Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2828

नवी मुंबईत होणार जागतिक मसाले परिषद, 80 देश होणार सहभागी

0
नवी मुंबईत होणार जागतिक मसाले परिषद, 80 देश होणार सहभागी


World Spices Council 2023 : नवी मुंबईत (Navi Mumbai) 14 व्या जागतिक मसाले परिषदेचं (World Spices Council 2023) आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान ही मसाले परिषद होणार आहे. यंदाच्या जागतिक मसाले परिषदेत स्टेट पॅव्हिलियन्स आणि या उद्योगातील अग्रणींकडून ‘टेक टॉक्स’ अशा अनेक नव्या वैशिष्ट्यांचा पहिल्यांदाच समावेश असणार आहे. ही परिषद मसाल्याचे ग्राहक आणि विक्रेते यांच्यासाठी या क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्याचे, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि मसाल्याच्या व्यापारात सर्वोत्तम पद्धती विकसित करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करेल असे मत भारतीय मसाले बोर्डाचे सचिव डी. सथियन यांनी व्यक्त केले.
 
विविध व्यापार आणि निर्यात मंचांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही जागतिक मसाले परिषद, मसाले क्षेत्रासाठीच्या सर्वात मोठ्या  व्यावसायिक व्यासपीठांपैकी एक आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक अधिकारी, मसाले व्यापार संघटना, सरकारी अधिकारी तसेच जी 20 देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ  सहभागी होणार आहेत. या परिषदेत जागतिक मसाले उद्योगातील सर्व हितधारक एक छत्राखाली येणार असल्याची माहिती डी. सथियन यांनी दिली.

मसाल्यांची बाजारपेठ असलेला भारत आघाडीचा देश

मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये भारत आघाडीचा देश असून, या क्षेत्रामधील अतुलनीय विविधता असलेला देश आहे. उत्पादन क्षेत्रातील शेतकरीच नव्हे तर मसाला क्षेत्र देखील देशाच्या परकीय चलनात महत्त्वाचे योगदान देत आहे. जागतिक मसाले परिषद 2023 ही मसाल्याचे ग्राहक आणि विक्रेते यांच्यासाठी या क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्याचे, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि मसाल्याच्या व्यापारात सर्वोत्तम पद्धती विकसित करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करेल असे सथियन म्हणाले. 

80 देशांनी केली नोंदणी 

दरम्यान, या जागतिक मसाले परिषदेत 800 ते 1000 प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. सुमारे 80 देशांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. आगामी काळात आणखी जास्त आंतरराष्ट्रीय नोंदण्या अपेक्षित आहेत. त्यामुळे या परिषदेत जगभरातील देशांचा सहभाग होईल. जागतिक मसाले परिषद 2023 ही कोविड -19 पश्चात मसाले उद्योगातील सध्याचा कल, उदयोन्मुख आव्हाने आणि यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी हितधारकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात  मसाल्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष व्यावसायिक सत्रे तसेच दुसऱ्या दिवशी आयातदारांसोबत रिव्हर्स बायर सेलर मीट (RBSM) आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या प्रतिष्ठित G20 अध्यक्षतेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत 15-17 सप्टेंबर 2023 दरम्यान 14व्या  जागतिक मसाले परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे जागतिक मसाला व्यापारातील नवनवीन संधी खुल्या होतील. 1990 मध्ये स्थापन जागतिक मसाला परिषदेची स्थापना झाली आहे. या क्षेत्रातील जागतिक दृष्टीकोन एकत्र आणण्याबरोबरच मसाल्यांच्या व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यात यशस्वीपणे योगदान देऊ शकते.

जागतिक मसाले परिषद 2023 ची वैशिष्ट्ये

जागतिक मसाले परिषद 2023 ची संकल्पना, “व्हीजन-2030 : S-P-I-C-E-S (सस्टेनेबिलिटी, प्रॉडक्टिव्हिटी, इनोवेशन, कोलॅबरेशन, एक्सेलन्स ॲन्ड सेफ्टी)” म्हणजेच  शाश्वतता, उत्पादकता, नवोन्मेष, सहकार्य, उत्कृष्टता आणि सुरक्षितता अशी आहे.

जागतिक मसाले परिषद 2023 च्या सत्रांमध्ये पिके आणि बाजार अंदाज व  कल; अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके आणि प्रमाणपत्रे; औषधी, पोषण संबंधी, अभिनव  आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उत्पादनांमध्ये मसाल्यांना वाव आणि संधी; चव वाढवणारे मसाले आणि अन्नपदार्थ; रेडी टू यूझ /कुक / ड्रिंक उत्पादने; स्पाईस ऑइल आणि ओलिओरेसिनसाठी कल आणि संधी, ग्राहकांचे प्राधान्य आणि उदयोन्मुख कल; पुरवठा साखळी व्यवस्थापनातील विश्वासार्हता आणि अखंडता, पॅकेजिंगसंबंधी आंतरराष्ट्रीय आवश्यकता, जागतिक मसाला बाजारपेठेतील कल आणि संधी यावर चर्चा होईल.

जागतिक मसाले परिषद 2023 चा भाग म्हणून मसाले आणि मूल्यवर्धित मसाले उत्पादनांच्या विविध श्रेणी तसेच मसाले उद्योगातील अभिनव तंत्रज्ञान आणि उपाय अधोरेखित करणारे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे. टेक टॉक, नवीन उत्पादनाचे उद्घाटन आणि कुकरी शो ची सत्रे देखील या निमित्ताने होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Benefits of Spices : हळद, आलं, काळी मिरीसह ‘हे’ मसाले औषधी; कोणत्या आजारांवर गुणकारी? जाणून घ्या…



Source link

मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त

0
मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त


मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनाकडून निवडणूक कार्यक्रम  स्थगित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र दहा दिवसाच्या आतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार अर्ज भरण्याची शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 ही अंतिम तारीख होती. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. 

राजकीय पक्ष त्यासोबत विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रम निवडणुकांचा जाहीर झाल्यानंतर त्यानुसार रणनीती आखून तयारी सुद्धा केली आहे. मात्र सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

स्थगितीचे कारण गुलदस्त्यात?

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र, हा निर्णय का घेतला, याची माहिती परिपत्रकात दिली नाही. त्याशिवाय, माध्यमांनाही सांगितले नाही. त्यामुळे या निर्णयावरून चर्चांना उधाण आले आहे. 

विद्यार्थी-युवक संघटनांची टीका

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक असल्याची टीका ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केली आहे. अखेर राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले त्याचा आम्ही युवासेना तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. 

सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांच्या युवा आघाडी आणि विद्यार्थी आघाडीची तयारी नसल्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये आपला पराभव हा निश्चित होणार आहे हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला असल्याचा आरोप छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी केला आहे. 

असा होता निवडणुकीचा कार्यक्रम 

ही निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार होता. 



Source link

Sindhudurg : नगरपंचायत शिवसेना – काँग्रेस आघाडीकडे,  चार पैकी दोन नगरपंचायती मविआकडे

0
Sindhudurg : नगरपंचायत शिवसेना – काँग्रेस आघाडीकडे,  चार पैकी दोन नगरपंचायती मविआकडे



<p>Sindhudurg : नगरपंचायत शिवसेना – काँग्रेस आघाडीकडे,&nbsp; चार पैकी दोन नगरपंचायती मविआकडे</p>



Source link

पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार

0
पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार


मुंबई: राज्यातील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे. आता नाशिकमध्ये गुरूवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी – म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात जप्त करण्यात आले आहेत. 

आज राज्यातल्या विविध ठिकाणी तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. नाशिकमधील म्हसरूळ या ठिकाणी या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयिताचे कोणी साथीदार आहेत का याचाही तपास सुरू आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. याचवेळी परीक्षा केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरत असल्याच दिसताच त्याची पोलिसांकडून अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये आजच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात येऊन म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. सदरचा संशयित हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून परीक्षा केंद्रात तो कोणाला मदत करत होता? त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? अशाप्रकारे काम करणारे एखादे रॅकेट कार्यरत आहे का? याचा पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे.

दरम्यान, नाशिकसोबत नागपूरमध्येही तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आधीच जर राज्याच्या गृहमंत्र्यानी दिशाभूल न करता पेपरफुटीवर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी शाससाने लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

काय म्हणाले रोहित पवार?

तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग सीरियस झाला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावं, ही कळकळीची विनंती!

तलाठी भरती परीक्षा केंद्रवाटपात गोंधळ

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्रांऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचं दिसतंय. परीक्षार्थींना परीक्षेसाठी अर्ज करताना महसूल मंडळातील आपल्या जवळच परीक्षा केंद्र मिळेल असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार झाल्यांच स्पष्ट झालंय. 
 
ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



Source link

Nagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

0
Nagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू


 ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या रोस्टरनुसार, आज ड्युटीवर येण्यापूर्वी कॅप्टन मनोज यांनी अनेक विमानांचे उड्डाण केले. त्याशिवाय,  २७ तासांची विश्रांतीही घेतली. मनोज यांनी बुधवारी, त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटे ३ ते सकाळी ७ दरम्यान विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी २७ तास विश्रांती घेतली. त्यानंतर आज नागपूरहून पुण्याकडे विश्रांतीनंतर पहिलेच उड्डाण होते. अशी माहिती समोर आली आहे.



Source link

नागपूरच्या कन्हान नदीत एका तरुणीसह ४ जण बुडाले, शोध मोहीम सुरु

0
नागपूरच्या कन्हान नदीत एका तरुणीसह ४ जण बुडाले, शोध मोहीम सुरु


विजय ठाकरे, सानिया कोल्हे, अंकुश बघेल आणि अर्पित अशी नदीमध्ये बुडालेल्यांची नावं आहेत. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले चार तरुण बुडाल्याच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने बचाव व शोधकार्य सुरू केले. चारही तरुणांचा पाण्यात शोध घेतला जात आहे.



Source link

महाराष्ट्रात आणखी एका वाघाचा मृत्यू; जानेवारी २०२३ पासून २८ जण ठार

0
महाराष्ट्रात आणखी एका वाघाचा मृत्यू; जानेवारी २०२३ पासून २८ जण ठार


दरम्यान, बुधवारी (१६ ऑगस्ट २०२३) तुमसर वन परिक्षेत्रातील भंडारा वनविभागाच्या शेजारील खंडाळ गावाच्या परिसरात वाघाचे कुजलेले शव आढळून आले. विद्युत शॉकमुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आठ दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. या परिसरात एक संघटित शिकारी टोळी सक्रिय असल्याचा आरोप करण्यात आला. अलीकडील वाघांच्या मृत्यूंपैकी काही जण शिकारीचे बळी ठरले. तुमसरजवळ नुकताच झालेला वाघाचा मृत्यू ही शिकार करणाऱ्यांची कृती नव्हती. परंतु, काही वेळा गावकरी शिकारींच्या संगनमताने वाघाला ठार करण्याची योजना आखतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



Source link

Sharad Pawar: “माझं वय झालं म्हणता पण…”; शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

0
Sharad Pawar: “माझं वय झालं म्हणता पण…”; शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल


माझं सांगण इतकंच आहे की ठीक आहे, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा, पण निदान कोणामुळं आयुष्यात काही मिळालं असेल त्यांच्यामुळं भलं झालेलं असेल तर त्यांच्याप्रती थोडी माणुसकी जरी ठेवायचा प्रयत्न करा आणि असं नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत पवारांनी अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना सुनावलं आहे.



Source link

Ajit Pawar : इथेनॉल बनवणं गरजेचं असं अमित शाह देखील म्हणाले Abp Majha

0
Ajit Pawar : इथेनॉल बनवणं गरजेचं असं अमित शाह देखील म्हणाले Abp Majha



<p>Ajit Pawar : इथेनॉल बनवणं गरजेचं असं अमित शाह देखील म्हणाले Abp Majha</p>



Source link

Beed: शरद पवार यांच्या बीड येथील मेळाव्यास्थळी झळकले अजित पवार यांचे पोस्टर्स

0
Beed: शरद पवार यांच्या बीड येथील मेळाव्यास्थळी झळकले अजित पवार यांचे पोस्टर्स


शरद पवार यांच्या बीडमधील मेळाव्यास्थळी राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी अजित पवार यांचे पोस्टर लावल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून महाविकास आघाडीत गोंधळ सुरु असल्याची चर्चा होती. यावर शरद पवार यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले. आम्ही एकजूट आहे. येत्या ३१ ऑगस्टर आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधीपक्ष इंडियाची पुढील बैठक आयोजित करू, असे शरद पवार म्हणाले.



Source link