Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2827

KBC 15: ऐश्वर्या बच्चन नाही तर ही अभिनेत्री आवडते अमिताभ बच्चन यांना

0
KBC 15: ऐश्वर्या बच्चन नाही तर ही अभिनेत्री आवडते अमिताभ बच्चन यांना


राहुलने त्या कतरिना कैफ ही अभिनेत्री आवडते असे या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सांगितले. नंतर त्याने बिग बींना त्यांची आवडती अभिनेत्री कोणती असा प्रश्न विचारला आहे. त्यावर बिग बींनी ‘तू मला मोठ्या अडचणीत टाकले आहेस. मी ज्याज्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे त्या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. जर मी एका अभिनेत्रीचे नाव घेतले तर काहींना वाईट वाटले. सध्याच्या सर्वच अभिनेत्री उत्कृष्ट आहेत’ असे उत्तर दिले. पुढे राहुल म्हणाला की मला असे वाटते की तुम्हाला अभिनेत्री क्रिती सेनॉन जास्त आवडते कारण तुम्ही तिच्यासोबत डान्स केला होता.



Source link

Territory Trailer: नरभक्षक वाघाचा शोध! ‘टेरिटरी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Territory Trailer: नरभक्षक वाघाचा शोध! ‘टेरिटरी’चा ट्रेलर प्रदर्शित



Territory Trailer: ‘टेरिटरी’ या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



Source link

KBC 15: स्पर्धकाला विचारलेल्या ३ लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

0
KBC 15: स्पर्धकाला विचारलेल्या ३ लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?


१४ ऑगस्ट रोजी कौन बनेगा करोडपतीचे १५वे सिझन सुरु झाले आहे. या शोचे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. यंदाच्या सिझनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ‘ऑडियन्स पोल’ ही लाइफलाइन अॅड करण्यात आली आहे. तसेच डबल डीप ही देखील लाइफलाइन असणार आहे. या लाइफलाइनच्या माध्यमातून स्पर्धकाला दोन प्रश्नांची उत्तरे एकाच वेळी देण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर चुकले तरी दुसरा प्रश्न पर्याय म्हणून असतो. या लाइफलाइनचा वापर केल्यानंतर स्पर्धकाला गेम क्विट करता येत नाही. शिवाय ‘व्हिडीओ कॉल अ फ्रेंड’ ही लाइफलाइन देखील देण्यात आली आहे.



Source link

Gadar 2: सलग ७व्या दिवशी ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, सनीला पाहण्याची चाहत्यांची गर्दी

0
Gadar 2: सलग ७व्या दिवशी ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, सनीला पाहण्याची चाहत्यांची गर्दी


‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचा लगान हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ‘गदर’ आणि ‘लगान’ हे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. यावेळी देखील ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ‘ओएमजी २’ हे चित्रपट आमनेसामने आहेत.



Source link

एक खुनाचा तपास लागतो न लागतो, तोच दुसरा खून घडतोय; नाशिकचं सामाजिक स्वास्थ बिघडतं चाललंय? 

0
एक खुनाचा तपास लागतो न लागतो, तोच दुसरा खून घडतोय; नाशिकचं सामाजिक स्वास्थ बिघडतं चाललंय? 


नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील हत्यासत्र सुरूच असून तीन दिवसांत दोन खुनाच्या (Nashik Crime) घटनांनी शहर हादरले आहे. काही दिवसांपूर्वीच अंबड भागात एकाच दिवशी दोन तरुणांचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना घडली होती. अशातच मंगळवारी होलाराम कॉलनी परिसरात प्रियकराने प्रेयसीला चाकूने भोसकले तर काल 17 ऑगस्ट रोजी सातपूर अंबड लिंक रोड भागात एका वीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

नाशिकसह जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीच्या (crime) घटना घडत असल्याने जिल्ह्याचं वातावरण पूर्णतः बिघडल्याच्या स्थितीत आहे. अशातच शहरात सातत्याने गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या घटना घडत असल्याने नाशिककरांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाल्याचे चित्र आहे. दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. अशातच शहरातील होलाराम कॉलनी परिसरात खुनाची पहिली घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. विवाहित महिलेचा तिच्या प्रियकराने (Love Affair) खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने पाणी न दिल्याने झालेल्या वादातून ही घटना घडली. श्याम अशोक पवार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत 29 वर्षीय विवाहित असलेल्या आरतीचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्याम पवार हा बिगारी काम करत होता तर मृत महिला धुणे भांडी करत होती. मंगळवारी श्याम पवार काम करुन रात्री आठ साडे आठ वाजेच्या सुमारास घरी आला. यावेळेस मुलाकडे त्याने पाणी मागितले. तो खेळत असल्यामुळे त्याने पाणी दिले नाही. त्यामुळे संतापात श्यामने या मुलाच्या मारले. यानंतर श्याम आणि आरतीमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर आरतीने शिवीगाळ करत श्यामला लाथ मारली. त्यानंतर संतप्त झालेल्या श्यामने जवळच पडलेला धारदार सुरा उचलून आरतीच्या पाठीत खुपसला. त्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर, निरीक्षक तुषार आढावू तसेच सहाय्यक निरीक्षक खैरणार, भोये आदींनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत संशयितास अटक केली.

तर दुसऱ्या घटनेत सिडको परिसरातील मयूर केशव दातीर या युवकाची निर्घृण हत्या (Youth Murder) झाल्याची घटना घडली. अंबडच्या स्वामी नगरातील समाज मंदिर परिसरामध्ये हा खून झाला. आठ दिवसापूर्वीच संजीव नगर भागात दोन युवकांचे खून झाले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन प्राणघातक हल्ल्यात झाले. करण कडुसकर, रवी आहेर, मुकेश मगर यांनी धारदार शस्त्राने मयूर दातीर याच्या छाती व पोटावर वार केले. हे घाव वर्मी बसल्याने मयूरचा जागीच मृत्यू झाला. यातील करण कडुसकर याच्यावर खून, घरफोडी सह 18 गुन्हे दाखल आहेत. तर मुकेश मगर याला हद्दपार करून अहमदनगर जिल्ह्यात सोडण्यात आले होते.

कठोर कारवाई गरजेची 

नाशिक शहरात सातत्याने खुनाच्या, मारहाणीच्या, वाहन जाळपोळीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्याचबरोबर रोजच प्राणघातक हल्ल्यानी शहर हादरत आहे. खुनाचे, वाहन तोडफोड जाळपोळच्या घटनांचे सत्र बघून पोलिसांनी यावर धडक मोहीम राबविण्याची गरज आहे. तात्पुरती कारवाईने संशयित धजावत नसल्याचे या घटनांवरून दिसून येते.  मागील तीन दिवसात जिल्ह्यात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने पोलीस प्रशासन हातावर हात धरून बसले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. यातही पोलीस संशयितांना काही दिवसातच ताब्यात घेत असताना घटना मात्र घडतच आहेत, त्यामुळे संबंधित संशयितांना कठोर कारवाई केल्यास कुणी अशा घटना करण्यास धजावणार नाही, मात्र चित्र याउलट असल्याचे दिसते आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Crime : साडूनेच काढला माजी सरपंच साडूचा काटा, सुरगाणा तालुक्यातील घटना, दोघी बहिणींवर वार



Source link

Mumbai Real Estate : मेट्रो सुरू झाल्याने दहिसर-अंधेरीत फ्लॅट महागले; नोकरदार आणि विद्यार्थांच्या खिशाला कात्री

0
Mumbai Real Estate : मेट्रो सुरू झाल्याने दहिसर-अंधेरीत फ्लॅट महागले; नोकरदार आणि विद्यार्थांच्या खिशाला कात्री


मुंबईतील अंधेरी ते दहिसर दरम्यान नव्या मेट्रोमार्गाचं काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलं आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर दोन्ही भागातील नागरिकांना प्रवास करणं सोयीस्कर झालं आहे. त्यामुळं अंधेरी तसेच दहिसर भागातील घरांच्या किंमती झपाट्याने वाढल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी घरांचं भाडं १५ ते २० टक्क्यांनी वाढलं आहे. तर नव्या आणि पुनर्विकास झालेल्या इमारतीत फ्लॅटच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहे. त्यामुळं नवीन घर खरेदी करणाऱ्यांना निश्चित किंमतीपेक्षा आणखी पैसे मोजावे लागणार आहे. मेट्रो लाईनच्या कामामुळं मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी आणि अंधेरी या भागांमधील घरांच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहे.



Source link

Urfi Javed: ‘या’ मुलीला डेट करतेय उर्फी जावेद? किस करतानाचे फोटो व्हायरल

0
Urfi Javed: ‘या’ मुलीला डेट करतेय उर्फी जावेद? किस करतानाचे फोटो व्हायरल


उर्फी जावेद ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जरी चर्चेत असली तरीही ती नेमकी कोणाला डेट करत आहे, याबद्दल कधी खुलासा होऊ शकला नाही. मात्र, नुकताच उर्फी जावेद हिचा एका फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून आता अनेक चर्चा या रंगताना दिसत आहे.



Source link

Nyasa Devgan : ही नेहमी नशेतच असते; न्यासाचा व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल

0
Nyasa Devgan : ही नेहमी नशेतच असते; न्यासाचा व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल


एका यूजरने न्यासाचा हा व्हिडीओ पाहून ‘ही नेहमीच नशेत का असते?’ असे म्हणत ट्रोल केले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘ही तर मद्यधुंद अवस्थेत आहे’ असे म्हणत कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘न्यासा नाही नशा नाव ठेवा हिचे’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर न्यासाला ट्रोल केले जात आहे. दरम्यान, न्यासाने पोपटी रंगाचा टॉप घातला आहे आणि पांढऱ्या रंगाची पँट. त्यावर तिने केस मोकळे ठेवले आहेत. या लूकमध्ये न्यासा सुंदर दिसत आहे.



Source link

Ranvir Shorey: रणवीर शौरीवर आली होती देश सोडून जाण्याची वेळ, जाणून घ्या काय झाले होते

0
Ranvir Shorey: रणवीर शौरीवर आली होती देश सोडून जाण्याची वेळ, जाणून घ्या काय झाले होते


रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट करत बॉलिवूडमधील गडबाजी आणि त्यांच्या वागणूकीमुळे होणाऱ्या त्रासाविषयी माहिती दिली होती. तो म्हणला होती की, “मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही. कारण माझ्याकडे कोणता पुरावा नाही. परंतु, मी या विषयावर बोलतो कारण या सगळ्याचा (गडबाजीचा) अनुभव मी सुद्धा घेतला आहे. एकटं पाडणं, दुषणं लावणं, प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरवणं, याचा अनुभव मी घेतला आहे. २००३-०५ पर्यंत या दोन वर्षात मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. आज ज्यांची नाव समोर येत आहेत, त्याच लोकांनी माझ्यासोबत हे सगळं केलं. परंतु, माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्यासोबत होते म्हणूनच मी या सगळ्यातून बाहेर पडू शकलो. एक काळ असा होता की माझ्याविषयी फार नकारात्मकता पसरवली गेली होती, त्यामुळे माझ्यावर देश सोडण्याचीही वेळ आली होती. तर हा योगायोग होता?- नाही. हे जाणूनबुजून करण्यात आलं होतं”



Source link

Mumbai Local Train : सीएसटीहून सुटणाऱ्या दोन लोकल अचानक रद्द; अनेक रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवाशांची तारांबळ

0
Mumbai Local Train : सीएसटीहून सुटणाऱ्या दोन लोकल अचानक रद्द; अनेक रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवाशांची तारांबळ


कोणत्या लोकल गाड्या रद्द होणार?

सीएसटीहून १२.२८ वाजता ठाण्यासाठी सुटणारी लोकल दोन दिवस रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर सीएसटीहून १२.३१ वाजता कुर्ल्यासाठी सुटणारी लोकल शनिवार आणि रविवारी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळं रात्री उशीरा सीएसटीहून कर्जतला सुटणारी लोकल अखेरची रेल्वे असणार आहे. रेल्वेने गर्डरच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेतल्यानंतर उपनगरीय सेवा रद्द राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय हावडा-सीएसएमटी रेल्वे दादर रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे. तसेच भुवनेश्वर-सीएसएमटी रेल्वे ठाण्यात थांबवण्यात येणार आहे. शालीमार-एलटीटी एक्सप्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी या रेल्वे अर्ध्या तासाच्या उशीराने धावणार आहे.



Source link