Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2745

Marine Drive Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मरीन ड्राईव्हबाबत पालिकेचा मोठा निर्णय

0
Marine Drive Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मरीन ड्राईव्हबाबत पालिकेचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराचा काही महिन्यांपूर्वी दौरा केला होता. त्यावेळी नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुशोभिकरणाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राच्या दिशेकडील इमारतींना विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करावी. प्रसाधनगृहे, स्वच्छतेची काळजी घेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो सुरू करण्याच्या सूचना बीएमसीला केल्या होत्या. परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर मरीन ड्राईव्ह परिसराचं सुशोभिकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

Source link

Marathwada Cabinet Meeting : यंदाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी 40 हजार कोटींचं पॅकेज?

0
Marathwada Cabinet Meeting :  यंदाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी 40 हजार कोटींचं पॅकेज?

Marathwada Cabinet Meeting :  यंदाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी 40 हजार कोटींचं पॅकेज?

 छ. संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक, बैठकीच्या खर्चावरुन विरोधकांचा सरकारवर घणाघात

Source link

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने का डिलिट केले इन्स्टाग्रामवरील फोटो? फक्त ‘या’ दोन पोस्ट ठेवल्या

0
Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने का डिलिट केले इन्स्टाग्रामवरील फोटो? फक्त ‘या’ दोन पोस्ट ठेवल्या

रिंकूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘खिल्लार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. त्यासोबतच तिची १०० डेज ही सीरिज देखील आली होती.

Source link

Abol Pritichi Ajab Kahani: मयुरी आणि यामिनी यांच्यात रंगणार मंगळागौर, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत नवे वळण

0
Abol Pritichi Ajab Kahani: मयुरी आणि यामिनी यांच्यात रंगणार मंगळागौर, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत नवे वळण

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत भाऊसाहेब म्हणजेच बॉडीगार्डच्या वेशात असताना मयूरी म्हणून राजवीरला भेटण्यासाठी मयूरीला तारेवरची कसरत करावी लागते. आता तर मंगळागौरीसाठी बोलावले असल्याने मयूरीला खास मराठमोळ्या पारंपरिक वेशात राजवीरच्या घरी जावे लागणार. या दोन वेगवेगळ्या वेशभूशेतील कसरत मयूरी कशी सांभाळणार? त्यासाठी तिला काय काय युक्त्या कराव्या लागतील? का तिची फाजीती होते? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रविवारी ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेचा महाएपिसोड होणार आहे. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

Source link

भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू, भंडाराजवळील खुर्शिपार येथील घटन

0
भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू, भंडाराजवळील खुर्शिपार येथील घटन

भंडारा : भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने  दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या धडकेमध्ये (Accident) दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडाराजवळील खुर्शिपार येथे शुक्रवार (15 सप्टेंबर) रोजी रात्री घडली. या अपघातातील मृत व्यक्तींमध्ये एका लष्करी जवानाचा देखील समावेश आहे. नागेश्वर बालपांडे (वय 34) ,  हरगोविंद क्षीरसागर (वय 45), विनोद भोंदे (वय 47) असं मृत व्यक्तींची नावे आहेत. नागेश्वर बालपांडे हे बेलगाम इथे भारतीय लष्करात कार्यरक आहेत. तर ते सुट्टीसाठी गावाला आले होते. या अपघातामध्ये चारचाकी वाहनातील दोघेही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर  एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

वाहनांचा वेग जीवघेणा…

या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. यातील  नागेश्वर बालपांडे  हे  सातोना गावामध्ये तर हरगोविंद क्षीरसागर हे पाहुणी आणि विनोद भोंदे हे मोहदुरा या गावामध्ये वास्तव्यास होते. अचानक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. समोरील वाहन हे वेगात असल्याने या तिघेही जण संभ्रमात पडले. त्यामुळे वाहनांचा वेग हा जीवघेणा ठरत असल्याचं चित्र सध्या भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान चारचाकी वाहनाची पोलिसांकडून चौकशी देखील करण्यात येत आहे. तर त्या वाहन चालकांवर देखील आता कोणती कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अपघाताचं सत्र थांबेना

भंडारा जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यामध्ये अनेकांचा नाहक जीव देखील जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील , असा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

काहीच दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यामध्ये एका मुलाच्या खिशातच मोबाईचा स्फोट होऊन तो गंभीर जखमी झाला होता.  भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर परिसरात घडली. या घटनेत चांदपूर येथील 12 वर्षीय प्रीतम किशोर वाघरे हा मुलगा जखमी झाला. मुलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. 

हेही वाचा : 

Marathwada Cabinet Meeting : औरंगाबादकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील बदल पाहा; अन्यथा वाहतूक कोंडीत अडकाल

Source link

निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ, प्रतिमहिना मिळणार ८५ हजार!

0
निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ, प्रतिमहिना मिळणार ८५ हजार!

सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ७० ते ८० हजार रुपये स्टायपेंड दिला जातो. हा स्टायपेंड ते कोणत्या शहरात व मेडिकल कॉलेजमध्ये सेवा देतात, यावरून ठरवला जातो. मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी स्टायपेंटसाठी आंदेलन केले होते. त्यानुसारराज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, सर्व वरिष्ठ निवास डॉक्टरांना एकसमान ८५ हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड दिला जाईल.

Source link

Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? जेव्हा गौतमी पाटील थापतेय चुलीवर भाकऱ्या

0
Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? जेव्हा गौतमी पाटील थापतेय चुलीवर भाकऱ्या

Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? जेव्हा गौतमी पाटील थापतेय चुलीवर भाकऱ्या

Source link

Mumbai University : विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा.. LLM प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून मुदतवाढ

0
Mumbai University : विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा.. LLM प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून मुदतवाढ

LLM admission deadline : मुंबई विद्यापीठाने LLM प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एलएलएम प्रवेशाची मुदत आज (१५ सप्टेंबर) संपणार होती.

Source link

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्या : 15 सप्टेंबर 2023 : ABP Majha

0
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्या : 15 सप्टेंबर 2023 : ABP Majha

<p>Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्या : 15 सप्टेंबर 2023 : ABP Majha</p>

Source link

Palghar : आई की कैदाशीण..! मुलाच्या हव्यासापोटी धक्कादायक कृत्य, पाच दिवसांच्या मुलीचा गळा घोटला

0
Palghar : आई की कैदाशीण..! मुलाच्या हव्यासापोटी धक्कादायक कृत्य, पाच दिवसांच्या मुलीचा गळा घोटला

Palghar Crime News :तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पाच दिवसांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. ही घटना पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरातील घिवली या गावात घडली आहे.

Source link