Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2966

सातारा : कास पठारावर उगवल्या दुर्मीळ रानभाज्या | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहराच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढला आहे. मान्सून सक्रिय होत असताना कास परिसर व डोंगररांगांत अनेक रानभाज्या उगवल्या आहेत. जुने, अनुभवी व्यक्ती रानोरानी दुर्मीळ रानभाज्या शोधून आणत आहेत. या रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

कास पठार परिसरात काही थंड तर काही उष्णवर्गीय रानभाज्या उपलब्ध होत असतात. भारंगीची भाजी विशेष आवडीने खाल्ली जाते. या भाजीच्या पानात लोह जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते. ही भाजी खोकला व कफ कमी करण्यासाठी गुणकारी आहे.
आळू, शेंडवल, आक्वल, भोकरी, तरळी, वाघचौवडा, अळंबी, मोरशेडा, कुरडू, रानआळू आदींसारख्या गोड, आंबट, खारट चव असणार्‍या नैसर्गिकरीत्या उगवलेल्या पौष्टिक, औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत नसल्याने पावसाळा ऋतूत भाज्यांचे सेवन केल्याने शरीरास आरोग्यद़ृष्ट्या महत्त्वाच्या ठरतात.

पावसाळा सुरू झाला की साधारण जून महिन्यापासून या रानभाज्या निसर्गत: कास तसेच आसपासच्या डोंगराळ भागात उगवून येण्यास सुरुवात होते. रानभाज्या दसरा, दिवाळीपर्यंत उपलब्ध असतात. सध्या कास परिसरासह आसपासच्या सर्व डोंगराळ भागात या रानभाज्या मुबलक प्रमाणात उगवून येण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा समावेश आहारात करतात. शहरी भागात अशा रानभाज्या खायला मिळणे म्हणजे फारच दुर्मीळ. जवळच्या बाजारपेठेतदेखील ग्रामस्थांकडून या रानभाज्या विक्रीस नेल्या जातात. कोणत्याही खताविना उगवून आलेल्या या रानभाज्या पावसाळ्यात पर्वणीच असते. सध्याच्या घडीला कास पठार व परिसरात पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. यानंतर रानभाजा उगवण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी या रानभाजा तोडण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.











Source link

सातारा : बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला | पुढारी

0









मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी रस्त्यादरम्यान बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात सुभाष श्रीरंग काळे (रा. सोनाईचीवाडी) हे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी 7 च्या सुमारास घडली आहे.

याबाबत माहिती अशी, सुभाष काळे हे सोमवारी सायंकाळी पाटणहून पापर्डेमार्गे दुचाकीवरून सोनाईचीवाडी येथील घरी निघाले होते. चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी दरम्यान ते आले असता बिबट्याने चालत्या गाडीवर झेप टाकून त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुभाष काळे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते गाडीसह रस्त्याकडेला पडले. यात त्यांच्या पायाला मार लागला. यावेळी बिबट्याने त्यांच्या मानेचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंगातील रेनकोटमुळे त्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले. मात्र बिबट्याने नख्यांनी सुभाष यांच्या डोक्याला, हाताला ओरखडले आहे. दरम्यान, मागून येणार्‍या दुचाकीवरील नागरिकांनी सुभाष यांना ताबडतोब घटनास्थळापासून शेजारी असलेल्या सुर्यवंशीवाडी गावामध्ये नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

यापूर्वीही हल्ल्याच्या घटना…

नागरिकांची सुरक्षा धोक्यात

गव्हाणवाडी, पापर्डे ते साजूर मार्गावर अनेकदा वाहनधारकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. तर बिबट्याकडून दुचाकीवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. असे प्रकार घडू लागल्याने येथून प्रवास करणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.











Source link

सातारा : वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम वनविभागाने पाडले | पुढारी

0









खटाव; पुढारी वृत्तसेवा :  खटाव तालुक्यातील किल्ले वर्धनगडावर राखीव वनक्षेत्रावर केलेले अनधिकृत बांधकाम मंगळवारी सकाळी हटवण्यात आले. कमालीची गुप्तता पाळत वन विभागाने ही कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

किल्ले वर्धनगडावर असलेल्या वनविभागाच्या राखीव क्षेत्रात करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे, अशी मागणी मनसेचे पदाधिकारी युवराज पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे पोलिसांच्या बंदोबस्तात वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई सुरु केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सूर्योदय होताच पावणेसात वाजता कारवाई सुरु केली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेकॉर्डवर नसलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.

मध्यरात्री तयारी आणि सूर्योदय होताच कारवाई

किल्ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची तयारी मध्यरात्रीपासूनच करण्यात आली होती. पहाटेपासूनच गडावर जाणार्‍या सर्व रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन अधिकारी, 32 कर्मचारी, दोन स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईवेळी उपस्थित होते. यावेळी गडावर भाविकांसह सर्वानाच प्रवेशबंदी केली होती. प्रसिद्धी माध्यमांनाही मज्जाव केला होता. मंगळवारी दिवसभर गडावर कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही.











Source link

Movies Releasing This Week: ‘नीयत’ ते ‘आठवणी’; या आठवड्यात मिळणार मराठी-हिंदी चित्रपटांची मेजवानी!

0
Movies Releasing This Week: ‘नीयत’ ते ‘आठवणी’; या आठवड्यात मिळणार मराठी-हिंदी चित्रपटांची मेजवानी!


७२ हुरें

‘द केरळ स्टोरी’ या विवादित चित्रपटानंतर आता ‘७२ हुरें’ हा चित्रपट आता रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा ब्रेनवॉश करून आत्मघातकी बॉम्बर्स बनणाऱ्या तरुणांभोवती फिरते. ‘७२ हुरें’ हा चित्रपट दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रसिद्ध दिग्दर्शक संजय पूरण सिंह फिल्म्स यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एकूण १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त इंग्रजी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, काश्मिरी आणि आसामी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पवन मल्होत्रा आणि आमिर बक्षी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ७ जुलैला हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.



Source link

NCP Crisis : दादांच्या बंडामुळे पुणे जिल्ह्यात इच्छुकांचा होणार पत्ता कट; अजित गटाला अ‍ॅडजेस्ट करणे भाजपला अवघड

0
NCP Crisis : दादांच्या बंडामुळे पुणे जिल्ह्यात इच्छुकांचा होणार पत्ता कट; अजित गटाला अ‍ॅडजेस्ट करणे भाजपला अवघड


शिरूर तालुक्यातील भाजपच्या जयश्री पलांडे, खेडमधील राम गावडे, पुरंदर तालुक्यातील बब जाधवराव, हवेली तालुक्यातील प्रदीप कंद, तसेच दौंड तालुक्यातील अजित पवार यांचे समर्थक रमेश थोरात आणि भाजपचे राहुल कुल यांचे काय होणार या कडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



Source link

आ. मकरंद पाटील शरद पवारांसोबतच | पुढारी

0


वाई; पुढारी वृत्तसेवा :  शरद पवार की अजित पवार या संभ्रमावस्थेत असलेल्या वाई-खंडाळा – महाबळेश्वर मतदार संघात अखेर स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे संस्कार व शिकवण अखेर निर्णय घेण्याच्यावेळी कामी आले. द्विधा मनःस्थितीत असलेल्या आ. मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवसांपूर्वी ना. अजित पवार यांच्यासमवेत राहिलेल्या आ. मकरंद पाटील यांनी दुसर्‍यादिवशी शरद पवार यांच्या गाडीतून एकत्र प्रवास केला. मात्र, तरीही त्यांनी आपण कोणाबरोबर आहे हा निर्णय जाहीर केला नव्हता. या संदर्भात किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर त्यांनी निवडक पदाधिकार्‍यांची व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडावीत, असे सुचवण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी कारखान्याच्या उर्जितावस्थेसाठी अजितदादांसमवेत गेले पाहिजे, असे सांगितले. मात्र, बर्‍याच कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी आ. मकरंद पाटील यांना स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या संस्कारांची आठवण करुन दिली. काहींनी स्व. मदनराव पिसाळ यांचीही आठवण काढली. त्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी शरद पवार यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय जाहीर केला.

यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, राजेंद्रशेठ राजपुरे, दिलीप बाबा पिसाळ, महादेव मस्कार, मदन आप्पा भोसले, मोहन जाधव, किरण काळोखे, विनायक येवले, डी. बी. खरात, अनिल सावंत, रमेश गायकवाड, चरण गायकवाड, अजित शेेवाळे, मोहन चव्हाण, अनिल पवार, बाळासाहेब चिरगुटे, सुधीर भोसले, राजाभाऊ सोनावणे, कांतीलाल पवार, दीपक बाबर, उदय कबुले, ज्ञानोबा शिंगटे, संतोष बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.



Source link

साताऱ्यात अजित पवारांच्या शुभेच्छा फ्लेक्सवर शरद पवारांचाही फोटो | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा सातारा दौरा झाल्यानंतर मंगळवारी सातारा शहर व परिसरात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या शुभेच्छांचे फलक लागले आहेत. या फलकावर खा. शरद पवार यांचा फोटो आहे. मात्र त्यांच्या समर्थक खासदार व आमदारांचे फोटो गायब आहेत. या बॅनरवर फक्त सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून हे बॅनर लावले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनरमागील कर्ता धर्ता कोण? असा सवाल केला जात आहे.

खा. शरद पवार यांच्या दौर्‍यानंतर सातारा शहर व परिसरात मंगळवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लागले. या फ्लेक्सवर खा. शरद पवार, ना. अजित पवार, आ. रामराजे नाईक निंबाळकर, खा. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मंत्रिमंडळात सहभागी झालेल्यांचे फोटो लागले आहेत. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे शरद पवार समर्थक खासदार व आमदारांच्या फोटोसह राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांच्या फोटोंना स्थान देण्यात आले नाही. बॅनरवर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे लिहण्यात आले आहे. जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी हे फ्लेक्स राष्ट्रवादीने लावले नसल्याचे स्पष्ट केले आहे.











Source link

Maharashtra Political Crisis : मुंबईत बैठका; जायचे नक्की कुणाकडे;द्विधा मनःस्थितीतच खटावमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवाना | पुढारी

0









खटाव; पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (Maharashtra NCP crisis) पक्षात उभी फूट पडल्यानंतर बुधवारी मुंबईत दोन्ही गटांची बैठक पार पडत आहे. यामध्ये दादांच्या बैठकीला जायचे की साहेबांच्या बैठकीला उपस्थित राहायचे, अशा द्विधा मनस्थितीत खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Maharashtra Political Crisis)

आज दोन्ही गटाकडून (Maharashtra NCP crisis) मुंबईत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. खटाव तालुक्यातूनही पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. काहींनी साहेबांच्या तर काहींनी दादांच्या गोटात सामील व्हायचा निर्णय घेतला आहे. काहींनी काहीच न ठरवता गाडी मुंबईच्या दिशेने दामटली आहे. मुंबईत पोहोचल्यावर तिथले वातावरण पाहून निर्णय घेण्याचे काही चाणाक्षांनी ठरवले आहे.

राजकारणात काम करताना राष्ट्रवादीच्या सर्वच नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अजितदादांशी अधिक संपर्क असतो. या सर्वांसाठी पवार साहेबांकडे जाण्याचा प्रसंग क्वचितच येतो. विकासकामांसाठी निधी मिळवणे, पक्ष कार्यकारिणीत पदे मिळवणे, निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवणे, शासकीय कामात मदत मिळवणे अशा अनेक कामांसाठी सर्वांना अजितदादांकडे जावे लागते. आता पुन्हा ते उपमुख्यमंत्री होवून सत्तेत आल्याने यापुढेही हाच सिलसिला सुरु रहाणार आहे. त्यामुळे दादांच्या गोटात सामील व्हावे, असा एक मतप्रवाह तालुक्यात पुढे आला आहे. (Maharashtra Political Crisis)

दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणजे खा. शरद पवार हे समीकरण यापुढेही कायम राहील. सर्वसामान्य जनता साहेबांच्याच पाठीशी राहिल. त्यामुळे भविष्यात तालुका स्तरावरील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना सर्वसामान्य मतदारांचा विचार करावाच लागेल, अशी धारणा असलेले शरद पवार यांच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे. खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी किती आणि कुणाकडे जाणार हे आज मुंबईत होणार्‍या बैठकांमधून दिसणार आहे.

उघड उघड न येता फोनवरून विचारणा

गेल्या दोन दिवसात पवार कुटुंबीय आणि खा. शरद पवार यांच्या कार्यालयातून तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांना फोन करून कराड आणि मुंबईला बैठकीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वच पदाधिकारी उघड उघड एकत्र न येता फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहेत. एकमेकांना एकमेकांचा निर्णय विचारला जात आहे. (Maharashtra Political Crisis)

हेही वाचा !

 











Source link

अजित पवारांचा निर्णय राजकारणातील दांभिकपणा : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0









खटाव; पुढारी वृत्तसेवा :  एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. दुसरीकडे अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी उल्लेख केला होता. त्यानंतर लगेचच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा राजकारणातील दांभिकपणा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दरम्यान, सत्तेसाठी भाजपा आणि मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे राज्यातील जनतेने पाहिले असल्याचेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

वडूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, सचिव राजेंद्र शेलार, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, बाबासाहेब माने आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्याच्या राजकारणात काल चुकीची घटना घडली. हा राष्ट्रवादीमधील विषय आहे. त्यांची पक्ष म्हणून रस्त्यावरील लढाई सुरु झाली आहे. त्या लढाईचे रणशिंग खा. शरद पवार यांनी कराडमधून फुंकले आहे. संपूर्ण राज्यभर दौरा करून नव्याने पक्ष उभारणीचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात 17 पक्षांची आघाडी झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी हा महत्त्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादीत विभाजन झाले असले तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आमच्या आघाडीतील घटक पक्ष राहणार आहे.

भाजप, शिंदे गट व अजित पवार यांच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांना समर्थन देणार्‍या आमदारांच्या निलंबनाबाबत विधीमंडळ अध्यक्षांकडे कारवाई सुरू आहे. 18 ऑगस्टपर्यंत त्यांना अंतिम निर्णय द्यावा लागेल. तो निर्णय शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना निलंबित करण्याशिवाय दुसरा काही होऊ शकत नाही. त्यांचे निलंबन अटळ आहे. त्यावेळी मुख्यमंत्रीपद रिक्त होईल. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले असल्याचे समजत असल्याचेही त्यांनी सांगितले.

…अन्यथा त्यांचेही निलंबन

ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले होते त्यांना चौकशीची भीती दाखवली गेली. अजित पवार यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणार्‍या नऊ आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राज्याच्या अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांकडे निलंबनाची तक्रार दिली आहे. त्यावर न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी दोन तृतीयांश म्हणजे 36 आमदार अजित पवार यांच्याकडे असतील तर पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून ते सुटतील, अन्यथा निलंबित होतील.











Source link

सातारा : जिल्हा परिषद शाळेच्या 195 खोल्या धोकादायक; पडझडीबाबत ‘बांधकाम’कडे अहवाल | पुढारी

0


सातारा; प्रवीण शिंगटे :  जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं काम होत असते. मात्र, या ज्ञानदान करणार्‍या 59 शाळांमधील 195 वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत. या खोल्या निर्लेखीत करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाने बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. निधी नसल्याने धोकादायक शाळांच्या खोल्याचे बांधकाम रखडले आहे. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. दुर्देवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

सातारा जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, खंडाळा तालुक्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. छतांना गेलेले तडे, वारा अन् पावसामुळे छताचे तुकडे वर्गामध्ये पडणे, पत्र्याचा जोरदार आवाज येणे, पावसाळ्यात वर्गखोल्या गळणे असे प्रकार या प्राथमिक शाळांमध्ये घडत आहेत. त्यामुळे त्या वर्गावर शिकवणार्‍या शिक्षकांसह हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून तर काही ठिकाणी जिल्हा वार्षिक योजना निधीच्या माध्यमातून शाळांची बांधकामे करण्यात येतात यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र झालेली ही बांधकामे गुणवत्तापूर्ण झाली आहेत का? याची त्रयस्थ यंत्रणे मार्फत तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच बांधकामाची पाहणी करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती आवश्यक आहे. त्याबरोबरच दरवर्षी शाळांचे बांधकाम ऑडीट होणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळांची कमी अधिक प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. मात्र शाळांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश शाळांची दुरुस्ती प्रशासनामार्फत करण्यात आली नसल्याने याच धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी की ठेकेदाराच्या फायद्यासाठी केला जातो असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

अशा आहेत धोकादायक शाळेतील खोल्या…

सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहूली शाळेतील 8, मांडवे 5, काशीळ 7, अंगापूर नं 1 मधील 4 व नं 2 मधील 7, धनवडेवाडी 2, धनवडेवाडी (दरे बु.) 1, वर्णे 5, अतित 2, खंडोबाचीवाडी 2, कोडोली 3, प्रतापसिंहनगर 2, कळंबे 2. कोरेगाव तालुक्यातील बोरजाईवाडी 3, जळगाव 8, करपेवस्ती (चिमणगाव) 1, लक्ष्मीनगर 4, सुलतानवाडी 3, तांबी पु. 3, रेवडी 4, दुघी 3. वाई तालुक्यातील खडकी 2, वेलंग 3, खंडाळा तालुक्यातील पारगाव 4, वाठार बु.3, कराडवाडी 3. फलटण तालुक्यातील सांगवी 5, माळेवाडी (सांगवी) 2, बागेवाडी 3, सावंतवाडी1, तरडफ 3, उपळवे 2. कराड तालुक्यातील वहागाव 6, बेलवडे बु. 8, वराडे 3, हनुमानवाडी 2, वस्ती साकुर्डी 4, आणे 6, साळशिरंबे 6, पाटीलवाडी (शेवाळेवाडी) 2, हणमंतवाडी 2, काटेकरवाडी 2, म्हासोली 1, जुळेवाडी 1. खटाव तालुक्यातील शेळकेवाडी (निमसोड) 2, हिवरवाडी 3, शिरसवस्ती 4, तडवळे 2, डिस्कळ 3, कुरोली सिध्देश्वर 5, कातरखटाव 3. पाटण तालुक्यातील निसरे, उरूल, विरेवाडी, तामिणे. जावली तालुक्यातील महिगाव, कुडाळ, धाकटी काळोशी व महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील शाळेची 1 खोली धोकादायक आहे.



Source link