Friday, June 26, 2026
Home Blog Page 3139

सातारा : जिल्ह्यात आता भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा | पुढारी

0

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदवणार्‍या व काम करणार्‍या गावांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावास जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये व राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकास 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
राज्यामध्ये भूजल उपशाचे प्रमाण अधिक आहे. भूजल उपशामध्ये नगदी पिकांच्या सिंचनाकरिता भूजलाचा उपसा अधिक आहे. परिणामी, काही भागात भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा क्षेत्रांतील पाणलोट क्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशत: शोषित या वर्गवारीमध्ये समाविष्ट आहेत. पुनर्भरणापेक्षा अधिक भूजल उपसा विंधन विहिरीद्वारे केल्याने भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीवर होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन, अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थ सहाय्यित अटल भूजल योजना राज्यातील 13 जिल्ह्यातील 1 हजार 442 गावांमध्ये राबवण्यात येत आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे असा अटल भूजल योजनेचा गाभा असून, त्यासाठी ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्याकरिता अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करून ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेमध्ये शाश्वतता साध्य करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील या योजनेत समाविष्ट असलेल्या गावांतील नागरिकांनी सहभागी व्हावे. सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरिता हिरीरीने सहभाग नोंदवावा. त्यासाठी गावागावामध्ये सद़ृढ स्पर्धा निर्माण होण्याच्या द़ृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य ब्रीद लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्याच्या द़ृष्टीने भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सुरू करण्यात येत आहे. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा ही सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांत राबवण्यात येणार आहे. गावांचे मूल्यांकन करण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार
आहे.

असे मिळणार पुरस्कार…

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 30 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 20 लाख रुपये तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास 1 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकास 50 लाख रुपये व तृतीय क्रमांकास 30 लाख रुपये देवून सन्मानित केले जाणार आहे.

Source link

सातारा पालिका करणार 26 हजार युनिट वीजनिर्मिती; दरवर्षी 6 कोटींची बचत | पुढारी

0

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा नगरपालिका सोनगाव कचरा डेपो येथे साकारण्यात येणार्‍या सौरऊर्जा प्रकल्पातून सुमारे 6 हजार युनिट तर कास धरणातून येणार्‍या जलवाहिन्यांवर 20 हजार युनिट विजेची निर्मिती करणार आहे. दोन्ही प्रकल्पांतून सुमारे 26 हजार युनिट वीज तयार होणार आहे. या विजेचा वापर कास व शहापूर पाणीयोजना, शहरातील स्ट्रीटलाईट व न.पा. कार्यालयासाठी होणार आहे. वीजबिलापोटी वर्षाचा होणारा सुमारे 5 ते 6 कोटी रुपयांचा खर्च वाचणार असून शिल्लक वीजेपासून कोट्यवधींचे उत्पन्न नगरपालिकेला मिळणार आहे.

सातारा नगरपालिका ही हद्दीबाहेर मालमत्ता असणारी राज्यातील एकमेव नगरपालिका आहे. कास धरण, सोनगाव कचरा डेपो आणि आकाशवाणी झोपडपट्टी, करंजे एमआयडीसी (सध्या हद्दीत) या नगरपालिकेच्या मोठ्या मालमत्ता आहेत. नगरपालिकेने या मालमत्तांचा वापर उत्पन्नवाढीसाठी करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. आता या मालमत्तांवर उत्पन्नवाढीच्यादृष्टीने आणि नगरपालिकेच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने नवे प्रयोग प्रशासनाकडून सुरु आहेत. सातारा नगरपालिकेने सोनगाव कचरा डेपो येथील घनकचरा प्रकल्पाच्या छतावर सोलर पॅनल बसवून सुमारे 6 हजार युनिट विजनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सौरऊर्जेवर चालणार्‍या एफएसटीपी प्लांटची उभारणी भविष्यात करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.

सातारा शहराच्या प्रामुख्याने पश्चिम भागास कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. कास धरणाची उंची वाढवण्यात आली असून धरणात यावर्षीपासून शंभर टक्के पाणीसाठा केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नगरपालिकेने तब्बल 95 कोटी रुपये खर्च केले. सध्या या धरणात 0.5 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कास धरणातून गुरूत्वाकर्षनाद्वारे सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांपर्यंत पाणी आणले जाते. वेग प्रचंड असल्याने या पाण्यावर पॉवर हाऊस येथे पूर्वी जलविद्युत निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला होता. मात्र तो कालांतराने बंद पडला. आता पुन्हा हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा चंग नगरपालिकेने बांधला आहे. या प्रकल्पातून सुमारे 20 हजार युनिट विजनिर्मिती करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. दोन वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होतील. नगरपालिकेकडून सुमारे 26 युनिट वीजनिर्मिती केली जाणार आहे. नगरपालिकेच्या पाणीयोजना, कार्यालय कामकाज व स्ट्रीटलाईट यांच्यासाठी सुमारे 17 हजार 100 युनिटची आवश्यकता असते. ही गरज भागल्याने नगरपालिकेचा सुमारे 5 ते 6 कोटींचा विजबिलावर होणारा खर्च वाचणार आहे. तसेच 8 हजार 900 युनिट शिल्लक वीजेतून नगरपालिकेला लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.

नगरपालिकेचे खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे हीच प्रशासनाची भूमिका आहे. सौरऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पाची देखभाल नियमित ठेवण्याकडे लक्ष दिले जाईल. सातारा शहरासाठी भविष्यात आणखी असे प्रकल्प राबवले जातील. सातारा शहर अग्रेसर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
-अभिजीत बापट, मुख्याधिकारी, सातारा

Source link

Dada Kondke: विनोदी टायमिंगचा बादशहा! दादा कोंडके यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

0
Dada Kondke: विनोदी टायमिंगचा बादशहा! दादा कोंडके यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Dada Kondke Death Anniversary: ‘विनोदी टायमिंगचा बादशहा’ असे बिरूद मिरवणाऱ्या दादा कोंडके यांची आज पुण्यतिथी आहे. मराठी चित्रपटांतल्या विनोदी शैलीतील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या.

Source link

Ganga : हेमा मालिनी बनणार ‘गंगा’; नद्या पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेत उचलणार खारीचा वाटा!

0
Ganga : हेमा मालिनी बनणार ‘गंगा’; नद्या पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेत उचलणार खारीचा वाटा!

Hema Malini ballet Dance: अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र सरकारने सर्व राज्यांतील ७५ नद्या स्वच्छ तसेच, पुनरुज्जीवित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना हाती घेतली आहे. या मोहिमेत हेमा मालिनी सहभागी होणार आहेत.

Source link

Urfi Javed: चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा संतापली उर्फी जावेद! ट्वीट करत म्हणाली…

0
Urfi Javed: चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा संतापली उर्फी जावेद! ट्वीट करत म्हणाली…

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे यांना पाठिंबा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवरून उर्फी जावेद हिने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शीतल…..तू लढ, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शीतल पुरता मर्यादीत नाहीचं, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. @MumbaiPolice ना आवाहन आहे, या हरामखोरांना सोडू नकाचं. पण यांचा करविता धनी कोण आहे, त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा.’

Source link

सातार्‍याच्या सुरेखा यादव यांनी केले सोलापूर-मुंबई वंदे भारतचे सारथ्य | पुढारी

0

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आशियातील पहिल्या महिला लोको पायलट असलेल्या सुरेखा यादव यांनी सोमवारी (दि. 13) सोलापूर ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य केले. मेक इन इंडियाअंतर्गत तयार केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चालवून मध्य रेल्वेचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

महिला सक्षमीकरण आणि त्यांना सामान संधी देण्यात मध्य रेल्वे नेहमीच आघाडीवर आहे. महिलांच्या विकासासाठी विविध योजना नेहमी राबविण्यात येतात. मध्य रेल्वेवर सुरेखा यादव या पहिल्या महिला लोको पायलट आहेत. सोमवारी सोलापूर ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस सुरेखा यादव यांनी चालविली. एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आल्यानंतर सुरेखा यांचा सत्कार करण्यात आला. सुरेखा यादव म्हणाल्या, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याची संधी मध्य रेल्वेने दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. गाडी वेळेच्या 5 मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील सातारा येथील सुरेखा यादव या 1988 मध्ये भारतातील पहिल्या महिला रेल्वेचालक बनल्या. त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Rohit Shetty Birthday: कधीकाळी अभिनेत्रींच्या कपड्यांना इस्त्री करायचा रोहित शेट्टी! ‘असा’ बनला दिग्दर्शक…

0
Rohit Shetty Birthday: कधीकाळी अभिनेत्रींच्या कपड्यांना इस्त्री करायचा रोहित शेट्टी! ‘असा’ बनला दिग्दर्शक…

रोहित शेट्टीने २००३मध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्याचा पहिला चित्रपट ‘जमीन’मध्ये अजय देवगण झळकला होता. यानंतर त्याने ‘गोलमाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने त्याच्या करिअरला नवी दिशा दिली. या चित्रपटात रोहित शेट्टीच्या कामाला चांगलीच पसंती मिळाला होती. या चित्रपटानंतर रोहित शेट्टीने हिट चित्रपटांची लाईन लावली. त्याने ‘संडे’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले.

Source link

Aamir Khan Birthday: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीयेत का?

0
Aamir Khan Birthday: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीयेत का?

आमिर खान याला बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्ष आयुष्यात त्याला अंघोळ करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. याचा खुलासा त्याची पूर्व पत्नी किरण राव हिने स्वतः केला होता. अगदी काहिअतरी आवश्यकता असते आणी गरज पडते तेव्हाच आमिर अंघोळ करतो, असे तिने म्हटले होते. यावेळी तिने एक किस्सा देखील शेअर केला होता. १९९८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाम’ या चित्रपटात आमिर खानने दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका फायटिंग सीनसाठी आमिर खानने तब्बल १२ दिवस अंघोळ केली नव्हती. चित्रपटातील हा सीन खूप मोठा होता आणि आमिरला पुन्हा पुन्हा मेकअप करण्यात वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळे सीन पूर्ण होईपर्यंत त्याने आंघोळच केली नव्हती आणि मेकअपही तसाच ठेवला होता. हा सीन शूट करण्यासाठी १२ दिवस लागले होते.

Source link

Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर जखमांचे निशाण

0
Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर जखमांचे निशाण

Bhagyashree Mote sister madhu dead : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाग्यश्री मोटेच्या बहिणीचे नाव मधू मार्कंडे असे होते. 

Source link