Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2967

मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट, आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; समुद्रातही उंच लाटा येण्याचा इशारा

0
मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट, आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; समुद्रातही उंच लाटा येण्याचा इशारा


Mumbai Rain : सकळापासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचलं आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार मुंबईत (Mumbai) आज पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 
  
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईत यलो अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईच्या शहरी भागात 53.93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरात 27.97 मिमी आणि पश्चिम उपनगरात 45.69 मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

समुद्रात 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याचा इशारा

आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट दिल्यामुळं आज समुद्र खवळण्याची शक्यता आहे. समुद्रात आज 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समुद्रात 4.78 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट 

राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. पावसामुळं शेतीचं काम खोळंबली आहेत. दरम्यान राज्यातील कोकणातील जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Weather Update : 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज  



Source link

Bigg Boss OTT 2: बिग बॉसच्या घरात क्रूरतेचा कळस; कॅप्टनपदासाठी स्पर्धकांनी जिया शंकरवर ओतली मिरची पावडर!

0
Bigg Boss OTT 2: बिग बॉसच्या घरात क्रूरतेचा कळस; कॅप्टनपदासाठी स्पर्धकांनी जिया शंकरवर ओतली मिरची पावडर!


जिया शंकर स्वतःचे कॅप्टनपद वाचवण्यासाठी खुर्चीवर बसली. मात्र, यावेळी मनीषा राणी, बेबिका आणि अभिषेक मल्हान यांनी तिला खुर्चीवरून उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी कधी तिच्या अंगावर मिरची पावडर टाकाली, तर कधी शाम्पू ओतला. या गोष्टीच नाही तर, त्यांनी तिला खुर्चीवरून उठवण्यासाठी तिच्या अंगावर हँडवॉश, तेल, काळी मिरी, पाने अशा बऱ्याच गोष्टी टाकल्या. अशा स्थितीत जिया शंकर मात्र खचली नाही. सायरस आणि पूजा भट्ट यांनी तिच्यावर फोम क्रीम लावले. मात्र, त्यानंतर ते शांत बसले. तर, दुसरीकडे अविनाश जियाला मदत करण्यासाठी तिच्यावर पाणी ओतताना दिसला. यादरम्यान अविनाश आणि अभिषेकमध्ये भांडण देखील झाले.



Source link

Shah Rukh Khan: सेटवर अपघात, शस्त्रक्रिया… अखेर सगळ्याचा सामना करून शाहरुख खान भारतात परतला! पाहा व्हिडीओ

0
Shah Rukh Khan: सेटवर अपघात, शस्त्रक्रिया… अखेर सगळ्याचा सामना करून शाहरुख खान भारतात परतला! पाहा व्हिडीओ


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे शाहरुख खान जखमी झाला असून, त्याच्या नाक आणि चेहऱ्याला खूप दुखापत झाली आहे. अपघातानंतर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी शाहरुखवर अमेरिकेतच एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. या दरम्यान हे वृत्त ऐकून त्याचे चाहते मात्र प्रचंड काळजीत पडले होते. आपल्या लाडक्या अभिनेत्याला बरे वाटावे म्हणून ते सतत देवाचा धावा करत होते. मात्र, आता शाहरुख खान सुखरूप भारतात परतला असून, काहीकाळ घरीच विश्रांती घेणार आहे. शाहरुख खान विमातळावर पुन्हा एकदा ‘बादशहा’ अंदाजात पाहून चाहते आनंदून गेले आहेत.



Source link

संपादकीय: यूसीसी प्रगतिशील, पण सर्व पैलूंवर चर्चा झाली पाहिजे

0
संपादकीय: यूसीसी प्रगतिशील, पण सर्व पैलूंवर चर्चा झाली पाहिजे


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मानवाचा विकासाचा प्रवास हा बुद्धिमत्तेच्या वापराचा दस्तऐवज आहे, जंगलातून शेती, उद्योग व आता एआयपर्यंत पोहोचणे आणि या प्रक्रियेत नवीन वैयक्तिक, सामाजिक, सरकारी, व्यावसायिक संस्था व पद्धती विकसित करणे हे मानवी जीवन-आशेचे उदाहरण आहे. याच विचाराने आयुष्य उत्तरोत्तर सुधारत गेले. धर्म आणि त्याच्या श्रद्धा मानवी जीवनात शांतता आणतात, पण ते कधीकधी बौद्धिक विकासाच्या प्रवासात मागे पडतात, उदा. काही आदिवासी प्रथा. इ.स.पूर्व १७७६ मधील हमुराबीची फौजदारी संहिता (ती अनेक शतके टिकली) देवाच्या नावावर असली, तरी उच्चभ्रू वर्गातील व्यक्ती एखाद्या प्रतिस्पर्ध्याच्या मुलीला मारल्यावर त्याच्या मुलीची हत्या किंवा अशी व्यक्ती एखाद्या गुलामाच्या मुलीला मारते तेव्हा त्याला काही नाणी देण्याचा कायदा देतो, त्यामुळे आज आपल्याला अशा न्यायव्यवस्थेचा तिरस्कार वाटतो. धर्माचा जीवनाच्या इतर पैलूंवर परिणाम होत असेल तर समाज जडत्वाचा बळी ठरतो, कारण धर्माच्या व्यवस्था स्तब्ध आणि नवीन जीवनशैलीबाबत बदल-शून्य असते. धर्माच्या नावाखाली लाखो लोक मारले गेले, अशा वादळात आपले संविधान बनवले गेले.

संविधान निर्मात्यांना सावधपणे पावले टाकावी लागली. त्याचे शब्द पाहा- ‘राज्य आपल्या नागरिकांना संपूर्ण भारताच्या प्रदेशात एकसमान नागरी संहिता प्रदान करण्याचा प्रयत्न करेल.’ म्हणजे विवाह, दत्तक, घटस्फोट, वारसा इ.मध्ये एकसमानता. भूतकाळातील विचारसरणी कितीही धार्मिक असली तरी ती व्यक्तिगत किंवा स्त्री-स्वातंत्र्याच्या वर्तमान निकषांना स्पर्शही करू शकली नाही. मग समाज नव्या बौद्धिक विचारातून निर्माण झालेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा फायदा समाज घेत असेल, तर त्याच विचारसरणीतून निर्माण झालेल्या नैतिकतेचे नवे मापदंड स्वीकारण्याची जबाबदारीही त्याचीच आहे. आदिवासींच्या बाबतीत समान नागरी कायद्यावर निरोगी चर्चा गरजेची आहे.



Source link

Pune Police : पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच दिवसात घेतली तब्बल १८०० गुंडांची झाडाझडती; १५९ जण गजाआड

0
Pune Police : पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच दिवसात घेतली तब्बल १८०० गुंडांची झाडाझडती; १५९ जण गजाआड


बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, काेयते, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष मोहिमेत पोलिसांनी मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडले आहे. मारहाणीच्या गु्न्ह्यात सात जणांना अटक करण्यात आली. बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले. शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी १३ गुंडांना अटक करण्यात आली.



Source link

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; आज दिवसभरात

0
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; आज दिवसभरात


5th July Headline : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याकडील खासदारांची संख्या मात्र स्पष्ट झाली नाही. पण बुधवारी होणाऱ्या बैठकीत अजित पवार त्यांच्याकडील खासदारांची संख्या स्पष्ट करणार आहेत. बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या महराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर शिवसेनेप्रमाणे शरद पवारही राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत. 

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचा महाराष्ट्र दौरा 

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. तसेच त्या गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. नागपूर मधील कोराडी येथील भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीची बैठक घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुकास्तरावरील सर्व फ्रंटल सेलच्या सदस्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीचा व्हीप जितेंद्र आव्हाड यांनी जारी केला आहे. 

अजित पवारही घेणार बैठक

पक्षातून बंड केल्यानंतर अजित पवारांनी आज सर्व आमदार, खासदारांना बैठकीला बोलवलं आहे.या बैठकीनंतर अजित पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या बैठकीचा व्हिप प्रतोद अनिल पाटील यांनी जारी केला आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक

अजित पवार सरकार मध्ये सामिल झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा सध्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. 

उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन 

आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माजी आमदारांची बैठक घेणार आहेत. ही बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनचा इशारा

राज्यात पुढील काही चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अर्लट देण्यात आला आहे. 



Source link

Ajit Pawar Office: अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन; कार्यालयात शरद पवारांचा फोटो

0
Ajit Pawar Office: अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन; कार्यालयात शरद पवारांचा फोटो



<p>Ajit Pawar Office: अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन; कार्यालयात शरद पवारांचा फोटो</p>



Source link

Maharashtra NCP Political Crisis LIVE : दोघेही आशावादी, कुणाची राष्ट्रवादी? अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतही दोन गट, पाहा लाईव्ह अपडेट्स

0
Maharashtra NCP Political Crisis LIVE : दोघेही आशावादी, कुणाची राष्ट्रवादी? अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतही दोन गट, पाहा लाईव्ह अपडेट्स



<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Political Crisis :</strong> राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून (Shiv Sena) बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तशी नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याचीही माहिती मिळत आहे.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">अजित पवारांच्या शपथविधीनंतर काल (सोमवार) शिंदे गटाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. याच बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. &nbsp;तसेच, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे गटातील काही मंत्री नाराज आहेत.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह उदय सामंत (Uday Samant), गुलाबराव पाटील (Gulab Patil), शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदिपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक छोटीशी बैठक झाली ज्यात त्यांनी विभागांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार राज्य मंत्रिमंडळात सामील झाले &nbsp;आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्यानं जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचं समजत आहे.&nbsp;</p>



Source link

NCP Crisis : राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब..“शरद पवारांना एकटं राहू द्या, जाऊ आपण”, ‘त्या’ पत्राबद्दल खळबळजनक खुलासा

0
NCP Crisis : राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब..“शरद पवारांना एकटं राहू द्या, जाऊ आपण”,  ‘त्या’ पत्राबद्दल खळबळजनक खुलासा


जितेंद्र आव्हाड म्हणाले की,जयंत पाटील यांनी ते पत्र शरद पवारांना दिलं नाही, कारण जयंत पाटील यांना माहिती होतं की शरद पवारांना किती वाईट वाटेल. त्यावेळी शरद पवारांना एकटं सोडा,आपण जाऊया, असं काही आमदारांचं म्हणणं होतं. शरद पवारांना एकटं राहू द्या,जाऊ आपण, असं आमदार दिलीप बनकर म्हणाले होते. तेव्हा जयंत पाटील ढसाढसा रडले होते’,असा दावाही आव्हाड यांनी केला आहे.



Source link

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परतणार? शंभूराज देसाईंचे सूचक विधान

0
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परतणार? शंभूराज देसाईंचे सूचक विधान


त्यावर शिंदे म्हणाले की, हा जर-तरचा विषय आहे. ज्यावेळी हाक येईल तेव्हा साद दिली जाईल, असे म्हणत त्यांच्याकडून तशी साद आली तर सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ, असे मोठे विधान केले आहे. शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचा तिसरा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link