Monday, July 6, 2026
Home Blog Page 3015

Kangana Ranaut: “रणबीर कपूर दुर्योधन तर करण जोहर शकुनी”, कंगना रणौत का संतापली?

0
Kangana Ranaut: “रणबीर कपूर दुर्योधन तर करण जोहर शकुनी”, कंगना रणौत का संतापली?


पुढे तिने, “मी या गोष्टी तुमच्यासमोर आणत आहे, त्यामुळे माझ्या चित्रपटांविरोधात एक पीआर टीम काम करत आहे. पण, आज मी शपथ घेते की, जेव्हा जेव्हा मी सत्य बाहेर आणण्याच्या स्थितीत असेन तेव्हा मी ते नक्कीच उघड करेन. हे लोक डार्क वेब, हेरगिरी, हॅकिंग अशा कोणत्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत, हेही सर्वांना सांगेन. मी बऱ्याच काळापासून याबद्दल बोलत आहे. आता यांचे स्वत:चे करिअर बुडत असल्याने त्यांनी इतरांऐवजी आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. नाहीतर या इंडस्ट्रीत या लोकांसोबत काम करणं खूप कठीण झालं असतं.”



Source link

Zara Hatke Zara Bachke: बॉक्स ऑफिसवर दिसली विकी-साराची जादू; ‘जरा बचके जरा हटके’ची छप्परफाड कमाई!

0
Zara Hatke Zara Bachke: बॉक्स ऑफिसवर दिसली विकी-साराची जादू; ‘जरा बचके जरा हटके’ची छप्परफाड कमाई!


Zara Hatke Zara Bachke Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.



Source link

सातारा जिल्ह्याची बालकामगार मुक्तीकडे वाटचाल | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  बाल कामगार कायदा होवून 37 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, याची सुरूवातीच्या काळात प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने बालकामगारांची संख्या जास्त होती. मात्र, अलीकडच्या काळात गांभीर्याने सरकारने उपाययोजना केल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. सातारा जिल्ह्यातही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने गत काही वर्षात 100 हून अधिक धाडी टाकल्या. यामध्ये केवळ 3 बालकामगार आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची बाल कामगार मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.

बालकामगार कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, पूर्वी या कायद्याची अपेक्षित जनजागृती नसल्याने मुले शिक्षण सोडून कामाला जात होते. अलीकडच्या काळात मात्र सहयक कामगार आयुक्त कार्यालयाकडून बालकामगार कायद्याची जनजागृती करून कडक कारवाई केली. या कार्यालयाकडून टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये केवळ 3 बालकामगार आढळले. त्यांचेही प्रबोधन करण्यात आले आहे.

कायदा काय सांगतो

  •  14 वर्षांखालील काम करणारी मुले बालकामगार असतात
  •  14 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवू नये
  • 14 वषार्र्ंखालील मुलांना कामावर ठेवल्यास 1 वर्षाचा तुरूंगवास व दंड
  •  परिस्थितीमुळे अशी कामे मुले करत असल्यास रात्रीच्या वेळची कामे देवू नये

बालकामगार रोखण्यासाठी उपाययोजना

  •  सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून जनजागृती करणे
  •  बाल कामगारांना शिक्षणास प्रोत्साहित करणे
  • सातत्याने बालकामगार काम करतील अशा ठिकाणांची पाहणी करणे
  • व्यवसायिकांवर कठोर कारवाई करणे
  •  बालकामगार निर्माण होवूच नये यासाठी आराखडा तयार करणे

जिल्ह्यात बालकामगारांची संख्या कमी झाली आहे. मुलांसाठी शिक्षण मोफत असून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यामुळे मुलांना शिकवण्याकडे कल वाढू लागला आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडूनही बालकामगार मुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.
-रेवणनाथ भिसले, सहाय्यक कामगार आयुक्त











Source link

Avika Gor: साऊथ इंडस्ट्री म्हणजे नेपोटीझमचं दुकान!; ‘बालिका वधू’ अविका गौर असं का म्हणाली?

0
Avika Gor: साऊथ इंडस्ट्री म्हणजे नेपोटीझमचं दुकान!; ‘बालिका वधू’ अविका गौर असं का म्हणाली?


अभिनेत्री अविका गौर हिची दुसरी मालिका ‘ससुराल सिमर का’ देखील सुपरहिट ठरली होती. अविका गौरने टीव्ही मालिकांसोबतच फिल्मी दुनियेतही पाऊल ठेवले. अविकाने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, अविकाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना नेपोटीझमचे गंभीर आरोप केले आहेत. सिद्धार्थ कन्ननच्या शोमध्ये बोलताना अविका गौरने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला नेपोटीझमचे दुकान असे म्हटले आहे. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, लोकांना वाटतं फक्त बॉलिवूडमध्येच नेपोटीझम आहे. पण तसं नसून साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील नेपोटीझम आहे.’



Source link

सातारा : कोयनेचा बहुतांशी भाग पडला कोरडा | पुढारी

0









पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  कोयना धरणातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालली आहे. एका बाजूला कोयना जलविद्युत निर्मितीपैकी कोयना चौथा टप्पा हळूहळू पाण्याअभावी अडचणीत येत असतानाच पोफळी येथील टप्पा एक व दोनसाठी पाणीपुरवठा करणारा इंटक टनेलसुद्धा पाण्याअभावी अडचणीत येऊ लागला आहे. धरणालगतच्या अगदी शासकीय लाँचेसदेखील पाण्याअभावी गाळात अडकल्या असून बहुतांशी विभाग आता पाण्याअभावी आटलेला पाहायला व कोरडा पडलेल्या पाहायला मिळत आहे.

कोयना धरणात सध्या उपयुक्त सरासरी सात टीएमसी पाणीसाठा आहे. या पाण्यावर पाऊस पडेपर्यंत सिंचनासह जलविद्युत निर्मितीची प्रमुख जबाबदारी आहे. वास्तविक सध्या धरणाच्या पायथा वीज गृहातून पूर्वेकडे सिंचनासाठी अव्याहतपणे पाणी सोडणे सुरूच आहे. त्यामुळे पूर्वेकडील सिंचनाची मागणी लक्षात घेता त्याचे परिणाम पश्चिमेकडील पोफळी अलोरे, कोयना चौथा टप्पा या जलविद्युत निर्मितीवर होऊ लागल आहे. कोयना चौथा टप्पा हा तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा असला तरी पाण्याअभावी सध्या यातून तुरळक वीज निर्मिती करण्यात येत आहे. पोफळी, अलोरे प्रकल्पानांदेखील अपेक्षित पाणीपुरवठा करणे आता हळूहळू अशक्य बनत चालले आहे.

धरणातील एकूण पाण्याचा विचार करता यापुढे जलविद्युत निर्मिती ही अधिकाधिक अडचणीची होत असताना पूर्वेकडे सिंचनाचा पाणी प्रश्नही काही दिवसानंतर गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यासाठी आता तातडीने अपेक्षित पाऊस पडणे ही अत्यंत गरजेचे बनले आहे.

दरम्यान, धरणाची जलपातळी 618 मीटरवर गेल्यानंतर जलविद्युत निर्मितीचा महत्त्वाचा एक हजार मेगॅवॅट क्षमतेच्या कोयना चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती बंद पडणार आहे. यासाठी आता केवळ दोन मीटर इतकीच जलपातळी शिल्लक असल्याने लवकरच हा संभाव्य धोका देखील सार्वत्रिक घोंगावत आहे.











Source link

सातारा : धारदार शस्त्र नव्हे तर ‘खटक्यावर बोट’चे आकर्षण | पुढारी

0


कराड; अमोल चव्हाण : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे अवैध पिस्तूल येतात कोठून? याचा तपास आजपर्यंत मुळापर्यंत गेलाच नाही. त्यामुळेच दिवसेंदिवस अवैध पिस्तूल बाळगणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यातूनच मग गुन्हेगार लाठीकाठी, चाकू, तलवार यासह धारदार शस्त्रांऐवजी आता अवैध पिस्तूल जवळ बाळगून खटक्यावर बोट ठेवण्याचे आकर्षण त्यांच्यामध्ये वाढू लागले आहे. गुन्हेगारांचा हा बदलता ट्रेंड भविष्यासाठी धोकादायक आहे. याचा विचार करून पोलिसांनी अवैध पिस्तूल येते कुठून? ते पुरवत कोण? उत्पादन कोठे होते? त्याला अर्थ पुरवठा कोण करतो? या सर्व बाबींची माहिती घेऊन त्याच्या मुळावरच घाव घालने गरजेचे आहे. तरच या प्रकरणाला आळा बसेल अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे हा प्रकार भविष्यातही असाच सुरू राहील.

जिल्ह्यात सर्वात जास्त कराड उपविभागात अवैध पिस्तूल बाळगणार्‍यांची संख्या असल्याचे आजवर झालेल्या कारवायांवरून स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी 26 मार्च रोजी राजमाची ता. कराड येथे झालेली कारवाई तर राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी कारवाई होती. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने दहा जणांना पकडून त्यांच्याकडून 14 पिस्तूल व 20 काडतुसे जप्त केली होती. ही कारवाई खरोखरच गुन्हेगारांवर वचक ठेवणारी होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईनंतर अवैध पिस्तूल बाळगणार्‍यांवर वचक बसेल असे वाटत होते. कराड शहर व परिसरात त्या दृष्टीने गुन्हेगारांमध्ये वचक बसल्याचे काही प्रमाणात दिसूनही आले. अवैध पिस्तूल जवळ बाळगल्यास पोलीस कारवाई करतात, हा संदेश गुन्हेगारी क्षेत्रात फिरू लागला. त्यामुळे शहरी भागातील अवैध पिस्तूल बाळगणे, त्याची खरेदी-विक्री करण्याचे लोन काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत असले तरी ते लोन हळूहळू ग्रामीण भागात पसरू लागले. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले.

कराडचा पदभार स्वीकारल्यानंतर डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी प्रथम त्या दृष्टीने माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसारच त्यांना कराडच्या ग्रामीण भागातून येऊन अवैध पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने कराड शहरात काही जण फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसारच मग शनिवारी पोलिसांनी बस स्थानक परिसरात अवैध पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या वाघेश्वर मसूर तालुका कराड येथील युवकाला अटक केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस आणखीही एक दोघांना ताब्यात घेतील. मात्र भविष्यात अशा स्वरूपाच्या घटना घडणारच नाहीत त्या दृष्टीने डीवायएसपी अमोल ठाकूर काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

गुन्हेगारी घटना घडत असताना अनेक वेळेला लाठ्या, काठ्या, चाकू, कोयता, तलवार अशा हत्यारांचा वापर होत होता. परंतु अलीकडे रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह गुंडांच्या कमरेला पिस्तूल दिसू लागली आहेत. बेकायदा पिस्तूल जवळ बाळगून त्याचा धाक दाखवत अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. अवैध पिस्तूल जवळ बाळगून कराड शहर व परिसरात गुंडांनी हल्ले केल्याचे यापूर्वी अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळेच एखादी गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलिस त्याबाबत कारवाया करतात; पण त्याचे पुढे काय होते हे समजत नाही.

‘त्या’प्रकरणाचे पुढे काय झाले?

कराड तालुक्यातील राजमाची येथे एकाच वेळी कारवाई करून दहा संशयतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 14 अवैध पिस्तूल व वीस काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले होते. त्यानुसार तपास करत असताना पोलिस पिस्तूल बनवत असलेल्या मध्यप्रदेशातील ठिकाणापर्यंत पोहोचले. अवैध पिस्तूल पुरवणार्‍याची माहिती मिळवली. परंतु तो सापडत नाही, त्याचा शोध सुरू आहे, एवढेच पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची कारवाईही थांबली की काय? त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.



Source link

वारकर्‍यांवरील लाठीहल्ला क्लेशदायक : अजित पवार | पुढारी

0









सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला गौरवशाली पंरपरा आहे. देश-विदेशातून या सोहळ्यासाठी भाविक येतात. पालखी सोहळ्याच्या इतिहासात लाठीमाराची घटना कधीच घडली नव्हती. वारकर्‍यांचे सोहळ्यासाठी नेहमीच सहकार्य असते. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळेच ही घटना घडली असून, वारकर्‍यांवर झालेला लाठीहल्ला क्लेशदायक असल्याची खंत राज्याचे विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी सातार्‍यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

आ. अजित पवार म्हणाले, मी साडेबारा वर्षे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. पालखी सोहळ्याच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. पालखी सोहळ्याच्या नियोजनाला वारकर्‍यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियोजन बैठक घ्यायचो. योग्य नियोजनातून काम केल्यास असले प्रकार घडत नाहीत.

आळंदी येथे वारकर्‍यांवर झालेला लाठीहल्ला ही गोष्ट माझ्यासाठी क्लेशदायक आहे. आषाढी वारीला गौरवशाली पंरपंरा आहे. या पालखी सोहळ्याला देशविदेशातून भाविक सहभागी होत असतात. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळेच हे घडले असावे. ही घटना मनाला चीड आणणारी आहे. हा लाठीहल्ला करणार्‍या सरकारचा मी तीव्र निषेध करतो. या प्रकरणात सरकार व पोलिस प्रशासनाने लक्ष घालून संबंधितावर कारवाई करावी. या घटनेची सखोल चौकशी करावी. पुन्हा कदापीही अशी घटना घडू नये यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असेही आ. अजित पवार म्हणाले.











Source link

केंद्रातील राजकारणात मला रस नाही : अजित पवार | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  माझ्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. पक्षाचे विविध दौरे, पक्षीय अधिवेशने व कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर फिरत असून, मी माझी जबाबदारी पार पाडतच आहे. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामाची पद्धत यात बराच फरक आहे. मला
केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नसून, राज्यात काम करणार असल्याची स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, सातारा लोकसभेला कोण उमेदवार हे इतक्यात सांगता येणार नाही. अनेक उमेदवार आमच्यासमोर आहेत. कोणी गेले म्हणून पक्ष संपत नाही. जिल्ह्यातील काही ठिकाणी नवीन नेतृत्व उभे करू. कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप व्हायचे आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवारच येथून विजय होईल, असे अजितदादांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आ. अजित दादा म्हणाले, माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत नाराजीच्या बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडण करायचे व काय झाले हे सांगण्यातच माझा जास्त वेळ जात आहे.
भाकरी फिरवण्याबाबत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेबाबत आ. अजितदादा म्हणाले, त्यांना काय म्हणायचे हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीला काय करायचे आहे ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ठरवतील. पवार साहेब पुन्हा काहीही बोलले नाहीत. हा प्रश्न पक्षांतर्गत आहे. भाजपने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. विरोधकांकडून होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर ते म्हणाले, प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचे काम करतो. सरकार असते त्या पक्षात अनेकजण जातात. सातार्‍यातील काही आमदार भाजपमध्ये गेले, सरकार आल्यावर तुम्हाला मंत्री, पालकमंत्री करू अशा आणाभाका सांगून त्यांना गळाला लावले जाते.

भाजपचे सोडून गेलेले नेते तुमच्या संपर्कात आहेत काय? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना कुणी काही काम घेवून आले तर पक्षाच्या नजरेतून न पाहता प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय एकमेकाचे दुष्मन नाही. 16 आमदार अपात्र होवूनही आमदारांचे संख्याबळ सत्ताधार्‍यांकडे असल्याने सरकार कोसळणार नाही. याबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी आहे. एखाद्या आमदाराने मुदत मागितली तर सुनावणीलाच वर्ष जाईल. पक्षांतर बंदी कायद्यानुसार काय निर्णय द्यायचा याबाबत विधानसभेचे अध्यक्षच अधिकारवाणीने सांगू शकतील, असेही आ. अजित पवार म्हणाले.

औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर बोलताना अजितदादा म्हणाले, या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधला पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळात अशा घटना घडल्या नाहीत मग हे सरकार आल्यानंतर आताच कशा घडत आहेत? यातून जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे.



Source link

Meera Joshi: ‘अगंबाई अरेच्चा २’मधील अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात

0
Meera Joshi: ‘अगंबाई अरेच्चा २’मधील अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात


मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने कारला तिची मैत्रीण म्हटले आहे. ती व्हिडीओमध्ये बोलत आहे की, “प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण. रात्र-दिवस, ऊन-वारा, पाऊस चढ उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणे पत्करलेस आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस. थँक्यू. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल ९० हजार मैलांचा आपला प्रवास. गमावले ना मी तुला. आता विश्रांती घे.”



Source link

Adipurush: प्रदर्शनापूर्वीच आदिपुरुष चित्रपटाची बक्कळ कमाई, जोरदार अडवान्स बुकींग सुरु

0
Adipurush: प्रदर्शनापूर्वीच आदिपुरुष चित्रपटाची बक्कळ कमाई, जोरदार अडवान्स बुकींग सुरु


ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला’आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणाची आधुनिक आवृत्ती असणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे बजेट जवळपास ५०० कोटी आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.



Source link