Monday, July 6, 2026
Home Blog Page 3014

Food Poisoned : मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सात जणांवर उपचार सुरू | पुढारी

0


तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा : वहागाव (ता. कराड) येथे मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून सातजणांवर कराड येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर प्राथमिक उपचार करून 15 जणांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेने वहागावसह परिसरात खळबळ उडाली आहे. (Food Poisoned)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण तसेच गटविकास अधिकारी मिनाताई साळुंखे यांनी वहागाव येथे भेट दिली. विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू करत तेथील जेवणाचे नमुने तपासणीसाठी घेतले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वहागाव येथील तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या नातेवाईकाची शुक्रवारी दोन जूनला मांसाहारी जेवणाची देवाची यात्रा होती. त्यानिमित्त त्यांनी येतगाव (ता. कडेगाव), गोळेश्वर, अभयनगर, विंग तसेच स्थानिक वहागावमधील 35 पै-पाहुणे व नातेवाईकांना जेवणासाठी निमंत्रित केले होते. शुक्रवारी मांसाहारी जेवण झाल्यानंतर शनिवारपासून 35 जणांपैकी तुकाराम राऊत यांच्या कुटुंबीयांसह 23 जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. विषबाधा झालेल्या 23 जणांमध्ये वहागावमधील 11, येतगाव 4, गोळेश्वर 2, अभयनगर 3 व विंग येथील 3 जणांचा समावेश आहे.

उलट्या व जुलाबाचे प्रमाण वाढल्यामुळे तुकाराम राऊत, पत्नी सुनंदा तुकाराम राऊत आणि सचिन वसंत सोनुलकर यांना कराड येथे खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल केले. तसेच वहागाव येथील वसंत अण्णा सोनुलकर, गणेश बाळासो पवार, मनोहर जयवंत पवार, भामा वसंत सोनवलकर, लक्ष्मण ज्ञानदेव राऊत, अनिकेत लक्ष्मण राऊत, अण्णा लक्ष्मण सरगर, लक्ष्मण विष्णू सरगर आणि जयेश सदाशिव पवार यांना वहागाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात उपचारकरता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, तुकाराम राऊत यांच्यावर कराड येथे उपचार सुरु असतानाच रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे वहागाव 2, येतगाव 2 आणि  विगं येथील 3 असे एकुण 7 जणांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, कराड गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्नेहल कदम, वहागाव उपकेंद्राचे डॉ. गंगाधर माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विषबाधा झालेल्यांना उपचार सुरू केले. आरोग्य विभागाकडून मासांहारी जेवण, भाकरी, पीठ, भात व पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल दोन दिवसात येणार असून नक्की विषबाधा कशामुळे झाली हे निष्पन्न होऊ शकते असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.



Source link

Fraud Investment : ४ टक्के परताव्याच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक | पुढारी

0


कराड; पुढारी वृत्तसेवा : प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीत पैसे गुंतवल्यास प्रति महिना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची सुमारे ५० लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २२ ते मे २३ या कालावधीमध्ये ही घटना घडली. यामुळे कराडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हणमंत भगवान लोखंडे (रा. बहे-तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली), प्रमोद बाळू लोंढे (रा. मुंढे, ता. कराड) व प्रकाश सदाशिव नायकवडी (रा. विंग, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शहाजी गणपती पाटील (रा. बहे-तांबवे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तांबवे येथील शहाजी पाटील यांना गावातीलच हणमंत लोखंडे याने चार टक्के परतावाच्या अश्वासनाने काही रक्कमेची मागणी केली. यावेळी त्याने पाटील यांना, ”मी प्राईमबुल्स मल्टीकॉन या कंपनीत डायरेक्टर पदावर आहे. तुम्ही जी रक्कम गुंतवणार त्याचे मला दोन टक्के कंपनीकडून कमिशन मिळते व तुम्हाला चार टक्के परतावा मिळणार आहे. तसेच तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील तर तुम्ही कर्ज काढून पैसे भरा फायदा मिळेल. तसेच सदर रकमेचे एक वर्षानंतरचे चेक तुम्हाला देणार असल्याने मूळ रकमेची पूर्ण खात्री आहे,” असे सांगितले. त्यानंतर लोखंडे हा शहाजी पाटील यांना घेऊन मलकापूर तालुका कराड येथील कृष्णा हॉस्पिटलसमोर असलेल्या प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला‌‌. याठीकाणी शहाजी पाटील यांची प्रमोद लोंढे व प्रकाश गायकवाड यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी त्यांनीही शहाजी पाटील यांना तुम्हाला चार टक्के परतावा मिळेल निर्धास्त रहा, असे सांगितले.

शहाजी पाटील यांची गुंतवणूक

शहाजी पाटील यांनी हणमंतसह इतर काही लोकांवर विश्वास ठेवून पाच लाख रुपये कर्ज काढून त्यातील दोन लाख दहा हजार रुपये प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवले. त्यावेळी लोखंडे याने सदर रकमेचा प्रमोद लोंढे यांच्या अकाउंटचा चेक शहाजी पाटील यांना दिला. पुन्हा शहाजी पाटील यांनी पत्नी राजश्री पाटील हिच्या नावावर तीन लाख 80 हजार रुपये कर्ज काढले व ती सर्व रक्कम प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवली. या रकमेचा देखील चेक लोखंडे याने पाटील यांना दिला. तसेच या रकमेचे चार ते पाच हप्ते पाच टक्के परताव्याने शहाजी पाटील यांच्या बँक खात्यावर जमा केले.

परतावा मिळणे बंद झाल्यानंतर शहाजी पाटील आक्रमक

पैसै देण्याचे आणि परतावा देण्याचे हे सत्र ऑक्टोबर 2022 पर्यंत चालू होते. मात्र त्यानंतर लोखंडे यांच्याकडून पाटील यांना कोणताही परतावा देणे बंद झाले. त्यामुळे शहाजी पाटील यांनी लोखंडे, लोंढे व गायकवाड यांना याबाबत विचारणा केली असता मार्केट डाऊन आहे नंतर पैसे मिळतील, सहा महिने थांबा असे सांगण्यास सुरुवात केली. एक वेळ शहाजी पाटील यांनी मलकापूर येथे ऑफिसमध्ये जाऊन संबंधितांची भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी काळजी करू नका तुम्हाला तुमच्या रकमेचा परतावा मिळेल असे सांगितले. त्यानंतर शहाजी पाटील यांनी जानेवारी 2023 मध्ये त्यांना दिलेला चेक वटविण्यासाठी बँकेत गेले असता प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी तपास करीत आहेत.

आणखी काही जणांची फसवणूक

दरम्यानच्या कालावधीत आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची माहिती शहाजी पाटील यांना समजली. त्यानुसार विश्वास निवृत्ती मोहिते (3 लाख 10 हजार), मालोजी तातोबा सरगर (20 हजार), वसंतराव रामचंद्र देशमुख (2 लाख 10 हजार, सर्व रा. बहे-तांबवे, या. वाळवा, जि. सांगली) तसेच विनायक शिवाजी तोडकर (5 लाख 10 हजार) अक्षयकुमार बाळासाहेब पाटील (14 लाख 10 हजार) यांचीही फसवणूक झाली आहे. तर अमोल आनंदराव देसाई, सुयश उल्हास देसाई (दोघेही रा. वाठार, ता. कराड) यांचीही अनुक्रमे 12 लाख व 1 लाख रुपयांची, शैलेश परशुराम चव्हाण (रा. कार्वे नाका, कराड) व इतरांनी फसवणूक केल्याचे शहाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे फसवणुकीचा एकूण आकडा 49 लाख 50 हजार एवढा मोठा होत असल्याने खळबळ उडाली आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

दरम्यान, याबाबत माहिती घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. तपासी अधिकारी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता मी बाहेरगावी आहे, कार्यक्रम असल्याने दोन दिवस येणार नाही, आल्यानंतर भेटू, रविवारी येणार आहे, नाईट ड्युटी केली आहे, सायंकाळी पाच वाजता भेटू, दिवसभर न्यायालयात होतो अशी वेगवेगळी कारणे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. फसवणुकीचा एवढा मेजर प्रकार असतानाही त्याबाबतची माहिती देण्यास का टाळाटाळ केली जात होती, हे समजून येत नाही.



Source link

Ask SRK: शाहरुखच्या ‘जवान’ची सगळ्यांनाच उत्सुकता; चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना किंग खान म्हणाला…

0
Ask SRK: शाहरुखच्या ‘जवान’ची सगळ्यांनाच उत्सुकता; चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना किंग खान म्हणाला…


Shah Rukh Khan Ask SRK: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर अनेकदा ‘आस्क एसआरके’ सेशन आयोजित करतो. नुकतेच किंग खानने पुन्हा एकदा हे सत्र आयोजित केले होते आणि चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली. या सेशनदरम्यान एका यूजरने शाहरुखला एक प्रश्न विचारला की, ‘माझ्या एका मित्राला तुमच्यावर क्रश आहे, मी काय करू सर?’ यावर उत्तर देताना शाहरुखने म्हटले की, ‘यात तू काय करणार आहेस? मला सांग मी आता काय करू?’. दुसर्‍या एका यूजरने विचारले की, डंकीबद्दल सर्वात आव्हानात्मक गोष्ट कोणती आहे? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, ‘राजूला चित्रपटातील सर्व दिग्गज कलाकारांना घेऊन एक विश्व निर्माण करायचे आहे.’ राजू म्हणजेच राजकुमार हिरानी ज्यांनी ‘डंकी’चे दिग्दर्शन केले आहे.



Source link

Koyna Dam Water Level : कोयना धरणामध्ये फक्त 12 टक्के पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचं शासनाचं आवाहन

0



<p>कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे कोयना धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाले असून सांगलीतील नदीचे पात्र कोरडे पडले आहे… त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलंय.. कृष्णा नदीतील पाणी साठा कमी होऊ लागल्याने सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या पाणीपुरवठयावर देखील परिणाम होत आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Prabhu Deva: वयाच्या ५०व्या वर्षी बाबा बनला प्रभूदेवा; दुसऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म!

0
Prabhu Deva: वयाच्या ५०व्या वर्षी बाबा बनला प्रभूदेवा; दुसऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म!


Prabhu Deva becomes father: प्रभूदेवा चौथ्यांदा बाबा बनला आहे. वयाच्या ५०व्या वर्षी प्रभूदेवाच्या घरी चिमुकला पाहुणा आला आहे.



Source link

Spider man: ‘स्पायडरमॅन’ चित्रपटाला या मराठमोळ्या कलाकाराने दिला आवाज

0
Spider man: ‘स्पायडरमॅन’ चित्रपटाला या मराठमोळ्या कलाकाराने दिला आवाज


रेडिओ जॉकी, डबिंग या प्रवासात स्वतःला सिद्ध केल्यानंतर ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ या अॅनिमेशनपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका मोठ्या हॉलीवूडपटाच्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद सचिन सुरेश याने व्यक्त केला. ‘प्राईम फोकस टेक्नॉलॉजी’ ने माझ्यावर विश्वास दाखवत ही संधी मला दिली, माझ्यासाठी हा वेगळा आणि थ्रिलिंग अनुभव होता. डबिंग ते मिक्सिंग अशी सर्व जबाबदारी सांभाळत महिन्याभरात आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे सचिन सांगतात.



Source link

Naseeruddin Shah: ‘आता सुळावर चढवणार का?’; ट्रोल झाल्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी मागितली माफी

0
Naseeruddin Shah: ‘आता सुळावर चढवणार का?’; ट्रोल झाल्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी मागितली माफी


नुकताच नसीरुद्दीन शाह यांनी दावा केला होता की, पाकिस्तानमध्ये सिंधी भाषा बोलली जात नाही. आता त्यांनी माफी मागत त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘ठीक आहे, मी पाकिस्तानातील संपूर्ण सिंधी भाषिक लोकांची माफी मागतो, जे माझ्या चुकीच्या मतामुळे खूप दुखावले गेले आहेत. मी मान्य करतो की, मला चुकीची माहिती देण्यात आली होती. परंतु यासाठी मला आता सुळावर चढवणार आहात का? येशूने म्हटल्याप्रमाणे, ‘त्याला मुक्त होऊ द्या…’. किंबहुना, अनेक वर्ष स्वतःला एक हुशार माणूस म्हणवून घेतल्यानंतर, मला ‘अज्ञानी’ आणि ‘दांभिक बुद्धीवादी’ म्हणवून घेणे खूप मनोरंजक वाटते. हाच तर बदल आहे.’



Source link

Gadar 2 Teaser OUT: पाकिस्तानचा जावई बनलेला तारा सिंह हुंड्यात मागतोय लाहोर! ‘गदर २’चा टीझर पाहिलात?

0
Gadar 2 Teaser OUT: पाकिस्तानचा जावई बनलेला तारा सिंह हुंड्यात मागतोय लाहोर! ‘गदर २’चा टीझर पाहिलात?


या टीझरची सुरुवात एका संवादाने होते. ‘तो पाकिस्तानचा जावई आहे. त्याला नारळ द्या आणि टिळा लावा. अन्यथा, यावेळी तो हुंड्यात लाहोर घेऊन जाईल’, हा संवाद ऐकू येतो. यानंतर तारा सिंहची जबरदस्त एन्ट्री होते, जो अतिशय रागात दिसत आहे. यानंतर तारा सिंह बैलगाडीचे चाक उखडून हवेत फिरवताना दिसत आहेत. हा सीन पाहता ‘गदर २’मध्ये चाहत्यांना ‘गदर’पेक्षा जास्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत, असा अंदाज बांधला जात आहे.



Source link

Gamadpanthi: चिकूला किडनॅप करण्याचे प्लॅनिंग का होत आहे? शुक्रवारी उलगडणार रहस्य

0
Gamadpanthi: चिकूला किडनॅप करण्याचे प्लॅनिंग का होत आहे? शुक्रवारी उलगडणार रहस्य


मागील भागांमध्ये आपल्याला सरळ साध्या चिकूला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी हनी पाहिली. हनीच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या चिकूला किडनॅप करण्याचे प्लॅनिंग होत असतानाच त्यात अनेकांचे गेम होत आहेत. आता हे किडनॅपिंग का होत आहे? आणि या किडनॅपिंगच्या जाळ्यात कोण कोण अडकणार? हे येत्या शुक्रवारी म्हणजेच ९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, दि फिल्म क्लिक स्टुडिओज निर्मित, संतोष कोल्हे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



Source link

The Archies: ‘द आर्चिज’ चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज; शाहरुख खानच्या लेकीने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

0
The Archies: ‘द आर्चिज’ चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज; शाहरुख खानच्या लेकीने वेधलं साऱ्यांचं लक्ष!


The Archies News Poster Out: गेल्या काही महिन्यांपासून ‘द आर्चिज’ या चित्रपटची जोरदार चर्चा सुरू आहे. या एकाच बॉलिवूड चित्रपटातून ३ स्टारकिड्स एकत्र मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. अभिनेत्री खुशी कपूर हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या चित्रपटाचं एक नवं शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या शेजारी पोज देताना दिसली आहे. तर, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर केसांना वेगळा रंग देऊन खाली बसलेली दिसत आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून खुशी कपूरने हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.



Source link