Aathvani Movie: अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट येत्या ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.
Source link
Aathvani : प्रेमकथेच्या ‘आठवणी’ पत्रातून उलगडणार, दोन पिढ्यांच्या प्रेमाचा टीझर आउट
Aai Kuthe Kay Karte : वीणाचा भूतकाळ येणार सर्वांसमोर? मालिका रंजक वळणावर

Aai Kuthe Kay Karte: मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सुलेखा ताई वीणा समजावर असतात तेवढ्यात खिडकीवर कोणी तरी दगड फेकून मारतो.
Source link
Gadar 2: ‘गदर’मधील या कलाकारांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, एकाने निवडला अध्यात्मचा मार्ग

‘गदर २’ या चित्रपटाच्या कथानकात तब्बल २२ वर्षांनंतर तारा सिंह पाकिस्तानचा जावई म्हणून परतणार आहे. मात्र, यावेळी पूर्वीपेक्षा अधिक चीड डोक्यात घेऊन तारा सिंह याने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले आहे. तारा सिंहच्या एन्ट्रीमुळे आता पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. तो आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पाकिस्तानामध्ये शिरकाव करताना दिसणार आहे. सनी देओल ‘गदर २’ घेऊन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
Kunya Rajachi Ga Tu Rani:फुलाला सुगंध मातीचा नंतर हर्षत अतकरी दिसणार या मालिकेत
कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना हर्षद म्हणाला, ‘कबीर हे पात्र मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. कबीर हा तळागाळात जाऊन काम करणारा पत्रकार आहे. मालिकेचं कथानकही खूप छान आहे. कामावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कबीर साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिका संपल्यानंतर पुन्हा कधी भेटीला येणार याची सतत विचारणा होत होती. योग्य वेळी ही सुवर्णसंधी चालून आली आणि मी तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला. माझ्या याआधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम कुन्या राजाची गं तू मालिकेतील कबीरवर करतील याची खात्री आहे.
Divya Pugaonkar: ‘मुलगी झाली हो’मधील माऊ दिसणार या चित्रपटात, चाहत्यांमध्ये उत्सुकता

पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटात दिव्या पुगांवकरसह अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. मनू अस्थी संकलक तर चित्रपटाच्या छायांकनची जबाबदारी गौरव पोंक्षे यांनी सांभाळली आहे. शिवाय नाईंटी नाईन प्रोडक्शनचे विजय शिंदे आणि बॉम्बे बरोडा वेब टॉकीज हे या चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर आहेत.
Adipurush: ‘पठाण’पेक्षा जास्त ‘आदिपुरुष’ची अडवान्स बुकींग, शाहरुखला टक्कर देणार प्रभास

११ जून पासून आदिपुरुष चित्रपटाच्या अडवान्स बुकींगला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा बुकींगला चांगला प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहिती नुसार, चित्रपटाने जवळपास १० लाख तिकिटांची अडवान्स बुकींग झाली होती. आता १२ लाखांपेक्षा जास्त तिकिटे विकली गेली असल्याचे समोर आले आहे.
Adipurush: ‘आदिपुरुषमध्ये एकनाथ शिंदे आहेत माहिती नव्हते’, ट्वीट व्हायरल होताच पोलिसांनी घेतली दखल

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन महत्त्वाच्या भूमिकेत असणारा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर जोरदार टीक होताना दिसत आहे. दरम्यान, चित्रपटातील एका सीनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे दिसत असल्याचा दावा नेटकऱ्याने केला आहे. हे ट्वीट पाहून पोलिसांनी लगेच अॅक्शन घेतली आहे.
Butterfly: तिसऱ्या आठवड्यात “बटरफ्लाय” चित्रपटाची यशस्वी घौडदौड

Butterfly Box Office collection : आज तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पुण्यात बटफ्लाय चित्रपटाचे हाउसफुल खेळ चालू आहेत
Source link
Nawazuddin Siddiqui: २१ वर्षीय अभिनेत्रीला किस करण्यावर नवाजने दिली प्रतिक्रिया, ‘तरुण अभिनेते…’

नवाज सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रमोशनच्या वेळी त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला २८ वर्षींनी लहान अभिनेत्रीला किस करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने, ‘आता तरुण अभिनेते हे नल्ले झाले आहेत आणि ते रोमँन्स करु शकत नाही तर आम्हीच पुढे आले आहोत. त्यामुळेच मोठे कलाकारच रोमँन्स करताना दिसत आहेत. आजकालचे अभिनेते कुठे रोमॅन्स दाखवतात. त्यांचा रोमॅन्स व्हॉट्सअपवर येऊन थांबला आहे. रोमॅन्स तर शाहरुख आणि सलमानने करावा’ असे उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले.
सातारा : जेवणाच्या पार्टीत युवकाचा खून | पुढारी
युवकाचा खून
पाचगणी, पुढारी वृत्तसेवा : सर्जापूर (ता. जावली) गावच्या हद्दीत मसनमोर शिवारात रात्री जेवणाच्या पार्टीत दारूच्या नशेत झालेल्या वादावादीत रुईघर (ता. जावली) येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी सर्जापूर येथील युवकास अटक केली आहे. किशोर श्याम निकम (वय 29) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव रवींद्र बोराटे (वय 25) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मेढा पोलीस ठाण्यात गुरुवार दि. 15 जून रोजी सर्जापूर येथील एका शेतात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने त्याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. यावरून अज्ञात मृतदेह म्हणून मेढा पोलीसात याची नोंद करण्यात आली. अनोळखी इसमाची माहिती पोलीस पाटील यांच्या व्हाट्सअप ग्रुपवरुन व्हायरल करण्यात आली. त्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
या इसमाचे नाव किशोर श्याम निकम, (रा. रुईघर, ता. जावली) असे समजले. त्यानंतर लागलीच त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. या इसमाच्या मृतदेहावर काही ठिकाणी मार लागल्याच्या खुणा दिसून आल्या. हा युवक नक्की कशामुळे मयत झाला हे समजत नसल्याने मेढ्याचे सपोनि संतोष तासगावकर व कुडाळ पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे, हवालदार सनी काळे, हवालदार दिगंबर माने यांनी सूत्रे गतिमान केली.
दि. 16 जून रोजी या मयत युवकाच्या नातेवाईकांनी किशोरच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. याबाबत पोलिसांनी तपास केला असता गुरुवारी सर्जापूर गावच्या हद्दीत जेवणाची पार्टी झाल्याची माहिती समोर आली. या पार्टीत दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी वैभव बोराटे याने दांडक्याने किशोर याला मारहाण केल्याचे समोर आले. या मारहाणीत किशोर याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून संशयित आरोपी म्हणून वैभव बोराटे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष तासगावकर करत आहेत.

