Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2965

मोठी बातमी.. अजित पवारही शिंदेंच्या मार्गाने! राष्ट्रवादी पक्ष व घड्याळावर निवडणूक आयोगाकडे ठोकला दावा

0
मोठी बातमी.. अजित पवारही शिंदेंच्या मार्गाने! राष्ट्रवादी पक्ष व घड्याळावर निवडणूक आयोगाकडे ठोकला दावा


अजित पवारांनी एमएनटी येथील बैठकीतअनेक गौप्यस्फोट केले आहे. २०१४ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं, जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं, तर आम्हाला का तिथे पाठवलं? असा सवालही अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी एका आमदाराला धमकावल्याचाही गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला आहे.



Source link

Tu Chal Pudha: शिल्पी पुन्हा एकदा मयुरीच्या मनात विष पेरणार; अश्विनी विरोधात मुलीला भडकवणार!

0
Tu Chal Pudha: शिल्पी पुन्हा एकदा मयुरीच्या मनात विष पेरणार; अश्विनी विरोधात मुलीला भडकवणार!


मात्र, त्याचवेळी शिल्पीच्या डोक्यात एक दुष्ट विचार येतो आणि ती मयुरीला अश्विनी विरोधात भडकावण्यास सुरुवात करते. तुझ्या आईने मुद्दाम बिघडलेली खुर्ची तुला दिली आहे, असे ती मयुरीला सांगायचा प्रयत्न करते. तर, स्वतः कर्ज काढून घेतलेली खुर्ची ती तुला का देईल? तुझा बिझनेस चालवा, असे तिला वाटतच नाहीये. त्यामुळे मुद्दाम तिने तुला ही खुर्ची दिली आहे, असं शिल्पी मयुरीला सांगते. आधी आईच्या बाजूने असलेली मयुरी आत्याच्या या कुटील डावात अडकते आणि आपल्यामुळेच सगळं झालं आहे, यावर विश्वास ठेवते. आता पुन्हा एका मयुरी आणि अश्विनीमधील युद्ध पाहायला मिळणार आहे.



Source link

स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवून महिला पोहचली पंचायत समितीत; आईलाच कागदोपत्री मृत दाखवलं

0
स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवून महिला पोहचली पंचायत समितीत; आईलाच कागदोपत्री मृत दाखवलं


Chhatrapati Sambhaji Nagar News: शेत जमिनीसाठी सावत्र मुलाने जिवंत असलेल्या आईला ग्रामपंचायतच्या कागदोपत्री मृत दाखविण्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील आघूर येथे उघडकीस आला आहे. स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवूनच ती महिला पंचायत समितीत दाखल झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे, या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे तीन एकर शेतजमीन हडपण्याचा डाव मुलाने रचला असल्याचा आरोपही महिलेने केला आहे. तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने कोणतीही खातरजमा न करता हे प्रमाणपत्र कसे दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील आघूर येथील मंगलबाई उत्तमसिंग राजपूत या आपल्या मुलीच्या घरी रांजणगाव येथे राहतात. आघूर शिवारात त्यांची शेतजमीन आहे. ही शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने त्यांचा दीर शंकरसिंह रतनसिंह राजपूत, त्यांची दोन मुले आणि महिलेचा सावत्र मुलगा पंकज राजपूत यांनी ग्रामपंचायतला खोटी माहिती देत त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. पंकज राजपूत, दीपक राजपूत, शंकरसिंग राजपूत, सागर सोळुंके या सर्वांनी मिळून खोटी माहिती देऊन ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र तलाठी कार्यालयात देऊन आपली जमीन नावावर करण्याचा त्यांचा डाव असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

काय आहे प्रमाणपत्रामध्ये? 

दरम्यान, आघूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने एका छापील नमुन्यात मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला दिला आहे. यात मृत व्यक्ती मंगलबाई उत्तमसिंग राजपूत असा उल्लेख आहे. जिवंत असलेल्या महिलेचा मृत्यू 15 मे 2023 रोजी झाल्याचे दाखवून नोंदणी केली गेली आहे. या नोंदणीचा क्रमांक 71/2023 दाखविण्यात आला आहे. प्रमाणपत्र 21 जून 2023 रोजी दिल्याची तारीख असून, त्यावर ग्रामपंचायतीचा शिक्का आणि ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे.

वस्तुनिष्ठ अहवाल दोन दिवसांत देण्याचे आदेश 

या मृत्यू प्रमाणपत्रावर गंभीर स्वरूपातील चुका दिसून आल्याने त्याच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित होत आहे. महिलेचा मृत्यू 12 मे 2023 रोजी म्हंटले असतांना नोंदणी मात्र मागील वर्षी 17 मे 2022 रोजी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र ग्रामसेवकानेच दिले कि अन्य कोणी शिक्क्यांचा वापर करून हे तयार केला याचे कोडे निर्माण झाले आहे. दरम्यान जिवंत महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र कोणत्या आधारे देण्यात आले? याबाबत आपला वस्तुनिष्ठ अहवाल दोन दिवसांत देण्याचे आदेश ग्रामसेवक के. जे. काळे यांना पंचायत समिती प्रशासनाने दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

चल आपण पळून जाऊ… लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; संभाजीनगरमधील घटना



Source link

Mahesh Babu: ‘टाईम्स स्क्वेयर’च्या बिलबोर्डवर झळकणारी पहिली स्टारकीड; लेकीची भरारी पाहून भारावला महेश बाबू!

0
Mahesh Babu: ‘टाईम्स स्क्वेयर’च्या बिलबोर्डवर झळकणारी पहिली स्टारकीड; लेकीची भरारी पाहून भारावला महेश बाबू!


सिताराने तिच्या पदार्पणाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर आपल्या मुलीच्या पदार्पणाबद्दल महेश बाबूलाही खूप आनंद झाला आहे. अभिनेत्याने मुलीच्या एवढ्या मोठी कामगिरीची पोस्ट देखील शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी, सिताराने देखील तिच्या पदार्पणाची माहिती देत शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टाईम्स स्क्वेअर…. मी यापेक्षा अधिक आनंदी कधीच होऊ शकले नसते… पीएमजे ज्वेलरी तुमच्याशिवाय मी हे करूच शकले नसते.’ महेश बाबूनेही तिची पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टाईम्स स्क्वेअरवर… खूप अभिमान आहे आम्हाला तुझा… अशीच चमकत राहा’.



Source link

Rohit Pawar : भुंकणाऱ्या कुत्र्यांचा फोटो ट्वीट करत रोहित पवारांनी शेअर केली सूचक कविता

0
Rohit Pawar : भुंकणाऱ्या कुत्र्यांचा फोटो ट्वीट करत रोहित पवारांनी शेअर केली सूचक कविता


रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका फोटो शेअर केला आहे. त्यात मध्यभागी शरद पवार कार्यकर्त्यांसह दिसत आहेत. तर, चहूबाजूंनी कुत्रे भुंकत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. याचबरोबर, त्यांनी एक कविताही शेअर केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक परंपरेचा आढावा घेत सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या रोपट्यावर विखारी पावसाचं सिंचन होतंय, असं त्यांनी म्हटलं आहे.



Source link

Hemant Takale: शरद पवारांची ताकद काय आहे ते आजच्या बैठकीत कळेल- टकले

0
Hemant Takale: शरद पवारांची ताकद काय आहे ते आजच्या बैठकीत कळेल- टकले



<p>Hemant Takale: शरद पवारांची ताकद काय आहे ते आजच्या बैठकीत कळेल- टकले सरकारमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते मृगजळात अडकले -हेमंत टकले शरद पवारांची ताकद&nbsp; काय आहे ते आजच्या&nbsp; बैठकीत कळेल -टकले ‘जाणारे फक्त सत्तेसाठी&nbsp; गेले, त्यांना बाकी काही&nbsp; घेणं-देणं नाही'</p>



Source link

Anup Soni: ‘सावधान इंडिया’ म्हणणारा अनुप सोनी पहिल्या पत्नीला धोका देताना जेव्हा रंगेहाथ पकडला गेला! वाचा…

0
Anup Soni: ‘सावधान इंडिया’ म्हणणारा अनुप सोनी पहिल्या पत्नीला धोका देताना जेव्हा रंगेहाथ पकडला गेला! वाचा…


अनुपचे हे बोलणे ऐकून रितूला खूप मोठा धक्का बसला होता. अनुपने केवळ संसारच मोडला नाही, तर त्याने मुलींची जबाबदारी घेणे देखील टाळले होते. त्यानंतर अनुपने घर सोडले आणि वेगळा राहू लागला. रितूला पुरावा म्हणून अनुपच्या फोनची बिलेही मिळाली, ज्यात बहुतेक कॉल जुही बब्बरच्या नंबरवर केले गेले होते. यानंतर दोघेही वेगळे झाले. यांनतर अनुप सोनीने जुही बब्बरशी लग्नगाठ बांधली होती.



Source link

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ‘या’ लेखकाला डेट करत असल्याची चर्चा!

0
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ‘या’ लेखकाला डेट करत असल्याची चर्चा!


अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच राहुल मोदींसोबत चित्रपट पाहण्यासाठी आली होती. यावेळी दोघेही पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चित्रपट लेखक राहुल मोदीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी असा अंदाज बांधला आहे की, श्रद्धा कपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका खास व्यक्तीसोबत प्रेमाची एन्ट्री झाली आहे.



Source link

Rimjhim Gire Sawan: भर पावसात शूट झालं होतं अमिताभ बच्चन यांचं गाणं; अभिनेत्रीलाही करावी लागली तारेवरची कसरत!

0
Rimjhim Gire Sawan: भर पावसात शूट झालं होतं अमिताभ बच्चन यांचं गाणं; अभिनेत्रीलाही करावी लागली तारेवरची कसरत!


याशिवाय अमिताभ बच्चन मौसमी चॅटर्जी यांच्यापेक्षा खूप उंच आहेत, त्यामुळे शूटिंगदरम्यान त्यांचा वेग जुळवणे त्यांच्यासाठी किती कठीण होते? यावर बोलताना मौसमी चॅटर्जी यांनी गंमतीशीरपणे सांगितले की, अमिताभ भलेही त्यांच्यामुळे छोटी पावले टाकत होते, पण ते पुढे निघून जात. अशावेळी त्यांच्या लक्षात आले की, ते आपला वेग पुन्हा मंदावत. यामुळे कॅमेरा सतत मौसमी यांच्यावर फोकस व्हायचा.



Source link

सातारा : विस्तारवाढीचा छोट्या कारखान्यांना दणका; उसाची होणार पळवापळवी | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी गतवर्षी दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ केली आहे. त्यामुळे या कारखान्यांना यंदाच्या हंगामापासून जास्त ऊस लागणार आहे. हा ऊस गोळा करण्यासाठी उसाची मोठ्या कारखान्यांकडून पळवापळवी होणार आहे. याचा दणका छोट्या कारखान्यांना बसणार आहे. यंदाची उसाची झालेली लागवड व कारखान्यांची वाढलेली क्षमता याचा विचार करता यंदाचा हंगामही लवकर आटोपण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारने साखर उद्योगाच्या हिताचे बरेच निर्णय घेतले आहे. त्यामुळेच राज्यासह जिल्ह्यातील कारखानदारी तरली आहे. त्यामुळेच राज्यात अनेक नवीन कारखाने उभा राहत आहेत. तसेच अनेक कारखान्यांकडून गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इथेनॉलला मागणी वाढल्याने इथेनॉल प्रकल्पही बसवले जात आहेत. विस्तारवाढ व नवीन प्रकल्प होत असल्याने उसाची मागणी वाढणार आहे. परंतु, त्या तुलनेत यंदाच्या हंगामात उसाची लागवड झालेली नाही. गतवर्षीही हंगाम इनमीन 120 दिवस चालला होता.

यंदा जिल्ह्यातील श्रीराम, कृष्णा, लोकनेते बाळासाहेब देसाई, सह्याद्री, अजिंक्यतारा, दत्त इंडिया, जरंडेश्वर, शरयू आणि जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी अडीच हजार ते साडे सात हजार टनाने क्षमता वाढवली आहे. या 9 कारखान्यांची एकूण क्षमता तब्बल 52 हजार टन प्रति दिन इतकी वाढली आहे. त्यामुळे हे कारखाने दुसर्‍या कारखान्यांच्या हद्दीतून ऊस ओढून आणणार आहे. यातील बहुतांश कारखान्यांकडे इथेनॉलचे प्रकल्प आहेत. इथेनॉलसाठी लागणारी मळी खरेदी करावी लागू नये, यासाठी अनेक कारखाने उसाची पळवापळवी करणार आहे.

गाळप क्षमतेत वाढ झाली असली जिल्ह्यातील उस लागवड मात्र ‘जैसे थे’ आहे. उसाच्या लागवडीचे क्षेत्र न वाढल्यामुळे याचा हंगामावर परिणाम होणार आहे. गतवर्षी उस नसल्याने महिनाभर अगोदरच हंगाम आटोपला होता. त्यामुळे अनेक कारखान्यांचे उद्दिष्टही पूर्ण झाले नव्हते. यंदाही तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरात चढाओढ लागणार का?

तब्बल 9 कारखान्यांनी क्षमता वाढवल्याने दैनंदिन उसाची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यांना लागणार आहे. उसाची कमी झालेली लागवड आणि वाढलेली क्षमता यामुळे कारखान्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्यांना मेहनत करावी लागणार आहे. यामधून शेतकर्‍यांचा फायदा होऊन विस्तारवाढ केलेल्या कारखान्यांमध्ये दराची चढाओढ लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.











Source link