Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2831

Raj thackeray : राज ठाकरेंचा मेळावा होताच मनसैनिक आक्रमक, मुंबई-गोवा महामार्गाच्या कंपनीच्या कार्यालयात खळ्ळ-खट्ट्याक

0
Raj thackeray : राज ठाकरेंचा मेळावा होताच मनसैनिक आक्रमक, मुंबई-गोवा महामार्गाच्या कंपनीच्या कार्यालयात खळ्ळ-खट्ट्याक


महामार्गाची पाहणी केल्यानंतरमुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज म्हणाले की, अख्ख्या महाराष्ट्रात कोकणाचीच नाही तर अनेक रस्त्यांची तीच हालत आहे. हे खड्डे आज पडलेले नाहीत. २००७ मध्ये मुंबई गोवा रस्त्याचं काम चालू झालं. काँग्रेस, शिवसेना भाजप सरकार आलं. ना आकार ना उकार कोणाकोणाचं सरकार आलं, मात्र काय झालं. निवडणुकीच्या तोंडावर वारेमाप गोष्टी सांगतात आश्वासन देतात. निवडणूक आल्यावर करु बघू म्हणतात’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.



Source link

तळकोकणात आढळला दुर्मिळ प्रजातीतील पोवळा साप; जाडी करंगळी एवढी अन् भला मोठा लांब

0
तळकोकणात आढळला दुर्मिळ प्रजातीतील पोवळा साप; जाडी करंगळी एवढी अन् भला मोठा लांब


Rare Snake Specie: सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात अतिशय दुर्मिळ असलेला साप (Snake) आढळला आहे. तुळस गावात सापाची दुर्मिळ प्रजाती असलेला क्रॅस्टोस कोरल स्नेक, म्हणजेच पोवळा साप आढळला आहे. तुळस गावातील चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांना पोवळा साप आढळला. हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र जंगलात भटकंती करत असतात. हा साप विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा आणि फारसा दृष्टीस न पडणारा आहे.

पोवळा जातीच्या सापाचा रंग ब्राऊन ब्लॅक असून पोटाखालून तो पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचं द्योतक मानलं जातं. सामान्यपणे दगडाखाली आणि पाला पाचोळ्याखाली हा साप राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ इत्यादी कीटक आहेत. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. या जातीचा पूर्ण वाढलेला साप हा करंगळी एवढा जाड असतो. त्याच्याबरोबर त्याच्या डोक्यावर भगवी जाड रेषा असते आणि हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून त्याच्याजवळ येऊ नका, असा इशारा देत असतो. सर्पमित्रांनी वेंगुर्ल्याच सापडलेल्या या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे.

कोल्हापुरातही आढळला दुर्मिळ जातीचा साप

 कोल्हापूरच्या गगनबावडा परिसरात ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात 3 ऑगस्टला दुर्मिळ प्रजातीचा तस्कर साप (Trinket) आढळून आला. गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या डॉ. अमित पाटील यांना हा दुर्मिळ साप आढळून आला. चार ते साडेचार फूट लांबीचा आणि एक ते सव्वा इंच जाडीचा पूर्ण वाढ झालेला हा साप त्यांनी पकडला. मात्र, नेहमी आढळणाऱ्या सामान्य तस्कर (Common Trinket) सापापेक्षा या सापाचा रंग जास्त गडद आणि डोक्यावरील पट्टे वेगळे असल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं. उत्सुकता ताणल्याने त्यांनी इंटरनेवरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून फारसं काही हाती लागलं नाही.

त्यामुळे पाटील यांनी राधानगरीच्या सम्राट केरकर यांच्या माध्यमातून सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी आणि कर्नाटकातील प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला. डॉ. देशपांडे यांनी त्यांना काही संदर्भ पाठवून पुढील अभ्यास केला. डॉ. गिरी यांनी डॉ. अमित पाटील यांनी पाठवलेल्या विविध फोटोंच्या आधारे निदान करून हा ‘सामान्य तस्कर’ साप नसून ‘मॉण्टेनचा तस्कर’ साप (Montane’s Trinket) असल्याचं आणि हा अतिशय दुर्मिळ, सहजासहजी न आढळणारा साप असल्याचं सांगितलं.

हेही वाचा:

Rohit Pawar : ‘एमआयडीसीप्रमाणे एसटी डेपोमध्ये नाक खुपसू नका, अन्यथा..’ राम शिंदेना रोहित पवारांचा इशारा 



Source link

Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! ‘देवरा’मधील सैफ अली खानचा ‘भैरा’ पाहिलात का?

0
Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! ‘देवरा’मधील सैफ अली खानचा ‘भैरा’ पाहिलात का?


या पोस्टरमध्ये सैफ अली खानचे लांब केस आणि इंटेन्स लूक दिसत आहे. यासोबतच त्याच्या या पात्राचे नावही समोर आले आहे. या चित्रपटात सैफ अली खान ‘भैरा’ची भूमिका साकारणार असून, त्याचा फर्स्ट लूक खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटाची कथा काय असणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांचे केवळ फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील या चित्रपटाद्वारे साऊथमध्ये पदार्पण करणार आहे.



Source link

Rang Maza Vegla: दीपाला पुन्हा एकदा मिळणार सासू सौंदर्याची साथ! कार्तिकीला शोधू शकणार?

0
Rang Maza Vegla: दीपाला पुन्हा एकदा मिळणार सासू सौंदर्याची साथ! कार्तिकीला शोधू शकणार?


सध्या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुलींच्या वर्णाची तुलना करून दीपावर गंभीर आरोप केले जात आहे. कार्तिकी तुमच्यासारखी दिसत नाही, म्हणून तुम्ही तिच्यावर फारसं प्रेम केलं नाही आणि तिला वाईट वागणूक दिलीत, असे आरोप तिच्यावर करण्यात आले. मात्र, आपण आपल्या दोन्ही मुलींवर समान प्रेम करतो आणि त्यांना कधीच अंतर दिलं नाही, असं दीपा म्हणते. येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. आता दीपा-सौंदर्या मिळून कार्तिकीला शोधू शकतील का, हे लवकरच कळणार आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.



Source link

हृदयद्रावक.. पतीच्या विरहानं व्याकूळ शिक्षिका पत्नीनंही गळफास घेत मृत्यूला कवटाळलं, लातूरमधील घटना

0
हृदयद्रावक.. पतीच्या विरहानं व्याकूळ शिक्षिका पत्नीनंही गळफास घेत मृत्यूला कवटाळलं, लातूरमधील घटना


latur News : पतीच्या निधनानंतर आलेल्या नैराश्येतून  महिलेने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.



Source link

‘एमआयडीसीप्रमाणे एसटी डेपोमध्ये नाक खुपसू नका, अन्यथा..’ राम शिंदेना रोहित पवारांचा इशारा 

0
‘एमआयडीसीप्रमाणे एसटी डेपोमध्ये नाक खुपसू नका, अन्यथा..’ राम शिंदेना रोहित पवारांचा इशारा 


अहमदनगर : कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात नेहमीच राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. आता कर्जत येथील एसटी डेपोवरून (Karjat ST Depo) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर भाजप आमदार राम शिंदे यांनीही रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

अहमदनगरच्या (Ahmednagar) कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून एसटी डेपोची मागणी होत होती. भाजपचे तत्कालीन आमदार राम शिंदे यांनी लवकर कर्जतसाठी स्वतंत्र एसटी डेपो मंजूर केला जाईल, अशी वारंवार घोषणा जाहीर कार्यक्रमातून केली. मात्र डेपो काही आला नाही तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये एसटी डेपोच्या कामाचा शुभारंभच केला. या एसटी डेपोसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला. पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीवरून आ. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांच्यात अधिवेशन काळात चांगलाच संघर्ष पेटला होता. आता आ. रोहित पवार यांनी एसटी डेपोच्या मुद्द्यांवर आ. राम शिंदे यांना ‘एमआयडीसी (Karjat MIDC) प्रमाणे एसटी डेपोमध्ये नाक खुपसू नका, अन्यथा संविधानिक पद्धतीने उत्तर देऊ’ असा इशारा दिला आहे. 

एसटी डेपोसाठी आम्ही देखील आमच्या कार्यकाळात मदतच केली. माझ्या कार्यकाळात दोन तहसील कार्यालय बांधले, दोन पोलीस स्टेशन बांधले आणि रोहित पवार ज्या रस्त्याने प्रवास करतात. तो रस्ता देखील माझ्याच कार्यकाळात झाला, हे रोहित पवार विसरले का? असे उत्तर आ. राम शिंदे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून मतदारसंघात मंजूर करून आणलेल्या कामात राम शिंदे नेहमीच खोडा घालत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही केला जात आहे. तर भाजप कार्यकर्त्यांकडून एसटी डेपोची पहिली मागणी आम्हीच केली होती आणि त्यासाठी पाठपुरावा देखील आम्हीच केल्याचा दावा केला जात आहे. 

सध्या कर्जत एसटी डेपोचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. राज्यात एसटीसाठी तब्बल तीन हजार नव्या एसटी बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यातील 50 बसेस या कर्जत डेपोसाठी मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची आहे. मात्र, एमआयडीसीप्रमाणेच डेपोवरूनही दोन्ही आमदारांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरही राजकारण धुमसत असल्याचे चित्र आहे. 

इतर संबंधित बातमी : 

Rohit Pawar :कर्जत – जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी रोहित पवार आग्रही, थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र



Source link

KBC 15: ‘केबीसी १५’मध्ये स्पर्धक धीमयीने अमिताभ बच्चन यांनाच केला महत्त्वाचा प्रश्न! म्हणाली ‘तुम्ही रात्री…’

0
KBC 15: ‘केबीसी १५’मध्ये स्पर्धक धीमयीने अमिताभ बच्चन यांनाच केला महत्त्वाचा प्रश्न! म्हणाली ‘तुम्ही रात्री…’


सोशल मीडियाविषयी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे की, जिथे लोकांशी संपर्क होतो, दोन चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईट गोष्टीही ऐकून घ्याव्या लागतात. आयुष्यात चांगल्या गोष्टीही असतात आणि वाईटही असतात. जर तुम्हाला कुणी म्हणत असेल की हे काम करू नका, तुमच्याने होणार नाही, तर त्याचे आव्हान स्वीकारा आणि ती गोष्ट घडवून दाखवा.’



Source link

Gondia news : सुट्टी असल्याने मित्राने बोलावले; सहलीसाठी गेलेल्या तीन शिक्षकांचा मांगता धरणात बुडून मृत्यू

0
Gondia news : सुट्टी असल्याने मित्राने बोलावले; सहलीसाठी गेलेल्या तीन शिक्षकांचा मांगता धरणात बुडून मृत्यू


गोंदिया : सलग दोन दिवस सुट्ट्या आल्याने गोंदियातील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेल्या तीन शिक्षक मित्रांना एकाने सहलीसाठी बोलवले होते. त्यानुसार ते मांगता धरण येथे मंगळवारी (दि १५) सहलीसाठी गेले होते. मात्र, चौघांपैकी तिघा शिक्षकांचा मांगता धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी घडली.



Source link

Karun Gelo Gaav: ‘करून गेलो गाव’च्या माध्यमातून महेश मांजरेकर-राहुल भंडारेंनी केली इर्शाळवाडीला मोठी मदत!

0
Karun Gelo Gaav: ‘करून गेलो गाव’च्या माध्यमातून महेश मांजरेकर-राहुल भंडारेंनी केली इर्शाळवाडीला मोठी मदत!


Marathi Natak Karun Gelo Gaav: इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.



Source link

Amitabh Bachchan: ‘अशा गोष्टींमध्ये जेव्हा आपली मुलं असतात…’; अभिषेकमुळे आले अमिताभ यांच्या डोळ्यांत पाणी!

0
Amitabh Bachchan: ‘अशा गोष्टींमध्ये जेव्हा आपली मुलं असतात…’; अभिषेकमुळे आले अमिताभ यांच्या डोळ्यांत पाणी!


यावेळी अमिताभ बच्चन यांनी जीवनात संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी एक संदेश दिला. त्यांनी लिहिले की, ‘आपण सर्वांनी जीवनात कधी ना कधी अपयशाचा सामना केला आहे, निराश झालो आहोत आणि पराभूत होणे म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण, विजय मिळाल्यावर कसे वाटते हे कळणे सर्वात मोठे आव्हान आहे, ज्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. दाराला कुलूप असल्याचे आपल्याला तेव्हाच कळते, जेव्हा आपण आत जायचा प्रयत्न करतो. आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात आणि हा जीवनातील सर्वात मोठा धडा देखील आहे.’



Source link