
Arush in OMG 2 News : सिनेमा प्रदर्शित झालाय, जोरदार कमाई करतोय, चित्रपटप्रेमींमध्ये चर्चाही आहे, पण त्यात काम करणारा एक अभिनेताच तो पाहू शकणार नाही. असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न कोणालाही पडेल. पण तसं प्रत्यक्षात झालंय.

Arush in OMG 2 News : सिनेमा प्रदर्शित झालाय, जोरदार कमाई करतोय, चित्रपटप्रेमींमध्ये चर्चाही आहे, पण त्यात काम करणारा एक अभिनेताच तो पाहू शकणार नाही. असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न कोणालाही पडेल. पण तसं प्रत्यक्षात झालंय.

सनी देओलचा गदर २ हा शुक्रवारी म्हणजेच काल देशभरात रिलीज करण्यात आला होता. सनी देओलला जून्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी अभूतपूर्वी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, दिल्ली, चेन्नई, चंडीगढ, पुणे, कानपूर, पाटणा, लखनौ आणि बंगळुरु या शहरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी गदर २ चित्रपट पाहिला आहे. पहिल्याच दिवशी ३५ ते ४० कोटी रुपयांची कमाई करणारा गदर २ चित्रपट मोठ्या यशाकडे वाटचाल करत आहे. कारण गदर २ हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा वर्षातला दुसरा चित्रपट ठरला आहे. त्यामुळं आता सनी देओल आणि आमिषा पटेल यांच्या बॉलिवूड करियरला मोठा बूस्टर मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील हार्बर लाइनवर सकाळी ११.१५ ते ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मानखुर्द आणि नेरुळ अप आणि डाउन मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. परिणामी सीएसटीहून सकाळी १०.१८ ते ३.२८ वाजेपर्यंत हार्बर मार्गावर सुटणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. वाशी-बेलापूर-पनवेलसाठी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी ते मानखुर्द स्टेशन पर्यंत विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : अवैध दारू वाहतूक प्रकरणात मदत करण्यासाठी व पुढे कोणताही त्रास होणार नाही, यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी औंध पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार (एएसआय) बापूसाहेब नारायण जाधव (वय 54) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात औंध पोलिस ठाण्याचा कारभारी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे यानेही लाचेची मागणी केली असून, दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एकाचवेळी दोन पोलिस अधिकार्यांवर कारवाई झाल्याने सातारा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सपोनि दराडे पसार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे 42 वर्षांचे असून, त्यांचा परमिट रूम बार आहे. दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारवाई प्रकरणात तक्रारदार हे सपोनि दत्तात्रय दराडे व सहायक फौजदार बापू जाधव याला भेटले. यावेळी दोन्ही संशयितांनी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच इथून पुढे त्यांच्या व्यवसायात कोणताही त्रास न देण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी केल्याने बारमालक तक्रारदारांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार दिली. पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या पडताळणीमध्ये दराडे व जाधव या दोघांनी पैशांची मागणी केल्यहाचे लक्षात आले. लाचेची रक्कम शुक्रवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने ट्रॅप लावला. लाचेची रक्कम सहाय्यक फौजदार जाधव याच्याकडे देण्याचे ठरले. औंध येथील जुन्या एसटी स्टॅन्ड परिसरातील पटांगणामध्ये जाधवने दुपारी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईची माहिती औंधसह परिसरात पसरल्यानंतर खळबळ उडाली.
संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने औंधचे प्रभारी दत्तात्रय दराडे याच्याकडे मोर्चा वळवला असता ते नाट्यमयरित्या गायब झाले.
एसीबीने कारवाईला सुरुवात केल्यानंतर जिल्हा पोलिस दलात याची माहिती वार्यासारखी पसरली. एसीबीने पंचनामा करुन रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निलेश चव्हाण, तुषार भोसले, निलेश येवले यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांनी लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहायक फौजदार बापू जाधव याची फिरून-फिरून औंध पोलिस ठाण्यात अनेकदा बदली होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुमारे 3 ते 4 वेळा तिथेच त्याने बदली केली असून, औंध परिसरात त्याने बस्तान मांडले आहे. तो पोलिस कमी आणि ‘दाजी’ म्हणून परिसरात परिचित आहे. पोलिस ठाण्यापर्यंत भानगड आली असेल किंवा भानगड येणार असेल, तर ‘दाजीला भेटा आणि टेन्शन विसरा,’ असाच काहीसा रुतबा होता. पोलिस ठाण्यांतर्गत बहुतेक बीटांमध्ये ढवळाढवळ होत होती. शुक्रवारी ‘दाजी’ ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर औंधमध्ये खुशीचा माहोल होता.

<p>Independence Day List: ध्वजारोहणासाठी पालक मंत्र्यांची सुधारित यादी प्रसिद्ध होणार का?</p>
Source link
सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाच्या कामासंदर्भात सुरुवातीपासून तक्रारींचा ओघ असतानाच आता खड्ड्यांचा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. जीवघेणे खड्डे पाचवीलाच पुजलेले आहेत. पुणेपासून ते कागलपर्यंत महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर काही ठिकाणी डागडुजी केली. मात्र उर्वरित महामार्ग खड्ड्यांनी गिळला असून तो आहे तसाच आहे. वाहनांच्या टायर फुटीच्या घटना वाढल्या असून सेवा रस्तेही खड्ड्यात गेले आहेत.
ऑगस्ट सुरू झाल्यानंतर सार्यांनाच आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. गणेशोत्सवामुळे गावी येणार्या चाकरमान्यांची व पर्यटनासाठी बाहेर पडणार्यांची संख्या वाढणार आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मुळ घराकडे निघणार असून, महामार्गावरून जाताना त्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे. सावध व्हा, वाहने सावकाश चालवा अन्यथा महामार्गावरील खड्डे घात करतील, अशी भयावह परिस्थिती आहे. ‘महामार्गावर काय खरं नाही, हे ध्यानात ठेवा’, असे म्हणायची वेळ आली आहे.
पुणे-सातारा महामार्ग कायमच चर्चेत राहिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याकडे कायमच दुर्लक्ष झाले आहे. मुदत संपून 7 वर्षे झाल्यानंतरही या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या हा मार्ग खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. सातार्यासह खंडाळा, शिरवळ, पाचवड, उंब्रज, कराड या भागातही खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली मात्र, तरीही याबाबत काहीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे.
सातारा तालुक्याच्या हद्दीतील 30 ते 35 किमी अंतरात गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नाही. खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना आपल्या वाहनाचा टायर फुटतो की काय? असा प्रश्न पडत आहे. लिंब येथे महामार्गाला लागलेला उपळा, चाहूरमध्ये खड्ड्यांमुळे वाहनांचे फुटलेले टायर, वाढे फाटा परिसरातील सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे हे दुष्टचक्र थांबणार आहे की नाही? हा प्रश्न न सुटणारा आहे.
लगतच्या गावांतील नागरिकांनाही ये-जा करताना महामार्गावरून वाहतूक करावी लागते. खड्ड्यांमुळे या स्थानिकांनाही जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करून खड्डे भरण्यात आले होते. हे खड्डे अवघ्या काही दिवसांमध्ये पुन्हा जैसे थे झाले आहेत.
सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे सांगत खुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका बैठकीत रिलायन्सच्या कामाचा बुरखा फाडला होता. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या कामावर नाराजी व्यक्त केली होती.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : ‘पुढारी’ टॅलेंट सर्च एक्झाम’ या शिष्यवृत्ती परीक्षेचा माहोल वाढला असून जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रांगणात या परीक्षेची जोरदार हवा आहे. शाळा-शाळांमध्ये या उपक्रमाचा बोलबाला असून विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेत उतरत आहेत. पालकही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे दिवसागणीक स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी खटावच्या पूर्व भागातील मायणी, कलेढोण परिसरात ‘पुढारी टॅलेंट सर्च’चा जागर दिसून आला.
दै. ‘पुढारी’ व गणेश बेकरी नांदणी यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2024 मध्ये घेण्यात येणारी ही स्पर्धा उपयुक्त ठरत आहे. ‘पुढारी’ टॅलेंट सर्च एक्झाम’ विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचे नवे दालन उभे करणारी ठरत आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड व रुची निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची प्रश्नावली सुरू असून खटाव तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनंत इंग्लिश स्कूल मायणी, हुतात्मा भगतसिंग मायणी, भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मायणी, वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला मायणी, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ कलेढोण, नवमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चितळी आदी शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. जानेवारी 2024 मधील तिसरा किंवा चौथ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. परीक्षेचा निकाल फेब—ुवारीमध्ये जाहीर केला जाईल.
सातारा शहर व तालुका, कोरेगाव व खटाव तालुका : 9405207193.
माण, फलटण तालुका : 8805007204.
वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा तालुका : 8805007268.
कराड शहर, तालुका व पाटण तालुका : 9922913664.
The post सातारा : ‘पुढारी’ शिष्यवृत्ती परीक्षेचा शाळाशाळांमध्ये बोलबाला appeared first on पुढारी.
मेढा; पुढारी वृत्तसेवा : जावलीकरांनी विचार करावा, अशा आशयाचे बॅनर मेढा बाजार चौकात लावले आहे. दारूबंदीचा फज्जा उडवत आडवी बाटली पुन्हा उभी करण्यासाठी मेढा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची येथील भैरवनाथ मंदिरात रविवारी सायंकाळी 4 वा. बैठक आयाजित केली आहे.
जावली तालुका दारूमुक्त झाला ही खरोखरच आनंदाची बाब आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती संघटनेबरोबर आपण सर्वांनी मेहनत घेतली. लोकांची व्यसनं सुटतील, माता भगिनींचे संसार फुलतील, तरुणाई व्यसनापासून दूर राहील, असा त्यामागे उदात्त हेतू होता. मात्र, झाले उलटेच. आज सर्व तालुक्याचे चित्र पाहिले तर काय अवस्था आहे? गावोगावी अवैध दारूधंदे सुरू झालेत. त्यातून अनेक मान्यवरांना इन्कम सुरू झालाय. तरुण पोरं दारू विकत आहेत, दारू मिळत नाही म्हणून उलट चार चार बाटल्या खरेदी केल्या जात आहेत. एकदा दारू तोंडाला लागली की मग त्या चारही बाटल्यांचा फडशा पाडला जाऊन नको ते प्रकार घडत आहेत.
या अवैध दारू विक्रीतून मोठी आर्थिक लॉबी तयार झाली आहे. दारू विकणारे आणि दारूधंद्याला अभय देणारे मालामाल झालेत. अवैध दारूतून मिळणार्या पैशाने मस्ती वाढली आहे. कारवाईचा केवळ फार्स केला जातोय, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. ज्या मंडळींनी दारूबंदी करण्यासाठी उठाव केला त्यांच्या बाजूने मात्र कोणीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही.
उलट दारूबंदीमुळे तालुक्याचं मार्केट बसलं, लोकांचे धंदे होईनात, मार्केटमध्ये उलाढाल थांबलीय, पर्यटक दारू मिळत नाही म्हणून येथे थांबायला तयार नाहीत. याचा बाजारपेठेवर परिणाम होत आहे. पण, ती बंद करायची असेल तर तालुक्यात दारूचा एक थेंब पण मिळाला नाही पाहिजे. तरच दारूबंदीचा फायदा होईल; अन्यथा विनाकारण बाजारपेठेवर परिणाम का करून घ्यायचा? अवैध दारु विक्री करणार्यांना मोठं करायचं, हप्तेबाजीला खतपाणी घालायची गरज नाही. यामुळे व्यापारी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, पर्यटनालाही खीळ बसत आहे. हे सर्वांना कळत आहे. मात्र, भीतीने कोणीच बोलत नाही.
पण आता गप्प बसणे सयुक्तिक ठरणार नाही. उठाव केलाच पाहिजे. दारू कायदेशीर मार्गाने सुरू करण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवलाच पाहिजे, असे या बॅनरवर लिहिले आहे. आता दारू सुरू व्हावी, या मागणीसाठी कितीजण पुढाकार घेतात? हे रविवारच्या बैठकीत स्पष्ट होईल.

चांदणी चौकातील जुन्या पुलामुळं अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळं पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. तब्बल ३९७ कोटी रुपयांचा खर्च करत नव्या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळं आता कोथरूड-मुळशी, सातारा-मुळशी, मुळशी-पुणे, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण-बावधन आणि पाषाण-मुंबई या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. नव्या उड्डाणपुलासह काही भुयारी मार्ग देखील तयार करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी दोन सर्व्हिस रोड आणि आठ रॅम्प यासह १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे. उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर थोड्याच वेळात तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : अधिक महिन्यात व्रत-वैकल्यांबरोबरच धोंडा साजरा करण्यात येत आहे. अधिक मासात जावई व लेकीसाठी नवीन कपडे, चांदीचे निरंजन व जोडवी, पैंजणाची खरेदी जोमात होत आहे. दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याने सराफी बाजारपेठेला झळाळी आली आहे.
अधिक महिन्यात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच व्रतवैकल्यांची रेलचेल वाढली आहे. नवविवाहितांसाठी अधिक महिन्याचे विशेष महत्व आहे. अधिक महिन्यात मुलगी व जावई यांना बोलावून पाहुणचार करण्याची परंपरा कायम आहे. यावेळी गोडाधोडाच्या जेवणाबरोबरच नवीन कपडे व भेटवस्तू दिल्या जातात. जावयाला चांदीचे पूजा ताट, निरंजन तर मुलीला चांदीची जोडवी, पैंजण तसेच सोन्याचे दागिने दिले जातात. त्यामुळे सध्या जावई मंडळींची चंगळ सुरु आहे. अधिक मास अंतिम टप्प्यात आल्याने घरोघरी लेक जावयाचे कौतुक सोहळे सुरु आहेत. त्यासाठी जोमात खरेदी केली जात आहे. कापड बाजारपेठेसह सराफी पेढ्यांवर गर्दी होत आहे. पै-पाहुण्यांनाही अधिक मासासाठी बोलवण्यात येत आहे. या महिन्यात मिठाईलाही मागणी वाढली आहे. अधिक मासामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली आहे. बाजारपेठेत अर्थकारणाला चालना मिळाली आहे.