Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2847

पुण्यात चांदणी चौकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन; आज दिवसभरात

0
पुण्यात चांदणी चौकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन; आज दिवसभरात


12th August Headline : आज राज्यात दिवसभरात विविध घडामोडी घडणार आहेत. पुण्यातील चांदणी चौकाचे लोकार्पण आज करण्यात येणार आहे. चांदणी चौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नवीन प्रकल्प उभा करणे आवश्यक होते. त्यासाठी जुना पुल 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. आता चांदणी चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे. तर, भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही लोकसभेसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. 

पुण्यातील चांदणी चौकाचे लोकार्पण

पुणे – पुण्यातील चांदणी चौकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पुण्यातुन जाणाऱ्या पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आलाय. चांदणी चौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नवीन प्रकल्प उभा करणे आवश्यक होते. त्यासाठी जुना पुल 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. आता चांदणी चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या नव्या प्रकल्पामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र,  त्यासाठी छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव आणि फोटो वापरण्यात आलेले नाहीत.  यावरुन मेधा कुलकर्णी नाराज झाल्यात.  हा आपले अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न असल्याचे सोशल मीडियावर त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांची श्रद्धांजली सभा

मुंबई – ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचे दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुंबई एज्युकेशन ट्रस्ट, भुजबळ नॉलेज सिटी, वांद्रे येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोक सभेस सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला आदी क्षेत्र यासह सर्वपक्षीय राजकीय मान्यवर श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
 

काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांची पत्रकार परिषद

दिल्ली – काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांची काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभेत पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत संसदेतून दोन दिवस निलंबित करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची शक्यता आहे. 
 

राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठका

अमरावती –  अमरावती लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय चर्चा करण्याकरिता आणि होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी कॉग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटी भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

चंद्रपूर –  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्यात होणार दाखल होणार आहे. सावली येथे दुपारी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना  – येथे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक होणार असून यावेळी जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय बैठकीचे सकाळी आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर – पृथ्वीराज चव्हाण हे दोन दिवस हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघांचा दौरा करून आढावा घेणार आहेत.  हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी निवडणूक लढवत आलेत.

पुण्यात ‘संभाजी ब्रिगेड कॉनक्लेव्ह’चे आयोजन 

पुणे – ‘संभाजी ब्रिगेड कॉनक्लेव्ह’चे प्रवीण गायकवाड यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात दुपारी रोहित पवार आणि त्यानंतर संध्याकाळी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. 
 



Source link

सातारा : पंतप्रधान दहा वर्षात बोललेले एक तरी सत्य ठरले का? भाई जगताप यांची पीएम मोदींवर टीका | पुढारी

0









कराड ः पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर अनेक घोषणा केल्या आहेत. ते बोललेले एक तरी मागील दहा वर्षात सत्य ठरले आहे का? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सातारा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी शुक्रवारी कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, निवासराव थोरात, अजितराव पाटील चिखलीकर, अभिजीत पाटील या प्रमुख काँग्रेस पदाधिकार्‍यांसह तिन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार जगताप पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरेल आणि महाविकास आघाडीची महापालिकेवर सत्ता येईल. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ४८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच मते जाणून घेण्याची प्रक्रिया काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण सातारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेत पक्ष श्रेष्ठींना १५ ऑगस्टपर्यंत आपण अहवाल सादर करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यापुढे एकही विरोधक नाही असे म्हणतात, मात्र त्याच नसलेल्या विरोधकांनी चार राज्यात सत्ता काबीज केली आहे. तर विश्वगुरूंच्या पक्षाची सत्ताही चारच राज्यात आहे, असेही आमदार भाई जगताप म्हणाले.

हेही वाचलंत का?











Source link

Gadchiroli Rape: धक्कादायक! गडचिरोलीत दोन सख्या भावांचा सात महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार

0
Gadchiroli Rape: धक्कादायक! गडचिरोलीत दोन सख्या भावांचा सात महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार


मिळालेल्या माहितीसाठी, संजय तुलाराम कपूरडेरिया (वय, ३८) आणि ताराचंद तुलाराम कपूरडेरिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही विवाहित असून धमदीटोला गावात राहतात. तर, पीडित महिला सात महिन्यांची गर्भवती असून प्रसूतीसाठी धमदीटोला गाव येथे तिच्या माहेरी आली होती. दरम्यान, गुरुवारी पीडित महिलेचे आई- वडिल शेतीच्या कामानिमित्त घराबाहेर गेले. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पीडित घरात एकटीच होती. याचा गैरफायदा घेत दोन्ही आरोपी तिच्या घरात शिरले आणि तिच्यावर बलात्कार केला.



Source link

Bachu kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमची जाहिरात मागे घ्यावी- बच्चू कडू

0
Bachu kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमची जाहिरात मागे घ्यावी- बच्चू कडू



<p>Bachu kadu On Sachin Tendulkar&nbsp; : सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमची जाहिरात मागे घ्यावी, आमदार बच्चू कडू यांची मागणी&nbsp;</p>



Source link

High Court On Manholes : इतक्यात वर्षांत तुम्ही काय केलं?, खड्यांवरून महापालिकांना कोर्टानं झापल

0
High Court On Manholes : इतक्यात वर्षांत तुम्ही काय केलं?, खड्यांवरून महापालिकांना कोर्टानं झापल



<p>High Court On Manholes : इतक्यात वर्षांत तुम्ही काय केलं?, खड्यांवरून महापालिकांना कोर्टानं झापलं</p>



Source link

एक लाखाची लाच घेताना साताऱ्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक, अवैध दारू व्यवसायप्रकरणी जाळ्यात

0


सातारा: एक लाख रुपयाची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असं या लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. 

अटक करण्यात आलेले दोन्ही अधिकारी औंध पोलिस ठाण्यातील आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात मदत करण्यासाठी या दोघांनी दीड लाखाची लाच मागितली होती. तडजोडीअंतर्गत एक लाखाची लाच देण्याचं ठरलं. दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क करुन याची तक्रार केली आणि लाचलुचपत विभागाने या दोघांनाही रंगेहात पकडलं. 

यातील तक्रारदाराच्या परमिट रुममधून दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराला यापुढे त्याच्या व्यवसायात इथून पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी या पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाखाची लाच मागितली. त्यानंतर एक लाखावर तडजोड करण्यात आली. 

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक उज्वल अरुण वैद्य यांच्या टीमने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडलं. या दोन्ही पोलिसांवर औंध पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळमध्ये बीडीओला 22 हजारांची लाच घेताना अटक

यवतमाळच्या पांढरकवडा पंचायत समितीचा बीडीओ विठ्ठल शामराव जाधव याला 22 हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही सापळा कारवाई केली. मंगी गावातील शेतकऱ्यांच्या चार सिंचन विहिरींच्या बिलावर सही करण्यासाठी 23 हजार 500 रुपयाची लाचेची मागणी बीडीओने पडताळणी दरम्यान केली होती. त्यानंतर त्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मनरेगा कामातील भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे, त्यावर वरिष्ठांनी अंकुश घालण्याची मागणी होत आहे.

नाशिकच्या लाचखोर तहसीलदाराचे निलंबन

नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम यास विभागीय आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. पंधरा लाखांची लाच घेणाऱ्या तहसीलदार बहिरम यास निलंबित करण्यात आले आहे. लाच घेतल्यानंतर तहसीलदार चांगलाच चर्चेत आला होता, अखेर नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी आदेश काढले असून बहिरम याचे निलंबन (Suspend) करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: 

 



Source link

मनमाड-जळगावदरम्यान दोन दिवसांचा मेगाब्लॉक; ३३ गाड्या रद्द, १९ गाड्यांचे मार्ग बदलले

0
मनमाड-जळगावदरम्यान दोन दिवसांचा मेगाब्लॉक; ३३ गाड्या रद्द, १९ गाड्यांचे मार्ग बदलले


Manmad-Jalgaon Mega Block Updates: मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान तिसऱ्या लोहमार्गाच्या कामासह दुहेरी मार्ग यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे रेल्वेने दोन दिवसांचा (१४ ऑगस्ट- १५ ऑगस्ट) दरम्यान मेगाब्लॉक घेतला आहे. या दरम्यान, ३३ गाड्या रद्द आणि १९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. या काळात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांच्या मेगा ब्लॉग दरम्यान रद्द झालेल्या गाड्यांची यादी जाहीर केली आहे.



Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 ऑगस्ट 2023 : ABP Majha



<p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 ऑगस्ट 2023 : ABP Majha</p>



Source link

संपूर्ण देशाने मोदी सरकारचा खोटेपणा पाहिला; कलावतींच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले!

0
संपूर्ण देशाने मोदी सरकारचा खोटेपणा पाहिला; कलावतींच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले!


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार यांनी कलावती यांच्यावरून अमित शाहांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस नेते राहुल गांधींचे सामाजिक काम आणि त्यांनी दिलेला शब्द पक्का आहे, हे देशातील जनतेला माहिती आहे. राहुल गांधी यांनी कलावतीच नाही तर निर्भयाच्या भावाला पायलट बनवण्याचा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. सध्या सत्य नाही तर असत्य बोलून देश चालवला जात आहे. गृहमंत्र्यांच्या भाषणातून हे देशाला कळून चुकले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.



Source link

Tomato Price: टोमॅटोचे भाव निम्म्यावर; नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील नवे दर घ्या जाणून

0
Tomato Price: टोमॅटोचे भाव निम्म्यावर; नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील नवे दर घ्या जाणून


Tomato Price Drop: गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने ते आपल्या जेवणातून गायब झाले. मे महिन्यात १५ रुपयांनी विकले जाणारे टोमॅटो २०० रुपये किलो दराने विकला जात होता. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याची भीती घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. याच दरम्यान सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली. नवी मुंबईच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये टोमॅटोचा आवाक सर्वसाधारण होत असल्याने ग्राहकांना १०० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. लवकरच टोमॅटो किंमतीत आणखी घट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link