Monday, July 6, 2026
Home Blog Page 3009

Mithun Chakraborty Birthday: एकेकाळी नक्षलवादी होते मिथुन चक्रवर्ती! ‘त्या’ घटनेमुळे बदललेलं संपूर्ण आयुष्य

0
Mithun Chakraborty Birthday: एकेकाळी नक्षलवादी होते मिथुन चक्रवर्ती! ‘त्या’ घटनेमुळे बदललेलं संपूर्ण आयुष्य


चित्रपटात पदार्पण केल्यानंतर ८०चे दशक त्यांनी चांगलेच गाजवले होते. पण, एक वेळ अशीही आली जेव्हा मिथुनदा यांचे चित्रपट सतत फ्लॉप होऊ लागले. १९९३ ते १९९८पर्यंत त्यांचे सलग ३३ चित्रपट फ्लॉप झाले. पण, सतत फ्लॉप चित्रपट देऊनही त्याचा मिथुन चक्रवर्ती यांच्या स्टारडमवर काहीही परिणाम झाला नाही. या काळातही मिथुन यांनी सलग १२ चित्रपट साईन केले होते. ‘जाग उठा इंसान’ चित्रपटाच्या सेटवर मिथुन दा यांची योगिता बालीशी भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम फुलू लागलं आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केलं.



Source link

Tirthanand Rao:फेसबुक लाइव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया, “मरू द्या त्याला”

0
Tirthanand Rao:फेसबुक लाइव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया, “मरू द्या त्याला”


तिर्थानंदने आत्महत्येचा प्रयत्न करताच पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या गर्लफ्रेंडची चौकशी केली. तिला रुग्णालयात बोलवण्यात आले होते. मात्र तिने नकार दिला. त्यावेळी ती म्हणाली की, “मरू द्या त्याला, असंही मी त्याला सोडून जाणार होते.”



Source link

Tula Shikvin Changla Dhada: अधिपति आणि अक्षरा अडकले बंद खोलीत, मालिकेत नवे वळण

0
Tula Shikvin Changla Dhada: अधिपति आणि अक्षरा अडकले बंद खोलीत, मालिकेत नवे वळण


झी मराठीवर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, आणि प्रेक्षकांनाही पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. ही मालिका आता एका वळणावर पोहोचली आहे. मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: बायको नावाच्या व्यक्तीचा द्वेष का? संजनासोबतचे वागणे पाहून अरुंधती अनिरुद्धवर संतापली

0
Aai Kuthe Kay Karte: बायको नावाच्या व्यक्तीचा द्वेष का? संजनासोबतचे वागणे पाहून अरुंधती अनिरुद्धवर संतापली


ते सगळं ऐकून अरुंधती म्हणते, ‘काय कारण असू शकतं? आई, त्यांनी हेच माझ्या वाढदिवसाला देखील केलं होतं. संजनाला घेऊन आले होते आणि केक कापला होता. बायकोसोबत असंच वागायचं असतं, असं काही आहे का त्यांच्या डोक्यात? अन्याय आणि अपमान सहन करुन नकोस. मी जी चुक केली ती तू करु नकोस. तुझ्याकडे बघून मला बळ मिळालं आहे. तू खचून जाऊ नकोस. आज तुझा वाढदिवस आहे. देवानं तुला चांगलं आरोग्य दिलंय, त्याच्यासाठी आभार त्याचे मान. तुला दु:खी करायचा अधिकार कोणालाही देऊ नको.’



Source link

Rang Maza Vegla: आयेशा दीपाचा जीव घेणार? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये नवा ट्वीस्ट!

0
Rang Maza Vegla: आयेशा दीपाचा जीव घेणार? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये नवा ट्वीस्ट!


‘रंग माझा वेगळा’या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. या लीपनंतर आता मालिकेचं कथानक पुढे गेलं आहे. दिपामुळे आपल्याला शिक्षा झाली, असा गैरसमज झालेला कार्तिक तिच्यावर सूड उगवत आहे. मात्र, याची कल्पना असून देखील दीपा कार्तिकला पुन्हा एकदा त्याचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.



Source link

Rekha: छोट्या पडद्यावरील ‘या’ मालिकेत दिसणार रेखा, जाणून घ्या मालिकेविषयी

0
Rekha: छोट्या पडद्यावरील ‘या’ मालिकेत दिसणार रेखा, जाणून घ्या मालिकेविषयी


‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका आता एका रंजक वळणावर आहे आणि यानिमित्ताने रेखा मालिकेतील नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहे. या मालिकेचा एक समृद्ध वारसा आहे. सई आणि विराटच्या या वारशाची ओळख करून देण्यासाठी रेखा यांची मदत घेण्यात आली आहे. ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेची निर्मिती राजेश राम सिंग, पिया बाजपेयी, प्रदीप कुमार आणि शायका परवीन यांनी केली आहे. ही मालिका सोमवार ते रविवार रात्री ८ वाजता स्टारप्लस वाहिनीवर प्रदर्शित होते.



Source link

Megha Dhade: बिग बॉस मराठी विजेती मेघा धाडेचा राजकारणात प्रवेश

0
Megha Dhade: बिग बॉस मराठी विजेती मेघा धाडेचा राजकारणात प्रवेश



Megha Dhade: मेघाने राजकारणात प्रवेश करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे.



Source link

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दिनने केले २१ वर्षीय अभिनेत्रीला किस, पाहा ‘टिकू वेड्स शेरू’चा ट्रेलर

0
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दिनने केले २१ वर्षीय अभिनेत्रीला किस, पाहा ‘टिकू वेड्स शेरू’चा ट्रेलर


नवाजुद्दीन लवकरच ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरवरुन चित्रपटात ४९ वर्षीय शेरू आणि २१ वर्षीय टिकूची अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ट्रेलरमध्ये शेरू कसा टिकूच्या प्रेमात कसा पडतो आणि त्यानंतर दोघेही अंडरवर्ल्ड, ड्रग्ज आणि रोमान्समध्ये कसे अडकतात हे दाखवण्यात येणार आहे.



Source link

Devendra Fadnavis: ‘आदिपुरुष’साठी देवेंद्र फडणवीस यांनी केले ट्वीट, म्हणाले…

0
Devendra Fadnavis: ‘आदिपुरुष’साठी देवेंद्र फडणवीस यांनी केले ट्वीट, म्हणाले…



Devendra Fadnavis Tweet on Adipurush: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधीत केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

एक एक थेंब आणि इंच इंच पाण्याची किंमत | पुढारी

0









पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  दरवर्षी पावसाळ्यात सरासरी पन्नास तर कित्येकदा एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षाही ज्यादा पाणी विनावापर सोडून देणार्‍या कोयना धरणावर सध्या अपुर्‍या पाणीसाठ्यामुळे सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी एक एक थेंब पाण्याचा व जलपातळी व पाणीउंचीत अगदी एक एक इंचाचा विचार करून काटेकोरपणे नियोजन करावे लागत आहे. ही काटकसर व काटेकोर नियोजनात जलसंपदासह ऊर्जा विभागाचा अक्षरशा घामटा निघत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत संबंधित विभागांचा समन्वय व नियोजन हे निश्चितच राज्याच्या पथ्यावर पडत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. धरणातील पाण्याच्या अखेरच्या थेंबापर्यंतचे सार्वत्रिक नियोजन लक्षात घेता जलसंपदा व ऊर्जा विभागाची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या कोयना धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठा 12.08 टीएमसी इतका आहे यापैकी मृत पाच टीएमसी साठा वगळता धरणात उपयुक्त केवळ 7.08 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यावरच अपेक्षित पाऊस पडेपर्यंत सिंचन व वीजनिर्मितीची सार्वत्रिक भिस्त आहे. सध्या पूर्वेकडे सिंचनासाठी तर पश्चिमेकडे जलविद्युत निर्मितीसाठी प्रचंड मर्यादा आल्या असल्याने सिंचनासाठी पूर्वेकडे केवळ धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1050 क्यूसेक इतकेच पाणी सोडण्यात येत आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पांसाठीही अत्यल्प पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची जलपातळी 618 मीटरला गेल्यानंतर तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा टप्पा बंद पडतो सध्या ही जलपातळी 619.785 मीटर इतकी आहे.

अद्यापही 1.785 मीटर पाणी पातळी असेपर्यंत कोयना चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती सुरू राहील. एकूणच महाकाय पाणी साठवन क्षमता व त्याचपटीत विनावापर सोडण्यात शेकडो टीएमसी पाणी सोडणार्‍या याच कोयना धरणावर सध्या अक्षरशः एक एक थेंब पाण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची वेळ आली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही जलसंपदा विभागाकडून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा व जलपातळी व पाणी उंचीच्या प्रत्येक इंचाचा विचार करून त्यानुसारच सिंचन व जलविद्युत निर्मितीचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत असली तरी ते यात यशस्वी होताहेत ही समाधानाची बाब आहे.

कोयना पाणीसाठा स्थिती

पाणीसाठा 12.08 टीएमसी , 11.47 टक्के
उपयुक्त पाणीसाठा 7.08 टीएमसी
पाणी उंची 2033.5 फूट
जलपातळी 619.785 मीटर
सिंचनासाठी धरण पायथा वीजगृहातून 1050 क्यूसेक विसर्ग
एक जूनपासूनचा एकूण पाऊस – कोयना – 41 मि. मी., नवजा – 45 मि. मी., महाबळेश्वर – 75 मि. मी.

जलसंपदा विभागाची अवहेलना नको, प्रोत्साहन द्या

पावसाळ्यात पाण्यामुळे तर उन्हाळ्यात पाण्यासाठी जलसंपदा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात एका बाजूला धरणात पाणी साठवताना दुसरीकडे पूर्वेकडे पाणी सोडताना पूर, महापूर त्यातून होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. नैसर्गिक , तांत्रिक, प्रशासकीय, शासकीय या सर्व गोष्टींचा सामना करताना सामान्यांचा सार्वत्रिक विचार करावा लागतो. उन्हाळ्यात सिंचन, वीजनिर्मितीसाठी काटकसरीने पाणी वापर करावा लागतो; मात्र पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी जनसामान्यांसह मान्यवर नेतेही आव्हानात्मक परिस्थितीत अनेकदा संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर खापर फोडतात. जलसंपदा विभागाला प्रोत्साहन देणे गरजेचे असतानाही त्यांची अवहेलनाच होते, ही दुर्दैवाची बाब आहे.











Source link