Monday, July 6, 2026
Home Blog Page 3006

Naseeruddin Shah: रत्ना पाठक यांच्या लग्नाला होता कुटुंबीयांचा नकार, नसीरुद्दीन शाहांनी सांगितले कारण

0
Naseeruddin Shah: रत्ना पाठक यांच्या लग्नाला होता कुटुंबीयांचा नकार, नसीरुद्दीन शाहांनी सांगितले कारण


पुढे नसीरुद्दीन म्हणाले, “रत्नाला पाहताक्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. मी नुकताच माझा पहिला चित्रपट केला होता जेव्हा आमची ओळख झाली. ती तेव्हा सत्यदेव दुबे यांच्या नाटकात काम करायची. आम्ही सुख-दुःखात एकमेकांबरोबर खंबीरपणे उभे राहिलो. आमचं नातं आणखी भक्कम होण्यामागील एकमेव कारण म्हणजे रत्ना आहे. आमच्यातील मैत्री कायम होती.”



Source link

Father’s Day 2023: मुले सुपरस्टार असूनही साधारण आयुष्य जगतात ‘या’ कलाकारांचे वडील

0
Father’s Day 2023: मुले सुपरस्टार असूनही साधारण आयुष्य जगतात ‘या’ कलाकारांचे वडील


प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुक होते. त्याने आजवर कोट्यावधी रुपये कमावले आहेत. मात्र, त्याचे वडील राधाकांत वाजपेयी आजही गावात राहून सर्वसाधारण आयुष्य जगतात.



Source link

पोवई नाका सोडून दुसरीकडे स्मारक बांधा : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पोवई नाक्याच्या संपूर्ण परिसराला सातारकर शिवतीर्थ म्हणून ओळखत आहेत. त्यामुळे या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज (थोरले) या व्यतिरिक्त कोणतीही तडजोड सातारकर स्वीकारणार नाहीत. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी समंजस्यपणा दाखवून स्व. बाळासाहेब देसाई यांचे स्मारक पोवई नाका सोडून इतर ठिकाणी बांधावे, अशी कडक भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेतली. अहंकाराचे हे इगो वॉर तातडीने थांबवा, असा सल्लाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

पोवई नाका येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आयलँड उभारण्यावरून सातार्‍यात गेल्या चार दिवसांपासून वादंग सुरू आहे. राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले , खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कृतीला विरोध दर्शवला आहे, तर सातार्‍यातील सामाजिक संघटनांनीही तीव्र निदर्शने केली आहेत.

शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर पत्रकार परिषदेत ‘पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकारात मी पोवई नाक्यावरच मोकळ्या जागेत स्व. बाळासाहेब देसाई यांचे आयलँड उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आयलँड इथेच बांधणार, कुणी कितीही विरोध करा खपवून घेणार नाही, अशी भूमिका जाहीरपणे बोलून दाखवली. पालकमंत्र्यांच्या भाषेवर सोशल मीडियावर जोरदार टिकाटिप्पण्णी सुरू आहे. गेले चार दिवस या वादापासून दूर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी प्रथमच आक्रमक व उघड भूमिका घेतली.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातार्‍यात गोंधळ नव्हे तर इगो वॉर सुरू आहे. त्याला आपण अहंकार म्हणतो. एकाने भिंतीवर चित्र रंगवले, तर दुसर्‍याने स्मारक करायचे ठरवले आहे. हे इगो वॉर आहे. दुर्दैवाने सातारकर आणि शिवभक्त या दोन नेत्यांमध्ये अडकले व गुरफटले गेले आहेत. या विषयात वेगळे काहीही नाही. स्थानिक दोन नेत्यांच्या इगो वॉरचा फटका हा सातार्‍याला बसत आहे. मध्यंतरी पेंटिंगवरून उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात वाद सुरू होता. उदयनराजे यांचे पेंटिंग काढायचे मध्येच थांबवले, पेंटरला पकडले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्याबाबत कसलीही तडजोड
होऊ शकणार नाही आणि कोणी करणारही नाही. इगो वॉर खासदार आणि पालकमंत्री या दोघांनीही थांबवावे. पालकमंत्र्यांनी समंजस्यपणा दाखवावा. उदयनराजे स्वतः समंजस्यपणाची भूमिका घेतील असे नाही. ते त्यांच्याच विश्वात सारखे असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांनी समंजस्यपणा दाखवावा आणि शिवतीर्थ परिसराबाबत शिवभक्तांच्या भावनांचा मान ठेवावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

बाळासाहेब देसाई हे सातारा जिल्ह्याचे फार मोठे नेतृत्व होते. त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. बाळासाहेब देसाईंचे स्मारक त्यांना सातार्‍यात करायचे असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थ परिसरात न करता अन्य बरीच ठिकाणे असून लोकांना दिसेल अशा ठिकाणी उभे करावे. पहिले आपण पोवई नाका म्हणत होतो, त्यानंतर कालांतराने शिवभक्तांमुळे शिवतीर्थ नाव पडले. लोकांच्या भावनांचा आदर ठेवला पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी लगावला.

संपूर्ण पोवई नाका परिसरच ‘शिवतीर्थ’

शिवतीर्थ म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेला परिसर असे नव्हे, तर संपूर्ण पोवई नाका परिसरच शिवतीर्थ आहे. लोकांच्या तशा भावना आहेत, हे पालकमंत्र्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आताची तरुण पिढी हा संपूर्ण परिसर शिवतीर्थ म्हणून ओळखत आहे. शंभूराज यांनीच समंजस्यपणा दाखवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक इतर ठिकाणी बांधावे. लोकांच्या भावना आहेत त्याप्रमाणे माझी पण अपेक्षा असून पालकमंत्री नक्की विचार करतील, असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.



Source link

Heart of stone Trailer: आलिया भट्ट व्हिलनच्या भूमिकेत, ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Heart of stone Trailer: आलिया भट्ट व्हिलनच्या भूमिकेत, ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर प्रदर्शित


‘हार्ट ऑफ स्टोन’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याचदिवशी चित्रपटगृहात आणखी ३ मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’, सनी देओलचा ‘गदर २’ अन् अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २.’ आता कोणता चित्रपट सरस ठरणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या हॉलिवूड चित्रपटाशिवाय आलिया रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.



Source link

Adipurush: दुसऱ्याच दिवशी ‘आदिपुरुष’ला झटका, कमावले इतके कोटी

0
Adipurush: दुसऱ्याच दिवशी ‘आदिपुरुष’ला झटका, कमावले इतके कोटी



Adipurush Box Office Collection Day 2: ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. मात्र आता चित्रपटाला दुसऱ्या दिवशी फटका बसताना दिसत आहे.



Source link

The Archies: प्रेम आणि ब्रेकअपची कथी, सुहाना खानच्या ‘द आर्चिज’चा टीझर प्रदर्शित

0
The Archies: प्रेम आणि ब्रेकअपची कथी, सुहाना खानच्या ‘द आर्चिज’चा टीझर प्रदर्शित


नेटफ्लिक्सने हा टीझर शेअर करत, ‘तुम्ही त्यांना कॉमिक्समध्ये, पुस्तकांमध्ये आणि रिवरडेलमध्ये पाहिले आहे. यावेळी त्यांना तुम्ही भारतात पाहणार आहात. ६०चे दशक दाखवणारा आर्चिज हा असा चित्रपट आहे जो सर्वांना ओळखीचा वाटेल. हा पहिला लूक’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.



Source link

Bigg Boss OTT: पूजा भट्ट दिसणार ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये

0
Bigg Boss OTT: पूजा भट्ट दिसणार ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये


‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागच्या वेळी या शोचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. मात्र, यावेळी टीव्हीप्रमाणे सलमान खान ओटीटीवरचा शो देखील होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाल्यापासून, यावेळी कोणते कलाकार ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात प्रवेश करणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता यातील स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.



Source link

Adipurush: ‘आदिपुरुष’वर बंदी घालण्याची भाजप मंत्र्याच्या मुलाची मागणी, कारणही सांगितलं!

0
Adipurush: ‘आदिपुरुष’वर बंदी घालण्याची भाजप मंत्र्याच्या मुलाची मागणी, कारणही सांगितलं!


भाजप नेता आणि खासदार गोविंद राजपूत यांचा मुलगा आकाश राजपूत याने एका मुलाखतीमध्ये आदिपुरुष चित्रपटावर निशाणा साधला आहे. ‘आदिपुरुष हा सिनेमा तरुणांना भगवान रामाशी जोडेल अशी आम्हाला आशा होती. मात्र, या चित्रपटाचा भगवान रामाशी काहीही संबंध नाही. हे सनातन धर्माच्या विरोधात आहे. या चित्रपटात भगवान राम, भगवान हनुमान, देवी सीता आणि इतर देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले आहे. याचा आम्ही निषेध करतो. तरुण हा चित्रपट कॉमेडी म्हणून पाहात आहेत. मी पंतप्रधान आणि सर्व राज्य सरकारांना या चित्रपटावर बंदी घालण्याची विनंती करतो’ असे आकाशने म्हटले आहे.



Source link

पालकमंत्र्यांकडून समंजसपणाची अपेक्षा : साताऱ्यात दोन नेत्यांच्या ‘इगो वॉर’वर आमदार शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : एकाने भिंतीवर चित्र रंगवलं म्हणून दुसऱ्याने स्मारकाचा विषय काढला आहे. दुर्दैवाने या दोन्ही नेत्यांमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुरफटले गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबत कोणतीही तडजोड कोणीही करणार नाही. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेला ‘इगो वॉर’ थांबवावा अशी कानउघाडणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

साताऱ्यात सध्या सुरू असलेल्या स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या आयलॅन्ड आणि शिवतीर्थ या विषयावर आ. शिवेंद्रराजे भोसले माध्यमांशी बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांची कान उघडणी केली आहे. तसेच थेट उदयनराजे भोसले यांच्यावरही टीकास्त्र सोडले

उदयनराजें स्वतः च्याच विश्वात : आ. शिवेंद्रराजे भोसले

माझं स्पष्ट मत आहे, दोन्ही नेत्यांच्यात इगो वाॅर सुरू आहे. पालकमंत्र्यांनीच याबाबतीत सामंजसपणा दाखवावा. कारण उदयनराजेंशी बोलण्यात काही अर्थच नाही, उदयनराजे हे स्वतःच्याच विश्वात सतत असल्यामुळे त्यांच्याकडून भूमिका घेतली जाईल अस वाटत नाही. मंत्र्यांनीच सामंजसपणा दाखवून शिवभक्तांचा भावनेचा विचार करून हे स्मारक पोवई नाका येथे न करता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी करावे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल आम्हांला आदर आहे, आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.











Source link

Adipurush: फ्लॉप की हिट? जाणून घ्या आदिपुरुष सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई

0
Adipurush: फ्लॉप की हिट? जाणून घ्या आदिपुरुष सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई


शुक्रवारी १६ जून रोजी प्रदर्शित झालेला आदिपुरुष चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये तब्बल ६२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. एकट्या हिंदी भाषेतच हा चित्रपट तब्बल ४ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला याचा अंदाज सर्वजण लावत होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम रचले आहेत. ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी ८५ ते ९० कोटींची कमाई केली आहे. पण हे अंदाजे आकडे आहेत व त्यात रात्रीच्या शोचा समावेश नाही. जगभरात चित्रपटाने १४० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.



Source link