Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2747

Tharla Tar Mag: सुभेदारांच्या घरातच रंगणार सायली-अर्जुनची खास डेट; आता तरी प्रेम व्यक्त होईल का?

0
Tharla Tar Mag: सुभेदारांच्या घरातच रंगणार सायली-अर्जुनची खास डेट; आता तरी प्रेम व्यक्त होईल का?

अर्जुन आता सायलीच्या प्रेमात पडला आहे. जगाला दाखवण्यासाठी जरी त्यांनी लग्न केले असले, तरी त्यांच्यात नवरा-बायकोचे नाते नाहीये. सगळ्यांसमोर ते पती-पत्नी म्हणून वावरत असले तरी, खोलीच्या आता मात्र ते एकेमेकापासून एकदम वेगळे आहे. मात्र, आता हे दोघे एकमेकांवरील प्रेमाचा स्वीकार करू शकतील का, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Source link

बैलांची जागा घेतली ट्रॅक्टरनं, भंडाऱ्यात बैलांसह भरला ट्रॅक्टरचा पोळा

0
बैलांची जागा घेतली ट्रॅक्टरनं, भंडाऱ्यात बैलांसह भरला ट्रॅक्टरचा पोळा

Bail pola : शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा (Bail pola). काल राज्यभरात उत्साहत बैलपोळ्याचा सण साजरा झाला. या दिवशी शेतात राबून वर्षभर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलाच्या उपकाराचे पांग फेडलं जातं. दरम्यान, आता आधुनिक पद्धतीनं शेती केली जाते, त्यामुळं बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली आहे. त्यामुळं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी गावात बैलांसह ट्रॅक्टरचाही पोळा मोठ्या उत्साहात भरवण्यात आला.

भंडारा जिल्ह्यात काल दिवसभर कधी मध्यम तर, कधी रिमझिम पावसानं हजेरी लावली. अशा पावसातही तमा नं बाळगता शेतकऱ्यांनी उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला. विदर्भातचं नव्हे तर संपूर्ण देशात पोळा सण साजरा केल्या जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी उत्साहात बैलजोडीची पुजा करुन पोळा सण साजरा करतात. ज्या शेतकऱ्यांकडं बैलजोडी नाही असे शेतकरी, शेतमजूर मातीचे बैल बनवून त्यांची पुजा करुन त्यांना नैवेद्य दाखवून कृतज्ञता व्यक्त करतात.

शेतीच्या कामासाठी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर

अलिकडच्या काळात बैलांची संख्या प्रचंड रोडावली आहे. त्यामुळं शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करायला लागलेत. शेतीच्या कामासाठी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर व्हायला लागला. पोळ्याच्या सणाला बैलजोडीला साजशृंगार करुन गावातील मंदिराजवळ घेऊन जाण्याची प्रथा आहे. मंदिरासमोर आंब्याचे पानांचं तोरण बांधून त्याखाली शेतकऱ्यांनी बैलजोडी उभी करायची, भाविकांनी बैलजोड्यांची पुजा करायची, ज्याला माहिती आहे त्यांनी झडत्या (बिरवे) म्हणायच्या आणि सायंकाळी तोरण तोडून पोळा संपवायचा. त्यानंतर गावातील घरोघरी जाऊन त्यांची पुजा करुन घ्यायची अशी परंपरा सुरु असून आजही ती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्याची प्रथा झाली सुरु

आता आधुनिकतेचा जमाना आला असून अलिकडच्या काळात बैलांची संख्या रोडावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बैलजोडी पोळ्यात घेऊन जाता येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून पोळ्यात सजविलेले ट्रॅक्टर घेऊन जाणे सुरु केले. पवनी येथील चंडिका मंदिर परिसरात सन 2019 मध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला होता. त्यानंतर कोरोना कालावधीत तो बंद झाला. मात्र, पवनीच्या ट्रॅक्टर पोळ्याची नक्कल कन्हाळगाव रस्त्यावरील सेलारी येथे करण्यात आली. तिथं हनुमान मंदीरात ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्यात आला. त्यानंतर सावरला मार्गावरील गुडेगाव येथे ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्याची प्रथा सुरू झाली. ती अद्यापही सुरुच आहे. यावर्षी धानोरी, कोदूर्ली यासह मोहाडी तालुक्यातील सतोना यासह अन्य काही गावांमध्ये बैलजोडी व ट्रॅक्टरचा संयुक्त पोळा भरविण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या:

Bail Pola : बैलांची संख्या घटली, राज्यातील पशुधनाची नेमकी स्थिती काय? वाचा काय म्हणतायेत तज्ज्ञ

Source link

Kishor Kadam: ‘आपण बोलून निघून जायचं..’; सरकारच्या ‘त्या’ कृत्यावर भाष्य करणारी सौमित्र यांची कविता व्हायरल!

0
Kishor Kadam: ‘आपण बोलून निघून जायचं..’; सरकारच्या ‘त्या’ कृत्यावर भाष्य करणारी सौमित्र यांची कविता व्हायरल!

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका सभेदरम्यानचे हेच शब्द माईकमध्ये पकडले गेल्याने, त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मराठा आरक्षणासंबंधित पत्रकार परिषद घेत असताना ‘आपण बोलून मोकळं व्हायचं.. निघून जायचं’ असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता किशोर कदम यांची ही कविता तुफान व्हायर झाली आहे. तुम्ही वाचलीत का ही कविता?

Source link

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आलिशान फार्महाऊसची किंमत माहितीय? घर घेण्याचं कारण सांगताना म्हणाली…

0
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आलिशान फार्महाऊसची किंमत माहितीय? घर घेण्याचं कारण सांगताना म्हणाली…

काहीच दिवसांपूर्वी आपल्या या आलिशान बंगल्याचे फोटो पोस्ट करून तिने संपूर्ण खानदानीमध्ये सगळ्यात मोठं कर्ज घेतल्याचं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या या आलिशान फार्महाऊसची किंमत किती आहे, असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. रिपोर्ट नुसार, तिच्या या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या टुमदार फार्महाऊसची किंमत कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. तर, प्राजक्ताने देखील आपल्या स्वःबळावर कर्ज काढून हे घर विकत घेतले आहे.

Source link

KBC 15: थोडक्यात हुकली शुभम गंगराडेची १ कोटी जिंकण्याची संधी! तुम्हाला माहित आहे का ‘या’ प्रश्नाचं उत्तर?

0
KBC 15: थोडक्यात हुकली शुभम गंगराडेची १ कोटी जिंकण्याची संधी! तुम्हाला माहित आहे का ‘या’ प्रश्नाचं उत्तर?

इंदूरच्या शुभमने अतिशय दमदार खेळी दाखवत ५० लाखांपर्यंत मजल मारली होती. मात्र, या प्रवासात त्याने सगळ्या लाईफलाईन वापरल्या. ५० लाख तर त्याने जिंकलेच होते. मात्र, १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्याने त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशच्या इंदूर शहरातील शुभम गंगराडे हा अनेक स्वप्न उराशी बाळगून या मंचावर आला होता. आपल्या आई-वडिलांसाठी हक्काचं स्वतःचं घर बांधण्यासाठी शुभम प्रचंड मेहनत घेत आहे. यासाठीच त्याने केबीसीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता.

Source link

Kasara Suicide Case : घरच्यांनी लाथाडलं, आयुष्याने छळलं; लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा दुर्दैवी अंत

0
Kasara Suicide Case : घरच्यांनी लाथाडलं, आयुष्याने छळलं; लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा दुर्दैवी अंत

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या सोमनाथ आणि सुजाता यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबियांचा याला विरोध असल्याने दोघे कसारा येथे राहणाऱ्यासाठी आले. भाड्याने खोली घेत दोघांनी कसाऱ्यात राहण्याचा निर्णय घेतला. भाड्याने खोली घेण्यासाठी सोमनाथला मोठा संघर्ष करावा लागला. बॅगा आणि अन्य सामान मित्राच्या घरी ठेवून जोडपं सोबत राहत होतं. सोमनाथ गवंडी काम करत उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे गोळा करत होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून खोली बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. परंतु आतून आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती घरमालकाला दिली.

Source link

Ramya Krishnan Birthday: श्रीदेवीमुळे चमकलं राम्या कृष्णनचं नशीब! ‘शिवगामीदेवी’बद्दल हे माहितीय का?

0
Ramya Krishnan Birthday: श्रीदेवीमुळे चमकलं राम्या कृष्णनचं नशीब! ‘शिवगामीदेवी’बद्दल हे माहितीय का?

‘बाहुबली’ हा चित्रपट राम्या कृष्णनच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. मात्र, ही भूमिका तिच्यासाठी नव्हतीच. या भूमिकेत पहिली पसंती अभिनेत्री श्रीदेवीला देण्यात आली होती. परंतु, श्रीदेवीने जास्त फीची मागणी केल्यामुळे दिग्दर्शक राजामौली यांनी रम्याची या भूमिकेसाठी निवड केली. या चित्रपटाने राम्याला एक नवीन ओळख मिळवून दिली. रम्या कृष्णनने आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रम्या साऊथच्या टीव्ही चॅनलवरही प्रचंड सक्रिय आहे.

Source link

राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

0
राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Rain : सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी (Farmers) चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ भागामध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार

सध्या पावसानं उघडीप दिली आहे. मात्र, पुढील चार चे पाच दिवसात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळं उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मराठवाड्यासह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पावसाचा मोठा खंड

जून महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान मिळालं होतं. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळं पावसाचा मोठा खंड पडला आहे. चालू असलेल्या सप्टेंबर महिन्यात देखील पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे.

पावसाची ओढ शेती पिकांना फटका

शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडला होता. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिकांचे नुकसान हे 50 टक्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर काही भागात शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Solapur : पावसाचा खंड, पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यात 50 टक्क्याहून अधिक पिकांचं नुकसान; सोयाबीनसह तूर आणि मकेला फटका

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत.

राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना

महाराष्ट्र राज्यात अमंली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ड्रग्जला रोखण्यासाठी राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण याचा देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली ही टास्क फोर्स काम करेल

इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस

मुंबई मध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे.या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन.. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक

महायुतीच्या बैठकीचा दुसरा दिवस

महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.सकाळी 9 वाजता, एनएससीआय येथे विभागवार बैठकीतून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात एकाच वेळी दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. 85 रुपयांऐवजी आता 87 रुपये लिटरने दूध मिळणार आहे. चारा आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात 20 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल

देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो.

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधण्यात येत असलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेच्या कार्यान्वित समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. ‘महेंद्रगिरी’ ही MDL ने बांधलेली चौथी युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत सातवी स्टेल्थ फ्रिगेट आहे.

Source link

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात चार ते पाच दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज

0
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात चार ते पाच दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात चार ते पाच दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज

Source link