Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2964

सातारा जिल्ह्यात शरद पवार- अजित पवार गटांतील संघर्ष उफाळणार | पुढारी

0

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी मुंबईत कोणता झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती झाली. शरद पवारांच्या सभेला जायचे की अजित पवारांच्या सभेला जायचे, अशी संभ्रमावस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही भविष्यकाळात शरद पवार व अजित पवार गटांमध्ये संघर्ष उफाळणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण हे अजितदादांच्या व्यासपीठावर तर खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे व आ. बाळासाहेब पाटील हे खा. शरद पवार यांच्या व्यासपीठावर दिसले. आ. मकरंद पाटील यांनी दोन्हीकडे जायचे टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यातही उभी फूट पडली आहे. खा. शरद पवार यांनी सातार्‍याच्या दौर्‍यात डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा संपूर्ण प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसले नाही. अनेक तालुक्यांमधून अजितदादांच्या सभेलाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, या विधानाला तडा गेला.

खा. शरद पवार यांच्या व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे तर समोर सारंग पाटील, सुनील माने,राजकुमार पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी दिसले. त्यात सातार्‍यातून शशिकांत वाईकर, अतुल शिंदे, दीपक पवार, सचिन जाधव, सचिन चव्हाण, जावलीतून समिंद्रा जाधव, कोरेगावातून राजाभाऊ जगदाळे, संजना जगदाळे, श्रीमंत झांजुर्णे, सनी शिर्के, कराडमधून मानसिंग जगदाळे, देवराज पाटील, पाटणमधून सत्यजित पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजेश पवार, माणमधून प्रभाकर देशमुख, अभय जगताप, बाबासाहेब सावंत, वाईतून प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, प्रताप पवार, खंडाळ्यातून दत्तानाना ढमाळ, डॉ. नितीन सावंत, अजय भोसले, महाबळेश्वरमधून रोहित ढेबे उपस्थित होते. तर अजितदादांच्या सभेला व्यासपीठावर आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण तर समोर किरण साबळे-पाटील, सचिन बेलागडे, राजेंद्र नेवसे, अमित कदम, नंदकुमार मोरे, रमेश धायगुडे-पाटील, बंडू ढमाळ, विक्रमबाबा पाटणकर, अरुण माने, नागेश जाधव, मंगेश धुमाळ, नीलेश कुलकर्णी, संभाजी घाडगे, रमेश शिंदे, बाळासाहेब शेळके यांच्यासह अनेक तालुक्यांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

सभेनंतरही या कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा घ्यायचा, यावरून संभ्रम होता. शरद पवार व अजित पवार यांनी मतभेद संपवून तातडीने एकत्र यावे, अशा प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे व्यक्त केल्या. मात्र, दोन्ही सभांनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी शक्यता दुरापास्त झाल्याने भविष्यकाळात शरद पवार-अजित पवार गटांत सातारा जिल्ह्यात संघर्ष उफाळणार, असेच चित्र निर्माण झाले आहे.

मकरंद पाटील कुठेच फिरकले नाहीत

आ. मकरंद पाटील दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांच्या दौर्‍यात पूर्णवेळ होते. मात्र, मुंबई येथील सभेला कोणत्याच व्यासपीठावर ते दिसले नाहीत. मकरंद पाटील यांचे पवार कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांची कुचंबणा वाढली असल्याची चर्चा असून, वैद्यकीय कारणास्तव आ. मकरंद पाटील दोन्ही सभांकडे फिरकले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांचे कार्यकर्ते खा. शरद पवार यांच्या सभेला उपस्थित होते.

Source link

महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

0
महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra Election News: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra NCP Political Crisis) अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politcs) भूकंपानंतर आता जवळपास सर्वच समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक (Lok Sabah Election 2024) झाली तर निकाल काय लागतील आणि जनतेचा कौल कोणाला मिळेल? हे प्रश्न आतापासूनच सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहेत.

देशात लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी 2024 मध्ये होणार असल्या तरी, महाराष्ट्रात अद्याप निवडणुकीचे बिगुल वाजलेले नाही. टाईम्स नाऊ नवभारतनं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात एक सर्वेक्षण केलं आहे. आज लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) झाली तर कोणत्या पक्षाला किती मताधिक्य मिळेल? हा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आला. दरम्यान, या सर्वेक्षणाचे आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत.

कोणत्या पक्षाला किती मतं?

सर्वेक्षणानुसार, आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या (BJP) पारड्यात जरा जास्त मताधिक्य पडले. सर्वेक्षणात भाजपला 43.10 टक्के तर महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) 42.10 टक्के मतं मिळाली आहेत. इतरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची मतांची टक्केवारी 14.80 टक्के आहे. महाविकास आघाडीच्या मतांच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपचं मताधिक्य पुढे असल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे, परंतु संख्याबळ पाहता महाविकास आघाडी भाजपच्या तुलनेत फारशी मागे नाही. महाविकास आघाडीच्या मतांचा वाटा भाजपपेक्षा फक्त एक टक्का कमी आहे.

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?

भाजपची मतांची टक्केवारी : 43.10 टक्के
महाविकास आघाडीची मते : 42.10 टक्के
इतरांच्या मतांचा वाटा : 14.80 टक्के

निवडणुकीपूर्वी नेतेमंडळी सज्ज

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं प्रादेशिक युनिट्सची एक मोठी संघटनात्मक पुनर्रचना सुरू केली आहे, ज्याकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. संघटनात्मक बदलांमध्ये तेलंगणा, पंजाब आणि झारखंडचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, सुनील जाखर आणि बाबुलाल मरांडी यांची नावं समाविष्ट आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय होतं चित्र?

भाजपची लाट देशातील काही राज्यांतून ओसरताना दिसत आहे. यावेळी बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं. ही तिनही तिच राज्य आहेत, जिथे 2019 च्या निवडणुकीत भाजपनं एकतर्फी विजय मिळवला होता. 2019 मध्ये भाजप, एलजेपी आणि जेडीयूनं बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. परंतु, आता जेडीयूननं भाजपची साथ सोडली आणि भाजपनं बिहारमधील सत्ता गमावली. कर्नाटकात 28 पैकी 25 जागा भाजपनं जिंकल्या, तर एक जागा त्यांच्या समर्थक उमेदवारांच्या वाट्याला गेली, परंतु कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mararashtra NCP Crisis: 2024 मध्ये भाजपला का हवीये अजित पवारांची साथ? काय आहे निवडणुकीपूर्वीचा गेम प्लान?

Source link

विहेतील सॉफ्टवेअर इंजिनियर पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी | पुढारी

0

मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा : ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) पुणे शहरातील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास अटक केली आहे. तो पाटण तालुक्यातील विहे गावचा आहे. अभिजीत संजय जंबुरे असे त्याचे नाव आहे.

अभिजीत जंबुरे हा पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, बुधवार (दि. ५) रोजी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी अभिजीत जंबुरे यांच्या विहे येथील घरी जाऊन नातेवाईकांची विचारपूस केली. त्याच्या घरी आई – वडील व बहिण आहे. अभिजीत जंबुरे हा अविवाहित आहे. वडील विहे बस थांब्यावर अनेक वर्ष सायकलचे पंक्चर व किरकोळ दुरुस्तीचे काम करत होते. अभिजीत गेल्या महिन्यात घरी आला होता. अचानक आज त्याच्याबाबतची माहिती समजल्यामुळे गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Source link

Maharashtra NCP Political Crisis LIVE : दोघेही आशावादी, कुणाची राष्ट्रवादी? अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतही दोन गट, पाहा लाईव्ह अपडेट्स

0
Maharashtra NCP Political Crisis LIVE : दोघेही आशावादी, कुणाची राष्ट्रवादी? अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतही दोन गट, पाहा लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून (Shiv Sena) बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तशी नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याचीही माहिती मिळत आहे.

अजित पवारांच्या शपथविधीनंतर काल (सोमवार) शिंदे गटाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. याच बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.  तसेच, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे गटातील काही मंत्री नाराज आहेत.

शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह उदय सामंत (Uday Samant), गुलाबराव पाटील (Gulab Patil), शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदिपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक छोटीशी बैठक झाली ज्यात त्यांनी विभागांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार राज्य मंत्रिमंडळात सामील झाले  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्यानं जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचं समजत आहे.

Source link

Mumbai local : मुंब्र्यात लोकलचा डबा प्लॅटफॉर्मला घासला, कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

0
Mumbai local : मुंब्र्यात लोकलचा डबा प्लॅटफॉर्मला घासला, कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबईहून सुटलेली धिम्या गतीची रेल्वेगाडी टिटवाळाच्या दिशेने जात होती. ही रेल्वेगाडी रात्री ९.२० वाजता मुंब्रा रेल्वे स्थानकात आली असता, गाडीचा पहिला डबा प्लॅटफॉर्मला घासला.त्यामुळे रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. त्याचा परिणाम डोंबिवली, कल्याणच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्वच धिम्या गतीच्या रेल्वे वाहतूकीवर झाला.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

Maharashtra Political Crisis : दुपारी शरद पवारांच्या बैठकीला हजेरी अन् संध्याकाळी ‘त्या’ आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा

0
Maharashtra Political Crisis : दुपारी शरद पवारांच्या बैठकीला हजेरी अन् संध्याकाळी ‘त्या’ आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा

दरम्यान अजित पवार गटाकडून सांगण्यात आले की, सर्व आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. ४० पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे येथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील ९५ टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच ४० आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

Source link

चेंबूरच्या प्रियदर्शनीजवळ रस्ता खचल्याचा भयानक VIDEO समोर, ४० ते ५० गाड्या खड्ड्यात कोसळल्या

0
चेंबूरच्या प्रियदर्शनीजवळ रस्ता खचल्याचा भयानक VIDEO समोर, ४० ते ५० गाड्या खड्ड्यात कोसळल्या

घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल, पोलिस पथक दाखल झाले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत तर पावसामुळे ट्रॅफिक जाम होत असून लोकांना बाहेर पडण्यास अडचण होतेय. यातच चेंबुरमध्ये रस्ता खचला. त्यामुळे लोकांचा संताप होत आहे.

Source link

Parbhani Rain : परभणीतील अनेक भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर Abp Majha

0
Parbhani Rain : परभणीतील अनेक भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर Abp Majha

परभणीतील अनेक भागात जोरदार पाऊस.. पाथरी, मानवत , जिंतूर गंगाखेड तालुक्यात पाऊस… अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर …

Source link

Ncp Breaksup : दुसऱ्याची कबर खोदता खोदता स्वतःची खोदत आहेत, जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

0
Ncp Breaksup : दुसऱ्याची कबर खोदता खोदता स्वतःची खोदत आहेत, जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे४० जण गेले त्यांनी तक्रार अजित पवारांबाबत होती. आता तीच तक्रार पुन्हा असेल तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेल्यांच्या मनात आता परत फिरायचे वेध लागले आहेत. ४० आमदारांच्या बळाबर त्यांच्या गटाचा मुख्यमंत्री व ८ ते ९ मंत्रीपदे आहेत. मात्र महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला ज्यांचे १०५ आमदार आहेत, त्यांना केवळ ४ ते ५ मंत्रिपद मिळाली आहेत. दुसऱ्याची कबर खोदता खोदता स्वतःची खोदत आहेत. आमच्या मविआला तीन चाकी गाडी म्हणत होते, आता काय? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

Source link