Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2963

Rishi Kapoor: ‘चित्रपटात काम करेन पण अमिताभ नसतील तरच…’; ऋषी कपूरची अट ऐकून सगळेच झाले होते हैराण!

0
Rishi Kapoor: ‘चित्रपटात काम करेन पण अमिताभ नसतील तरच…’; ऋषी कपूरची अट ऐकून सगळेच झाले होते हैराण!


ऋषी कपूर यांनी या चित्रपटात अमिताभ यांच्या भूमिकेसाठी शशी कपूर यांना घेण्याचे सुचवले होते. यानंतर या चित्रपटात शशी कपूर यांची एन्ट्री झाली. ‘दुनिया मेरी जेब में’ या चित्रपटात ऋषी कपूर, नीतू सिंह आणि शशी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. नंतर जरी ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र चित्रपट केले असले तरी, त्यावेळी मात्र दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. अमिताभ बच्चन यांच्यासाठी काही खास भूमिका लिहिल्या जायच्या, अशी ऋषी कपूर यांची समजूत होती.



Source link

Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 06 जुलै 2023 : गुरुवार: ABP Majha

0
Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 06 जुलै 2023 : गुरुवार: ABP Majha


Maharashtra Politics Crisis : शिंदे गटाप्रमाणे भाजपमध्ये देखील मंत्रीपदावरून नाराजी; शिंदेसेनेच्या नेत्याचा मोठा दावा



Source link

Salaar: ‘आदिपुरुष’नंतर प्रभास पुन्हा एकदा मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! ‘सालार’चा टीझर पाहिलात का?

0
Salaar: ‘आदिपुरुष’नंतर प्रभास पुन्हा एकदा मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! ‘सालार’चा टीझर पाहिलात का?


प्रभास आणि श्रुती हासन स्टारर हा चित्रपट २ भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी ‘सालार’च्या पहिल्या भागाला ‘सीझफायर’ असे नाव दिले आहे. प्रभास आणि श्रुती व्यतिरिक्त या चित्रपटात टिनू आनंद आणि पृथ्वीराज सुकुमार यांच्याही प्रमुख भूमिका दिसणार आहेत. ‘सालार’ हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.



Source link

Coco Lee Death: प्रचंड प्रसिद्धी मिळवूनही नैराश्यानं ग्रासलं; अवघ्या ४८व्या वर्षी लोकप्रिय गायिकेचं निधन!

0
Coco Lee Death: प्रचंड प्रसिद्धी मिळवूनही नैराश्यानं ग्रासलं; अवघ्या ४८व्या वर्षी लोकप्रिय गायिकेचं निधन!


Singer Coco Lee Death: अनेक लाईव्ह शो करून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करणारी कोको ली मागील काही काळापासून नैराश्याचा सामना करत होती.



Source link

सातारा : दुधासाठी ‘एफआरपी’चा पॅटर्न गरजेचा | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : विविध दूध संघ चालक आणि खासगी बडे व्यावसायिक यांची दूध खरेदी दरात सातत्याने दादागिरी सुरू आहे. यातून उत्पादकाला दूध दराची हमी राहिलेली नाही. राज्य सरकार दराचा प्रश्न चिघळू लागला की एखादी समिती नेमते आणि जबाबदारी झटकते. वाढता उत्पादन खर्च विचारात घेता शासनाने बोटचेपेपणाचे धोरण सोडून दुधाला ‘एफआरपी’चे ’कवच’ लागू करण्याची गरज आहे. तरच खरेदीदरातील दुग्ध व्यासायिकांत असलेली मनमानी थांबेल आणि उत्पादकाला चार पैसे तरी मिळतील..!

दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की एकीकडे दुधाचे उत्पादन काहीसे घटते, तर विविध कारणे पुढे करत दुग्धव्यावसायिक दूध नाकारण्याचे फंडे सुरू करतात. यातूनच गेल्या काही वर्षापासून उत्पादकांना मिळणारे दूधदर सारखे कमी-जास्त मिळत आहेत. खरे तर गाय दूध एसएनएफ 8.5 साठी 3.00 फॅटसाठी 34.30 रु. प्रतिलिटर दूध खरेदी आहे. मात्र, हा दर विविध संघ, व्यावसायिकांकडून दूध उत्पादकाला वेगवेगळा मिळतो. अशी मनमानी का? असा सवाल दूध उत्पादक करत आहेत. गेल्या दीड पावणेदोन वर्षांपासून चारा, पशुखाद्य यांचे दर भरमसाठ वाढले आहेत. सातत्याने वाढत असलेली मजुरी, इंधनाचे दर वाढले आहेत. यातून वाढलेला वाहतूक खर्च आणि यातून प्रचंड प्रमाणात वाढलेला असल्याचे स्पष्ट होते. दूध उत्पादन खर्च याचा आणि दुधाला मिळणारा दर यात काहीच संबंध दिसत नाही. वाढत्या खर्चामुळे दुग्धोत्पादन करणारा शेतकरी मेटाकुटीस आला आहे. दुधाला सातत्याने मिळणाच्या कमी दराने तो आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे.

अनेक खासगी दूध संघ कंपन्या हे आधी त्यांचा नफा निश्चित करून उत्पादकांना काय दर द्यायचा ते ठरवितात. ही मनमानी आहे. यासाठी शासनाने दुधाला एफआरपीचे (रास्त आणि किफायतशीर दर) धोरण लागू करायला हवे, दूध उत्पादक शेतकन्यांच्या संघटना यांनीसुद्धा ही मागणी मागील काही दिवसांपासून लावून धरलेली आहे.

रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्युला 80:20 करणे गरजेचे

दुधाला एफआरपी देण्यासाठी 80:20 हा रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. यानुसार दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया केल्यानंतर होणार्‍या विक्रीतील 80 टक्के हिस्सा उत्पादकांना, तर 20 टक्के प्रक्रियादार अथवा दूध संघांना मिळायला हवा, अशीही प्रतिक्रिया उमटत आहे. यासाठी समिती नेमण्यात आली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी गरजेची आहे.

The post सातारा : दुधासाठी ‘एफआरपी’चा पॅटर्न गरजेचा appeared first on पुढारी.



Source link

सातारा : आईच्या कुशीतच ९० बाळांनी सोडला जीव, बाळाला झोपवताना अशी घ्या काळजी..! | पुढारी

0









सातारा;  विशाल गुजर :  जिल्ह्यात अर्भक मृत्यू आणि बालमृत्यू कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र, बाळाला पोटावर झोपवल्याने तसेच स्तनपान केल्यानंतर ढेकर न काढल्याने 90 बाळांनी आईच्या कुशीतच जीव सोडल्याचे समोर आले आहे. ‘सडन इन्फंट डेथस सिंड्रोम’ प्रकारात मोडणार्‍या या दोन प्रमुख कारणांमुळे या बाळांचा मृत्यू झाला आहे. अशा बालमृत्यूच्या घटना ग्रामीण भागात कमी अन् शहरी भागात अधिक आहेत. ढेकर न काढल्याने अथवा पोटावर झोपवल्याने श्वास गुदमरून कराड तालुक्यात 18 तर माण व पाटण तालुक्यात 13 मृत्यू झाल्यांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

लहान बाळाला त्याच्या आईच्या कुशीत आयुष्यभराची उब मिळते. मात्र, कधी-कधी आई रात्रीच्या वेळी बाळाला कुशीत स्तनपान करत असताना अचानकपणे झोपी जातात. नेमकी येथेच मोठी चूक होते. बाळ आईच्या कुशीत निवांत झोपले असल्याचे समजून कुटुंबातील माणसेही निर्धास्त होवून जातात. मात्र, झोपेतच स्तनपान सुरु असल्याने बाळाच्या घशात काही थेंब अडकून पडण्याची शक्यता असते. काहीदा हे बाळ झोपेतच पालथे होण्याची शक्यता असते. त्यामुळे आणखी धोका संभवतो. याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी त्यात बाळाचा श्वास गुदमरतो अन अघटित घडते.

अर्भकाचा श्वास गुदमरून होणारा मृत्यू ही अतिशय गंभीर बाब आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. प्रसूती करणारे डॉक्टर, परिचारिका आणि सुईणींना सातारा जिल्हा आरोग्य विभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
परिणामी इतर जिल्ह्याच्या तुलनेत ‘सडन इन्फंट डेथस सिंड्रोम’ प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील स्तनदा मातांना बाळाचा ढेकर काढणे सुलभपणे जमते. मात्र, शहरी भागातील महिलांना फारसे जमत नाही. जिल्ह्यात 90 बाळ मृत्यू हे श्वास गुदमरुन झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू कराड येथे झाले आहेत. येथील मृत्यूचा आकडा 18 इतका आहे. त्यापाठोपाठ माण व पाटण तालुक्यात 13 मृत्यू झाले आहेत. सातारा तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत.

बाळाला झोपवताना अशी घ्या काळजी..!

आईने स्वत:च्या अंगावर, सोफा किंवा आराम खुर्चीवर बाळाला झोपवू नये.
बाळाच्या आजूबाला खेळणी किंवा उशी ठेवू नये.
बाळ झोपले असताना चेहरा उघडा ठेवावा
बाळाची हालचाल होईल अशाप्रकारे दुपट्यात गुंडाळणे
पाळणा सुरक्षित अन् आईपासून जवळ हवा

आईने बाळाला स्तनपान केल्यानंतर त्याला खांद्यावर घ्यावे आणि त्याच्या पाठीवर अगदी हलक्या हाताने काही मिनिटे थोपटत राहावे. यामुळे ढेकर निघतो. परिणामी बालकांना उलटी होत नाही. ढेकर नाही काढला तर त्याला उलटी होण्याचा धोका असते. असे करुनही ढेकर नाही निघाला त्याला डाव्या कुशीवर झोपवावे. अशा परिस्थितीत उलटी झाली तर धोका नसतो. बाळाला झोपवताना पोटावर झोपवू नये.
-डॉ. किरण घार्गे, बालरोगतज्ज्ञ सातारा

असे झाले बालमृत्यू

तालुका  संख्या
कोरेगाव  3
खटाव  4
माण   13
कराड 18
वाई      7
फलटण   4
खंडाळा   3
जावली    9
पाटण    13
सातारा   12
महाबळेश्वर  4











Source link

Leopard On Set: टीव्ही सिरीयलच्या सेटवर शिरला बिबट्या; कलाकारांसह संपूर्ण टीमची उडाली तारांबळ!

0
Leopard On Set: टीव्ही सिरीयलच्या सेटवर शिरला बिबट्या; कलाकारांसह संपूर्ण टीमची उडाली तारांबळ!


अचानक सेटवर आलेला बिबट्या पाहून अनेकांची तारांबळ उडाली होती. पण, समोरची गर्दी पाहून बिबट्याच सेटच्या मागच्या बाजूला गेला. मात्र, बिबट्याला समोर पाहून माकडांनी सेटवर चांगलाच गोंधळ घातला होता. सेटवरची माणसांची गर्दी पाहून बिबट्यानेच काढता पाय घेतल्याने या माकडांचा जीव देखील बचावला आहे. बिबट्याला समोर पाहून सेटवर उपस्थित कलाकारदेखील बिथरले होते. मात्र, सगळ्यांनीच ही परिस्थिती संयमाने हाताळली.



Source link

Shweta Tripathi Birthday: अभिनेत्री बनण्यापूर्वी फोटो एडिटर होती ‘मिर्झापूर’ची ‘गोलू’! वाचा श्वेता त्रिपाठीबद्दल…

0
Shweta Tripathi Birthday: अभिनेत्री बनण्यापूर्वी फोटो एडिटर होती ‘मिर्झापूर’ची ‘गोलू’! वाचा श्वेता त्रिपाठीबद्दल…


अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज (६ जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. श्वेता त्रिपाठीने चित्रपटांमध्ये सुरुवात करण्यापूर्वी अनेक कामे केली होती. श्वेता त्रिपाठीचे वडील आयएएस अधिकारी आहेत, तर तिची आई शिक्षिका आहे. श्वेता त्रिपाठीचा जन्म दिल्लीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. श्वेता लहानपणापासूनच खूप खोडसाळ होती. कधी ती शाळा बंक करायची, तर कधी दिवसभर घराबाहेर खेळायची. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्वेता त्रिपाठीने फॅशन कम्युनिकेशन कोर्सला प्रवेश घेतला. श्वेताला फॅशनच्या दुनियेत नाव कमवायचे होते. पण, तिच्या मनात अभिनयाचे स्वप्न कधी घर करून गेले ते कळलेच नाही.



Source link

Ranveer Singh Birthday: लेखक म्हणून सुरुवात करणारा रणवीर सिंह अभिनेता कसा बनला? वाचा…

0
Ranveer Singh Birthday: लेखक म्हणून सुरुवात करणारा रणवीर सिंह अभिनेता कसा बनला? वाचा…


रणवीत सिंहला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. त्यामुळे तो शालेय नाटकांमध्ये, वादविवादांमध्ये भाग घेऊ लागला. शाळेत होणाऱ्या प्रत्येक वादविवाद स्पर्धेत तो भाग घ्यायचा. त्याने एचआर कॉलेजमधून कॉमर्सचे शिक्षण घेतले. यादरम्यान रणवीर सिंह सतत ऑडिशन्स देत होता. पण, त्याची कुठेही निवड होत नव्हती. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणं तितकं सोपं नाही, हे आता रणवीरला कळून चुकलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनय शिकण्यास सुरुवात केली.



Source link

Maharashtra Politics : महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार?, भाजपच्या बड्या नेत्याने पुरावेच दिले

0
Maharashtra Politics : महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार?, भाजपच्या बड्या नेत्याने पुरावेच दिले


भाजपाचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. ट्वीटमध्ये बोलताना सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय की, मी सध्या मुंबईत आहे, शिंदे गटातील अनेक आमदार शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाचा वापर करून घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीला सोबत घेतलं आहे. याच गोष्टीमुळं एकनाथ शिंदेंचे आमदार प्रचंड अस्वस्थ असल्याचं मला समजलं आहे. त्यामुळं आता भाजपच्याच नेत्याने केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी गटात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार-खासदारांची बैठक घेतली आहे. त्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती आहे.



Source link