Friday, June 26, 2026
Home Blog Page 3140

सातारच्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत ट्रेन, ठरल्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट 

0


मुंबई : भारतातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहेत. देश-विदेशातील भारतीय महिलांची क्षमता ओळखून त्यांना सन्माननीय पदांची जबाबदारी दिली जात आहे. आजच्या महिला सर्व काही करू शकतात. स्त्रिया आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालवण्यास सक्षम आहेत. अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव ( Surekha Yadav) यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या लोको पायलट (Loco Pilot ) ठरल्या आहेत.

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (vande bharat express) चालवली. यावेळी सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले आहे. 

या कामगिरीबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक आठवर सत्कार करण्यात आला. त्यावेळी  सुरेखा यादव म्हणाल्या, “नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे.  गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या पाच मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.”

 

सुरेखा यादव मूळच्या सातारा जिल्हातील

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा येथून झाले. पुढील अभ्यासासाठी त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम केला आणि नंतर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा डिप्लोमा मिळवला. 1988 मध्ये त्या भारतातील पहिली महिला लोको पायलट बनल्या. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

महत्वाच्या बातम्या 

Sheetal Mhatre Viral Video :  शितल म्हात्रेंच्या ओरिजिनल व्हिडीओचा शोध घ्या; ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी  





Source link

Oscar 2023: RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला तो सोनेरी क्षण, पाहा व्हिडिओ

0
Oscar 2023: RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला तो सोनेरी क्षण, पाहा व्हिडिओ



Oscar 2023: नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. त्यानंतर या गाण्याला ऑस्कर मिळतानाचा सोनेरी क्षण.



Source link

Ghar Bandook Biryani: ‘घर बंदूक बिरयानी’तील मोस्ट वॉन्टेड गुंड गँग आली समोर

0
Ghar Bandook Biryani: ‘घर बंदूक बिरयानी’तील मोस्ट वॉन्टेड गुंड गँग आली समोर


हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख कलाकार सर्वांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड ‘डाकू गँग’ समोर आली आहे. सोशल मीडियावर या ‘डाकू गँग’चे पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. या गॅंगमध्ये श्वेतांबरी घुडे, विठ्ठल काळे, नीरज जमगाडे- मायकल, सोमनाथ अवघडे, संतोष व्हडगीर (नाईक ), ललित मटाले, प्रवीण डाळिंबकर, किरण ठोके, सुरज पवार, किशोर निलेवाडी, प्रियांशू छेत्री- बाबू , सुभाष कांबळे, गिरीश कोरवी, चरण जाधव, अशोक कानगुडे, आशिष खाचणे यांचा समावेश आहे. या डाकू गँगची सुनावणी येत्या ७ एप्रिलला जवळच्या चित्रपटगृहात होणार आहे.



Source link

Oscar 2023: आणि राजामौलींनी पत्नीला मिठी मारली! पाह ऑस्करमधील सोनेरी क्षण

0
Oscar 2023: आणि राजामौलींनी पत्नीला मिठी मारली! पाह ऑस्करमधील सोनेरी क्षण



Oscar for Naatu Naatu Song : लॉस एंजलिस इथं झालेल्या ९५व्या ऑस्कर सोहळ्यावर भारताची मोहोर उमटली आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळाला आहे.



Source link

Oscar 2023: ऑस्करच्या मंचावर ‘RRR’ चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स

0
Oscar 2023: ऑस्करच्या मंचावर ‘RRR’ चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स



नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. त्यानंतर या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे समोर आले



Source link

Oscar 2023: ऑस्कर जिंकताच ‘नाटू नाटू’ गाण्याने केले तीन नवे विक्रम, जाणून घ्या कोणते

0
Oscar 2023: ऑस्कर जिंकताच ‘नाटू नाटू’ गाण्याने केले तीन नवे विक्रम, जाणून घ्या कोणते


एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, ‘नाटू नाटू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गायक काला भैरव आणि राहुल यांनी गायले आहे. त्यांच्या या गाण्याने आता ऑस्कर जिंकत सर्वांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’मधील संजनाला मिळाले दोन पुरस्कार

0
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’मधील संजनाला मिळाले दोन पुरस्कार


पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना रुपाली म्हणाली, ‘यंदा आनंद द्विगुणीत झालाय. स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. हे दोन्ही पुरस्कार अनपेक्षित होते. स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार ही कॅटेगरी पहिल्यांदाच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात होती. या नव्या पुरस्काराची सुरुवात माझ्यापासून झाली याचा आनंद आहे. स्टार प्रवाह आणि इन्स्टाग्रामने दिलेल्या या सन्मानाबद्दल मी खूपच आभारी आहे. या पुरस्कारामुळे आता जबाबदारी वाढली आहे. आपण काय पोस्ट केलं पाहिजे? लोकांपर्यंत काय पोहोचलं पाहिजे? याकडे आता अधिक लक्ष देईन. माझे रिल्स, फोटोज आणि व्हिडिओज तर मी पोस्ट करतेच यापुढेही असाच छान कन्टेण्ट देण्याचा प्रयत्न करेन. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस हा पुरस्कारही खूपच खास आहे. संजना हे पात्र खूपच स्टायलिश आहे. लेखक आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात संजना कशी वागेल? कशी दिसेल? हे पक्क ठरलेलं असतं. हे पात्र साकारताना मी दिलेल्या सुचनांचाही आदर राखला जातो हे उल्लेखनिय आहे. म्हणूनच तर संजनाची साडी, तिचे दागिने महिला वर्गात लोकप्रिय ठरत आहेत. प्रेक्षकांना एकच आवाहन करेन की हे प्रेम असंच राहू दे.



Source link

सातारा : वणव्यांमुळे डोंगरांची होतेय राखरांगोळी | पुढारी

0


तळमावले; पुढारी वृत्तसेवा :  डोंगरांना लावण्यात येणार्‍या वणव्यांमुळे डोंगरांची राखरांगोळी होत आहे. पाटण तालुक्यात डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. बामणवाडी, शिद्रुकवाडी येथील परिसरातील डोंगरांना वणवे लागल्यामुळे येथील वनसंपदा जळून खाक होत आहे. तर या वणव्याची झळ वन्यप्राण्यांसह पशुपक्षांनाही बसत आहे.

पाटण तालुक्याला निसर्गाचा अनमोल ठेवा मिळाला आहे. घनदाट झाडी तसेच डोंगर दर्‍यांचा परिसर त्यामुळे वनसंपदा आणि औषधी वनस्पती येथे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे निसर्गाने आणि वनसंपदेने समृद्ध तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख नामशेष होती की काय अशी भिती निर्माण झाली आहे. कारण येथे उन्हाळ्यात डोंगरांना सर्रासपणे वणवे लावले जात आहेत. वनविभाग वणवे रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शिद्रुकवाडी (खळे), व बागलवाडी (काढणे) परिसरातील डोंगराला व कुंभारगाव विभागातील बामणवाडी परिसरातील डोंगरांना लावलेल्या वणव्यामुळे वनविभागाच्या हद्दीतील वनसंपदा जळून खाक झाली आहे. ही आग आटोक्यात न आल्यामुळे शेतकर्‍यांच्या हद्दीत तो वणवा घुसण्याची भिती शेतकर्‍यांना वाटत होती. वणव्यामुळे कितीतरी सुक्ष्म जीव, सरपटणारे प्राणी, पक्षी, तसेच इतर वन्यजीव जळून खाक होत आहेत.

दुर्मीळ वनस्पती, वृक्ष जळून खाक…

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वणव्यांचे सत्र सुरू असते. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. मात्र, वनविभागाने यातून कोणताही धडा घेतलेला नाही. अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात डोंगरांना वणवे लावले जात आहेत. या वणव्यांमध्ये दुर्मीळ वनस्पती, वृक्ष जळून खाक होत आहेत. तसेच याची झळ वन्यप्राण्यांसह पशुपक्षांना बसत आहे. याचा विचार करून वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

The post सातारा : वणव्यांमुळे डोंगरांची होतेय राखरांगोळी appeared first on पुढारी.



Source link

‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’..लाखोंच्या उपस्थितीत बावधनचे बगाड | पुढारी

0


वाई; पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन (ता. वाई) येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा रविवारी ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. कोरोनानंतर प्रथमच अपूर्व उत्साहात ही यात्रा साजरी झाली.

बगाडाचा प्रारंभ भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर भाविकांनी बगाडाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कृष्णा नदीवर सोनेश्वर याठिकाणी सकाळी आठच्या सुमारास बगाड पोहोचले. त्यानंतर बगाड्या दिलीप शंकर दाभाडे यांना कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत-गाजत बगाडाजवळ नेवून त्याला पारंपरिक पद्धतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते.
बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी साडेआकराच्या सुमारास सुरुवात झाली. त्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि जोतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले.

बगाड वाई-पाचवड रस्त्यावर दुपारी चार वाजले तरीही आलेले नव्हते. बावधन फाटयावर पाचच्या सुमारास पोहोचले.
बगाड गाड्यास शेतातून जाताना एकावेळी 12 बैल जुंपले होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर 4 बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेर्‍या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व 108 अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली होती. वाई विभागचे महावितरणचे उपअभियंता पंकज गोंजारी आपल्या टीम समवेत जातीने लक्ष ठेवून हजर होते.

वाई नगरपरिषदेचे अग्निशमक बंब बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बगाड गावात पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाडयाच्या पुढे व पाठीमागे ट्रॅक्टरवर लाऊडस्पीकरची सोय करून कृषीभूषण शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, राजू कदम, पोलिस पाटील अशोक भोसले, मदन भोसले, विलास पिसाळ, प्रतापराजे भोसले, विक्रम पिसाळ, आदी मान्यवर ध्वनीक्षेपकावरून बगाडाबाबत सुचना देत होते.

अनेक भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा पुकारा यावेळी करण्यात येत होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भाविकांनाही सुचना देण्यात येत होत्या. पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे, वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक कृष्णराज पवार, आशिष कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पीएसआय व 60 पोलिस कर्मचारी, एक जलद कृतीदलाची तुकडी तैनात होती.

खा. उदयनराजेेंचे ‘काशिनाथा’ला साकडं

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी बगाडाचे मनोभावे दर्शन घेतले. बावधनचे ग्रामदैवत ‘काशिनाथा’ला त्यांनी साकडं देखील घातलं. ते म्हणाले, या गावात यात्रेसाठी गावकरी एकत्र येतात. ही एकी कायम रहावी, लोकांचे भले होवो, उत्कर्ष होवो व सर्वजण सुखा-समाधानाने, आनंदाने राहोत.



Source link

Oscar 2023: भारताला दोन ऑस्कर मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्वीट

0
Oscar 2023: भारताला दोन ऑस्कर मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्वीट



Oscar 2023: ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याला आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटाला ऑस्कर मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



Source link