Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2830

Sanjay Dutt Accident : शूटिंगदरम्यान संजय दत्तचा भीषण अपघात, डोक्याला पडले टाके

0
Sanjay Dutt Accident : शूटिंगदरम्यान संजय दत्तचा भीषण अपघात, डोक्याला पडले टाके


‘डबल इस्मार्ट’ हा संजय दत्तचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धुरा पुरी जगन्नाध यांनी केले आहे. त्यांचा या पूर्वीचा ‘लायगर’ हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. संजय दत्तने ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचा ‘लियो’ हा चित्रपट तामिळ भाषेतील आहे. या चित्रपटातून तो तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.



Source link

Shasan Aaplya Dari Shirdi: शासन आपल्या दारी आज शिर्डीजवळील काकडी गावात

0
Shasan Aaplya Dari Shirdi: शासन आपल्या दारी आज शिर्डीजवळील काकडी गावात



<p>Shasan Aaplya Dari Shirdi: शासन आपल्या दारी आज शिर्डीजवळील काकडी गावात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार</p>



Source link

KBC 15: स्पर्धकाने या प्रश्नाचे उत्तर देत जिंकले १२ लाख ५० हजार, तुम्ही देऊ शकाल का उत्तर

0
KBC 15: स्पर्धकाने या प्रश्नाचे उत्तर देत जिंकले १२ लाख ५० हजार, तुम्ही देऊ शकाल का उत्तर


काय आहे प्रश्न?

जानेवारी २०२३मध्ये कोणत्या संघटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत आणि त्यानिमित्ताने ७५ रुपयांचे नाणे चलनात आणण्यात येणार आहे? या प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात आले होते. A. सीबीआय, B. भारत स्काउट अँड गाईड, C. सैनिक शाळा आणि D. एनसीसी



Source link

Sachin Pilgaonkar: पैसे नाही तर ‘शोले’साठी सचिन पिळगावकरांना मिळालं होतं खास गिफ्ट

0
Sachin Pilgaonkar: पैसे नाही तर ‘शोले’साठी सचिन पिळगावकरांना मिळालं होतं खास गिफ्ट


वयाच्या दहाव्या वर्षी सचिन यांनी ‘डाकघर’ चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर त्यांनी १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘नदिया के पार’ चित्रपटात काम केले. या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. सचिन यांनी ‘शोले’ चित्रपटात देखील काम केले. या चित्रपटात त्यांनी अहमदची भूमिका साकारली. पण तुम्हाला माहितीये का या चित्रपटात काम करण्यासाठी सचिन यांनी पैसे नाही तर एक वस्तू देण्यात आली होती. शोले चित्रपटात काम केल्याबद्दल त्यांना मानधन म्हणून निर्मात्याने फ्रिज गिफ्ट दिला होता.



Source link

नागपूर खंडपीठाचं सुट्टीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग मोकळा

0
नागपूर खंडपीठाचं सुट्टीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग मोकळा


Bombay High Court Nagpur Bench : विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा विषय लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं (Bombay High Court Nagpur Bench) सुट्टीच्या दिवशी कामकाज केलं आहे. नागपूर खंडपीठाने प्रकरणाची गरज लक्षात घेता 15 ऑगस्टला सुट्टीच्या दिवशी कामकाज करुन एका आदिवासी विद्यार्थ्याला दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळं संबंधित विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. गौरव वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो काटोल येथील रहिवासी आहे. 

पडताळणी समितीनं 10 नोव्हेंबर 2022 रोजी गौरवचा माना अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केला होता. त्यामुळं त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता त्याला 16 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. त्यामुळं उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि महेंद्र चांदवाणी यांनी या प्रकरणावर 15 ऑगस्ट रोजी सुनावणी घेतली. दरम्यान, रेकॉर्डवरील पुरावे पाहता पडताळणी समितीचा वादग्रस्त निर्णय रद्द केला आहे. तसेच, गौरवला माना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचा आदेश देखील न्यायालयानं दिला आहे. 

गौरवच्या वंशावळीतील सात सदस्यांना माना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात त्याच्या वडिलांचाही समावेश आहे. असे असताना त्याला वैधता प्रमाणपत्र नाकारले गेले होते. गौरवतर्फे ॲड. प्रिती राणे यांनी बाजू मांडली.

महत्त्वाच्या बातम्या:

CJI Uday Lalit : तुम्ही काय केलं ते महत्त्वाचं नाही, ते कशा पद्धतीने केलं हे महत्त्वाचं: सरन्यायाधीश उदय लळीत



Source link

Epidemic Diseases : साथीचे आजार, महाराष्ट्र बेजार;  मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, प्लेप्टो बळावले

0
Epidemic Diseases : साथीचे आजार, महाराष्ट्र बेजार;  मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, प्लेप्टो बळावले



<p>साथीचे आजार, महाराष्ट्र बेजार;&nbsp; मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, प्लेप्टो बळावले&nbsp;</p>



Source link

अहमदनगर हादरलं.. झोपेत असलेल्या पत्नी आणि सासूची हत्या करून जावयानेही संपवलं जीवन

0
अहमदनगर हादरलं.. झोपेत असलेल्या पत्नी आणि सासूची हत्या करून जावयानेही संपवलं जीवन


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या केल्यानंतर जावयानेही आत्महत्या केली आहे. कौटुंबीक वादातून जावयाने हे हत्याकांड केल्याचे समोर येत आहे. झोपेत असतानाच मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास जावयाने हे हत्याकांड केले. 



Source link

Sharad Pawar : शरद पवारांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात ‘पॉवर’ दिसणार! ऐतिहासिक दसरा चौकातून रणशिंग फुंकणार

0
Sharad Pawar : शरद पवारांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात ‘पॉवर’ दिसणार! ऐतिहासिक दसरा चौकातून रणशिंग फुंकणार


sharad&nbsp;pawar&nbsp;rally in kolhapur : कोल्हापुरात&nbsp;२५&nbsp;&nbsp;ऑगस्ट रोजी दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सभेचे अध्यक्ष असणार असून सभेपूर्वी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.



Source link

राज्यात साथीच्या आजारांनी डोकंवर काढलं; मुंबई, गडचिरोलीत मलेरियाचे 80 टक्के रुग्ण

0
राज्यात साथीच्या आजारांनी डोकंवर काढलं; मुंबई, गडचिरोलीत मलेरियाचे 80 टक्के रुग्ण


मुंबई : राज्यात पावसाळ्यात सुरू झालेल्या साथीच्या आजारांनी डोकंवर काढले आहे. डोळे येणे, इन्फ्ल्यूएन्झा, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांची रुग्णालयात गर्दी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याची माहिती जारी केली आहे. मागील काही दिवसांपासून डोळे येण्याची साथ वाढली होती. मात्र, आता हा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे राज्यातील मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे गडचिरोली आणि मुंबईतील असल्याची माहितीदेखील आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यातील डोळ्याच्या संसर्गाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या स्थिरावली? 

राज्यात एकूण 4 लाख 20 हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या आहे. राज्यात 13 ऑगस्टपर्यंत चार लाखांच्या जवळपास डोळ्यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. संसर्गाच्या मोठ्या उद्रेकानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले. डोळ्यांचा संसर्ग झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे. डोळे आल्यानंतर काही दिवसांच्या अवधीत संसर्ग बरा होत असल्याने रुग्णांनी काळजी करू नये. मात्र, स्वच्छता पाळावी आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  

इन्फ्ल्यूएन्झा ‘एच1एन1’ आणि ‘एच3एन2’ ची रुग्णसंख्या 2000 वर

राज्यात इन्फ्ल्यूएन्झा ‘एच1एन1’ आणि ‘एच3एन2’ची सक्रिय रुग्णसंख्या दोन हजार 155 इतकी नोंदवण्यात आली आहे. दोन हजार 155 रुग्णांपैकी 126 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इन्फ्ल्यूएन्झाचे सर्वच रुग्ण देखरेखीखाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

गडचिरोली, मुंबईमध्ये मलेरियाचे 80 टक्के रुग्ण

मलेरियाचे राज्यात एकूण 8 हजार 40 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. राज्यात मलेरियामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मलेरियाच्या एकूण रुग्णसंख्येच्या 80 टक्के रुग्ण गडचिरोली आणि मुंबईतील आहे. 
गडचिरोलीत 3 हजार 526  आणि मुंबईत दोन हजार 886 मलेरिया रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

राज्यात डेंग्यूचे एकूण 4448 रुग्ण 

राज्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. 738 वरून 546 इतकी रुग्ण संख्या आढळली आहे. सोबतच यंदाच्या आठवड्यात मुंबईतील डेंग्यूच्या साथीची रुग्णसंख्या 436 वरुन 208 वर आल्याची आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

मुंबईत डेंग्यूची एकूण रुग्णसंख्या 1323 इतकी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसंख्या शून्यवरुन 49 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 



Source link

पत्रकारांचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन; पत्रकार संरक्षण कायदयाची करणार होळी

0
पत्रकारांचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन; पत्रकार संरक्षण कायदयाची करणार होळी


पाचोऱ्याची घटना घडल्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्हीजेए, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल चिंता व्यक्त केली होती. पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली होती. तत्पूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत १७ ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्याचे आंदोलन होत असून राज्यातील पत्रकारांनी संघटनी संघटनात्मक भेद न बाळगता उद्याच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन वरील ११ संघटनांनी केले आहे.



Source link