Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2844

कॉलेजमध्ये सोडतो म्हणून बाईकवरून नेले अन् लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केले; कोल्हापुरातील घटना

0
कॉलेजमध्ये सोडतो म्हणून बाईकवरून नेले अन् लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केले; कोल्हापुरातील घटना


विनायक विलास चव्हाण (वय ४०, रा. कोरोची, ता. हातकणंगले) असे संशयिताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक याने गुरूवारी (दि.१०) सकाळी ओळखीतील एका मुलीला कॉलेजला सोडतो म्हणून मोटारसायकलवरून नेले. मात्र, तिला कॉलेजला न नेता कोल्हापूर रोडवरील एका लॉजवर नेले. तेथे जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर धाडसाने मुलीने घडल्या प्रकाराबाबत आईला सांगितल्याने आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.



Source link

Sushama Andhare: “लपून छपून भेटी-गाठी करायच्या, अंधारात ठेवायचं..”; पवार काका-पुतण्या भेटीबाबत अंधारेंची प्रतिक्रिया

0
Sushama Andhare: “लपून छपून भेटी-गाठी करायच्या, अंधारात ठेवायचं..”; पवार काका-पुतण्या भेटीबाबत अंधारेंची प्रतिक्रिया


सुषमा अंधारे म्हणाल्या की, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. देशात आणि राज्यात त्याचा एक वेगळा ठसा आहे. कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. अजित पवार व पवार साहेबएकत्र येणार असतील तर त्यावर उघडपणे भाष्य करण्याइतके शरद पवार सक्षम आहेत. ते तसे स्पष्टपणे सांगू शकतात. लपून छपून भेटी-गाठी करायच्या आहेत, कार्यकर्त्यांना सहयोगी पक्षांना अंधारात ठेवायचं, असं मला नाही वाटत. जोपर्यंत ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आघाडीतील एक जबाबदार आणि महत्त्वाचा घटकपक्ष म्हणून याबाबतीत घाईघाईने निष्कर्ष काढणे तसेच यावर प्रतिक्रिया देणार नाही.



Source link

हत्तींना माणसाची भाषा कशी समजते? हत्तींशी मराठीत संवाद साधणारे आनंद शिंदे

0
हत्तींना माणसाची भाषा कशी समजते? हत्तींशी मराठीत संवाद साधणारे आनंद शिंदे


Majha Katta : हत्तींनी आपल्याला माणूसकी शिकवली, जगण्याचं ध्येय आणि जगण्याचं कारण शिकवलं. मी काय काम करावं हे हत्तींनी मला शिकवलं असं हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी सांगितलं. जागतिक गजदिनानिमित्त हत्तीमित्र आनंद शिंदे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. जागतिक गजदिनानिमित्त त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. 

आनंद शिंदे यांना एलिफंट व्हिस्परर असं म्हटलं जातं. आनंद शिंदे यांना हत्तीच्या मनातील भाषा समजते. तसेच ते हत्तींसह इतर प्राण्यांसोबत मराठीतून संवाद साधतात हे विशेष. 

आनंद शिंदे हत्तींची भाषा कसे शिकले? 

जगातल्या कोणत्याही हत्तीला माणसाची भाषा समजते असं आनंद शिंदे सांगतात. ते म्हणतात की, हत्तींना शब्द फार कमी समजतात. पण त्यांना आपला टोन किंवा सूर समजतो. त्या आधारे ते आपली भाषा समजतात. इंदुरमधील मोती हत्तीशीही मी असाच संवाद साधला. हत्तींशी संवाद साधताना त्याच्याशी कसं बोलायचं हे शिकावं लागलं. त्यामध्ये हत्तीचं वय, त्याचा कळपातील स्थान लक्षात घ्यावं लागतं. 

हत्तीला अनुवांशिक स्मरणशक्ती असते. त्यामुळे हत्तीला एखादा रस्ता जर माहिती झाला तर त्याच्या पुढच्या पीढीला आपोआप त्याची माहिती होते. गडचिरोलीत येणारे हत्ती हे साडेतीनशे वर्षांपूर्वी होते. त्यानंतर आता आले. हत्ती आल्यानंतर त्यांच्या जेनेटिक्समध्ये असलेल्या नकाशामध्ये आपोआप अपडेट होतं आणि त्यानुसार त्यामध्ये वेळोवेळी बदल होते. बांबू हे हत्तींचे आवडतं खाद्य आहे. गडचिरोलीत बांबू मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी आलेले हत्ती हे छत्तीसगडमधून आलेले आहेत. गडचिरोलीत सध्या 60 हत्ती आहेत. हत्तींना लागणारे खाद्य जर जंगलात मिळालं नाही तर ते मग मानवी वस्तीत आणि शेतात येतात. कोल्हापुरातल्या हत्तींमध्ये हेच दिसतं. आता त्या ठिकाणी कर्नाटकातील हत्ती येतात. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये हत्ती फिरतात. 

हत्तींच्या कळपातील एखादा हत्तीचा मृत्यू झाला तर त्याचे योग्य पद्धतीने अंत्यदर्शन केलं जातं. दरवर्षी त्या ठिकाणी कळपातील सर्व हत्ती एकत्र येतात आणि श्रद्धांजली वाहतात असं आनंद शिंदे यांनी सांगितलं. 

हत्ती मानवाला चकवा कसे देतात?

हत्ती मानवाला चकवा देतात असं आनंद शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 23 हत्ती होते, त्यामध्ये कळप हा उजव्या बाजूला गेला. पण ठसा मात्र डाव्या बाजूला उमटवला. उजव्या बाजूला जाताना हत्ती पाऊल दाबून टाकत नव्हते, ते वरच्या वर टाकत होते. त्या रस्त्यावर कोणत्याही हत्तीने मूत्र विसर्जन केलं नाही किंवा शेण टाकलं नाही. डाव्या बाजूला जोरदार ठसा उमटवल्याने सर्वांना वाटते हत्ती तिकडेच गेले. 

हत्तींना विनाकारण त्रास दिल्यास किंवा पिल्लांना त्रास दिल्यास हत्ती हिंसक होतात असं आनंद शिंदे म्हणाले. हत्ती पिलांच्या बाबतील अतिसंवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना त्रास दिल्यास ते आक्रमक होतात. 

हत्ती दुखावल्या गेल्यात त्यांना वाईट वाटतं आणि त्याचवेळी त्यांना रागही येतो असं आनंद शिंदे यांनी सांगितलं. 

डॉ. जेकब अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केल्याचं आनंद शिंदे म्हणाले. ते म्हणाले की हत्ती दहा प्रकारचे आवाज काढू शकतात. त्यामध्ये फिमेल हत्ती जास्त बोलतात,  60 किमीमध्ये हत्ती एकमेकांशी बोलू शकतात. मेल हत्ती हे पायाने कंपने करुन एकमेकांशी संवाद साधतात. 

संबंधित बातमी : 



Source link

Ankita Lokhande Father: अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन

0
Ankita Lokhande Father: अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन


अंकिताचे कुटुंब हे मुळचे इंदूरचे आहे. तिचे वडील शशिकांत लोखंडे हे पेशाने बँकर होते आणि आई वंदना या शिक्षिका होत्या. काही दिवसांपासून अंकिताच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती, असे बोलले जात आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.



Source link

Maharashtra politics : राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? पुण्यात शरद पवार-अजित पवारामध्ये झाली गुप्त बैठक? चर्चांना उधाण

0
Maharashtra politics : राष्ट्रवादीत चाललंय तरी  काय? पुण्यात शरद पवार-अजित पवारामध्ये झाली गुप्त बैठक? चर्चांना उधाण


अजित पवारांनी शिरुरमधल्या एका सभेत म्हटलं होतं की, आम्ही आणि साहेब वेगळे नाही. त्यानंतरही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा झाल्या. दरम्यान आजच पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील एकत्र आले होते, पण अजित पवारांनी या कार्यक्रमाला यायचं टाळलं होतं.



Source link

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्या : 12 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्या : 12 ऑगस्ट 2023 : ABP Majha



<p>Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्या : 12 ऑगस्ट 2023 : ABP Majha</p>



Source link

KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन माहितीये का? वाचा..

0
KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन माहितीये का? वाचा..


‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोच्या लोकप्रियतेमागे अमिताभ बच्चन हे नावच मोठा फॅक्टर आहे. हा शो मधल्या काळात इतर अनेक कलाकारांनी होस्ट केला. पण, या शोला तितकी लोकप्रियता मिळाली नाही. यानंतर वर्षानुवर्षे अमिताभ बच्चन यांनीच या शोची धुरा सांभाळली. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सुरू झाला तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हा शो होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडचे २५ लाख रुपये आकारले होते.



Source link

Sara Kahi Tichyasathi: तळकोकणातील उमा तर, लंडनची संध्या! दोन बहिणींच्या कथेबद्दल शर्मिष्ठा म्हणते…

0
Sara Kahi Tichyasathi: तळकोकणातील उमा तर, लंडनची संध्या! दोन बहिणींच्या कथेबद्दल शर्मिष्ठा म्हणते…


या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शर्मिष्ठा राऊत म्हणाली, ‘ही कथा दोन बहिणींवर आधारित आहे. ज्या दोन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये राहतात. त्यांच्यामध्ये वेगळेपण असूनही किती साम्य असू शकते, हे दिसून येईल. प्रेक्षकांनी प्रोमो बघितलाच असेल आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक या मालिकेशी भावनिकरित्या जोडले जातील. कुटुंबामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला भाऊ-बहीण असतील पण ते आपल्या जवळ असतीलच असं नाही. काही जण कामासाठी, शिक्षणासाठी दूर परदेशात असतात. तर, काही वेगळ्या कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेले असतात. पण कितीही अंतर असलं तरीही मनाने आपण जवळच असतो. संस्कृती आणि नातेसंबंध हे किती महत्वाचे आहेत हे प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळेल.



Source link

OMG 2: बॉक्स ऑफिसवर थंड पडला ‘ओएमजी २’; पहिल्या दिवशी अक्षय कुमारच्या चित्रपटाची अवघी ‘इतकी’ कमाई!

0
OMG 2: बॉक्स ऑफिसवर थंड पडला ‘ओएमजी २’; पहिल्या दिवशी अक्षय कुमारच्या चित्रपटाची अवघी ‘इतकी’ कमाई!


चित्रपटाची कथा पाहता ‘ओएमजी २’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकेल असा अंदाज ट्रेड एक्सपर्ट्सनी बांधला होता. पण, आता पहिल्या दिवसाची कमाई पाहता हा अंदाज फोल ठरल्याचे लक्षात येत आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने मोठ्या पडद्यावर १०.२६ कोटींची कमाई केली आहे. तथापि, ही केवळ अंदाजे आकडेवारी आहे. चित्रपटाचे कथानक लक्षात घेता, आगामी काळात चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप दिसू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘ओएमजी २’ हा अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या ‘ओएमजी’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.



Source link

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन कधी चढणार बोहल्यावर? स्वतः अभिनेत्याने दिलं उत्तर! ऐका…

0
Kartik Aaryan: कार्तिक आर्यन कधी चढणार बोहल्यावर? स्वतः अभिनेत्याने दिलं उत्तर! ऐका…


करण जोहर याने त्याच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला साईन केले होते, ज्यामध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री जान्हवी कपूर दिसणार होती. कार्तिकने या चित्रपटासाठी मोठी रक्कम मागितली होती आणि या स्क्रिप्टमध्ये देखील काही बदल करण्यास सांगितले होते, जे करण जोहरला अजिबात आवडले नाही, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकच्या बॅकआउटमुळे करणच्या चित्रपटाला तब्बल २० कोटींचे नुकसान झाले होते. मात्र, दोघांनी आता आपापसांतील वाद मिटवले आहेत.



Source link