Monday, July 6, 2026
Home Blog Page 3010

सातारा : पोवई नाका सुशोभीकरणाचा वाद पेटला | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पोवईनाका सुशोभीकरणाचा वाद पेटला असून आज विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पोवईनाका नामांतराला तीव्र विरोध दर्शवला. तर जनतेच्या अस्मितेवर घाला घातल्यास हाणून पाडू अशा शब्दांत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले फेसबुकवरून गरजले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंत शेलार यांनी पाठवलेल्या पत्रकात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारकरूपी आयलँड पोवईनाक्यावरील इतर परिसरात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सातार्‍यातील पोवईनाका-शिवतीर्थ परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक विकसित करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याबाबत ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दि. 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बोलावलेल्या बैठकीत आढावा घेण्यात येणार असून संबंधित अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवतीर्थाच्या कामावरून अगोदरच दोन राजांमध्ये श्रेयवाद उफाळला असतानाच पोवई नाक्यावरील सुशोभीकरणाचा हा वाद समोर आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

पोवईनाका परिसरात अन्य काही नको, अशी आक्रमक भूमिका राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी घेऊन शिवतीर्थ परिसराची पाहणी केली. याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

उदयनराजे फेसबुकवरून गरजले

शिवप्रभूंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारूपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभूंपेक्षा दिगंत किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करू नये. अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हीन प्रकार करत असेल तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. खा. उदयनराजे म्हणालेत, सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक आहे. या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि नगर परिषदेच्या माध्यमातून चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांनाच शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी अन्य काही महापुरूषांचे स्मारक किंवा आयलँड करण्याचा कोणी घाट घालत असेल तर जनतेच्या अस्तितेवरील तो घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभूंचे कर्तृत्व झाकोळले जाईल असे कोणी काही करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल. लोककल्याणकारी शिवप्रभूंची तुलना अन्य कुणाशी होऊ शकणार नाहीच आणि तसा प्रयत्नही कुणी करू नये, अशी माफक अपेक्षा आहे, असेही खा.उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनीही पत्रकाद्वारे सुशोभिकरणाच्या मुद्दाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शिवतीर्थ हा परिसर वगळता पोवईनाक्याचा परिसर खूप मोठा व विस्तृत आहे. त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा स्मारकरूपी आयलँड विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आढावा बैठक लावण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिलेली आहे. पोवई नाक्यावरील शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारे लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याचा कोणताही विचार नाही.

याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंत शेलार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील शिवतीर्थ हे सातारकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत असून याबाबत संपूर्ण सातारकरांच्या आदराच्या भावना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ स्मारकात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक तयार करणे असे कोणतेही काम प्रस्तावित नाही. जिल्हाधिकार्‍यांना पालकमंत्र्यांच्या कार्यालयाने कळवलेल्या पत्रामध्ये पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने नवीन आयलँड तयार करण्याबाबत बैठक आयोजित करण्याविषयी नमूद केले आहे. या बैठकीत पोवईनाका परिसरात शिवतीर्थ स्मारक सोडून इतर ठिक़ाणी आयलँड विकसित तयार करण्यासाठीचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवतीर्थाला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याबाबतचा कोणताही विचार अथवा प्रस्ताव प्रस्तावित नाही. शिवतीर्थ हा परिसर वगळता पोवई नाक्याचा इतर परिसर हा खूप मोठा व विस्तृत आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकरूपी आयलँड विकसित करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, पोवईनाक्यावरील नव्या चौकाला सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दिशा मंचचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, मनसेचे शहराध्यक्ष राहूल पवार, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, आपचे सागर भोगावकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना, हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी या प्रक्रियेस विरोध दर्शवला आहे.



Source link

Shah Rukh Khan: चाहतीने शाहरुख खानला जवळ खेचलं अन् जबरदस्ती चुंबन घेतलं! Video Viral

0
Shah Rukh Khan: चाहतीने शाहरुख खानला जवळ खेचलं अन् जबरदस्ती चुंबन घेतलं! Video Viral


शाहरुख खान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता चाहते आणि नेटकरी चांगलेच संतापले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘जर एखाद्या मुलाने हे कृत्य केले असते, तर लोक त्याला काय म्हणाले असते माहीत नाही’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘या महिलेने शाहरुखला किस करण्यापूर्वी परवानगी घेतली होती का?’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘जर एखाद्या पुरुषाने अनेक महिला अभिनेत्रींसोबत हेच कृत्य केले असते, तर चांगलाच गोंधळ झाला असता.’



Source link

Sharda Rajan: ७०च्या दशकात स्वतःचा पॉप अल्बम काढणाऱ्या गायिका शारदा राजन यांचे निधन

0
Sharda Rajan: ७०च्या दशकात स्वतःचा पॉप अल्बम काढणाऱ्या गायिका शारदा राजन यांचे निधन


यासोबतच शारदा यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली होती. जवळपास सर्व संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले होते. त्याच वेळी, ७०च्या दशकात पॉप अल्बम लॉन्च करणाऱ्या शारदा राजन या पहिल्याच गायिका होत्या. यानंतर त्यांनी संगीत दिग्दर्शनाकडे वाटचाल केली होती. शारदा राजन नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहायच्या. पण, त्या ट्विटरवर खूप सक्रिय होत्या आणि जुन्या दिवसांच्या आठवणी त्या प्रेक्षकांसोबत आणि चाहत्यांसोबत शेअर करायच्या. शारदा राजन यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.



Source link

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियानंतर विजय वर्माने देखील दिली प्रेमाची कबुली; म्हणाला…

0
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियानंतर विजय वर्माने देखील दिली प्रेमाची कबुली; म्हणाला…


Tamannaah Bhatia-Vijay Varma Affaire: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने नुकतेच अभिनेता विजय वर्मासोबतच्या तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते.



Source link

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभागी होणार ‘हे’ कलाकार; समोर आली यादी!

0
Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभागी होणार ‘हे’ कलाकार; समोर आली यादी!


‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी जिओ सिनेमा अॅपवर एक व्हिडीओ जारी करून स्पर्धकांची पहिली झलक दाखवली. मात्र, यात त्यांनी कोणाचेही नाव व चेहरा उघड केलेला नाही. तर, यादरम्यान आता स्पर्धकांच्या नावांची यादीही समोर आली आहे. बिग बॉसशी संबंधित क्षणोक्षणीच्या अपडेट देणाऱ्या ‘BiggBoss_Tak’ या ट्विटर अकाउंटवरून स्पर्धकांची यादी शेअर करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, अविनाश सचदेव, आकांक्षा पुरी, जिया शंकर, नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया, पुनीत सुपरस्टार, बबिका धुर्वे, फलक नाज, मनीषा राणी, अभिषेक मल्हान, पलक पुरस्वानी, श्रुती सिन्हा असे स्टार्स दिसणार आहेत.



Source link

Navya Naveli Nanda Affaire: हातात हात घालून बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत डेटवर निघाली बिग बींची नात!

0
Navya Naveli Nanda Affaire: हातात हात घालून बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत डेटवर निघाली बिग बींची नात!


Navya Naveli Nanda Affaire Video: नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आता नव्याचं नाव बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत जोडले जात आहे.



Source link

Suriaya Birthday: देवानंद यांच्याशी लग्नगाठ बांधणार होत्या अभिनेत्री सुरैया! ‘या’मुळे आलं होतं प्रेमकथेत विघ्न

0
Suriaya Birthday: देवानंद यांच्याशी लग्नगाठ बांधणार होत्या अभिनेत्री सुरैया! ‘या’मुळे आलं होतं प्रेमकथेत विघ्न


शेवटच्या भेटीवेळी देवानंद यांनी सुरैया यांच्या घरी फोन केला होता. तो फोन सुरैया यांच्या आईने उचलला. सुरैयाच्या आईने त्यांना सांगितले की, सुरैयाला त्यांना भेटायचे होते आणि त्यांनाही भेटायचे असेल, तर दुसऱ्या दिवशी त्यांनी घराच्या छतावर वेळेत पोहोचावे. देवानंद यांना सुरैया यांना भेटायचे होते. मात्र, घराच्या टेरेसवर भेताचे हे ऐकून ते थोडेसे गांगरून गेले होते. त्यांना वाटले की, ‘हा मला अडकवण्याचा हा कट आहे का? मी पकडला गेलो तर? दुसऱ्या दिवशी ही बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होईल. मला अटकही होऊ शकते.’ मात्र, सुरैया यांच्या आईवर विश्वास ठेवत देवानंद तिथे पोहोचले. पण, त्यांनी सोबतीला एका पोलीस असणाऱ्या मैत्रिणीला घेऊन गेले होते. या भेटीनंतर त्यांच्यातील नाते तिथेच संपले.



Source link

शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  एस. टी. महामंडळाच्या विलीनीकरणाची आवई शरद पवार यांनीच उठवली. इतरांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची त्यांची सवय आहे. सातार्‍यातसुद्धा त्यांनी हेच केले. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. या व्हायरसचा प्रसार थांबला पाहिजे, अशी जोरदार टीका अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी केली.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत एस. टी. कष्टकरी पॅनेलच्या प्रचारासाठी बुधवारी सातार्‍यात आले. यावेळी त्यांनी सातारा बसस्थानकात चक्क बुलेटवर पत्नीसह फेरफटका मारला. यावेळी सातारा बसस्थानकातील कर्मचार्‍यांशी संवाद साधला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अ‍ॅड. सदावर्ते म्हणाले, महाराष्ट्रात सर्व वर्गात मागासलेपणा आहे. त्यासाठीच ईडब्ल्यूएसची तरतूद आहे. शरद पवारांनी त्यातही राजकारण केले. ज्या गोष्टी देणे शक्य नाही ते देण्याची आशा दाखवली. हा सर्व प्रकार म्हणजे त्यांच्या राजकारणाचा भाग होता.











Source link

Koyana Dam: कोयना धरणात फक्त 12 टीएमसी पाणी साठा शिल्लक

0



<p>Koyana Dam: कोयना धरणात फक्त 12 टीएमसी पाणी साठा शिल्लक</p>



Source link

Tu Chal Pudha: आईच्या विरोधात उभी ठाकणार मयुरी! ‘अश्विनी’ ब्युटी पार्लरही उद्ध्वस्त करणार?

0
Tu Chal Pudha: आईच्या विरोधात उभी ठाकणार मयुरी! ‘अश्विनी’ ब्युटी पार्लरही उद्ध्वस्त करणार?


मयुरीने प्रतीकला भेटू नये यासाठी तिने तिचा मोबाईल देखील काढून घेतला होता. अश्विनीने तिला घरातच कोंडून देखील ठेवले. मात्र, यातही प्रतीक मयुरीला भेटण्याचा प्रयत्न करत होता. आपण पळून जाऊन लग्न करू असे बोलून त्याने मयुरीचं मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, मयुरीने यासाठी स्पष्ट नकार दिला. अश्विनीने घातलेल्या अटीमुळे प्रतीक आता शहर सोडून न निघून गेला आहे. याचाच धक्का आता मयुरीला बसला आहे. मयुरी तिची आई अश्विनीवर प्रचंड संतापली असून, ती आता आईविरोधात उभी ठाकणार आहे.



Source link