Monday, July 6, 2026
Home Blog Page 3008

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याची भीती | पुढारी

0









चिपळूण : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याची वीजनिर्मितीही बंद होणार आहे. धरणात शिल्लक असलेले पाणी मृतजल ठरले आहे.

सकाळी व सायंकाळी विजेची नितांत गरज असताना कोयना वीज प्रकल्प चालविला जातो. पाण्यावर होणारी वीज ही सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अतिउच्च मागणीच्यावेळी कोयना वीज प्रकल्प चालवून विजेची गरज भागवली जाते. कोयना धरणाची जलसाठवण क्षमता 105 टीएमसी असून 1 जूनपासून जलवर्ष समजले जाते व त्यानंतर धरणात जमा होणारे पावसाचे पाणी मोजले जाते. मात्र, या वर्षी जूनचा निम्मा महिना संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी खालावली आहे. सध्या धरणामध्ये 11.74 टीएमसी म्हणजेच अवघे 11 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. दररोज कोयना नदीला 1050 क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे. कोयना धरण क्षेत्रात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला असल्याने जलसाठा वाढलेला नाही. याचा परिणाम कोयना जलविद्युत प्रकल्पावर झाला आहे.

105 टीएमसी पाण्यापैकी विद्युत निर्मितीसाठी 67 टीएमसी पाणी दरवर्षी वापरले जाते व उर्वरित पाणी सिंचनासाठी कोयना नदीमध्ये सोडण्यात येते. या वर्षीचा 67 टीएमसीचा कोटा संपला असताना नवीन जलवर्षात मात्र कोयना वीज प्रकल्पावर पाणी संकट ओढवले आहे. पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्पाचा चौथा टप्पा पूर्णपणे ठप्प झाला असून येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस होऊन धरणात पाणी साठा वाढला नाही तर पहिला, दुसरा व तिसरा टप्पादेखील ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

सद्य:स्थितीत कोयना वीज अवघी 100 ते 200 मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. एकीकडे वाढत्या उष्म्यामुळे वाढलेली विजेची मागणी आणि दुसरीकडे पाण्याअभावी ठप्प होणारा कोयना वीज प्रकल्प यामुळे नजीकच्या काळात पाऊस न झाल्यास भारनियमनाचे संकटदेखील ओढवणार आहे.

…तर पाणीटंचाईचा धोका

कोयना धरणातील पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे. चौथा टप्पा बंद झाला असून उर्वरित टप्पेदेखील पाण्याअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत चिपळूण परिसरात पाणीटंचाई उद्भवण्याचा मोठा धोका आहे. कोयनेच्या अवजलावर चिपळूण व वाशिष्ठी नदीलगतची गावे तसेच लोटे, गाणे-खडपोली, आरजीपीपीएल, खेर्डी येथील औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. जर वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली तर मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्याचा धोका आहे.











Source link

Al Pacino: वयाच्या ८३व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनला अभिनेता; २९ वर्षांच्या गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म!

0
Al Pacino: वयाच्या ८३व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनला अभिनेता; २९ वर्षांच्या गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म!


Al Pacino Become Father: हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अल पचिनो वयाच्या ८३व्या वर्षी चौथ्यांदा ‘बाबा’ झाले आहेत.



Source link

Adipurush Review : ‘आदिपुरुष’चा सोशल मीडियावर कल्ला; पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…

0
Adipurush Review : ‘आदिपुरुष’चा सोशल मीडियावर कल्ला; पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…


Adipurush Social Review : ‘आदिपुरुष’ या चित्रपटात मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रभासचे खूप कौतुक होत आहे.



Source link

सातारा : राजमाता मुख्यमंत्र्यांना भेटल्या | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  ऐतिहासिक पोवई नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही स्मारक असू नये, हे सांगण्यासाठी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले या गुरुवारी थेट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना वर्षा निवासस्थानी जाऊन भेटल्या. पोवई नाक्यावर दुसरे काही झाले तर जनक्षोभ उसळेल, असेही राजमातांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर यासंदर्भात मी स्वत: सर्व संबंधितांशी बोलेन. पोवई नाक्यावरचा निर्णय शिवप्रेमींच्या भावना विचारात घेऊनच होईल. आपण निश्चिंत राहा, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे राजमातांनी सांगितले.

ऐतिहासिक पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक (आयलँड) विकसित करण्याबाबत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठकही झाली आहे. हा चौक नेमका कुठे असेल? याबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेकडून स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, हा विषय अजेंड्यावर आल्यावर सोशल मीडियातून जोरात कालवा-कालव सुरू झाली. त्यानंतर सोशल मीडियातील प्रतिक्रियांची दखल माध्यमांनीही घेतली. त्यातच सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. दस्तुरखुद्द राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले या शिवतीर्थावर गेल्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला तर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवरून आवाज टाकत सातारकरांच्या अस्मितेवर घाला सहन करणार नाही, असा सज्जड इशारा दिला. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यातर्फे जयवंत शेलार यांनी त्यांच्या सहीचे पत्रक काढले. त्यात पोवई नाक्यावर शिवतीर्थ वगळून अन्य जागी बाळासाहेब देसाई यांचे स्मारक करणार असल्याचे म्हटले आहे. शिवतीर्थाचे कोणतेही नामांतर केले जाणार नसल्याचेही पालकमंत्र्यांच्या नावे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पोवई नाक्यावरचा हा वाद पेटला असतानाच गुरूवारी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी मुंबईत जावून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ऐतिहासिक पोवई नाक्याचे महत्व त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेच नाही असा पुतळा पोवई नाक्यावर शिवाजी सर्कल येथे आहे. अलीकडे या भूमीला शिवप्रेमींनी शिवतीर्थ हे नाव दिले आहे. याच परिसरात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी त्यांचे आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा, चौक सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सातारकरांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व छत्रपती घराण्यातील कर्तृत्ववान राजांच्याव्यतिरिक्त त्या परिसरात कोणाचेही पुतळे व स्मारक उभे होवू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर जनक्षोभ उसळेल, अशी माहिती राजमातांनी मुख्यमंत्र्यांना दिली. शिवप्रेमी व सामाजिक संघटना या विषयात आक्रमक असल्याचे राजमातांनी मु़ख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकभावनेचा विचार आपण केला पाहिजे, असेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे राजमाता म्हणाल्या.

शिवप्रेमींची भावना व लोकभावना विचारात घेवून पोवई नाक्यावरील निर्णय होईल. या संदर्भात आपण स्वत: सर्व संबधितांशी बोलू, असे मुख्यमंत्र्यांनी आपणाला सांगितल्याचे राजमातांनी सांगितले. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण हेही उपस्थित होते.

आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

पोवई नाक्यावरचा वाद शिगेला पोहोचला असतानाच तो मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत गेला असतानाच या विषयाच्या अनुषंगाने आज दि. 16 रोजी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत पालकमंत्री काय निर्णय देणार? बैठकीवेळी काय काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. बैठकीनंतर 5.15 मिनिटांनी पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींचे व सातारा जिल्हावासीयांचेही लक्ष या विषयाकडे आहे.

The post सातारा : राजमाता मुख्यमंत्र्यांना भेटल्या appeared first on पुढारी.



Source link

Tamannaah Bhatia: ‘जी करदा’मधील टॉपलेस इंटीमेट सीनमुळे तमन्ना भाटिया होतेय ट्रोल! नेटकरी म्हणतायत…

0
Tamannaah Bhatia: ‘जी करदा’मधील टॉपलेस इंटीमेट सीनमुळे तमन्ना भाटिया होतेय ट्रोल! नेटकरी म्हणतायत…


Tamannaah Bhatia Troll: या वेब सीरिजसाठी तमन्नाने तिचा ‘नि किसिंग’ नियम मोडला आहे आणि खूप बोल्ड सीन्स देखील दिले आहेत.



Source link

Khal Nayak: ‘खलनायक’ रिलीज झाला अन् दोन महिन्यांनी संजय दत्तला अटक झाली; वाचा किस्सा…

0
Khal Nayak: ‘खलनायक’ रिलीज झाला अन् दोन महिन्यांनी संजय दत्तला अटक झाली; वाचा किस्सा…


संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘खलनायक सारख्या प्रतिष्ठित चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. मी सुभाष घईजी आणि मुक्ता आर्ट्सचाही खूप आभारी आहे, ज्यांनी असा चित्रपट बनवला आणि मला त्याचा एक भाग बनवले. सुभाष जी हे भारतीय चित्रपटांतील सर्वात मोठे दिग्दर्शक आहेत. राम आणि गंगा यांची भूमिका करणाऱ्या जॅकी दादा आणि माधुरी दीक्षित यांचेही हार्दिक अभिनंदन. याशिवाय चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सचे खूप खूप अभिनंदन.’



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा झंझावात सुरूच! लवकरच गाठणार २५० कोटींचा टप्पा

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा झंझावात सुरूच! लवकरच गाठणार २५० कोटींचा टप्पा


‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे बजेट अवघ्या ४० कोटींचे होते. तर, ४२ दिवसांत या चित्रपटाने २४१.२४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज होणार आहे. नव्या चित्रपटांमुळे या चित्रपटाच्या कमाईची गती संथ झाली आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. काही ठिकाणी हा चित्रपट अजूनही करमुक्त ठेवण्यात आला आहे.



Source link

Adipurush : चिमुकल्यांनाही पडलीय ‘आदिपुरुष’ची भुरळ; क्रिती सेननने शेअर केले लहानग्यांचे क्युट व्हिडीओ! पाहा..

0
Adipurush : चिमुकल्यांनाही पडलीय ‘आदिपुरुष’ची भुरळ; क्रिती सेननने शेअर केले लहानग्यांचे क्युट व्हिडीओ! पाहा..


अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक लहानग्या मुली ‘आदिपुरुष’च्या जानकीचे डायलॉग बोलताना दिसत आहेत. हे व्हिडीओ शेअर करताना क्रिती सेननने लिहिले की, ‘रामायण हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि मूल्यांचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि आपण तो प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे.’



Source link

Prathmesh Laghate: जमलं रे जमलं! प्रथमेश लघाटेनं अखेर जाहीर केलं रिलेशनशिप स्टेट्स; म्हणाला…

0
Prathmesh Laghate: जमलं रे जमलं! प्रथमेश लघाटेनं अखेर जाहीर केलं रिलेशनशिप स्टेट्स; म्हणाला…


प्रथमेश लघाटेने मुग्धा वैशंपायनसोबतचा फोटो शेअर करून म्हटले की, ‘ओके! तर, तुम्ही सर्वजण आम्हा दोघांकडून बातमी किंवा घोषणेची अपेक्षा करत आहात! हेच ते!! आमचं ठरलंय!!’ या कॅप्शनसोबतच त्यांनी हॅशटॅगमध्ये ‘कपल गोल्स’ असे देखील म्हटले आहे. या फोटोत दोघांनी एकमेकांचा हात धरला असून, एकमेकांच्या डोळ्यांत बघत आहेत. दोघांचा हा सुंदर फोटो पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. लिटील चॅम्प्सचं सीझन संपल्यानंतर देखील प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांसोबत अनेक कार्यक्रम करताना दिसले होते. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या.



Source link

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या घरातून मौल्यवान ऐवजाची झाली चोरी! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

0
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या घरातून मौल्यवान ऐवजाची झाली चोरी! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात


Shilpa Shetty Mumbai House Robbery: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या मुंबईतील घरात मोठी चोरी झाली आहे.



Source link