यक्षपद भाजपलाच मिळावं

साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मंत्री गोरे यांनी मैदानावर तुफान फलंदाजी करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सातारा जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगत जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपलाच मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की अध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे. अजून खूप पाणी पुलाखालून जायचे आहे. पुढील काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. मात्र भाजपचा अध्यक्ष व्हावा यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

गोरेंचे काळे कारनामे, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करा, साडी चोळीचा आहेर देत सोलापुरात महिला काँग्रेस आक्रमक

आणखी वाचा



Source link

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चव्हाणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन

0
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चव्हाणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चव्हाणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन

चव्हाणवाडी :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चव्हाणवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Cummins India Limited आणि Work for Equality यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत चव्हाणवाडी हायस्कूलच्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली.महिला सन्मान आणि समानतेचा संदेश देत गावातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि सामाजिक विषयांवर विचार मांडता यावा हा या स्पर्धेचा उद्देश होता.
याचबरोबर सकाळी १० वाजता मुलांसाठी ‘भाकरी बनवणे’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. घरकामातील समानता आणि स्वावलंबनाची जाणीव मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच मुलींसाठी ‘विजेचे बल्ब निर्मिती’ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ज्यामुळे विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि कौशल्य विकासाला चालना मिळावी हा त्यामागील हेतू होता.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवाडी आणि चव्हाणवाडी हायस्कूल, चव्हाणवाडी चे विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी घेतला. आयोजकांनी गावातील महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन केले होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून “स्त्री-पुरुष समानता, हाच प्रगतीचा खरा वाटा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडी विद्यालयात कमिन्स इंडिया कंपनी सुरवडी व वर्क फॉर इक्वलिटी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.निकाळजे विठ्ठल बाबुराव उपशिक्षक श्री.क्षीरसागर पी एस सर, श्री.राजपुरे आर जे सर, सौ.चव्हाण एन एस, श्री.भोईटे एस आर सर वर्क फोर इक्वलिटी संस्थेच्या अध्यक्षा प्रभा विलास मॅडम पुणे, वर्क फॉर इक्वलिटी संस्थेच्या मॅनेजर सौ राजेश्री रासकर मॅडम, फिल्ड ऑफिसर सौ.उर्मिला चव्हाण मॅडम, सोनल मोरे मॅडम, सौ रेखा जगताप मॅडम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी श्री शशिकांत कदम सर, श्री शिंदे सर, श्री अर्जुन सर इत्यादी सर्व लोक उपस्थित होते

सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व : स्व. डॉ. कृष्णचंद्र भोईटे

0
सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व : स्व. डॉ. कृष्णचंद्र भोईटे


साहस Times :- राजकारण, सहकार, शिक्षण आणि साहित्य या विविध क्षेत्रांत काम करणारे डॉ. कृष्णचंद्र भोईटे हे फलटण तालुक्याच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यातून ग्रामीण विकास, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येतो.
त्यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन.

फलटण तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. कृष्णचंद्र भोईटे. समाजातील गुणी माणसे शोधून त्यांना संधी देत त्यांचा विकास घडवून आणण्याची वृत्ती ज्यांच्यात होती, अशा निष्ठावान सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
प्रारंभिक जीवन व शिक्षण
डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांचा जन्म ७ मार्च १९३७ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आरडगाव येथे झाला. इतिहासपरंपरा लाभलेल्या या गावाशी त्यांची नाळ आयुष्यभर जुळलेली राहिली. शिक्षणाबद्दलची ओढ आणि समाजकारणाची जाणीव या दोन गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुरुवातीपासून दिसून येत होत्या.
पुणे विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. (१९६४) पदवी संपादन केली. पुढे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेच्या अभ्यासावर त्यांनी संशोधन करून “Democratic Decentralisation in Maharashtra with special reference to Satara District” या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण प्रशासन याविषयी त्यांना विशेष अभ्यास होता.
पंचायत राज व्यवस्थेतून नेतृत्वाची सुरुवात
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ग्रामीण नेतृत्वाला नवी दिशा मिळाली. याच काळात डॉ. भोईटे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली.
१९६२ साली आरडगाव ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर ते पहिले सरपंच म्हणून निवडून आले. त्याच वर्षी स्थापन झालेल्या फलटण तालुका पंचायत समितीचे ते पहिले सभापती (१९६२–१९६७) झाले.
या कालावधीत त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे राबवली. पिण्याच्या पाण्याच्या योजना, प्राथमिक शाळांच्या इमारती, नाला बंडिंग, पाझर तलाव, रस्त्यांवरील दिवे अशी अनेक कामे प्रभावीपणे राबवली गेली. त्या काळात फलटण पंचायत समितीचे कामकाज आदर्श मानले जाऊ लागले. त्यांच्या या कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ग्रामीण विकास मंत्री गोपाळराव खेडकर यांनीही त्यांचे कौतुक केले होते.
विधानसभेतील प्रभावी कारकीर्द
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशस्वी कामगिरीमुळे डॉ. भोईटे यांना मोठ्या राजकारणात संधी मिळाली.
१९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ या दोन कार्यकाळात ते फलटण-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुमारे ११ वर्षे विधानसभेत काम केले.
विधानसभेत त्यांनी विविध समित्यांवर काम करत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. मुद्देसूद भाषणांमुळे ते अभ्यासू आणि तरुण आमदार म्हणून ओळखले जात. फलटण तालुक्यातील शेती, पाणी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले.
फलटण परिसरातील शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले. निरा उजव्या कालव्यालगत असलेल्या परंतु पाणी न मिळणाऱ्या हजारो एकर जमिनींसाठी लिफ्ट सिंचन योजना राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच काही शेतकऱ्यांना शेती महामंडळाकडे गेलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
सहकार क्षेत्रातील योगदान
राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. फलटण तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पुढाकारातून फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाची स्थापना १९७६ मध्ये झाली. या संघाच्या माध्यमातून तालुक्यात १०० पेक्षा अधिक दूध सोसायट्या स्थापन झाल्या. छोट्या शेतकऱ्यांना जर्सी गायी खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा मिळाला.
याचबरोबर दि. यशवंत को-ऑप. बँक या संस्थेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. तसेच महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे ते जवळपास २० वर्षे संचालक होते. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
१९८४ साली श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक “डॉ. कृष्णचंद्र भोईटे पॅनेल”च्या नावाने जिंकून त्यांनी कारखान्याच्या कामकाजातही महत्त्वाची भूमिका बजावली.
शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील सहभाग
डॉ. भोईटे यांचे योगदान केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर तीन वेळा निवडून आले तसेच पुणे विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांची निवड झाली. स्थानिक श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण एज्युकेशन सोसायटी या संस्थांमध्ये त्यांनी सचिव व नियामक मंडळ सदस्य म्हणून काम केले. मुधोजी कॉलेज कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
साहित्याचीही त्यांना आवड होती. त्यांच्या कविता आणि लेख विविध मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले. “अस्मिता” हा त्यांचा काव्यसंग्रह १९६० साली प्रकाशित झाला होता.
साधेपणाने जगलेले नेतृत्व
सत्ता आणि पद ही साधने मानून समाजासाठी काम करणे ही त्यांची भूमिका होती. सत्ता असूनही सत्तेचा मोह न बाळगता समाजहितासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. आमदारकी संपल्यानंतरही अनेक वर्षे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्यांचा विश्वास टिकून राहिला.

आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा(पूर्व)
मोबाईल नं : 9284658690

फलटण शहराच्या विकासाला वेग : १०० कोटींच्या कामांचा आराखडा, करवाढीला ब्रेक

0
फलटण शहराच्या विकासाला वेग : १०० कोटींच्या कामांचा आराखडा, करवाढीला ब्रेक

फलटण, प्रतिनिधी : नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराच्या विकासाला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले आणि मुख्याधिकारी निखील जाधव उपस्थित होते.
बैठकीत मुख्याधिकारी निखील जाधव यांनी विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, “फलटणकरांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करायचा आहे.” मार्च अखेरपर्यंत केंद्र, राज्य आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून जवळपास १०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या वर्क ऑर्डर काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शहरातील संकलित मालमत्ता कर पुढील पाच वर्षे वाढवला जाणार नाही. उलट नागरिकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी कर कमी करण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
पर्यावरणपूरक आणि खर्च कमी करणाऱ्या उपक्रमांतर्गत नगरपालिकेचा वीजखर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात नगरपालिकेचे वीजबिल जवळपास शून्यावर आणण्याचे नियोजन आहे.
शहराच्या पायाभूत सुविधांनाही मोठी चालना देण्यात येणार आहे. शहरात नवीन उद्याने, अद्ययावत रस्ते, नाट्यगृह, तारांगण आणि आधुनिक हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून ६ कोटी रुपये आणि राज्य नियोजन मंडळातून १० कोटी रुपये असे एकूण १६ कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
फलटण शहराच्या विकासाला गती देण्यासाठी फरांदवाडी, ठाकूरकी, जाधववाडी आणि चौधरवाडी या गावांचा शहर हद्दीत समावेश करून नगरपालिकेची हद्दवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर फलटण नगरपालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
फरांदवाडी परिसरात तब्बल १७ एकर जागेवर भव्य स्टेडियम उभारण्यात येणार असून विमानतळ परिसरात हेलिपॅड, हँगिंग गार्डन आणि अॅमिनिटी पार्क विकसित करण्यात येणार आहे.
महिलांच्या सुविधांचा विचार करून शहरातील प्रमुख चौकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार असून त्यापैकी ३ ते ४ स्वच्छतागृहे महिलांसाठी स्वतंत्र असतील.
अंतर्गत पालखी मार्गावरील चौकांचे सुशोभीकरण व दर्जेदार रस्त्यांचे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनसाठी अतिरिक्त ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून दलित वस्तीसाठी ८ ते ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
हद्दवाढ, प्रलंबित रिंगरोड प्रकल्प आणि २४ तास पाणीपुरवठा योजना या विषयांवर २८ आणि २९ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
बैठकीच्या शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “फलटण जिल्हा होण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे. भविष्यातील जिल्हा मुख्यालय ज्या दिमाखात असावे, त्या धर्तीवर फलटण शहराचा कायापालट केला जाईल.”
शहराच्या सुरक्षेसाठी नगरपालिकेत स्वतंत्र कंट्रोल रूम उभारण्यात येणार असून शहरात नाईट व्हिजन आणि नंबर प्लेट डिटेक्टर कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयामुळे फलटणमध्ये ६ नवीन तहसीलदार आणि महसूल प्रांताधिकारी कार्यरत होणार आहेत.
या आढावा बैठकीला नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, संदिप चोरमले, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, किरण जाधव तसेच नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, सुपर्णा अहिवळे, रूपाली सस्ते, मिना काकडे, मोहिनी हेंद्रे आणि सिद्धाली शहा उपस्थित होत्या.
तसेच अमरसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह भोसले, अनुप शहा, अमोल सस्ते, सनी मांढरे आणि श्रीवल्लभ हेंद्रे यांचीही उपस्थिती होती.

फलटण भाजपमध्ये अंतर्गत वाद तीव्र; माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या हकालपट्टीची शक्यता?

0
फलटण भाजपमध्ये अंतर्गत वाद तीव्र; माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या हकालपट्टीची शक्यता?


फलटण : फलटण नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांची निवड नुकतीच पार पडली असताना भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी पक्षाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातून हकालपट्टीची शक्यता निर्माण झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

नगरपरिषदेतील समित्यांच्या निवडीवरून नाराजी व्यक्त करत अनुप शहा यांच्या कन्या व नगरसेविका सिद्धाली शहा यांनी आपल्या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर त्याच दिवशी अनुप शहा यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या निर्णयांवर टीका केली. त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येऊ लागली आहे.
अनुप शहा यांनी पक्षाविरोधात घेतलेली भूमिका आणि ज्येष्ठ नगरसेवकांवर केलेली टीका ही पक्षासाठी घातक असल्याचा आरोप काही नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जोर धरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष नेतृत्व अनुप शहा यांच्याविरोधात काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

म्हसवडमध्ये अल्पवयीन मुलाची बाजारपेठेत धिंड; संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी

0
म्हसवडमध्ये अल्पवयीन मुलाची बाजारपेठेत धिंड; संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी



म्हसवड | प्रतिनिधी :-  म्हसवड येथे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाची बाजारपेठेतून धिंड काढल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. या घटनेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी मुलाच्या कुटुंबीयांनी केली असून या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर तक्रारदार कुटुंबीय व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सातारा येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या संदर्भात सविस्तर अहवाल मागवून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र केवळ आश्वासनावर कुटुंबीय समाधानी नसून “आश्वासन नको, थेट कारवाई हवी,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
प्रसिद्धीसाठी कारवाईचा आरोप
मुलाच्या कुटुंबीयांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलाचाही समावेश होता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
“खतरनाक गँग” असा ठपका ठेवत त्या मुलाला बाजारपेठेतून फिरवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे तो अल्पवयीन असतानाही त्याचे नाव सार्वजनिकपणे जाहीर करण्यात आले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. भारतीय कायद्यानुसार अल्पवयीन व्यक्तीची ओळख गुप्त ठेवणे बंधनकारक असताना पोलिसांनीच ती उघड केल्यामुळे समाजात बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आईचा भावनिक सवाल
या घटनेनंतर मुलाच्या आईने संताप व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलाने कुणाचा खून केला होता का? त्याची चूक काय होती? आयुष्यभर ही बदनामी आम्ही सहन करायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्हास्तरीय खेळाडू असल्याचा दावा
मुलाच्या वडिलांनीही पोलिसांवर गंभीर आरोप करत एफआयआरमधील मजकूर आणि माध्यमांना दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे सांगितले. “माझा मुलगा जिल्हास्तरीय खेळाडू असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या घटनेमुळे त्याच्या भविष्यावर परिणाम झाला,” असे त्यांनी सांगितले.
मानवी हक्कांचे उल्लंघन?
तक्रारीमध्ये पोलिसांनी बनावट आरोपांच्या आधारे अल्पवयीन मुलांची धिंड काढून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
तसेच प्रशासनाकडून योग्य कारवाई झाली नाही तर उद्यापासून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या शिष्टमंडळात भागवत जानकर, विजया जानकर, सोनाली जानकर, महेश करचे, डॉ. प्रसाद ओंबासे, दादासो खुपकर, सचिन चव्हाण आणि भाऊसाहेब धुलगुडे यांचा समावेश होता.
कायदा काय सांगतो?
भारतीय कायद्यानुसार पोलिसांना आरोपींची सार्वजनिक ठिकाणी धिंड काढण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांमध्ये अटक केलेल्या व्यक्तीला सन्मानाने वागणूक देणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोपी सिद्ध होण्यापूर्वीच सार्वजनिकरित्या फिरवणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आणि पोलीस अधिकाराचा गैरवापर मानला जाऊ शकतो. पोलिसांना केवळ तपासासाठी किंवा न्यायालयात हजर करण्यासाठीच आरोपीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्याचा अधिकार आहे.
या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रशासन पुढे काय निर्णय घेते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

फलटण तालुक्यात शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; कुऱ्हाड, गज, चाकूने हल्ले – आठ जणांवर गुन्हे दाखल

0
फलटण तालुक्यात शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; कुऱ्हाड, गज, चाकूने हल्ले – आठ जणांवर गुन्हे दाखल


फलटण : फलटण तालुक्यातील वाजेगाव येथे शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये क्षुल्लक कारणांवरून तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला रंग लावण्यास मज्जाव केल्याच्या रागातून तसेच “मूलबाळ होत नाही” असे म्हणून हिणवल्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये लोखंडी गज, कुऱ्हाड, कोयता आणि चाकूने जीवघेणे हल्ले करण्यात आले. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एकूण आठ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत ३४ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. ३ मार्च) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी झोपले असताना शेजारी राहणारे काही जण त्यांच्या मुलीला रंग लावत असल्याचे फिर्यादीच्या मुलाने सांगितले. यानंतर फिर्यादी बाहेर येऊन “माझ्या मुलीला रंग लावू नका” असे सांगितले. या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.
वाद वाढताच संबंधित चार जणांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची पत्नी, आई-वडील आणि मुलगा बाहेर आले असता, आरोपींनी संगनमत करून लोखंडी गज, काठी, कुऱ्हाड आणि कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याच घटनेप्रकरणी दुसऱ्या गटातील २९ वर्षीय तरुणानेही परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता तो घरी आल्यानंतर शेजारील चार जण त्याच्या घरासमोर आले. त्यांनी “तुला अजून मूलबाळ नाही, तुझा या घराशी काय संबंध?” असे म्हणत त्याची हेटाळणी केली तसेच पत्नीबद्दल अपशब्द वापरत शिवीगाळ केली.
यावेळी “मला शिवीगाळ करू नका आणि माझ्या घरासमोरून निघून जा,” असे सांगितल्यावर त्या चौघांनी तरुणावर चाकू आणि लोखंडी गजाने हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात तरुणाच्या मांडीत आणि उजव्या तळहातावर चाकू लागून तो जखमी झाला. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या चुलतीलाही हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.