Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2744

मराठवाड्यातील पहिल्या कॅबिनेटमध्ये 20 धडाकेबाज निर्णय, 59 हजार कोटींची घोषणा

0
मराठवाड्यातील पहिल्या कॅबिनेटमध्ये 20 धडाकेबाज निर्णय, 59 हजार कोटींची घोषणा


छत्रपती संभाजीनगर : तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting)पार पडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नदीजोड प्रकल्पाचा 14 हजार कोटी रुपयांचा निधी वगळून 45 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

राज्य मंत्रिमंडळ बैठक
छत्रपती संभाजीनगर

दिनांक : 16 सप्टेंबर 2023

संक्षिप्त निर्णय

जलसंपदा विभाग

1. मराठवाडयात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. 13 हजार 677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर – पशु संवर्धन विभाग 

2. अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार

3. औरंगाबादला फिरत्या भ्रण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना – ग्रामविकास विभाग 

4. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ – वैद्यकीय शिक्षण विभाग 

5. हिंगोलीत नवीन शासकीय महाविद्यालय. 485 कोटी खर्चास मान्यता

6. राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना 85 हजार रुपये दरमहा मानधन 12.85 कोटी खर्च – वन विभाग 

7. सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार – शालेय शिक्षण विभाग

8.  समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ. 

9. राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय – विधी व न्याय विभाग

10. सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय – कृषी विभाग

11. परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय

12. परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय 

13. परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार

14. सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय

15. नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय – वैद्यकीय शिक्षण 

16. उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा – कौशल्य विकास 

17. जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. १० कोटीस मान्यता – नगर विकास विभाग 

18. गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार – महिला व बाल विकास 
 
19. राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविणार

20. 2005 पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि 2009 मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ

हेही वाचा

CM Eknath Shinde : संजय राऊत म्हणाले पत्रकार परिषदेत मीही प्रश्न विचारणार, शिंदे म्हणाले, ‘राऊत आले नाहीत का?’



Source link

सातारा : पुसेसावळीत बाजारपेठ सुरु, जनजीवन पूर्वपदावर; पोलिस अजूनही तळ ठोकून गावातच 

0


सातारा : जिल्ह्यातील (Satara News) खटाव तालुक्यातील पुसेसावळीत (Pusesawali) दोन गटामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता चार दिवसांनी जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. दहशतीखाली असणाऱ्या पुसेसावळीत जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्याचबरोबर बाजारपेठ पुन्हा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सण तोंडावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अजूनही गावामध्ये तळ ठोकला आहे. 

प्रशासनाच्या आवाहनानंतर संघटनांकडून आजचा मोर्चा रद्द  

दुसरीकडे, पुसेसावळीमध्ये (Pusesawali) झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आज मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासन आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने मोर्चा रद्द झाला. मोर्चाची हाक देण्यात आल्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, जितेंद्र हुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेत गणेशोत्सव तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये, यासाठी मोर्चा काढू नका असं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत मोर्चा रद्द करण्यात आला.

पुसेसावळीत जनजीवन पुर्वपदावर आल्याने व्यापारपेठ सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता रस्त्यांवर गर्दी दिसू लागली आहे. सणांच्या पार्श्‍वभूमीवर शांततेने साजरे करण्याचा निर्णय गावकऱ्यांकडून घेण्यात आला आहे. दुसरीकडे, काही व्यापाऱ्यांनी अजून दुकाने उघडलेली नाहीत. चार दिवसांनंतर महाविद्यालये व शाळा सुरू झाल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांचा तळ अजूनही गावात  

दरम्यान, पुढील काही सणवार असल्याने पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस पुसेसावळीत ठाण मांडून आहेत. पुसेसावळी मोठी बाजारपेठ असल्याने आजूबाजूंच्या गावांचा कायम संपर्क असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील गावातून येणाऱ्यांची संख्या अजूनही तुरळक आहे. त्यामुळे व्यापारपेठेत ग्राहकांची वर्दळ तुरळक प्रमाणात आहे. येत्या काही दिवसात पुसेसावळी बाजारपेठ पूर्ववत होईल, अशी आशा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Mumbai Local Mega Block : कर्जत-बदलापूर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक

0
Mumbai Local Mega Block : कर्जत-बदलापूर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक


कर्जत-बदलापूर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने या मार्गावरील रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं आहे. हैदराबाद-सीएसएमटी अप एक्स्प्रेस, दादर-शिर्डी डाऊन एक्सप्रेस, भुवनेश्वर-सीएसएमटी अप एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम-लोकमान्य टर्मिनल्स या रेल्वे पनवेल-कर्जत मार्गावर वळवण्यात आल्या आहे. याशिवाय या सर्व रेल्वे कल्याण स्टेशनवर थांबणार नाही. ठाणे रेल्वे स्टेशनवर या गाड्या थांबणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुंबईतील लोकल रेल्वेगाड्यांचंही वेळापत्रक या मेगाब्लॉकमुळं कोलमडणार आहे.



Source link

Mumbai Kurla Fire : मुंबईत बहुमजली इमारतीत अग्नितांडव; ५० हून अधिक बचावले, बचावकार्य जारी

0
Mumbai Kurla Fire : मुंबईत बहुमजली इमारतीत अग्नितांडव; ५० हून अधिक बचावले, बचावकार्य जारी


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा कुर्ल्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारतीत अचानक आग लागली. कोहिनूर रुग्णालयासमोर घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांनी जीवाच्या आकांताने घराबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. आगीचे लोळ आणि धुराचे लोट इमारतीतून बाहेर पडू लागताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवांनांनी इमारतीतील ५० लोकांना सुखरुप बाहेर काढलं असून त्यांना किरकोळ इजा झालेली आहे. सर्वांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग कशामुळं लागली, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.



Source link

दिव्य मराठी ब्लॉग: फक्त या 4 समस्या सोडवा, छत्रपती संभाजीनगरवासियांची मुख्यमंत्र्यांना विनंती

0
दिव्य मराठी ब्लॉग: फक्त या 4 समस्या सोडवा, छत्रपती संभाजीनगरवासियांची मुख्यमंत्र्यांना विनंती


  • Marathi News
  • Opinion
  • Chhatrapati Sambhaji Nagar Residents Request Eknath Shinde; Solve Four Problems | Vishwas Kolte

विश्वास कोलते2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असणारे औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर हे शहर आजघडीला असुविधांचे केंद्र झाले आहे. नागरी सुविधा आणि नियोजनाचा अभाव असल्याने शहर व्यवस्थेचा पूर्ण फज्जा उडालेला असून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांपेक्षा छत्रपती संभाजीनगरमधील वास्तव्य आजघडीला महाग झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथली सोशिक जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. मात्र हा टाहो कारभाऱ्यांच्या कानात काही पोचत नाही. जनता सोशिक असल्याने त्यांना याचे काही सोयरसुतक नाही. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या पोकळ आश्वासनांवर जनतेची बोळवण होत आहे.

जनतेच्या तोंडचे पाणी पळवून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात कारभाऱ्यांनी काहीच कसर सोडलेली नाही. आज शहरात मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने किमान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तरी आमचा हा टाहो ऐकतील अन् शहरवासियांना पाणी देण्यासाठी ठोस पावले उचलतील ही अपेक्षा आहे. या बैठकीच्या अनुषंगानेच शहरातील अनेक समस्यांपैकी केवळ 4 प्रमुख नागरी समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी हा लेखप्रपंच करत आहे. नगरविकास आणि नियोजन खात्याचा दीर्घ अनुभव असलेले राज्याचे मुख्यमंत्री याची दखल घेत छत्रपती संभाजीनगरकांचा वनवास संपवतील एवढीच माफक अपेक्षा यामागे आहे.

1. पाणी

छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीप्रश्न हा इथल्या नागरिकांसह राज्यासाठीही नवा नाही. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी भरूनही पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा त्रास इथली जनता सहन करते. शहराच्या जवळच राज्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण आहे. अवघ्या 17 लाख लोकसंख्येच्या शहराला पुरूनही खूप उरेल एवढी धरणाची क्षमता आहे. तरीही दररोज पाणीपुरवठा हे शहरवासियांसाठी आजही एक स्वप्नच ठरले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगरपेक्षा कैकपट जास्त असलेल्या पुणे व मुंबईसारख्या शहरांमध्ये उत्तम नियोजनाद्वारे सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. तुलनेने जास्त लोकसंख्या असूनही या शहरांत जर हे शक्य होत असेल तर मग छत्रपती संभाजीनगरात का शक्य नाही एवढा साधा प्रश्न यानिमित्ताने मनात येतो. यात त्या शहरांतील कारभाऱ्यांचे नियोजन, दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरल्या आहेत. तुलनेने छत्रपती संभाजीनगरला असे दूरदृष्टी ठेवून नियोजन करणारे व प्रबळ इच्छाशक्ती असलेले कारभारी नसल्याचेच यावरून म्हणावे लागत आहे. पुण्यासारख्या शहरात येत्या 20-30 वर्षांत होऊ घातलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच नियोजनासाठी पुढाकार घेत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाचा धडाका आणि काम तडीस नेण्याची हातोटी राज्याला परिचयाची आहे. अशा नेत्यांमुळे शहरांच्या विकासाला गती मिळते. त्यामुळे आता दादांप्रमाणे आमच्या शहरासाठीही कारभाऱ्यांनी पुढाकार घेत पाण्याच्या समस्येपासून शहराला मुक्ती द्यावी एवढीच यानिमित्ताने अपेक्षा आहे.

2. सार्वजनिक वाहतूक, शहर बस

छत्रपती संभाजीनगरमधील दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव. शहराचा विस्तार, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना आजही शहरात भक्कम अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. ही आजची स्थिती नसून गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रासही जनता सहन करते आहे. सध्या शहरात स्मार्ट सिटी बस सुरू आहे, मात्र त्यांची संख्या, वारंवारता अतिशय तोकडी आहे. तसेच शहरातून जास्त प्रवास कराव्या लागणाऱ्या आतील मार्गांवरून या बसेसची सेवा उपलब्ध नाही. दुसरे म्हणजे या बसेसचे तिकिट दरही जवळपास रिक्षा भाड्याइतके आहे. मासिक पासची सुविधाही तितकी स्वस्त नाही. त्यामुळे सिटी बसमध्ये बसणे काय आणि रिक्षाने जाणे काय दोन्ही नागरिकांना सारखेच खर्चिक पडते. त्यामुळे शहरात सिटी बसची संख्या किमान तिपटीने वाढवून मुख्य तसेच आतील मार्गावरून किमान पाच ते सात मिनिटांनी बसेस उपलब्ध व्हाव्या अशा रितीने बसेसचे नियोजन करण्याची अपेक्षा आहे. तिकिट दरही कमी व्हावेत. राजधानी मुंबईत बेस्टचे किमान तिकिट पाच रुपये आहे. त्यामुळे बेस्टच्या धर्तीवर शहर बसचे नियोजन केले जावे एवढी माफक अपेक्षा आहे. दुसरे म्हणजे मीटर रिक्षा. शहरात मीटरनुसार धावणाऱ्या रिक्षा जवळपास नाहीच्या बरोबर आहेत. त्यामुळे यादृष्टीनेही कारभाऱ्यांनी पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

3. वाहतूक नियोजन, पार्किंग

जुने शहर असल्याने आणि नंतरच्या विकासात नियोजनाच्या अभावामुळे आज शहरात अरुंद रस्ते व पार्किंगच्या जागांचा अभाव आहे. त्यामुळे या दृष्टीनेही नियोजनाची गरज आहे.

4. शहरालगत नव्याने विकसित होणाऱ्या वसाहतींचे नियोजन

शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना शहराला लागून असलेल्या भागात झपाट्याने नागरी वसाहती वसत आहेत. मात्र या वसाहतींच्या नियोजनाकडे कुणाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. शहरात बीड बायपास, हर्सूल-सावंगी, जटवाडा रोड, विद्यापीठ परिसर, पैठण रोड अशा परिसरात झपाट्याने नागरी वसाहती वाढल्या आहेत. मात्र या वसाहतींमध्ये नागरी सुविधा, रस्ते, ड्रेनेज, उद्याने, मोकळ्या जागा यांचा अभाव दिसत आहे. भविष्यात यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शहरालगतच्या विस्तारीकरणाचे योग्य नियोजन केले जावे अशी अपेक्षा आहे. याशिवायही इतर अनेक गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. मात्र किमान या प्रमुख 4 गोष्टींचे नियोजन कारभाऱ्यांनी केले, तरी स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेले आमचे शहर स्वराज्यातील आदर्श रयत वसाहत होईल याची आम्हा शहरवासियांना खात्री वाटते.

या तक्रारींकडे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शहराचे कारभारी सकारात्मकतेने बघून यावर उपायांसाठी ठोस नियोजन करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.

आपलाच,

विश्वास कोलते.



Source link

गुजरातला जाणारं अतिरीक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा विचार : अजित पवार

0
गुजरातला जाणारं अतिरीक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा विचार : अजित पवार


Ajit Pawar : राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक मुंख्यमंत्र्यांनी आयोजीत केली आहे. या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात येणारे निर्णय हे मराठवाड्याला (Marathwada) चालना देणारे असतील असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm Ajit Pawar) यांनी केलं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. हा शेवट नाही तर ही सुरुवात असल्याचे अजित पवार म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा दिल्लीत उभा रहावा अशी माझी इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विचार करावा असेही अजित पवार म्हणाले. गुजरातकडे (Gujarat) जाणारं अतिरीक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा आमचा विचार असल्याचे अजित पवार म्हणाले.

विलासराव देशमुख यांच्या काळातही अनेक कामं झाली

महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एक रुपयात पिक विमा सुरु केला आहे. कृषीमंत्र्यांनी सूचना देखील दिल्या असल्याचे अजित पवार म्हणाले.  मराठवाड्यातील सर्व नेत्यांनी मराठवाड्याला न्याय देण्याचा निर्णय घेतला.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काळातही अनेक कामं करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. गुजरातकडे जाणार अतिरीक्त पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल हा आमचा विचार आहे. पालघर आणि ठाण्यातील पाणीही वळवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. नदीजोड प्रकल्पही केले जाणार आहेत. महायुतीच सरकार विकास हाच एकमेव अजेंडा यावरती काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले. 

अनेक विभागांमध्ये तातडीची भरती प्रक्रिया राबवली जाणार

शासनाच्या अनेक विभागांमध्ये तातडीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.  काही विभागात तात्पुरत्या स्वरुपात बाहेरुन कंत्राटी भरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण तात्काळ भरती करता येत नव्हती. मात्र आम्ही सर्वजण कायमची भरती करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधक काहीही मुद्दा काढतात, भडकवण्याच काम करतात. मात्र त्यांना त्यांचं लखलाभ असे अजित पवार म्हणाले. 

मराठवाड्याच्या मातीनं अनेक संत आणि कलाकार दिले

मराठवाड्याला चार मुख्यमंत्री मिळाले. त्यांनी कायापालट करण्याचा प्रयत्न केला. या मातीनं अनेक संत आणि कलाकार दिल्याचे अजित पवार म्हणाले.  
अनेकवेळा पॅकेज दिलं जातं मात्र, त्याचा पाठपुरावा पालकमंत्र्यांनी केला पाहिजे, तरच कामं होतात असे अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये मी तसचं करतो. मराठवाड्यात स्वच्छता केली पाहिजे. बकालपणा नको असे अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या महत्त्वाच्या सूचना; म्हणाले…



Source link

Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ दिवशी असणार शेवटचा भाग

0
Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ दिवशी असणार शेवटचा भाग


अवधूत गुप्ते आणि कार्यक्रमात हजेरी लावणार कलाकार किंवा राजकारणी यांच्यामधील संवाद, मजामस्ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी हे कलाकार दिसले होते. तसेच राज ठाकरे, संजय राऊत, अभिजीत बिचुकले, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.



Source link

Akshaya Naik: ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अक्षया नाईक एका वेगळ्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Akshaya Naik: ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अक्षया नाईक एका वेगळ्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला


अभिनेत्री अक्षया नाईकनं “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या पहिल्यावहिल्या मालिकेने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. तिची मालिकेतील भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. पण आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता अक्षया रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून ती या नाटकात मुख्य भूमिका साकरणार आहे . लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे, नुकतेच या नाटकातील अक्षयाचा लुक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.



Source link

KBC 15: खेळावर आधारित १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

0
KBC 15: खेळावर आधारित १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?


छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम कायमच चर्चेचा विषय ठरतो. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाला नुकताच करोडपती मिळाला. त्यानंतर अनेक स्पर्धक त्यांचे नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच हॉट सीटवर बसलेल्या मेघना यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर १२ लाख ५० हजार रुपये जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या अपयशी ठरल्या. चला पाहूया १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न काय होता.



Source link

OTT Trending: या विकेंडला घरी आहात? मग ओटीटीवरील ‘हे’ सिनेमे नक्की पाहा

0
OTT Trending: या विकेंडला घरी आहात? मग ओटीटीवरील ‘हे’ सिनेमे नक्की पाहा



OTT Trending new series: या आठवड्यात घरीच बसून काही चित्रपट बघण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जाणून घ्या कोणते चित्रपट तुम्हाला पाहाता येणार आहेत.



Source link