Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2829

Aurangabad : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील ‘राजा’ बिबट्याचा मृत्यू

0
Aurangabad : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील ‘राजा’ बिबट्याचा मृत्यू


Siddharth Zoo News: औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील (Siddhartha Udyan Zoological Museum) एका नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. राजा असे या बिबट्याचे नाव असून, त्याचे वय 15 वर्षे होते. 16 ऑगस्ट रोजी रात्री तो मृत पावला आहे. राजा बिबट्या मागील दोन महिन्यांपासून आजारी होता. राजा बिबट्याला हेमलकसा गडचिरोली येथून 2016 मध्ये प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते. त्यावेळेस त्याचे वय अंदाजे 7 ते 8 वर्षे इतके होते. त्याचा प्राणीसंग्रहालयामध्ये 7 वर्षे वावर होता.
 
मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या राजावर प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांचेमार्फत प्रतिदिनी उपचार करण्यात येत होते. या बिबट्याचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता अहवालानुसार आजारी बिबट्यावर उपचार करण्यात येत होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी रात्री राजाने अखेरचा श्वास घेतला. या बिबट्याचे शवविच्छेदन आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी डॉ. अमितकुमार दुबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. रोहीत धुमाळ, व डॉ. महेश पवार पशुधन विकास अधिकारी, शासकीय पशुसर्व चिकित्सालय यांनी केले. 

तर, मृत बिबट्याच्या शवाची विल्हेवाट लावण्याकरता श्री. डी. बी. तौर वनपरिक्षेत्र अधिकारी व श्री. ए. डी. तांगड वन परिमंडल अधिकारी यांची उपस्थिती होती. यांचे समक्ष मृत बिबट्याचे शरीर जाळण्यात आले व घटनेचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याचा मृत्यू Multi Organ failure ने झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

मागच्या महिन्यात ‘समृद्धी’ने दिला होता गोंडस बछड्यास जन्म 

दरम्यान काही दिवसांपूर्वी याच औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील पिवळे वाघ समृद्धी हिने एका गोंडस बछड्याला जन्म दिला होता. समृद्धीने 19 जुलै रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान एका बछड्यास जन्म दिलेला होता. समृद्धी वाघीण आणि बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांच्यामार्फत करण्यात आली होती. दोघांची तब्येत सुदृढ होती. विशेष म्हणजे सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघाच्या जोडीने प्रथम वेळी 12 नोव्हेंबर 2016 रोजी तीन पिवळे, एक पांढऱ्या बछड्यास जन्म दिला होता. दुसऱ्या वेळी 16 एप्रिल 2019  रोजी चार बछड्यांना जन्म दिला होता, ज्यात दोन पिवळे तर दोन पांढरे होते. तिसऱ्या वेळी 25 डिसेंबर 2020 रोजी पाच पिवळ्या बछड्यांना जन्म दिला होते. त्यानंतर आता तीन वर्षांनी आज 19 जुलै 2023 रोजी चौथ्यावेळी एका बछड्यास जन्म दिला आहे. तर आतापर्यंत जन्म झालेल्या या वाघांमधील एक जोडी पुणे प्राणीसंग्रहालय येथे तर दोन पिवळे वाघ मादी हे अहमदाबाद प्राणीसंग्रहालय येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad News : औरंगाबाद ‘सेफ्टी टँक मुक्त’ शहर म्हणून ओळखले जाणार; महानगरपालिका राबवणार उप्रकम



Source link

Sai Lokur: लग्नाच्या दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री होणार आई

0
Sai Lokur: लग्नाच्या दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री होणार आई


सईच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.



Source link

Lok Sabha Elections : भाजपला धोबीपछाड देत मविआ मुसंडी मारणार?, ताज्या सर्व्हेत मोठं भाकित

0
Lok Sabha Elections : भाजपला धोबीपछाड देत मविआ मुसंडी मारणार?, ताज्या सर्व्हेत मोठं भाकित


Lok Sabha Elections 2024 Congress Internel Survey : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहे. भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी आघाडी काम करत आहे. त्यामुळं आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेची माहिती समोर आली आहे. त्यात महाविकास आघाडीला ४० ते ४५ जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून चर्चांना उधाण आलं आहे.



Source link

Taali Series: सुष्मिता सेनच्या ‘ताली’ सीरिजचा दबदबा! ‘या’ मराठी कलाकारांनी केले कौतुक

0
Taali Series: सुष्मिता सेनच्या ‘ताली’ सीरिजचा दबदबा! ‘या’ मराठी कलाकारांनी केले कौतुक



Sushmita sen: ‘ताली’ या सीरिजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने गौरीची भूमिका साकारली आहे. ही सीरिज जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.



Source link

Ghoomer Review: अपयश पचवण्याची शिकवण देणारा ‘घूमरा’, जाणून घ्या कसा आहे चित्रपट

0
Ghoomer Review: अपयश पचवण्याची शिकवण देणारा ‘घूमरा’, जाणून घ्या कसा आहे चित्रपट


गेल्या काही दिवसांपासून आर बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री सैयमी खेर, अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेता अंगद बेदी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट उद्या १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाची कथा काय आहे? हे जाणून घेऊया…



Source link

पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग

0
पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग


पुणे : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात (transgender) आणण्यासाठी पुण्यात वेगवेगळ्या उपाययोजना सुरु करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेची सुरक्षा 10 तृतीयपंथीयांच्या हाती सोपवल्यानंतर आता पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात तृतीयपंथीय रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड सुरु करण्यात आलं आहे. यामुळे आता ससून रुग्णालायात तृतीयपंथीयांना उपचार घेणं सोपं आणि सुरक्षित होणार आहे. 

या वॉर्डमध्ये 24 बेड आणि दोन अतिरिक्त ICU बेड आहेत. मागील काही दिवसांपासून तृतीयपंथीयांना अनेक आरोग्याच्या समस्या जाणवत असल्याचं समोर आलं होतं. त्यात अनेकदा रुग्णालयात असा स्पेशल वॉर्ड नसल्यामुळे उपचार करण्यासाठी आणि तृतीयपंथीयांना उपचार घेण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या स्पेशल वॉर्डचं अनावरण करण्यात आलं आहे. 

यापूर्वी मुंबईतील सरकारी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात असाच एक वॉर्ड सुरु करण्यात आला होता. तो महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. राज्यभर सुविधेचा विस्तार करण्यासाठी सरकारने समुदायातील सदस्यांना त्यांच्या सूचना आणि अभिप्राय शेअर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता पुण्यातील ससून रुग्णालयात स्पेशल वॉर्ड सुरु करण्यात आला आहे. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथीयांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या स्पेशल वॉर्डची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी असा वेगळा वॉर्ड असेल अशी अपेक्षा आहे. यामुळे तृतीयपंथीयांना सामान्यांच्या रांगेत आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे. 

महापालिकेची सुरक्षा तृतीपंथीयांच्या हाती….

पुणे महापालिकेने सुरक्षारक्षक (Pune News ) म्हणून दहा तृतीयपंथीयांना (Transgender) नोकरीची संधी उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं आहे. तृतीयपंथीयांबद्दलच्या दृष्टिकोनात बदल व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी तनुश्री भोसले ही काही दिवसांपूर्वी शुभम भोसले होती. पण पुढचं आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचं तिनं ठरवलं आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन ती पुरुषाची स्त्री बनली. पण पुढे नोकरीचं काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिचा हा प्रश्न पुणे महापालिकेने सोडवला आहे. तिच्यासारख्या दहा तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक म्हणून काम द्यायचं पुणे महापालिकेने ठरवलं आहे. 

इतर महत्त्वाची बातमी

Pune Transgender Raju Doiphode : शाळेतील मुलं चिडवायचे म्हणून कीर्तन सोडलं… नंतर घर सोडलं; खाकी वर्दीतील नोकरीबरोबर तृतीयपंथी असलेल्या राजूंना आता कीर्तन का करायचंय?



Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिश-ईशाच्या हळदी समारंभाला सुरुवात, देशमुख कुटुंबात संमिश्र वातावरण

0
Aai Kuthe Kay Karte: अनिश-ईशाच्या हळदी समारंभाला सुरुवात, देशमुख कुटुंबात संमिश्र वातावरण



Aai Kuthe Kay Karte Serial Update: एकीकडे विशाखाचा घटस्फोट होत आहे आणि दुसरीकडे ईशाचे सर्वजण विधीवध लग्न लावून देत आहेत.



Source link

Gadar 2: या वर्षातील दुसरा मोठा सिनेमा, जाणून घ्या गदर २ची सहाव्या दिवशीची कमाई

0
Gadar 2: या वर्षातील दुसरा मोठा सिनेमा, जाणून घ्या गदर २ची सहाव्या दिवशीची कमाई


Gadar 2 Box Office Collection Day 6: सध्या बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. चित्रपटाने तर आता २०२३ या वर्षातील कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड केले आहेत. या चित्रपटाने तू झूठी मैं मक्कार, रॉकी और रानी की प्रेम काहानी, आदिपुरुष, किसी का भाई किसी की जान या सर्व चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.



Source link

Pune Fire News : पुण्यातील पीयूष ज्लेलर्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

0
Pune Fire News : पुण्यातील पीयूष ज्लेलर्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वानवडी भागातल्या पीयूष ज्लेवर्समध्ये मध्यरात्री अचानक आग लागली. दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांकडूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं असून त्यानंतर आता परिसराच्या कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. ज्लेसर्सच्या दुकानात लागलेल्या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, लाखो रुपयांची संतत्ती जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.



Source link

Baipan Bhari Deva: बॉलिवूड सिनेमांनां टक्कर देत बाईपण भारी देवाची बक्कळ कमाई

0
Baipan Bhari Deva: बॉलिवूड सिनेमांनां टक्कर देत बाईपण भारी देवाची बक्कळ कमाई


आता तर निर्मात्यांनी सिनेमाच्या तिकीटावर घट करून फक्त १०० रुपये केल्यामुळे दर्शक नव्या जोमाने पुन्हा पुन्हा जावून चित्रपट बघण्याचा आनंद लुटत आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळते.



Source link