Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2845

IMA : डॉक्टरांशी गैरवर्तन करणं आता पडणार महागात! डॉक्टरांना मिळाला ‘हा’ मोठा अधिकार

0
IMA : डॉक्टरांशी गैरवर्तन करणं आता पडणार महागात! डॉक्टरांना मिळाला ‘हा’ मोठा अधिकार

doctors Rule : डॉक्टरांसोबत गैरवर्तन केल्यास डॉक्टर आता संबंधित रुग्णावर उपचार करणे नाकारू शकणार आहेत. नॅशनल मेडिकल कौन्सिलने याबाबत निर्णय घेतला आहे.

Source link

Suhana Khan Video: शाहरुख खानच्या लेकीवरही होतोय कौतुकाचा वर्षाव! पाहा सुहानाने काय केलं…

0
Suhana Khan Video: शाहरुख खानच्या लेकीवरही होतोय कौतुकाचा वर्षाव! पाहा सुहानाने काय केलं…

Suhana Khan Viral Video: सुहाना खान हिच्या दर्यादिलीचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. सुहाना खान हिचा हा व्हिडीओ पाहून लोक तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

Source link

आपत्कालीन परिस्थितीत मृत पावलेल्या पोलिसांच्या विधवांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय

0
आपत्कालीन परिस्थितीत मृत पावलेल्या पोलिसांच्या विधवांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय

मुंबई: राज्यात नक्षलवादी, अतिरेक्यांविरोधातील कारवाई तसेच दरोडेखोरी, संघटित गुन्हेगारी विरोधी कारवाई आणि आपत्कालीन काळात मदत करताना मृत आणि जखमी झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला आता आर्थिक लाभ मिळणार आहे. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात आले होते. विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट सुरु होती.

राज्य सरकारकडून पुनर्विवाह केला आहे, अशा विधवा पत्नीस कुटुंबीय या नात्याने दिवंगत अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत वेतन देण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सदर दिवंगत पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या पुनर्विवाह केलेल्या विधवांना 13 ऑगस्ट 2013 च्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या निर्णयातील तरतुदींप्रमाणे संपूर्ण वेतनाचा लाभ अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुनर्विवाह करणाऱ्या शहिदांच्या विधवांना दिलासा मिळाला आहे.

पोलिसांच्या मृत्यूनंतर विधवा पत्नीला शासनाकडून वेतन दिले जाते. मात्र, पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील अनेक शहिदांच्या पत्नी व कुटुंबीयांनी याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबीयांची सुद्धा फरफट सुरु होती.

दिवंगत जवानाच्या कुटुंबीयांचा सांभाळ करावा लागणार

दरम्यान, दिवंगत जवानांच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या दिवंगत जवानांचे वयोवृद्ध आई-वडील, अविवाहीत/दिव्यांग बहीण/भाऊ व अज्ञान पाल्य इ. यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. तसे हमीपत्र संबंधित घटक प्रमुखांनी संबंधित विधवांकडून घ्यावे लागेल.  दिवंगत जवानांच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्याच व्यक्तींचे पालन-पोषण करण्यात येत नसेल, तर संपूर्ण वेतनाचा लाभ बंद करण्यात येईल. तसेच याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निराकारण झाल्यास पुढील संपूर्ण चेतनाचे प्रदान पुन्हा सुरु करण्यात येईल.

इतर महत्वाच्या बातम्या

History of Chandani Chawk Flyover Name: पुण्यातील चांदणी चौकाला ‘चांदणी चौक’ नाव कसे पडले? अजित पवारांनी सांगितला इतिहास…

Source link

Dada Kondke: जेव्हा रजा मुराद यांचा फोन नंबर दादा कोंडके यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितला! ‘हा’ किस्सा वाचाच…

0
Dada Kondke: जेव्हा रजा मुराद यांचा फोन नंबर दादा कोंडके यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितला! ‘हा’ किस्सा वाचाच…

‘दादा कोंडके हे मराठी चित्रपटांचे महारथी होते. ९ सिल्व्हर ज्युबिली चित्रपट, प्रचंड यश, प्रसिध्दी, वलय मिळवूनही त्यांच्या डोक्यात यशाची हवा कधीच गेली नव्हती. त्यांचा साधेपणा कायम आवडायचा. माझ्यासोबत मराठी, हिंदीतील एक यशस्वी अभिनेता, निर्माता आहे असं कधीच वाटलं नाही ते त्यांच्या साधेपणामुळेच. बंडी, नाडीची चड्डी, त्यांच्या केसांची स्टाईल, मिशीचा कट हे सगळच भन्नाट होतं. ते नायक म्हणून जसे पडद्यावर दिसायचे तसेच खऱ्या आयुष्यात होते. दादांचे चित्रपट आता थिएटरला दिसत नाहीत, पण आजच्या पिढीला दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्याची ही कल्पना खूपच स्तुत्य आहे’, असे रजा मुराद म्हणाले.

Source link

Payal Waje: विशाल राठोडला मिळाली शिवली परबची सोबत! नव्याकोऱ्या जोडीचं रोमँटिक गाणं पाहिलंत का?

0
Payal Waje: विशाल राठोडला मिळाली शिवली परबची सोबत! नव्याकोऱ्या जोडीचं रोमँटिक गाणं पाहिलंत का?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब हीचा अभिनय तर साऱ्यांनाच माहीत आहे, आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे. तिच्या या गाण्यातील अनुभवाबद्दल बोलताना शिवाली म्हणाली की, ‘विशाल राठोड यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. या आधीही आम्ही एकत्र काम केलं आहे, त्यांची कामाची पद्धत, आणि त्यांना माझ्या कामाची पद्धत जुळत असल्याने कदाचित एकत्र काम करण्याचा योग सतत येत आहे. ‘पायल वाजे’ या गाण्याला कमी कालावधीत लोकप्रियता मिळाली, आणि हस्यजत्रेसोबत गाण्यातूनही माझ्यावर प्रेक्षक प्रेम करत आहेत, हे पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. ‘व्हीआर म्युझिक’ला, ‘पायल वाजे’ या गाण्याला व मला असंच भरभरून प्रेम द्या हीच विनंती’.

Source link

Maharashtra Rain Update : पुढील सहा दिवस कशी असेल पावसाची स्थिती?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

0
Maharashtra Rain Update : पुढील सहा दिवस कशी असेल पावसाची स्थिती?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्यास सध्या तरी पोषक स्थिती नाहीय. त्यामुळं महाराष्ट्रात १७ ऑगस्टपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही. १९ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आठ दिवसांच्या तयारीसह शेतीची कामं करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामाची पीकं बहरली आहे. त्यामुळं गेल्या १० दिवसांपासून पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय राज्यातील शहरी भागांमध्येही उकाडा वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Source link

Sara Ali Khan Birthday: बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणाऱ्या सारा खानच्या ‘या’ अभिनेत्यांसोबतच्या रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

0
Sara Ali Khan Birthday: बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणाऱ्या सारा खानच्या ‘या’ अभिनेत्यांसोबतच्या रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

या अभिनेत्यांसोबतच्या रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत साराचे नाव जोडले गेले होते. माहितीनुसार, ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांना डेट करत होते. मात्र, दोघांनीही हे कधीच जाहीरपणे स्वीकारले नाही. याशिवाय साराचे नाव ‘लव्ह आज कल’ चित्रपटातील तिचा को-स्टार कार्तिक आर्यनसोबतही जोडले गेले होते. यामध्ये सारा आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिलचे अफेअर सर्वाधिक लोकप्रिय होते. आजही लोक या अभिनेत्रीचे नाव शुभमन गिलसोबत जोडतात. या सर्वांशिवाय साराचे नाव वीर पहाडिया, हर्षवर्धन कपूर आणि ईशान खट्टरसोबतही जोडले गेले आहे.

Source link

रिव्हर्स रेट वाढवून दूध दर पाडण्यास सरकारची मूकसंमती आहे काय? किसान सभेचा सवाल

0
रिव्हर्स रेट वाढवून दूध दर पाडण्यास सरकारची मूकसंमती आहे काय? किसान सभेचा सवाल

Milk Price : खासगी आणि सहकारी दूध संघांनी संगनमत करुन 3.5/8.5 गुणवत्तेच्या  दुधाला 34 रुपये दर (Milk Price) जाहीर केले. मात्र, फॅट आणि एस.एन.एफ.चे रिव्हर्स दर वाढवून शेतकऱ्यांना त्यापेक्षाही कमी दर मिळतील अशी व्यवस्था दूध संघानी केली आहे. सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करुन रिव्हर्स रेट पूर्ववत करावेत आणि शेतकऱ्यांना किमान 35 रुपये दर मिळतील याची व्यवस्था करावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे. मात्र, याबाबत दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मौन बाळगून आहेत. त्यामुळं सरकार आणि दुग्ध विकासमंत्री यांची शेतकऱ्यांची लुट सुरु ठेवण्यासाठीची मूक संमती आहे काय ? असा सवालही किसान सभेनं केलाय.

गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 35 रुपये दर द्यावा या मागणीसाठी किसान सभा, दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, राज्यातील विविध शेतकरी संघटना व शेतकरी नेत्यांनी संघर्ष केला. त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करत दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा असे निर्देश दिले. मात्र सरकारच्या अशा हस्तक्षेपाचा पूर्वानुभव पाहता असे निर्देश, पळवाटा काढून धाब्यावर बसविले जातील, अशीच शंका होती. प्रत्यक्षात तसेच घडल्याचे मत किसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले.

रिव्हर्स रेट वाढवण्यात आल्याने दुध व्यवसाय तोट्यात

शेतकऱ्यांना दूध संघांनी आणि दूध कंपन्यांनी गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा यासाठी शासन आदेश काढण्यापूर्वी फॅटचा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॅाइंटसाठी 20 पैसे होता. आता तो सरळ 50 पैसे  करण्यात आला आहे.  एस.एन.एफ.चा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॅाइंटसाठी 30 पैसे होता, आता तो 1 रुपया करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना यामुळे फक्त 25 ते 30 रुपयांचा दर मिळत आहेत. महाराष्ट्रात पशुधनाचे संकरीकरण करताना वापरण्यात आलेल्या पद्धती आणि बिजामुळे बहुतांश संकरीत गायींच्या दुधाला कमी फॅट आणि एस.एन.एफ. बसते. शिवाय सध्या पावसाळा असल्यानं आणि हिरवा चारा उपलब्ध असल्यानेही दुधाचे फॅट आणि एस.एन.एफ. कमी झाले आहे. परिणामी रिव्हर्स रेट वाढवण्यात आल्याने दुध व्यवसाय तोट्यात गेला आहे. रिव्हर्स पॅाइंटमुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावा लागत असल्याचे नवले म्हणाले.

सरकारनं पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी पावले उचलावीत

सरकारने दूध दर वाढवण्यासोबतच पशुखाद्याचे दर 25 टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे दर कमी करण्याऐवजी 1 ऑगस्टपासून पाच टक्क्यांनी वाढले आहेत. शासनाने दूध उत्पादकांच्या या प्रश्नांची तातडीने दखल द्यावी. गायीच्या दुधाला 34 रुपये दर देत असताना रिव्हर्स रेट पूर्ववत करत फॅट रिव्हर्स रेट 20 पैसे व एस.एन.एफ. रिव्हर्स रेट 30 पैसे करावेत. तसेच पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी किसानसभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांची ईडीकडून चौकशी करावी, राजू शेट्टींचा प्रहार

Source link

Gadar 2 : हा तर सी ग्रेड चित्रपट, गदर नाही गटर; केआरकेने सनी देओलला केलं ट्रोल

0
Gadar 2 : हा तर सी ग्रेड चित्रपट, गदर नाही गटर; केआरकेने सनी देओलला केलं ट्रोल

चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल व्यतिरिक्त यात अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा सारखे कलाकार आहेत. हा सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या २००१ मध्ये आलेल्या गदर: एक प्रेम कथा या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Source link

Jaya Prada Jail : अभिनेत्री जया प्रदा यांना तुरुंगवासाची शिक्षा; हजारोंचा दंड, नेमकं प्रकरण काय?

0
Jaya Prada Jail : अभिनेत्री जया प्रदा यांना तुरुंगवासाची शिक्षा; हजारोंचा दंड, नेमकं प्रकरण काय?

नेमकं प्रकरण काय आहे?

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी राम कुमार यांच्या मदतीने एक चित्रपटगृहाचा व्यवसाय केला होता. परंतु त्यात सातत्याने तोटा होत असल्याने अचानक चित्रपटगृह बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ईएसआय रक्कम कापण्यात आली होती. त्यामुळं नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी जय प्रदा यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. याशिवाय श्रम विमा कंपनीनेही जया प्रदा यांच्यासह दोघांवर कोर्टात खटला दाखल केला होता. त्यानंतर जया प्रदा यांच्याकडून कोर्टात कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन दिलं जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कोर्टाच्या आदेशानंतरही त्यांनी कर्मचाऱ्यांना पैसे दिले नाही, त्यानंतर कोर्टाने त्यांना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Source link