
Lalbaugcha raja 2023 first look out : पारंपारिक पद्धतीने लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यावेळी शिवाजी महारांजा काळ हा नृत्याविष्कार करुन दाखवण्यात आला.

Lalbaugcha raja 2023 first look out : पारंपारिक पद्धतीने लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यावेळी शिवाजी महारांजा काळ हा नृत्याविष्कार करुन दाखवण्यात आला.

पंढरपूर, सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले.
संभाजीराजे छत्रपती हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्या आघाडीत जायचे याबाबत अजून काहीच ठरवलेले नसल्याचे स्वराज पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले. निवडणुकीच्यावेळी ज्या पद्धतीची समीकरणे बनतील ते पाहून ऐनवेळी आघाडीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.
सध्या राज्यभर दौरे करून पक्षाची ताकद वाढवत असून पक्ष बांधणीची एकच लाईन ठरवली आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने समीकरणे बनतील त्यावेळी कोणत्या आघाडीत जायचे हे ठरवणार असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी राजे माढा लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उत्तर देताना सर्व 48 जागा लढवणार असल्याचे राजेंनी सांगितले.
96 कुळी मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण नको या राणेंच्या वक्तव्यावर कोणतीही टिप्पणी करणे त्यांनी टाळले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत असे सांगत जे आरक्षण देणार असाल ते टिकणारे असावे असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र हा बहुजन समाजाचा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये बहुजनांना आरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांची भूमिका ही सर्व बहुजन समाज एका छताखाली राहावा अशीच होती. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनीही अठरापगड जातींना एकत्रित केले होते. मराठा आणि ओबीसी हे भाऊ असून काही मंडळी हे वातावरण बिघडवत असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. यावेळी स्वराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजीराजे छत्रपती यांनी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दौरे सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी येवला मतदारसंघात सभा घेत राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती.

पुढे तेजश्रीने लिहिले की, ‘इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले..पडले, धडपडले, पुन्हा उठले.. आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं. इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं, ‘मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता. जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मीसाठी, कधी जान्हवीसाठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्तासाठी ढळतो.. आणि हीच जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे. या पुढे ही देत राहील. पुन्हा एकदा… मनापासून आभार. असेच कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी आयुष्य आनंदी आहेचं.’

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विरार ते चर्चगेट या धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाने लोकल डब्याच्या खांबाला पकडून धोकादायक स्टंट करत त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास आरोपीने स्टंट केला असून त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय दररोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत अशा घटना रोखण्याची मागणी केली आहे. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ शेयर करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या चित्रपटाचे ओटीटी राइट्स किती कोटींना विकले गेले, याची माहिती आता समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी ‘जवान’ या चित्रपटाचे ओटीटी अधिकार तब्बल २५० कोटी रुपयांना विकले आहेत. मात्र, अद्याप याविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आता याबद्दल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे म्हटले जात आहे.

अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक कलाकारांना मागे टाकले होते. त्यांनी अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर दिली होती. रंजना यांनी कमी वयातच मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. व्ही. शांताराम यांच्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या १९६५मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘बिनकामाचा नवरा’, ‘सासू वरचढ जावई’, ‘सुशीला’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘असला नवरा नको ग बाई’,’गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ अशा एकापेक्षा एक चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.

<p>किसान संपदा योजनेअंतर्गत मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावितला फायदा करून दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी. हाच परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का?, असा प्रश्न वडेट्टीवारांनी पंतप्रधानांना केला आहे.</p>
Source link

Sara Kahi Tichyasathi 15 September 2023: लंडनमध्ये जन्मलेली आणि तिथेच लहानाची मोठी झालेली ओवी अतिशय मॉर्डन मुलगी आहे. तिच्या राहणीमानावर देखील पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे.

आपल्या नवऱ्यावर इतके गंभीर आरोप का लावले हे विचारण्यासाठी आनंदी योजनाकडे गेली होती. यावेळी योजना आनंदीसमोर एक अट ठेवणार आहे. योजना आनंदीला सांगणार आहे की, ‘तुझ्या नवऱ्याने येऊन माझ्या पायावर नाक घासून माफी मागितली पाहिजे. तरच मी त्याच्यावरचे आरोप मागे घेईन.’ यानंतर आता ननाद खूप विचार करून तिला यासाठी होकार देणार आहे. तर, पोलीस तक्रार करायला जाणाऱ्या राघवला रोखून ती यासाठी राजी करते. आता आनंदीच्या आनंदासाठी राघव देखील तिची ही मागणी मान्य करणार आहे. मात्र, आता आनंदीच्या डोक्यात एक नवी कल्पना येणार आहे.

Marathwada Cabinet Meeting : औरंगाबाद येथे उद्या मंत्री मंडळाची बैठक हॉट आहे. यामुळे उद्या अनेक संघटना मोर्चे काढणार आहे. त्यामुळे उद्या औरंगाबाद शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे.
Source link