Home Blog Page 3

फलटण शहरात ११ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद; दुरुस्ती व देखभाल कामामुळे निर्णय

0
फलटण शहरात ११ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद; दुरुस्ती व देखभाल कामामुळे निर्णय


फलटण : शहरातील खजिना हौद येथे असलेल्या मुख्य वितरण जलवाहिनीची दुरुस्ती तसेच सुधारित जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवार, दिनांक ११ मार्च २०२६ रोजी फलटण शहरातील नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगर परिषदेकडून देण्यात आली आहे.
नगर परिषदेकडून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुरळीत आणि कार्यक्षम करण्यासाठी ही दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात येत आहेत. खजिना हौद येथील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
यामुळे शहरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच नगर परिषदेच्या या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी
फलटण नगर परिषद, फलटण

फलटणमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर; जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम

0
फलटणमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर; जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम



फलटण: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (SSC) येथे विद्यार्थिनींसाठी विशेष स्वसंरक्षण (Self-Defense) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कमिन्स इंडिया फाऊंडेशन आणि इको सर्क्युलर इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींना स्वतःच्या सुरक्षेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय प्रशिक्षण सत्रात शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणासाठी कराटे तज्ज्ञ प्रिया शेडगे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना विविध स्वसंरक्षण तंत्रांची माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्राचे स्वरूप अत्यंत व्यावहारिक ठेवण्यात आले होते.
या शिबिरात विद्यार्थिनींना सोपी पण प्रभावी स्वसंरक्षण तंत्रे शिकवण्यात आली. तसेच अचानक उद्भवणाऱ्या संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शनही करण्यात आले. शारीरिक हालचालींबरोबरच मानसिक ताकद आणि आत्मविश्वास वाढवण्यावरही विशेष भर देण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व तांत्रिक बाबींची जबाबदारी कमिन्स इंडिया फाऊंडेशन आणि इको सर्क्युलर इंडिया फाउंडेशन यांनी पार पाडली. अशा प्रकारच्या प्रशिक्षणांमुळे मुलींमध्ये सुरक्षिततेची जाणीव वाढून त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षक प्रिया शेडगे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

साताऱ्याच्या बावधन बगाड यात्रेला आंतरराष्ट्रीय रंग; बगाडावर अमेरिकन डॉलर्सची माळ

0


महाराष्ट्र

Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी

अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी



Source link

बोधिवृक्षाच्या साक्षीने नवजात कन्येचे धम्ममय स्वागत

0
बोधिवृक्षाच्या साक्षीने नवजात कन्येचे धम्ममय स्वागत

फलटण : The Buddhist Society of India शाखा फलटणचे सदस्य व पदाधिकारी आयु. पल्लवी व आयु. संग्रह भीमराव कांबळे यांच्या घरी नवजात कन्येच्या आगमनानिमित्त धम्ममय वातावरणात छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.
कन्येच्या आगमनाचा आनंद साजरा करताना परसबागेत बोधिवृक्षाचे रोपण करून वंदन करण्यात आले. बोधिवृक्षाच्या साक्षीने नवजीवनाचे स्वागत करण्याची ही प्रेरणादायी परंपरा यावेळी जपण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे माजी जिल्हा संघटक आयु. दादासाहेब दाजी कांबळे (वेळोशी, ता. फलटण) यांनी बुद्धपूजा घेत उपस्थितांना धम्मदेसना दिली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून करुणा, मैत्री व समतेच्या मूल्यांनुसार जीवन जगण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाला नातेवाईक, मित्रपरिवार तसेच धम्मबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवजात कन्येला सर्वांनी शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

एन. रघुरामन यांचा कॉलम: आईच्या शिस्तीतून अन् चिमणीच्या धैर्यातून मी शिकलेले जीवनाचे दोन अनमोल धडे!

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  आईच्या शिस्तीतून अन् चिमणीच्या धैर्यातून मी शिकलेले जीवनाचे दोन अनमोल धडे!




1. बाहेर तापमान एक अंकी असो किंवा मुसळधार पाऊस पडत असो – त्यांचा एक नियम अढळ होता: सकाळी 5 वाजण्यापूर्वी जेव्हा गजराचे घड्याळ वाजायचे, तेव्हा ‘स्नूझ’ बटण कधीही दाबायचे नाही. त्या अंधार असतानाच उठायच्या आणि सर्वात आधी आपले अंथरूण घडी करून ठेवायच्या. पण त्यांच्या गतीला ऊर्जा देणारी गोष्ट म्हणजे – फिल्टर कॉफी, ज्याच्या सुगंधाने घरातील बाकी लोक, विशेषतः वडीलही जागे व्हायचे. तोच त्यांचा ‘प्रोटीन शेक’ होता. आधुनिक मातांप्रमाणे त्या आपला ‘व्यायामाचा पोषाख’ परिधान करायच्या – म्हणजे त्या साडी घोट्यांच्या वर उचलून कमरेत खोचायच्या आणि आपल्या ‘जिमकडे’ कुच करायच्या. होय, 1960 आणि 70 च्या दशकात त्यांच्या जिममधील पहिल्या व्यायामाचा अर्थ होता – अंगण झाडणे आणि रांगोळी काढणे, ज्यामुळे घर प्रसन्न वाटायचे. यानंतर त्यांचा ‘बसून करण्याचा व्यायाम’ सुरू व्हायचा – भाज्या चिरणे, तांदूळ निवडणे आणि संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता तयार करणे. त्या हे सर्व आपल्या ‘इन्स्टाग्राम’वर नोंदवायच्या – म्हणजेच आपल्या आईला लिहिलेल्या 15 पैशांच्या पत्रात. मी त्यांना तेव्हापासून ‘फॉलो’ करायला सुरुवात केली होती, जेव्हा त्या विशीत होत्या. मी त्यांच्या 6.2 मिलियन फॉलोअर्सपैकी एक होतो. तुम्ही बरोबर वाचलेत. तसे तर त्यांचे सहा फॉलोअर्स होते – आई-वडील, चार भावंडे, दोन मुले – म्हणजे मी आणि माझी बहीण. एकूण 6.2 लोक, जे त्यांचे कौतुक करायचे. मी मिलियन (दशलक्ष) यासाठी म्हटले, कारण या जगातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी लाखांच्या बरोबरीची होती. येथूनच मला माझा पहिला धडा मिळाला की, चांगले नेते सकाळी लवकर का उठतात. हे केवळ उत्पादकता, शिस्त किंवा यशासाठी नाही – तर आपल्या दिवसावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे. त्या गजर वाजल्यावर ‘स्नूझ’ दाबत नाहीत, उठल्या उठल्या फोनवरील नोटिफिकेशन्स तपासत नाहीत आणि त्यांचे मन कधीही थकलेले नसते. त्या अंतरीच्या शांतीसाठी शांतता निवडतात; आपला संकल्प दृढ करण्यासाठी प्रार्थना करतात आणि सकाळच्या सुरुवातीच्या तासांमध्ये अधिक चांगल्या दर्जाचे काम करण्यासाठी आपले शरीर सक्रिय ठेवतात.
2. तुमच्यापैकी अनेकांनी बागेत झाडांना पाणी देताना कधी ना कधी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला असेल. माझ्यासोबतही असेच घडले. मी वाकून पाहिले तेव्हा तिथे नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांचा एक छोटासा थवा होता. ती पिल्ले थरथरत होती आणि त्यांचे डोळेही उघडले नव्हते. तीन छोटी पिल्ले, एकमेकांना चिकटून बसलेली, आसपासच्या जगापासून अनभिज्ञ. मी अनेक आठवडे त्यांचे निरीक्षण केले. त्यांची आई ठराविक अंतराने यायची. ती त्यांच्यापासून फार लांब जात नसे, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल. जेव्हा एखादा मोठा पक्षी किंवा संशयास्पद प्राणी आसपास दिसायचा, तेव्हा ती जणू मला हाक मारायची आणि मी धावत जाऊन त्यांना पळवून लावायचो. मी झाडाजवळ अन्न ठेवण्यासही सुरुवात केली. ती स्वतः ते खायची, पण आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी मात्र बाहेर जाऊन कीटक पकडून आणायची. कदाचित तोच त्यांचा ‘प्रोटीन शेक’ होता. एके दिवशी तिने त्यांना घरट्यातून उडी मारण्यासाठी प्रोत्साहित केले. एक पिल्लू उडाले आणि सुरक्षित उतरले. दुसरे थोडे डगमगले. तिसरे पिल्लू सर्वात जास्त वेळ घरट्यात थांबले. आई जणू शांतपणे त्याला सांगत होती – चला, तू करू शकतोस. आणि मग ते सर्व उडून गेले. हा माझा दुसरा धडा होता. त्यांना पाहताना मला जाणीव झाली की, आपण अनेकदा मानतो की जीवन पूर्णपणे नियोजन आणि नियंत्रणावर अवलंबून असते. आपण याद्या बनवतो, अंदाजपत्रक तयार करतो, पण जे लोक त्या पक्ष्यांप्रमाणे अनोळखी जगात झेप घेण्याचे धाडस करतात, तेच यश मिळवतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी विवाह करणे, त्याच्यासोबत नवीन शहरात जाणे, नवीन नाते सुरू करणे, मुलांना जन्म देणे आणि शेवटी पतीला साथ देण्यासाठी स्वतः नोकरी करणे – यातील प्रत्येक क्षण पालकांच्या सुरक्षित घरट्यातून बाहेर पडून एखाद्या अनोळखी जमिनीवर उडी मारण्यासारखाच आहे. जीवन आपण कुणाला धरून ठेवतो यापेक्षा, आपण कोणता धोका स्वीकारतो आणि अज्ञाताकडे झेप घेण्याचे धाडस दाखवतो, यावर जास्त अवलंबून असते.
फंडा असा की – सर्व प्रजातींच्या स्त्रिया इतर काही नसून स्वतःमध्ये एक ‘ऑल-इन-वन’ व्यक्तिमत्त्व असतात. त्यामुळेच आपण त्यांच्या असण्याचा उत्सव साजरा करतो, यात नवल नाही. महिला दिनाच्या शुभेच्छा!



Source link

महिला दिनी ‘विशेष भेट’! ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेत निवड; आंबेडकरी चळवळीतील प्रभावी आवाज संसदेत

0
महिला दिनी ‘विशेष भेट’! ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेत निवड; आंबेडकरी चळवळीतील प्रभावी आवाज संसदेत

महिला दिनी ‘विशेष भेट’! ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेत निवड; आंबेडकरी चळवळीतील प्रभावी आवाज संसदेत

सोलापूर – आंबेडकरी चळवळीत आक्रमक भूमिका, प्रभावी वक्तृत्व आणि शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम पार्श्वभूमी यामुळे ओळख असलेल्या ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेसाठी निवड झाल्याने राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला राज्यसभेवर पाठविले, ही “महिला दिनाची विशेष भेट” असल्याची भावना ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केली.
ज्योतीताई वाघमारे यांचा जन्म सोलापूर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबावर सामाजिक चळवळींचा ठसा असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव पडला. त्यांच्या वडिलांनी दलित पँथर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले होते. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरणातच ज्योतीताईंचे बालपण घडले.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्रजी विषयात पीएचडी पूर्ण केली असून मराठी भाषेवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी काही काळ वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले असून त्यांच्या स्पष्ट आणि प्रभावी मांडणीमुळे त्या व्यापक स्तरावर परिचित झाल्या.
राजकीय क्षेत्रातही ज्योतीताईंनी सक्रिय भूमिका बजावली आहे. २०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या आक्रमक, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद वक्तृत्वामुळे त्या राज्यभर ओळखल्या जाऊ लागल्या. सामाजिक न्याय, महिलांचे प्रश्न आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.
आंबेडकरी विचारांची पार्श्वभूमी, सामाजिक प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेतील निवड महत्त्वाची मानली जात आहे. आता त्या राष्ट्रीय पातळीवरही आंबेडकरी विचार, सामाजिक न्याय आणि महिलांच्या प्रश्नांवर आपली ठाम भूमिका मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजु

0


Satara News :   सातारा जिल्ह्यातील कराड ( Satara Karad) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेतात पाईपलाईनचे काम करताना दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून या दोघांचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे.  

दक्षिण मांड नदीच्या शेजारी संगम शिवारात शेतातील पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना दुर्घटना

कराड तालुक्यातील उंडाळे मनव मार्गांवर दक्षिण मांड नदीच्या शेजारी संगम शिवारात शेतातील पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करण बाजीराव चव्हाण व अमर रंगराव वडार असे मृत्यू झालेल्या मजुरांचे नाव आहे. दोघेही मनव गावचे रहिवासी असून श्रीरंग पाटील यांच्या शेतात पाईपलाईन टाकण्याचे काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही मुजरांचे मृतदेह उंडाळे ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत.

अहिल्यानगरमध्ये चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

अहिल्यानगरच्या कर्जत-श्रीगोंदा महामार्गावरील कोंभळी फाटा येथे चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  जळगाव येथील श्रावण सुखदेव पठारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान कोंभळी फाटा चौक हा मृत्यूचा सापळा बनला असून येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे येथील रहिवाशी देखील भीतीच्या छायेत असून आता ग्रामस्थांकडून तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू तर, दोघे गंभीर जखमी

लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे.भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिली. या घटनेत कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी

आणखी वाचा



Source link

जिल्हा परिषद शाळा परतवडी येथे विद्यार्थ्यांची रंगपंचमी उत्साहात साजरी

0
जिल्हा परिषद शाळा परतवडी येथे विद्यार्थ्यांची रंगपंचमी उत्साहात साजरी

परतवडी जि.प. शाळेत विद्यार्थ्यांची रंगपंचमी उत्साहात साजरी 


परतवडी (ता माण ) :- परतवडी येथील जिल्हा परिषद शाळेत होळी निमित्त रंगपंचमीचा सण विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. डोंगराच्या पायथ्याशी व निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त केला. संपूर्ण शाळा परिसर रंगांच्या उधळणीने आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी हास्याने उजळून निघाला होता.
रंगपंचमीच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सणाच्या माध्यमातून मैत्री, एकोपा आणि आनंदाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद संपूर्ण परिसरात सणाचे वातावरण निर्माण करत होता.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती साळवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रुपाली पवार मॅडम व विषय शिक्षक सुर्यकांत सुस्तरफोड सर त्यांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांनी सुरक्षित व आनंदी वातावरणात रंगपंचमी साजरी केली.
अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सणांचे महत्त्व, सहकार्याची भावना तसेच आनंद वाटण्याची सवय विकसित होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार : गोरे

0


Jayakumar Gore :  जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. यानंतर आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपला मिळावं , यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं आहे. 

सातारा जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष, त्यामुळं अध्यक्षपद भाजपलाच मिळावं

साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मंत्री गोरे यांनी मैदानावर तुफान फलंदाजी करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सातारा जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगत जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपलाच मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की अध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे. अजून खूप पाणी पुलाखालून जायचे आहे. पुढील काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. मात्र भाजपचा अध्यक्ष व्हावा यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

गोरेंचे काळे कारनामे, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करा, साडी चोळीचा आहेर देत सोलापुरात महिला काँग्रेस आक्रमक

आणखी वाचा



Source link

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चव्हाणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन

0
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चव्हाणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चव्हाणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन

चव्हाणवाडी :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चव्हाणवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Cummins India Limited आणि Work for Equality यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत चव्हाणवाडी हायस्कूलच्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली.महिला सन्मान आणि समानतेचा संदेश देत गावातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि सामाजिक विषयांवर विचार मांडता यावा हा या स्पर्धेचा उद्देश होता.
याचबरोबर सकाळी १० वाजता मुलांसाठी ‘भाकरी बनवणे’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. घरकामातील समानता आणि स्वावलंबनाची जाणीव मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच मुलींसाठी ‘विजेचे बल्ब निर्मिती’ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ज्यामुळे विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि कौशल्य विकासाला चालना मिळावी हा त्यामागील हेतू होता.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवाडी आणि चव्हाणवाडी हायस्कूल, चव्हाणवाडी चे विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी घेतला. आयोजकांनी गावातील महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन केले होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून “स्त्री-पुरुष समानता, हाच प्रगतीचा खरा वाटा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडी विद्यालयात कमिन्स इंडिया कंपनी सुरवडी व वर्क फॉर इक्वलिटी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.निकाळजे विठ्ठल बाबुराव उपशिक्षक श्री.क्षीरसागर पी एस सर, श्री.राजपुरे आर जे सर, सौ.चव्हाण एन एस, श्री.भोईटे एस आर सर वर्क फोर इक्वलिटी संस्थेच्या अध्यक्षा प्रभा विलास मॅडम पुणे, वर्क फॉर इक्वलिटी संस्थेच्या मॅनेजर सौ राजेश्री रासकर मॅडम, फिल्ड ऑफिसर सौ.उर्मिला चव्हाण मॅडम, सोनल मोरे मॅडम, सौ रेखा जगताप मॅडम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी श्री शशिकांत कदम सर, श्री शिंदे सर, श्री अर्जुन सर इत्यादी सर्व लोक उपस्थित होते